AYAAN HIRSI ALI

About Author

Birth Date : 13/11/1969


AYAAN HIRSI ALI IS A SOMALI-BORN DUTCH-AMERICAN ACTIVIST AND FORMER POLITICIAN. SHE IS A CRITIC OF ISLAM AND ADVOCATE FOR THE RIGHTS AND SELF-DETERMINATION OF MUSLIM WOMEN, OPPOSING FORCED MARRIAGE, HONOR KILLING, CHILD MARRIAGE, AND FEMALE GENITAL MUTILATION. WIKIPEDIA

सोमाली येथे जन्मलेल्या अयान हिरसी अली जागतिक कीर्तीच्या लेखिका, निबंधकार आणि राजकीय नेत्याही आहेत. १९९२ मध्ये वडिलांनी ठरवलेले लग्न मान्य नसल्याने त्यांनी घर सोडले आणि नेदरलँड्स येथे आश्रय घेतला. कालांतराने त्यांना नेदरलँड्सचे नागरिकत्व मिळाले. पोलिटिकल सायन्समध्ये डिग्री मिळवल्यानंतर त्यांनी तीन वर्षे डच संसदेत निर्वाचित सदस्य म्हणून काम केले. तेव्हापासून त्या इस्लाममधील एक सक्रिय समीक्षक, स्त्रियांच्या हक्कांसाठी लढणाNया वकील आणि इस्लामच्या पुनर्रचनेसाठी चाललेल्या चळवळीच्या अग्रगणी म्हणून ओळखल्या जातात. रूढी-परंपरागत मुस्लीम धर्मश्रद्धांचा स्वीकार करायला नकार देऊन त्याबद्दल आपले मत स्पष्टपणे व्यक्त करण्याचे धाडस दाखवल्यामुळे त्या कायमच मुस्लीम जहालमतवाद्यांच्या धमक्या आणि हिंसेच्या लक्ष्य ठरल्या. आताचे जातीय आणि धार्मिक ताणतणावांनी भरलेले जग लहान मुलांच्या नजरेतून कसे दिसते, याची एक झलक अयान हिरसी अली यांनी या पुस्तकातून दाखवली आहे. त्यांना अशी आशा आहे की लहान मुलांसाठी लिहिलेल्या या पुस्तकावरून इतरही अनेक लेखक प्रेरणा घेतील. त्या म्हणतात, ``मला माहीत आहे की हे पुस्तक सोपे नाही, पण लहान मुलांची आयुष्यंही सोपी नसतात. लहान वयापासूनच मुलांनी वेगवेगळ्या संस्कृतींबद्दल जाणून घेणे महत्त्वाचे आहे. या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करीत आलो आहोत. माझ्या या पूर्वग्रहातून पुस्तकांनीच मला बाहेर काढले."
Sort by
Show per page
Items 1 to 3 of 3 total
ADAN & EVA Rating Star
Add To Cart INR 80
INFIDEL Rating Star
Add To Cart INR 410
NOMAD Rating Star
Add To Cart INR 280

Latest Reviews

BACKSTAGE
BACKSTAGE by MONTEK SINGH AHLUWALIA Rating Star
श्री. श्रीकांत सातपुते, मुंबई

१ मार्च २०२६ रोजी अर्थतज्ज्ञ माँटेकसिंग अहलुवालिया ह्यांचं चरित्र `बॅकस्टेज` ह्या पुस्तकाचा जी.बी.देशमुख ह्यांनी केलेला मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे ह्यांचेतर्फे प्रकाशित करण्यात आला. ही बातमी कळल्यासरशी त्याच दिवशी शिवाजी पार्क इथल्य पुस्तक प्रदर्शनातून माझ्या कन्येच्या हातून मी हे पुस्तक मागवून घेतलं. सुमारे तिन आठवड्यांच्या अवधित ४५० पानांचं हे अनुवादित पुस्तक वाचून काढलं . अनुवाद एकदम भारी झाला आहे. यात जसं लेखकाचं मनोगत आहे तसंच अनुवाद करणा-याचं सुद्धा मनोगत असायला हवं अशी प्रकाशकांना सुचना करावीशी वाटते. लोकमान्य टिळकांच्या गीता रहस्यानंतर इतक्या मोठ्या आकाराचं पुस्तक मी पहिल्यांदाच वाचलं. हे एक आत्मकथन आहे याची जाणीव पुस्तक वाचताना होती. पुस्तकातील बरेच विषय कानावर असलेले होते व ते स्मृतीत ताजे असल्यामुळे वाचनात चांगलाच रस आला. कुठलिही कटुता व्यक्त न करता पुस्तक/ आत्मकथन कसे असावे याचा हा उत्तम नमुना आहे. पुस्तक छान आहे. माझ्या मित्रमंडळीत तथा नातेवाईकांना हे पुस्तक वाचण्याचा आग्रह जरुर करेन. लवकरच माझ्या शाळकरी मित्रांच्या गृपसाठी एक पोस्ट तयार करून त्यांना हे पुस्तक वाचण्याचे आवाहन करणार आहे. ...Read more

DIARY OF A HOME MINISTER
DIARY OF A HOME MINISTER by ANIL DESHMUKH Rating Star
दिलीप कंकाळ ज़िल्हा महिला व बालविकास अधिकारी से.नि

अनिल देशमुख डायरी ऑफ होम मिनिस्टर कालच वाचून पूर्ण केल. एका प्रामाणिक रांजकीय कार्यकर्त्यास सडलेली सत्ताधारी यंत्रणा किती त्रास देऊ शकते ह्याच जिवंत उदाहरणं हे आत्मकथन आहे. भाषा व मांडणी उत्कृष्ठ आहे. त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करून भावनिक ओझं कमी के असले तरी सनातन्या विरोधातील लढाई आणखी जोमाने लढावी हीच सदिच्छा. ...Read more