AJIT RAJARAM JADHAV

About Author

Birth Date : 10/02/1974


AJIT RAJARAM JADHAV WAS BORN IN KOLHAPUR. IN 1994, HE OBTAINED THE DEGREE OF CIVIL ENGINEER. EDUCATION OF TEMPLE ARCHITECTURE AND MAYAN ARCHITECTURE BY SHILPGURU PADMA BHUSHAN KAI. V. COMPLETED AT GANAPATI, TAMIL NADU.

अजित राजाराम जाधव यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. १९९४ मध्ये यांनी सिव्हील इंजिनिअरची पदवी संपादन केली. टेंपल आर्किटेक्चर व मयॉनिक वास्तुशास्त्राचे शिक्षण शिल्पगुरू पद्मभूषण कै. व्ही. गणपती, तामिळनाडू यांच्याकडे पूर्ण केले. कृष्णमूर्ती ज्योतिषशास्त्र, आधुनिक आर्किटेक्चरल ड्रॉईंग, वास्तुविषयक शास्त्रविधी - वास्तुविधी , ऐश्वर्य संपन्न होण्याचा राजमार्ग - श्रीयंत्र , प्रश्न तुमचे उत्तर शास्त्राचे - असेच का? इ. पुस्तकं प्रकाशित. शास्त्रोक्त स्वर्णपॉलीशयुक्त यंत्रे असा प्राचीन व अर्वाचीनतेचा अभूतपूर्ण संगम असलेला वास्तूशास्त्रावरील एकमेवाद्वितीय - वास्तुअजित ग्रंथ प्रकाशित झाला आहे. १) अथर्ववेदातील वास्तुशास्त्र, अद्भूत मयसभा, सोन्याची लंका, इत्यादी प्राचीन संस्कृत ग्रंथसंपदेवर दैनिक पुढारी या वर्तमान पत्रात अभ्यासपूर्ण लेख प्रकाशित. २) शेतकऱ्यांसाठी वास्तुशास्त्रानुसार गाई-म्हशींचा गोठा, शेळीचा गोठा यावर संशोधनात्मक विषयांवर लेखन. ३) वास्तुशास्त्र व अंकशास्त्र : एक शास्त्रीय मिमांसा, जगातील सर्वांत श्रीमंत श्री पद्मनाभ स्वामी मंदिर, प्राचीन मंदिरातील तळघरांचा भुलभुलय्या, सर्वोच्च देवी शक्तीपीठ कामाख्या मंदिर असे मंदिर निर्माण शास्त्रावर लेखन. याशिवाय विविध दिवाळी अंक, विविध सामाजिक संस्था व न्यूज चॅनेलवर मुलाखती. • अध्यापक : प्राचीन वास्तुशास्त्र, टेंपल आर्किटेक्चर, जोतिषशास्त्र व मंत्रविज्ञान इत्यादी विषयांचा समन्वयावर इंजिनिअरींग व आर्किटेक्चरल कॉलेजमध्ये अतिथी अध्यापक. • वास्तुशास्त्र अ‍ॅन्ड मंत्रविज्ञान रिसर्च फॉउंडेशन तर्फे वास्तुविषयक कार्यशाळेचे आयोजन. • स्टेज शो : वास्तुशास्त्राबद्दलचे समज / गैरसमज यावर प्रकाशझोत टाकणारा कार्यक्रम (प्रश्न तुमचे उत्तर वास्तुशास्त्रज्ञांचे; अर्थात वास्तु ते सुखवास्तू.) • बांधकाम क्षेत्रात अनेक प्रकल्पांचा प्रदीर्घ व समृध्द बांधकाम व्यवसायाचा अनुभव. भारत तसेच परदेशात ज्योतिषशास्त्रानुसार व वास्तुशास्त्रानुसार भवन निर्मितीसाठी अनेकांना सल्ला व अचूक मार्गदर्शन.
Sort by
Show per page
Items 1 to 2 of 2 total
VASTU AJIT Rating Star
Add To Cart INR 895
VASTUSHASTRA COMBO SET-2 BOOKS Rating Star
Add To Cart INR 1115

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
अनिल सहजे, नाशिक.

`कुलामामाच्या देशात’ हे पुस्तक म्हणजे जंगलातील अनुभवकथांचा एक विलक्षण रम्य प्रवास आहे. रवींद्र वानखडे यांच्या वनाधिकारी म्हणूनच्या प्रत्यक्ष अनुभवातून या कथा जन्माला येतात. प्रत्यक्षात घडलेल्या या कथा इतक्या रंगतदार आहेत की त्या काल्पनिक वाटाव्यात, अी त्यांची गंमत आहे. वानखडे यांच्या अनुभवांमधील कथाबीज अचूकपणे हेरून जी. बी. देशमुख यांनी त्यांना आपल्या रसाळ आणि खुमासदार शैलीत शब्दरूप दिले आहे. देशमुखांची शैली इतकी प्रवाही आणि ओघवती आहे की वाचक कथांमध्ये अक्षरशः गुंगून जातो. एकदा पुस्तक हातात घेतल्यानंतर ते पूर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेवावेसे वाटत नाही. वन हे सामान्य माणसासाठी तसे अपरिचितच क्षेत्र. जंगलातील जीवन, तेथील नियम-कायदे आणि जंगली श्वापदांचे विश्व याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. वानखडे-देशमुख द्वयी केवळ या अनोख्या जगाची ओळख करून देत नाहीत, तर त्याविषयी वाचकाच्या मनात विलक्षण कुतूहलही निर्माण करतात. ‘खुश रहेना मेरे यार’ आणि ‘महाकाय आकांत’ या दोन क्रमशः कथा तर विशेषतः चटका लावून जातात. त्या केवळ थरारक आणि अविश्वसनीय वाटाव्या अशा अनुभवांनी भारलेल्या नाहीत, तर जंगली श्वापदांची एक हळवी, माणुसकीच्या जवळ जाणारी बाजूही त्या प्रभावीपणे उलगडून दाखवतात. जी. बी. देशमुखांची खुमासदार, मिश्कील आणि रसाळ लेखनशैली वाचकाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुंतवून ठेवते. रवींद्र वानखडे यांच्या प्रत्यक्ष अनुभवांची सत्यता आणि देशमुखांच्या कथनकौशल्याचा सुंदर मिलाफ ‘कुलामामाच्या देशात’ घडवतो. हे पुस्तक केवळ जंगलातील अनुभवकथांचे संकलन राहत नाही, ते वाचकाला जंगलाच्या एका अनोख्या, रोमांचक आणि हळुवार विश्वाची सफर घडवते आणि नकळत सांगून जाते, ‘वनस्य कथा रम्यः!’ ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
ॲड. प्रशांत यावले, अमरावती

आज "दुर्दम्य" वाचुन पुर्ण झाले. मराठी साहित्याचा एक अप्रतिम अविष्कार. एक व्यक्तीचित्रण पण अत्यंत प्रभावी लेखन. एकाच व्यक्तीचे वेगवेगळे गुण वेगवेगळ्या कलात्मक वर्णनाने ईतक्या समर्थपणे मांडण्याचे कौशल्यपूर्ण लिखाण. शेवटच्या प्रकरणाने ईतक्या कठोर व्यक्तमत्वा बदल देखील भावना चाळवल्या. त्या व्यक्तीचे खरे नाव माहीती असुन देखील पुस्तक वाचुन संपवल्यावर ते आठवतच नव्हते ईतका प्रभाव "एकनाथन"चा राहीला. खुप सुंदर. ...Read more