* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: ANUSUAL
  • Availability : Available
  • Translators : SUPRIYA VAKIL
  • ISBN : 9789353172541
  • Edition : 1
  • Publishing Year : AUGUST 2019
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 164
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
  • Sub Category : MEMOIRS, DIARIES, LETTERS & JOURNALS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
ANUP IS THE STORY OF ANU AGGARWAL, THE DUSKY DELHI GIRL WHO WENT TO BOMBAY AND BECAME AN INTERNATIONAL MODEL, AND THEN A STAR WITH HER VERY FIRST BOLLYWOOD MOVIE, AASHIQUI, ONLY TO CHUCK IT ALL UP AND JOIN A YOGASHRAM.COMING BACK TO BOMBAY, SHE WAS INVOLVED IN A HORRIFYING CAR CRASH THAT PUT HER IN A COMA FOR TWENTY-NINE DAYS. MIRACULOUSLY, THE GIRL WHO BROKE INTO A MILLION PIECES RECOVERED, AND PUT THE PIECES OF HER LIFE BACK TOGETHER, FIRST TAKING SANYAS AND THEN RETURNING TO BOMBAY TO TEACH YOGA. THIS FASCINATING STORY OF A WOMAN`S SELF-DISCOVERY, A NEAR-DEATH EXPERIENCE AND AMAZING RECOVERY IS TOLD IN A STRAIGHT-FROM-THE HEART, UNBUTTONED STYLE, INCLUDING DETAILS OF THE MEN IN HER LIFE, FROM MILLIONAIRE JET-SETTERS TO SUPERYOGIS. IN THE END, AS SHE SAYS, LOVE IS ALL THERE IS.
‘अनू’प ही विलक्षण आत्मकथा आहे अनू अगरवाल यांची. दिल्लीहून मुंबईला आलेल्या अनूचं अल्पावधीतच आंतरराष्ट्रीय मॉडेल बनणं...पहिल्याच `आशिकी` या सुपरडुपरहिट चित्रपटाद्वारे रातोरात `स्टार` बनणं...त्यानंतर ग्लॅमरचा त्याग करून योगाश्रमात राहणं... तिथून मुंबईला परत आल्यानंतर दुर्दैवी कार अपघात होणं... कोमात गेलेल्या आणि छिन्नविच्छिन्न झालेल्या अनू पुन्हा बऱ्या होणं... त्यांनी परत आत्मशोधासाठी सज्ज होणं... संन्यास घेणं आणि त्यानंतर मुंबईत योगाचे धडे द्यायला लागणं... अनू यांच्या आत्मशोधाची... मृत्यूचा उंबरठा शिवण्याच्या अनुभवाची आणि पुन्हा जीवनरसानं फुलणाऱ्या चमत्काराची ही कहाणी.

No Records Found
No Records Found
Keywords
#‘अनूभव #अनूअगरवाल #सुप्रियावकील # आशिकी #रिक #आदित्य #स्वामीग्ली #डॅनियलखिस्तोफर #वेलिंग #लॉरन्ट #पॅट्स #गॅरी #ब्राउन #पॅट्रिक #रॉबर्टो #डॉकार्तिक #सुपरयोगी #तंत्र #ध्यानधारणा #आत्मशोध #कर्मयोगी #अनुफन #योगी #अदम्यजीद्द #धीरूभाईंसम #फाईव्हपॉईंटसमवन #आय डेअर #किनोटजेआरडीटाटा #माझीजीवनयात्रा #मिमलाला #मिसंपातपालगुलाबीसाडीवालीरणरागिणी #सेक्सवर्कर #दलास्टगर्ल #उत्सव #मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक# ANUSUAL #ANU AGGARWAL #SUPRIYAVAKIL #AASHIQUI # RIC #AADITYA #SWAMIGLI #DANIELLE #CHRISTOPHER #WELLING #LAURENT #PATES #GARRY #BROWN #PATRIK #ROBERTO #DRKARTIK #SUPERYOGI #MEDITATION #TANTRA #SELF #DISCOVERY #KARMAYOGI #AGAPETO #ANUFOM #YOGA #ADAMYAJIDDA #DHIRUBHAISM #FIVEPOINTSOMEONE #IDARE #KEYNOTEJRDTATA #MAZIJIVANYATRA #MIMALALA #MISAMPATPALGULABISADIWALIRANARAGINI #SEXWORKER #THELASTGIRL #UTSAV #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
  • Rating StarHemant Latkar

    `अनु` प हे अनु अगरवाल हिचे आत्मचरित्र काळा वर्ण असलेल्या मुलींनी जरूर वाचावे. आशिकी फेम अभिनेत्री. एक साधारण काळा वर्ण असलेली मुलगी माॅडेलच्या झगमगत्या क्षेत्रात चमकते. काही जण रॅम्पवाॅकसाठी नैसर्गिक "माॅडल्स वाॅक" असतात. महेश भट्ट दिग्दर्शित "शिकी" चित्रपटात अनु अगरवाल चमकली. चित्रपटाची कथा एका अनाथ मुलीच्या गायक/गिटारवादक तरूणावरच्या प्रेमावरची रोमान्स कथा आहे. ही मुलगी स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी धडपड करते. या चित्रपटाच्या यशानंतर पिक्चर क्षेत्राच्या झगमगत्या वातावरणाला कंटाळून ती योगशास्त्राकडे वळली. मुंबईतील कार अपघातात तिच्या हाडांचा चक्काचूर होऊन ती कोमात गेली. या अपघातातून सावरल्यावर तिने संन्यासश्रम घेतला. ...Read more

  • Rating Starयशवंत गायकवाड

    अनू अग्रवाल - नव्वदच्या दशकात आषिकी,खलनायिका,क्लाऊड डोअर वगैरे चित्रपटात काम करून चांगल्यापैकी यश संपादन केलेली अभिनेत्री.तिचा राहूल राॅय बरोबरचा "आषिकी तर super-duper hit झाला.M टी.व्ही वरही तिने V.J. म्हणून काम केलेलं.तसंच Modelling क्षेत्रातही आतरराष्ट्रीय दर्जाची Model म्हणून तिनं चांगली प्रसिद्धी मिळवी.आषिकी व खलनायाका तील भुमिकेची तर अमिताभ सारख्या दिग्गज अभिनेत्यानेही तिची प्रशंसा केली होती.कित्येक बाॅलीवूड निर्मात्यांच्या offers तिला मिळाल्या होत्या. एकंदरीत अभिनय क्षेत्रातील तिचं चांगल्यापैकी आकार घेत असतांनाच ती या ग्लॅमरस दुनियेतून दुर गेली.दिल्ली विद्यापीठातून B.A.(Sociology) तर तिनं Gold Medal पटकावलं होतं.समाजशास्त्रात तिनं MBA केलं होतं.थोडक्यात "BEAUTY WITH BRILLIANCE" अशाच दर्जाची ती स्री होती.असं सर्वकाही आलबेल असतांनाही तिनं केवळ आत्मशोधासाठी या सर क्षेत्रातून शिखरावर असतांना संन्यास घेतला. उत्तराखंडात गंगा नदीकाठी वसलेल्या देवगिरीवन येथे स्वामीग्ली यांच्या मार्गदर्शनाखाली तिनं योगविद्या, प्राणायाम( Maditation), मौनसामर्थ्याचं खडतर प्रशिक्षण पूर्ण केलं व जीवनात विरक्ती व त्यागी व संन्यासी व्रुत्ती स्विकारली केवळ आत्मशोध व समाजातील वंचित बालकांचं सांभाळ करण्यासाठी.एवढंच नव्हे तर आर्थिक मोहातून पूर्णपणे बाहर पडण्यासाठी तिनं आपली सर्व संपत्ती विकून समाजकार्यासाठी दान केली व स्वतःहासाठी काहीही ठेवलं नाही. वरील सर्व प्रसंग तिने लिहीलेल्या "Anusual" (Not Unusual) या आत्मकथेत कथन केला आहे.प्रसिद्ध पत्रकार सुमा वर्गीस यांनी तिला अनू या नावावरुनच Anusual (Unpredictable)हे बिरूद प्रदान केलं होतं.तेच नाव तिने आपल्या आत्मकथनाला दिलं.1999 मध्ये तिला भिषण अपघात झाला होता ईतका की मुंबईत Breach Candy Hospital मध्ये सलग 29 दिवस कोमात होती.यिची बरीच हाडे Fracture झालेली होती.तिच्यावर उपचार करणार्या डाॅक्टरानी सुद्धा तिच्या जगण्याच्या आशा सोडून दिलेल्या होत्या पण योगसामर्थाने मिळवलेल दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर ती यातून वाचली.या प्रसंगी सोसलेल्या यातना तिन या पुस्तकात सांगितल्या आहेत.वरील घटनेमुळे तिचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन पूर्णपणे बदलला.तिने Simple life style with mininmum needs स्विकरली. सध्या ती मुंबईत झोपडपट्टीतील एड्सग्रस्त मुलांसाठी काम करते तसंच कच्छमधील ध्यानकेंद्राचं व्यवस्थापनही बघते. "Anusual" मध्ये तिने आपल्या बाॅलीवूड व माॅडेलींग मधील दुनीयेत आलेले बरेवाईट अनूभव तसेच तिच्या वैयक्तीक आलेले देशीविदेशी पुरूष,त्यांच्याशी असलेले संबंध,त्यातील काही जणांनी तिची केलेली फसवणूक व स्वार्थासाठी केलेला वापर त्यांच्याबद्दल कोणतंही किल्मिष न ठेवता तिने खुल्या दिलानं मान्य केलाय.याबद्दल ती कुणालाही दोष देत नाही हे विशेष.योगविद्या शिकत असतांना गुरू स्वामीग्ली यांच्याशी आलेला संबंधही तिनं प्रामाणीकपणे कथन केलायं.थोडक्यात सांगायचं म्हणजे या आत्मकथनात तिने सर्व घटना पारदर्शकतेने (Trancperency) कुठल्याही सामाजिक बंधनाची तमा न बाळगता लिहीलेल्या आहेत.त्यामूळेच ते वाचनीय आहे. सदर आत्मकथनचा मराठीतून स्वैर अनुवाद सुप्रीया वकील यांनी अप्रतीम केला आहे.अगदी चूकवू नये असं काही असंच हे आत्मकथन आहे. अनू अग्रवाल फाऊडेशनसाठी मदत करणयाची ईच्छा असलेल्यांनी खालील संकेतस्थळांवर संपर्क साधावा. यशवंत गायकवाड, पनवेल ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 13-10-1019

    ‘अनू’ची कहाणी... ‘आशिकी’ या सिनेमातून ग्लॅमर इंडस्ट्रीत पदार्पण केलेल्या अनू अगरवाल रातोरात स्टार बनल्या. त्यांचा पहिलाच चित्रपट सुपरडुपर हिट झाला आणि त्यांच्याकडे चित्रपटांची रांग लागली... पण त्यांनी वेगळाच रस्ता शोधला. त्या योगाभ्यासाकडे वळल्या आण त्यांच्या आयुष्याला वेगळेच वळण मिळाले. हा सर्व प्रवास त्यांनी ‘Unusual’ इंग्रजी पुस्तकात उलगडला आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद सुप्रिया वकील यांनी केला असून तो ‘अनू’प या नावाने प्रसिद्ध झाला आहे. या पुस्तकातून आपल्याला अनू अगरवाल यांचे वेगळेच रूप दिसते. उच्च शिक्षित अनूंना समाजकार्याचाही अनुभव आहे. चित्रपटांतील भूमिकांबरोबर ‘सुपरमॉडल’ म्हणूनही त्या प्रसिद्धीच्या झोतात होत्या, त्यानंतर त्या योगाभ्यासाकडे वळल्या, योगाश्रमात राहू लागल्या. त्यानंतर त्यांचा भीषण कार अपघात झाला. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या व कोमात गेल्या. त्यातून बऱ्या होऊन त्या पुन्हा त्यांच्या कामात सक्रिय झाल्या आहेत. या सर्व प्रवासातील तगमग, मन:शांतीचा शोध याबद्दलचे प्रामाणिक व पारदर्शी कथन या पुस्तकात आहे. स्वत:कडे त्रयस्थपणे बघण्याचा त्यांचा अनुभवही आपल्याला वेगळ्या प्रकारच्या वाचानाचा आनंद देतो. सुप्रिया वकील यांनी या पुस्तकात अगदी ओघवता अनुवाद केला आहे. आयुष्य उत्सव आहे व सर्वत्र फक्त प्रेमच आहे असे मानणाऱ्या अनूंचा हा प्रवास वाचकाला वेगळ्याच जगाची सफर घडवतो. –शिवानी वकील ...Read more

  • Rating StarDatta Chavan

    अनू` प वाचतोय, "सर्वत्र फक्त प्रेमच आहे" असं कुणी कसं म्हणू शकतं? हा प्रश्न पडला होता सुरूवातीला. ते कसं याचा प्रत्यय घेतोय पानोपानी. एका ज्ञानवंत सुंदर स्त्रीच्या वाट्याला आलेल्या आयुष्यातील खडतर प्रवासाची आणि तशातही साक्षात मृत्यूच्या उंबरठ्यापरयंत जाऊन घेतलेल्या आत्मशोधाची ही अत्यंत प्रेरक कथा मराठीत आणल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि आभारासह खूप खूप धन्यवाद... .... दत्ता चव्हाण ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
श्रीपाद ब्रह्मे

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं. एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे. सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
प्रभाकर गावंडे, अमरावती

मी विकत घेऊन वाचले आहे हे पुस्तकं, चांगले आहे, नवीन माहिती वाचायला मिळाली.