* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CHEATING DEATH
  • Availability : Available
  • Translators : GAURI GADEKAR
  • ISBN : 9788184989502
  • Edition : 1
  • Publishing Year : JANUARY 2016
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 220
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Print Books:
IN THIS RIVETING BOOK, DR. SANJAY GUPTA--NEUROSURGEON, CHIEF MEDICAL CORRESPONDENT FOR CNN, AND BESTSELLING AUTHOR--CHRONICLES THE ALMOST UNBELIEVABLE SCIENCE THAT HAS MADE THESE SEEMINGLY MIRACULOUS RECOVERIES POSSIBLE. A BOLD NEW BREED OF DOCTORS HAS ACHIEVED AMAZING RESCUES BY REFUSING TO ACCEPT THAT ANY LIFE IS IRRETRIEVABLY LOST. EXTENDED CARDIAC ARREST, "BRAIN DEATH," NOT BREATHING FOR OVER AN HOUR--ALL THESE CONDITIONS USED TO BE CONSIDERED INEVITABLY FATAL, BUT THEY NO LONGER ARE. TODAY, REVOLUTIONARY ADVANCES ARE BLURRING THE TRADITIONAL LINE BETWEEN LIFE AND DEATH IN FASCINATING WAYS. DRAWING ON REAL-LIFE STORIES AND USING HIS UNPRECEDENTED ACCESS TO THE LATEST MEDICAL RESEARCH, DR. GUPTA DRAMATICALLY PRESENTS EXCITING ACCOUNTS OF HOW PIONEERING PHYSICIANS AND RESEARCHERS ARE ALTERING OUR UNDERSTANDING OF HOW THE HUMAN BODY FUNCTIONS WHEN IT COMES TO SURVIVAL--AND WHY MORE AND MORE PATIENTS WHO ONCE WOULD HAVE DIED ARE NOW ALIVE. FROM EXPERIMENTS WITH THERAPEUTIC HYPOTHERMIA TO SAVE COMATOSE STROKE OR HEART ATTACK VICTIMS TO LIFESAVING OPERATIONS IN UTERO TO THE STUDY OF ANIMAL HIBERNATION TO HELP WOUNDED SOLDIERS ON FAR-OFF BATTLEFIELDS, THESE REMARKABLE CASE HISTORIES TRANSFORM AND ENRICH ALL OUR ASSUMPTIONS ABOUT THE TRUE NATURE OF DEATH AND LIFE.
‘अद्याप न जन्मलेल्या बाळाच्या हृदयात प्राणघातक दोष...‘नॉर्वेतील गोठलेल्या तलावात तासभर बुडालेली स्कीअर...डॉक्टरांनी `व्हेजिटेबल` ठरवलेला कोमातील रुग्ण...वीस वर्षांपूर्वी यासर्वांना वाचण्याची आशा नाही म्हणून मृत समजून सोडून दिलं असतं; पण अविश्वसनीय अशा नवीन वैद्यकीय प्रगतीमुळे हे सर्वजण आज जिवंत आणि धडधाकट आहेत. चित्त खिळवून ठेवणा-या या पुस्तकात न्यूरोसर्जन,सीएनएन चे प्रमुख वैद्यकीय बातमीदार आणि लोकप्रिय पुस्तकांचे लेखक डॉ. संजयगुप्ता, हे चमत्कार प्रत्यक्षात आणणा-या असामान्य विज्ञानाचं इतिवृत्त नोंदवतात. जेव्हा मृत्यूपासून बचावकरण्याचा प्रश्न येतो, तेव्हा मानवी शरीर ज्या प्रकारे कार्यकरतं, त्या विषयीच्या आपल्या समजुती, हे अग्रेसर डॉक्टर आणि संशोधक कशा बदलून टाकतात, त्याचे वास्तव जीवनातील केसेस वरआधारित असलेले थरारक वृत्तान्त डॉ. गुप्ता सादर करतात. पूर्वी जे रुग्ण मृत्युमुखी पडण्याची दाट शक्यता होती, त्या रुग्णांचं जिवंत राहाण्याचं प्रमाण दिवसेंदिवस का वाढत आहे, यावर ते प्रकाश पाडतात. पक्षाघात विंवाहृदयविकाराच्या झटक्यानंतर कोमात गेलेल्या रुग्णांना वाचवण्यासाठी च्या रोगनिवारक हायपोथर्मिआच्या प्रयोगापासून ते गर्भाला जीवदान देणा-या शस्त्रक्रिया आणि रणांगणांवरील जखमी सैनिकांना वाचवण्याच्या उद्देशाने करण्यात येणा-या प्राण्यांमधील सुप्तनिद्रेच्या अभ्यासापर्यंतच्या या सर्व विलक्षण गोष्टी वाचून जीवन-मृत्यूच्या वास्तव स्वरूपा विषयीची आपली गृहीतवं पार पालटून जातात.

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #MRUTYUVARMAAT #CHEATINGDEATH #मृत्युवरमात #BIOGRAPHY&TRUESTORIES #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #GAURIGADEKAR #SANJAY GUPTA "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL 12-01-2020

    कधीकधी एखादे पुस्तक किचकट विषयावर भाष्य करणारे असते ... वाचायला रटाळ वाटू शकते मात्र ज्ञानाचे भांडार असते.हे असेच एक पुस्तक.जन्म आणि मृत्यू ह्यात एका श्वासाच अंतर असतं.. असं आपण नेहमी म्हणतो. श्वास बंद झाले, हृदय थांबले की मृत्यू झाला मानले जाते... मत्र जिवंत असणे आणि प्रत्यक्ष मृत्यू ह्यातही बरेच काही असते... मृत म्हणून घोषित केलेल्या अनेक पेशंटला चमत्कृतीपूर्ण पद्धतीने जिवंत केल्याच्या वास्तव घटना आणि संशोधन ह्या पुस्तकात नमूद केले आहे. वैज्ञानिक संशोधनाची, शोधांची आवड असणाऱ्या वाचकांना नक्कीच आवडू शकेल. पुस्तकाची प्रस्तावना आणि मुखपृष्ठ आवडले... :- यशश्री रहाळकर ...Read more

  • Rating StarKiran Borkar

    ऍना बागनहॉम नार्वेतील बर्फाळ शिखरावर स्कीईग करायला गेली आणि अपघातात सापडली .ती बर्फात एक तासांपेक्षा जास्त वेळ अडकली होती . क्लीनिकली ती मृत होती . माईक मर्ट्झ एका शाळेत बस ड्रायव्हर होता .एका अपघातात सापडला आणि त्याचे हृद बंद झाले . अफगाणिस्तानाती खिंडीत डोंगरात जखमी झालेल्याना भर युद्धात वैद्यकीय मदत कशी मिळेल. भरपूर रक्तस्त्राव होऊनही तो सैनिक कसा वाचेल??? त्याचे हृदयातचे ठोके थांबवून परत चालू करता येतील का ???? अजून त्या बाळाचा जन्मही झाला नाही पण त्याच्या हृदयात प्राणघातक दोष आहे . डॉक्टरांनी आशा सोडलेला कोमातील रुग्ण केवळ हृदयाचे ठोके बंद पडले आणि श्वास थांबला म्हणजे माणूस मृत झाला नाही . काही वर्षांपूर्वी अश्या रुग्णाची आशा डॉक्टरांनी सोडून दिली असती .पण नवीन वैद्यकीय संशोधनामुळे आज हे जिवंत आहेत तर धडधाकट ही आहेत . लेखक प्रसिद्ध न्यूरो सर्जन आणि लेखक डॉ. संजय गुप्ता विज्ञानाचा आधार घेऊन हे चमत्कार नोंदवतात . जेव्हा मृत्यू जवळ येतो तेव्हा मानवी शरीराची आत काय हालचाल सुरू असते ते सर्व आपल्याला हे डॉक्टर सांगतात. ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA 03-04-2016

    ‘अद्याप न जन्मलेल्या बाळाच्या हृदयात प्राणघातक दोष...’ ‘नॉर्वेतील गोठलेल्या तलावात तासभर बुडालेली स्कीअर...’ ‘डॉक्टरांनी व्हेजिटेबल’ ठरवलेला कोमातील रुग्ण... ‘वीस वर्षांपूर्वी या सर्वांना वाचवण्याची आशा नाही म्हणून मृत समजून सोडून दिलं असतं; पण अविशवसनीय अशा नवीन वैद्यकीय प्रगतीमुळे हे सर्वजण आज जिवंत आणि धटधाकट आहेत. चित्त खिळवून ठेवणाऱ्या या पुस्तकात न्यूरोसर्जन, सीएनएनचे प्रमुख वैद्यकीय बातमीदार आणि लोकप्रिय पुस्तकांचे लेखक डॉ. संजय गुप्ता, हे चमत्कार प्रत्यक्षात आणणाऱ्या असामान्य विज्ञानाचं इतिवृत्त नोंदवतात. जेव्हा मृत्यूपासून बचाव करण्याचा प्रश्न येतो, तेव्हा मानवी शरीर ज्या प्रकारे कार्य करतं, त्या विषयीच्या आपल्या समजुती हे अग्रेसर डॉक्टर आणि संशोधक कशा बदलून टाकतात, त्याचे वास्तव जीवनातील केसेसवर आधारीत असलेले थरारक वृत्तांत डॉ. गुप्ता सादर करतात. ...Read more

  • Rating StarTARUN BHARAT BELGAO 20-03-2016

    मृत्यूला चकवा दिलेल्या रुग्णांच्या कथा संजय गुप्ता एम. डी. असून ‘न्यूरोसर्जन’ म्हणून प्रक्टिस करतात. शिवाय अ‍ॅटलांटामधील ‘एमरी युनिव्हर्सिटी हॉस्पिटल’मध्ये ते साहाय्यक प्राध्यापक आहेत. सीएनएन आणि सीबीएसवरील कार्यक्रमातही त्यांच मोठं योगदान आहे. २००६मध्ये त्यांच्या आरोग्यविषयक रिपोटर्सना तीन पारितोषिके मिळाली. या व्यतिरिक्त ‘एमी’ ‘पीचडी’ आणि ‘द ड्यूपॉन्ट’ पारितोषिके मिळाली. २००४ मध्ये अ‍ॅटलांटा प्रेस क्लबने डॉ. गुप्तांना ‘जर्नलिस्ट ऑफ द इयर’ म्हणून गौरवलं. ‘द नॅशनल हेल्थकेअर कम्युनिकेटर्स’चं ‘गोल्ड अ‍ॅवॉर्ड’ आणि ‘द इंटरनॅशनल हेल्थ अँड मेडिकल मीडीआ’’चं ‘फेडी’ नावाचं पारितोषिकही त्यांना मिळालं आहे. ‘चेसिंग लाइफ’या त्यांच्या पहिल्या पुस्तकाला न्यूयॉर्क टाइम्सच्या ‘सर्वाधिक खपाच्या पुस्तका’च्या यादीत स्थान मिळालं आहे. डॉ. गुप्ता ‘द अमेरिकन असोसिएशन ऑफ न्यूरॉलॉजिकल सर्जन्स,’ ‘काँग्रेस ऑफ न्यूरॉलॉजिकल सर्जन्स’, ‘द कौन्सिल ऑफ फॉरिन रिलेशन्स’ अशा अनेक संघटनांचे सदस्य आहेत. डॉ. संजय गुप्ता ‘द लान्स आर्मस्ट्राँग फाऊंडेशन’चे बोर्ड सदस्य आहेत. ‘मृत्यूवर मात’ हे ‘चीटिंग डेथ’ या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे. प्रतिकूल परिस्थितीशी झगडून रुग्णांची आयुष्य वाचवणारे डॉक्टर आणि त्यांचे वैद्यकीय चमत्कार’ पुस्तकात वाचायला मिळतात. हृदयाची धडधड थांबते, तो अंत नसतो. खरंतर ती फक्त संकटाची नांदी असते, असं आढळून आले आहे की, जीवन आणि मृत्यू हे फक्त काळ्या आणि पांढऱ्या रंगांच चित्र नाही. त्या दोन्ही रंगांच्यामध्ये एक करडा रंगही असतो. एक पुसटसा तटस्थ प्रदेश. तिथे माणूस धड मेलेलाही नसतो की, धड जिवंतही नसतो. यावर ताबा मिळवून मृत्यूला चकवण्यासाठी प्रथम आपल्याला ती प्रक्रिया समजून घेतली पाहिजे. मृत्यूविषयी मृत किंवा जिवंत अशा ठाम शब्दांत विचार करायची आपल्याला सवय आहे. मॉनिटरवर वर खाली होणाऱ्या रेषा सपाट होतात. जीवन निसटून जायला काही मिनिटांचा कालावधीही पुरेसा आहे. हृदयाचे टोके थांबले की रक्तप्रवाह थांबतो. दोन मिनिटातच सगळं मंदावत. गंमत म्हणजे शरीराच्या आत चाललेल्या या प्रचंड उलथापालथीची आपल्याला जाणीवही नसते. रक्ता अभावी तडफडणारा, पहिला अवयव म्हणजे मेंदू, प्राणवायू अभावी दहा सेकंदातच मेंदूचे काम थंडावते. आकुंचन - प्रसरण बंद होते. अवयव ढासळू लागतात. मूत्रपिंडांच रक्त शुद्धीकरणाचे कार्य थांबते. शरीरातील पेशीमध्ये रासायनिक प्रक्रियांची गुंतागुंतीची शृंखला सुरू होते आणि त्यात त्या पेशी बळी पडतात. मरणाची प्रक्रिया ही अशी आहे. आपल्या हातात आहे, खळबळजनक आणि झपाट्याने बदलत चाललेल्या विज्ञानाच्या क्षेत्राचा शोध घेणारं, रोमांचक वैद्यकीय कहाण्यांच पुस्तक. याच्या पाना-पानातून जाणवेल. जीवन आणि मृत्यूमधील बारीकशी सीमारेषा आणि भेटतील सीमारेषेच्या अलिकडे रोग्यांना थोपवून धरण्यासाठी जीवाचं रान करणारे डॉक्टर. या सीमारेषेवर ‘तळ्यात-मळ्यात’ करून आलेल्या लोकांनी पाहिलेले- ऐकलेले त्यांचे अनुभव वाचून त्या सीमेविषयी अधिक माहिती मिळेल. आश्चर्यकारक आव्हानं स्वीकारणाऱ्या शास्त्रज्ञांशीही आपला परिचय होतो. आपल्याला अजून सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळालेली नसली, तरी कधी ना कधी ती नक्कीच मिळतील, असा विश्वास बाळगणारं निग्रही, आद्य संशोधक खरोखरच आशावादी आहेत. अगदी गर्भाशयापासून ते पार मृत्यूशय्येपर्यंत, जीवन मरणाच्या आपल्या समजाला छेद देणारे आधुनिक विज्ञानाचे असंख्य मार्ग या पुस्तकात आढळतील. लक्षात येईल की, आरंभरेषा आणि समाप्तिरेषा या काळ्या दगडावरील रेषा नसतात. त्या वाळूवर काढलेल्या रेषा असतात. वैद्यकीय ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रत्येक नव्या लाटेबरोबर त्या सरकत जातात. मृत्यूला जाणून घ्यायच्या आणि त्याला पुढे ढकलायचा मार्ग शोधण्याच्या या प्रवासात आपण जीवन आणि त्या पलीकडे जे काही आहे ते याच्यामधल्या करड्या, तटस्थ प्रदेशाचा थांग लावण्याचा प्रयत्न करणार आहोत. पुस्तकातील निवेदन ८ भागात आहे. १. हिमडॉक्टर्स, २. हृदय थांबण्याचा क्षण, ३. अविश्वासाला स्थगिती, ४. मृत्यूच्या पलीकडे, ५. दो गज जमीन के नीचे, ६. मृत्यूला चकवा गर्भाशयातच, ७. काय हा चमत्कार, ८. वेगळा दिवस. ‘अद्याप न जन्मलेल्या बाळाच्या हृदयात प्राणघातक दोष,’ नार्वेतील गोठवलेल्या तलावात तासभर बुडालेली स्कीअर ‘डॉक्टरांनी व्हेजिटेबल’ ठरवलेला कोमातील रुग्ण...’ वीस वर्षांपूर्वी या सर्वांना वाचण्याची आशा नाही म्हणून मृत समजून सोडून दिलं असतं; पण अविश्वसनीय अशा नवीन वैद्यकीय प्रगतीमुळे हे सर्व जण आज जिवंत आणि धडधाकट आहेत. चित्त खिळवून ठेवणाऱ्या या पुस्तकात न्यूरोसर्जन, सीएनएन चे प्रमुख वैद्यकीय बातमीदार आणि लोकप्रिय पुस्तकांचे लेखक डॉ. संजय गुप्ता हे चमत्कार प्रत्यक्षात आणणाऱ्या असामान्य विज्ञानाचं इतिवृत्त नोंदवतात. जेव्हा मृत्यूपासून बचाव करण्याचा प्रश्न येतो, तेव्हा मानवी शरीर ज्या प्रकारे कार्य करतं, त्याविषयीच्या आपल्या समजुती हे अग्रेसर डॉक्टर आणि संशोधक कशा बदलून टाकतात, त्याचे वास्तव जीवनातील केसेसवर आधारित असलेले थरारक वृत्तांत प्रत्यक्ष पुस्तकातच वाचणे उचित होईल. परीक्षणाच्या सीमारेषेत त्याला बांधणे अशक्यच नाही तर असंभवही आहे. अनुवादाचे काम अगदी उचित व योग्यच झालेले आहे. कुठेही वाचताना अडचण जाणवत नाही. शास्त्रीय संज्ञांचे सुबोध विवेचन आढळते. मृत्यूवर मात! ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BHARTIYA GANIKA
BHARTIYA GANIKA by DR.S.R. DESHPANDE Rating Star
डॉ. शुचिता नांदापूरकर-फडके

मंडळी, कालच्या ऱ्हासचक्रानंतर मी विचार करत होते की आज काय? पुस्तकं तर काही वाचून ठेवली होती (म्हणजे वाचली आणि ठेवून दिली बाजूला... अक्षरशः). आत्ताची समोर आहेत ती. कदाचित त्यातलं एखादं उद्या घेईन. मध्ये अचानक या पुस्तकाची जाहिरात वाचली, अगदी गेल्या ठवड्यातली गोष्ट. उत्सुकता चाळवली. समूहात काहीतरी आगळं वेगळं पुस्तक घ्यावं हा विचार सतत मनात असतोच. तसं पुस्तक घरी येताच (जय amazon) चाळायला म्हणून बसले, आणि काय सांगू, हातात मार्कर कधी आलं, मी खुणा कधी केल्या, पुस्तक कधी संपलं... कळलंच नाही. एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगते... प्रेयर पुस्तकाला तुम्ही जो भरघोस प्रतिसाद दिलात, अनेकांनी ते विकत घेण्याचा विचार केला तेव्हाच सांगायचं होतं, पण राहिलं. ओळख करून दिलेलं पुस्तक पूर्णपणे वाचनीय असतं असं नाही. त्याचा बरचसं भाग बोजड असतो. पण ते नाही का, डेटिंगच्या काळात मुलगा मुलगी स्वतःमधलं केवळ उत्तम ते दाखवतात, तसं मला प्रेयर बद्दल वाटलं. आय मीन प्रेयर पुस्तकाबद्दल वाटलं आणि गणिका या पुस्तकाबद्दल मला नेमकं तेच वाटत आहे. ========== ‘भारतीय कामशिल्प’ या पुस्तकाचं लेखन करत असताना प्राचीन भारताच्या समाजजीवनाची माहिती देणारे अनेक संदर्भग्रंथ वाचण्यात येऊन लेखकांची उत्सुकता चाळवली गेली आणि जेव्हा या विषयावर मराठीत एकही परिपूर्ण संदर्भग्रंथ नाही हे लक्षात आलं, तेव्हा त्यांनी स्वतःच या पुस्तकाचं लेखन मनावर घेतलं. केवळ सनसनाटी विषय सवंगपणे हाताळला आहे असं कुठेही वाटत नाही. अतिशय अभ्यासपूर्वक लेखन आहे. सोबत जोडलेली संदर्भग्रंथांची यादी (एकूण संख्या ६४) पुरेशी आहे. गणिका आणि उर्वरित श्रेणी या शरीरविक्रय करतात, हा वैश्विक व्यवसाय आहे. कैक काळापासून या व्यवसायाला मान्यता मिळाली आहे आणि त्याची आवश्यकता वाटली आहे. प्राचीन काळात भारतीय गणिका यांना एक संस्कृती आणि दर्जा होता. नीतीनियम होते, ते पाळावे लागत होते. पुस्तकाची प्रकरणं – प्रास्ताविक, विदेशी गणिका, भारतीय साहित्यातील गणिका, गणिकेची प्रशिक्षण व वर्णन, गानिकांची वेशभूषा, सौंदर्यप्रसाधने, विट, गणिकामाता, प्रियकराचा राग-रंग, कथांविषयी थोडेसे आणि कथा (या शेवटच्या प्रकरणात एकूण १३ कथा आहेत – अगदी सुरस आणि चमत्कारिक वाटाव्यात अशा, त्यांचा परिचय मी देणार....... नाही.) प्रास्ताविक – (नऊ पानांचं प्रकरण) कुटुंब किंवा विवाहसंस्था कधी आकाराला आले हे नक्की सांगता येत नसलं तरी स्त्री-पुरुष शरीरसंबंध हे आदिम असून ते पशु – पक्ष्यांप्रमाणेच जनन हेतुस्तव नैसर्गिक होते आणि राहतील. फलन हे स्त्रीदेहामध्ये होतं या जाणीवेतून तिला आदरस्थान प्राप्त झालं. सर्जनाची गूढ शक्ती धारण करणारी ती आदिमाया/माता/ अद्याशक्ती होय. जवळपास प्रत्येक धर्मात प्रजा, पशु आणि धान्य समृद्धीसाठी सुफलता विधी आहेत. भारतीय हिंदू धर्म शास्त्रीय ग्रंथांतून स्त्री पवित्र्याच्या कथा वाचायला मिळतात. पतीला परमेश्वर मानलं जाई. त्याही काळात गणिका हा व्यवसाय होता आणि त्याकडे सहिष्णू वृत्तीने पाहिलं जाई.राजे महाराजे त्यांचे पोशिंदे असतं. शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रिया तिरस्काराला पात्र असत, पण गणिका नाही. त्यांना नगर भूषण, नगर अलंकार, नाग्त रत्न मानलं जाई. प्रसंगी, राजे त्यांचा सल्ला घेत. त्या बहुश्रुत असतं चौसष्ट कलांत पारंगत असतं. संभाषणचतुर, हुशार, समंजस, उदार, योग्य आदर राखणाऱ्या, विनयशील आणि अनुपम सौंदर्यवती असत. एखाद्या गणिकेमुळे त्या राज्याची कीर्ती वाढत असे. धार्मिक समारंभ, सामाजिक कार्यक्रम (विविध झुंजी, शर्यती), करमणुकीचे कार्यक्रम (जलक्रीडा, वनविहार), रंगमंचावर अभिनय, अशा नानाविध ठिकाणी त्यांची ठळक उपस्थिती असे. रथारूढ अथवा सिंहासनाधिष्ठ राजाला वारा घालणे, चवरी ढाळणे, छत्र धरणे अशी कामं त्या करत. त्यांच्याशी संबंध ठेवणं समाजमान्य होतं. प्रतिष्ठितांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन व्यापक, अगत्यशील आणि स्नेहिल होता. मात्र, त्यांना कडक आणि कठोर नियम पालन करावे लागे.विजयनगर साम्राज्याच्या अस्तानंतर ते पेशवाई संपेपर्यंतच्या काळात, मोगल राजवट येऊन गेली, ब्रिटीश वसवतवादाचा प्रसार सुरू झाला, समाज व्यवस्था बदलली, गणिका संस्कृतीला ओहोटी लागली. ब्रिटीशांचा अंमल सुरू झाल्यावर गणिका संस्था नष्ट होऊन वेश्या व्यवसाय वाढीला लागला. यामागे औद्योगिक क्रांती हे एक कारण आहे. वेश्यागमन निंद्य कृत्य मानलं जाऊ लागलं. तरुण अधिकाधिक सुशिक्षित होऊ लागला तसा शरीरसंबंधांपायी स्वास्थ्य गमवावं लागलं तर काय, हा विचार थोडाफार मूळ धरू लागला. आणि या शौकाची आसक्ती कमी झाली. चरितार्थाकरता पैसे मिळवण्यासाठी वेश्याव्यवसाय हादेखील विश्वसनीय आर्थिक व्यवसाय मानण्यात यावा असा निकाल १९११मध्ये युरोपियन न्यायालयाने दिला. विदेशी गणिका – (२७) बहुतेक सर्व प्राचीन संस्कृतीत गणिकांचे पुरावे मिळतात. इजिप्त, बबिलोन, सिरीया, फिनिशिया, ही काही उदाहरणं. ग्रीस, इटली, भारत इथे त्यांना विशिष्ट दर्जा प्राप्त झाला. त्यांचेही प्रकार होते, सामान्य वेश्या अलेत्रय्डी, आणि सर्वोच्च म्हणजे हेटीअरा (या शब्दाचा अर्थ सोबती). काही हेटीअरा वादविवादपटू होत्या. क्लेप्सीड्रा हिच्या वक्तशीरपणामुळे तिला ते नाव मिळालं होतं त्याचा अर्थ जलघटिकापात्र असा होतो. थीओफ्रत्स याने इ.पू. ३७२ – २८७ या काळात ‘ऑन मरेज’ हा ग्रंथ लिहिला, याचा सविस्तर अभ्यास करून लिओंटीयम या हेटीअराने त्यावर प्रगल्भ टीका लिहिली. रोमन समाजात कोर्टीझन अस्तित्वात होत्या. पॉम्पेई इथे व्हिकोली बाल्कोन पन्सिली नावाच्या इमारतीत शेकडो रमणी वास करत. या संदर्भातली रतिक्रिडेची मूळ चित्रं पॉम्पेईन wall paintings म्हणून प्रसिद्ध असून ती इटलीच्या वस्तुसंग्रहालयात सुरक्षित आहेत. रोमन साम्राज्यात हेटीअरा ऐवजी कोर्टीझन शब्द रूढ झाला. युरोपात पंधरा-अठरा शतकांत कोर्टीझन आणि कलावंतीण यांना समाजात विशिष्ट स्थान आणि आदर मिळत होता. फ्रान्समध्ये सतराव्या शतकात रमणींची सत्कारगृहं (सलो) प्रसिद्ध होती. जपानमध्ये गै (कलात्मक क्षमता) आणि शा (व्यक्ती) यावरून गैशा ही संज्ञा रूढ झाली. त्यांच्यात अलंकारिक सुरावट, सौजन्य, निष्कपट, सुसंस्कृतपण असे. बाराव्या शतकापासून कार्यरत असलेली ही प्रथा इडो काळात (इ.स.१६००-१८६८) अधिक वाढीला लागली. ओकिया ही त्यांची निवासस्थानं होत. विसाव्या शतकात त्यांचं वर्चस्व राजकीय क्षेत्रात वाढीला लागलं. १९२०-३० मध्ये त्यांची संख्या साधारण ८० हजार होती, ती १९७०-८० दम्यान १७ हजार इतकीच उरली आहे. चीनमध्ये पूर्वी पीकिंग (बीजिंग) इथे सिंगसॉंग हाउस हा भाग राखीव होता. शांघाय इथे अत्यंत विलासी वारांगना गृहं आहेत. सिंगापूरमध्येगिटार गर्ल्स (पीपाचाई) या नावाने त्या ओळखल्या जातात. पाकिस्तानात त्या तवायफ, कान्जारी आणि गश्ती नावाने ओळखल्या जातात. आज मात्र सर्वत्र आमुलाग्र बदल झाला आहे. भारतीय साहित्यातील गणिका – (३२) संस्कृत, प्राकृत, पाळी भाषांत, हिंदू, बौद्ध, जैन वान्ग्मयात, त्यांचा उल्लेख आढळतो. त्या वैदिक काळात भारतात होत्या हे काही ऋचांवरून समजतं. (ऋचा १.१६७.४ – अनेक पुरुषांशी सांग करणारी ती साधारणी). पंचचुडा अप्सरेपासून त्यांची उत्पत्ती झाली असं मानतात. महाभारत काळात त्यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली. (राज, नागरी, गुप्त, देव आणि ब्रह्म असे पाच प्रकार होते). रामायणात फार स्थान नव्हतं. अमरकोश, महाभाष्य, वार्त्तिके, दशरूपक, कौटिलीय अर्थशास्त्र जातक कथा, पंचतंत्र, वेताळकथा, शुकबहात्तरी, गाथासप्तशती, अशा विविध ग्रंथांत त्यांचा उल्लेख आहे. कामसूत्र या ग्रंथात वात्सायनाने ‘वैशिक’ या प्रकरणात त्यांची माहिती दिली आहे. कथासरीत्सागर, राजतरंगिणी, शृंगारतिलक, सरस्वतीकंठभरणा, कलाविलास, मेघदूत, मृच्छकटिक, रत्नावली, नागानंदा, अशा नाटकांतून त्यांचा उल्लेख येतो. भारतात इ.पू. पहिल्या सहस्रकात ती प्रथा अस्तित्वात येऊन ब्रिटीशांच्या आगमनानंतर एकोणिसाव्या शतकात लोप पावली असावी असं समजलं जातं. गणिकेची प्रशिक्षण व वर्णन – (१६) गणिकेला बालपण जवळपास नव्हतच. वयाच्या सहा-सात वर्षापासून तिला घडवायला सुरुवात होत असे. त्यांच्या प्रशिक्षणात आचार, विचार, शिष्टाचार, विविध कला, खेळ, भाषा, वर्तन, सौंदर्यवर्धन, गायन, वादन, नृत्य, अलंकरण, शरीर सौष्ठव, बुद्धिवर्धन अशा प्रत्येक अंगाचा व्यापक विचार होता. काही हस्तकला शिकाव्या लागत. पाककला, सुगंधी द्रव्य निर्मिती, कामशास्त्र, प्रणायाराधन, हिकाव्म लागे. स्वसंरक्षण शिकावं लागे. गणिकांची वेशभूषा, सौंदर्यप्रसाधने – (५) आधीच्या प्रशिक्षणात हाही एक महत्त्वाचा भाग होता. विट – (७) हा शब्द मी पहिल्यांदाच ऐकला. त्याचा इथे दिलेला अर्थ – शृंगाररस नायकानुचराप्रमाणे संपत्तीचा भोग न घेणारा किंवा जो आपल्या पैशाचा वापर कधी करत नाही, असं नाटकातलं लबाड, धूर्त पात्र. गणिका संस्थेत त्याच्या जोडीने वयस्य, अनुचर, धूर्त आणि डिंडिक ही पुरुष पात्र वावरतात. प्रतिवेशिनी ही गणिकेची शेजारीण. ती विश्वासातली. ती गणिकेसाठी विट आणि प्रियकर यांच्याशी संवाद साधते. गणिकामाता – (७) हे पात्र फार महत्त्वाच. तिला संरक्षित स्त्री, कुट्टनी किंवा कुट्टीनी म्हटलं जाई. तिचं काम शिस्त राखणे, थोडक्यात रेक्टर. कामकुजानांना आळा घालणं, गणिकांना खऱ्या प्रेमापासून वंचित ठेवणं. कामुकांचं मानसशास्त्र तिला मुखोद्गत. पुरुषांच्या गुणदोषाच्या’ आधारे अचूक आडाखे बांधत ती गणिकेला सल्ला देता. तिचा दबदबा असतो. ते नसती तर गणिका ही संस्था कधीच नामशेष झाली असती. कारण स्त्रिया या स्त्रिया असल्याने स्त्रीसुलभ भावनेनुसार गणिकागिरीत न रमता त्या केव्हाच संसाराला लागल्या असत्या. प्रियकराचा राग-रंग – (९) रग हे बारा छटांमधली काम आसक्ती असं म्हणता येईल. पुरुषाची मनोवृत्ती, प्रवृत्ती, स्वभाव, गुणविशेष आणि खास करून राग-लोभ जाणून घेत गणिकेला त्याच्याशी वर्तन करावे लागते. कथांविषयी थोडेसे आणि कथा (४८) – ‘शृंगारमंजरीकथा’ हा राजा भोज रचित संस्कृत ग्रंथ असून त्यात स्त्री-पुरुष मनोवृत्ती दर्शन घडवणाऱ्या तेरा कथा आहेत. त्यापैकी काही जीर्ण, काही अपूर्ण आहेत. पैकी एक कथा वाचून दाखवते. संदर्भग्रंथ (४) सोबत फोटो दिले आहेत त्या पानांचे. या पुस्तकात आढळलेले सुंदर शब्द – गरती, लीलासहचारी, पृथुल (अर्थ कळला नाही अजून), रूपाजीवा, सूरसुंदरी परिचय फार लांबला. या विषयावरच्या इतक्या अभ्यासानंतर एखादा पेपर सहज देता येईल. परत अभिमानाने म्हणता येईल, ‘मा, मै फर्स्ट क्लास फर्स्ट आया!’ मनापासून धन्यवाद. माझी परिचय पाळी नसती तर मी हे पुस्तक वाचलंच नसतं. मजा आली मला वाचताना. तशी तुम्हालाही आली असेल अशी खात्री आहे. थांबते. ...Read more

RESHIMREGHA
RESHIMREGHA by SHANTA J SHELAKE Rating Star
मीना कश्यप शाह

शांता शेळके या कवयित्री म्हणून आपल्या सर्वांच्या माहितीच्या आहेतच. गीतकार म्हणूनही त्यांचे मोठे नाव झाले. रेशीमरेघा हे त्यांनी रचलेल्या गीतांचे पुस्तक. मुख्यतः त्यांनी चित्रपट आणि नाटक यासाठी गीते लिहिली आहेत. प्रस्तावनेत शांताबाई म्हणतात, गीते लििणे त्यांना अतिशय आकर्षक वाटत गेले आणि म्हणून केवळ चित्रपट आणि नाटकांसाठीच नाही, तर स्वानंदासाठीही, त्या गीतं लिहित राहिल्या. चालीवर गीते लिहिणे त्यांना आव्हानात्मक वाटायचे, बंधनकारक नाही. पुढे बंगाली, गुजराती अशा काही गीतांच्या चाली आवडल्या, तर त्या, त्या चालींवरही छंद म्हणून गीते लिहू लागल्या. त्यांच्या गीतांमध्ये लावण्या, गवळणी, नृत्यगीते आणि युगुलगीते (त्यांनी द्वंद्वगीते हा शब्द वापरला आहे, जो मला आवडत नाही) जास्त आहेत. ह्या पुस्तकात त्यांचे संकलन आढळून येतं. पुस्तकातील काही गीतांपेक्षा मला त्यांची प्रस्तावनाच जास्त आवडली. आपल्या गीतांबद्दल त्यांनी हळुवार होत लिहिलं आहे. प्रत्येक गाणं ध्वनिमुद्रीत होतानाचे क्षण त्यांना आठवतात. आणि ही गीतं प्रसिद्ध होण्यासाठी संगीतकार, गायक यांचा हातभार नक्कीच आहे याची त्या आठवण काढतात. गीतांचा अर्थ रसिकांपर्यंत पूर्णपणे पोहोचवण्यासाठी गायक-गायिकांचा खूपच मोठा वाटा आहे, त्यांच्याबद्दल त्या अपार कृतज्ञता व्यक्त करतात. हे पुस्तक त्यांनी लावणेसम्राज्ञी यमुनाबाईंना अर्पित केलेले आहे. त्यान्नी लिहिलेल्या "रेशमाच्या रेघांनी" या सर्वात जास्त प्रसिद्ध पावलेल्या लावणीच्या नावावर ह्या पुस्तकाचे नाव आधारित आहे. अनेक प्रसिद्ध गाणी या गीत संग्रहात आढळतात. रेशमाच्या रेघांनी, काय बाई सांगू, मनाच्या धुंदीत लहरीत, हे श्यामसुंदर, राजसा, शालू हिरवा पाच नि मरवा, चाल तुरू तुरू, मनाच्या धुंदीत लहरीत येना आणि अशी अनेक. शांताबाईंचं काव्य सामर्थ्य ह्या लावण्या/गीतांमध्ये देखील दिसून येतं... कळ्या आजच्या, शिळ्या उद्याला, ओठांशी न्याल का, आल्यावर जवळ मला घ्याल का.... अशी अनेक उदाहरणं! पुस्तकातील बहुतेक गाणी ही लावण्यांच्या स्वरूपातली आहेत. त्यामुळे त्याच त्याच भावना सारख्या सारख्या आढळून येतात. बोलावणे किंवा नको जाऊ म्हणणे, भेटी (गिफ्ट्स) घेणे, वाट पाहणे, विरह, सौंदर्याचे वर्णन, शृंगाराचे वर्णन, म्हणजे तुम्हाला काय मिळू शकेल याची कल्पना गीतातून देणे (उदा. कंबरपट्टा रेखून दावी, देहाचा आकार!!) अशा प्रकारचे विषय पुन्हा पुन्हा येत राहतात, पण (शांताबाई बीइंग शांताबाई) कुठेच तोचतोचपणा कंटाळवाणा होत नाही (वाचकाने जरा रोमँटिकपणा दाखवून वाचली ही गीतं तर फारच बहार!) शांताबाई नथ फारच आवडते असं दिसतं... नथ सर्जाची नाकी घालता हसेल डावा गाल किंवा सलगी करते नथ ओठांशी, तो तुमचा अधिकार अशा प्रकारे ती खुलून देखील दिसते ह्या गीतांमधे!! अनेकविध लावण्या आहेत ह्या पुस्तकात. पाडव्याची, रंगपंचमीची, श्रावणाची, अशा विविध दिवसांच्या लावण्या तर हिरव्या रंगाची लावणी देखील आहे. पाडव्याची लावणी म्हणजे पाडव्याला शालू मागते आहे, कारण ती रात्री एकांतात उभारणार आहे. 🙂 "मी सुंदर आहे तर आता मी काय करू?" अशी तक्रारही दिसून येते. "माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा" सांगणारीला स्वतःच्या सौंदर्याची पुरेपूर जाणीव आहे आणि त्यापेक्षाही, फक्त शारीरिक सौंदर्यावर विसंबून न राहता, त्याबरोबर तोरा दाखवत भुरळ पाडणे ह्यात ती माहीर आहे. पण त्याचबरोबर ती धोक्याची सूचना पण देते आहे... घटकाभर संग बसून घालवा वेळ, जमल्यास मनांचा जमून येईल मेळ, नाहीतर यायचा अंगाशी हा खेळ, पाय टाकण्याआधी इथे, विचार पुरता करा, माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा!! एका लावणीत एका पुरुषाने फसवलंय अशा स्त्रीचे रूप आहे. जत्रेत एक जण भेटला आणि त्याने आपल्याशी फ्लर्ट केलं, जत्रा उलगडल्यावर दुसऱ्या दिवशी मात्र तो डोळ्याला डोळा भिडवत नाही, तोंड चुकवून पुढे जातो, ह्याची तक्रार ह्या लावणीत येते. किती विविधता! अशा लावणी कलाकाराच्या आयुष्याचं विदारक दृश्य देखील शांताबाईंनी दाखवले आहे. तिथे येणारा आज एक, तर उद्या दुसराही असू शकेल किंवा तिथे असणारी आज एक, तर उद्या दुसरीही असू शकेल. हे सांगून त्या म्हणतात... प्रीतीचे नीतीचे व्यर्थ सांगणे, भुकेल्या देहाचे सारे मागणे, जन्माच्या नात्याचे फुका बहाणे, कुणाला सतत इथे राहणे? इथल्या महाली घडीची वस्ती, सुखाचे हिंदोळे आभाळी चढती, घडीत वरती घडीत खालती ऐन विशीतल्या स्त्रीचं सौंदर्याचं अत्युत्तम वर्णन एका गीतात केलं आहे. अनेक गीतांमध्ये पुरुषांनी स्त्रीच्या देहाचे आणि मनाचे केलेले वर्णन दिसून येते. त्यातही नुसता देहच नाही तर स्त्रीचा तोरा (attitude) देखील पुरुषाला कशी भुरळ पाडतो हे दिसतच. "ही चाल तुरुतुरु" आपल्या सगळ्यांच्या आवडीचे आणि माहितीचे आहे. असंच "मनाच्या धुंदीत लहरीत ये ना" हे देखील. गीतांमध्ये श्रावण, पाऊस, विरह, वाट बघणे हे सर्व हमखास येतं. एक गीत आहे "लहरी सजण कुणी दावा" - मीना खडीकर यांचे संगीत, उषा मंगेशकर यांचा आवाज. हे गीत मला ना वाचायला आवडलं ना ऐकायला आवडलं 🫣 श्रीकृष्ण राधेच्या कथा तर आपण गवळणींमधे अनेक वेळा ऐकल्या आहेत. कृष्णाची धून ऐकल्यानंतर अगदी काहीही न सुचता तशीच्या तशी निघालेली राधा! त्यातही तिच्या शृंगारचं वर्णन येतंच. सजण्याची आवड असलेल्या स्त्रीचे वर्णन अतिशय खुबीने शांताबाईंनी केले आहे. मला स्वतःला नटण्या मुरडण्याची अतिशय हौस असल्यामुळे हे सगळं वर्णन वाचून, "हे पुस्तक आपण आधी का नाही वाचलं" याचं दुःख मात्र झालं. ही उदाहरणं बघा ना... माथ्यावर मोतियाची जाळी, भांगेत मोती सर, चंद्रकोर भाळी, कानात झुमके, केसांमध्ये वेल, नाकात नथ, नथित हिरे, बिल्वदळे, वज्रटिक, `बोलताना पाठीवर जिचे रेशमाचे गोंडे खालीवर होतील अशी` पाच पदरी मोहन माळ!! दंडात वाकी रुताव्या, शिंदेशाही तोडे असावेत आणि पायी सांध्यात सोनसळी, गळ्यात तन्मणी, कमरेला कंबरपट्टा, पायी पैंजण.... "शालू हिरवा, पाच नि मरवा, वेणी तीपेडी घाला" हे गीत तर फारच प्रसिद्ध झाले. शृंगार आणि सौंदर्य यांचे वर्णन या सगळ्या गीतांमध्ये अगदी खुलून आलेलं आहे. आणि प्रेम! त्याविषयी किती लिहावं आणि कशाप्रकारे लिहावं असा मोठाच प्रश्न पडला आहे. तरीही एका स्त्रीच्या मनाने वाचलेल्या ह्या चार ओळी लिहीतेच... काय वाजले प्रिय ते पाऊल, तो तर वारा तिची न चाहूल, भास हो फसवा वरचेवरी, शोधितो राधेला श्रीहरी!! ...Read more