ARON RALSTON

About Author

Birth Date : 27/10/1975


ARON LEE RALSTON (BORN OCTOBER 27, 1975) IS AN AMERICAN OUTDOORSMAN, MECHANICAL ENGINEER AND MOTIVATIONAL SPEAKER KNOWN FOR SURVIVING A CANYONEERING ACCIDENT BY CUTTING OFF HIS OWN ARM. DURING A SOLO DESCENT OF BLUE JOHN CANYON IN SOUTHEASTERN UTAH HE DISLODGED A BOULDER WHICH PINNED HIS RIGHT WRIST TO THE SIDE OF THE CANYON WALL. AFTER SIX DAYS HE WAS ABLE TO AMPUTATE HIS FOREARM WITH A DULL POCKETKNIFE MAKE HIS WAY THROUGH THE REST OF THE CANYON, RAPPEL DOWN A 65-FOOT 20 M. DROP, AND HIKE 7 MILES 11 KM TO SAFETY. THE INCIDENT IS DOCUMENTED IN RALSTONS AUTOBIOGRAPHY BETWEEN A ROCK AND A HARD PLACE AND IS THE SUBJECT OF THE 2010 FILM 127 HOURSWHERE HE IS PORTRAYED BY JAMES FRANCO. AFTER THE ACCIDENT HE CONTINUED MOUNTAINEERING AND BECAME THE FIRST PERSON TO ASCEND ALL OF COLORADOS FOURTEENERS SOLO IN WINTER

अ‍ॅरन ली रॉल्स्टन यांचा जन्म २७ ऑक्टोबर १९७५ ला ओहिओ येथे झाला आहे. पुढे जाऊन सुप्रसिद्ध कार्नेजी मेलन महाविद्यालयातून अभियांत्रिकी विषयामध्ये पदवी घेतली. हे एक अमेरिकन अभियंता असून, ते गिर्यारोहण, रॅपलिंग,स्कीईंग इत्यादी साहसी खेळांमध्येही निपुण आहे. इंटेल कंपनीमधली आपली नोकरी सोडून, साहसी खेळांची आवड पूर्णपणे जोपसण्यासाठी अ‍ॅरन कोलारॅडो येथील अ‍ॅस्पेनमध्ये कायमस्वरूपी स्थित झाला. २००३ साली, उताह येथील ब्लू जॉन खिंडीमध्ये गिर्यारोहण करत असताना, अ‍ॅरन भयंकर अपघात झाला. खिंडीच्या भिंतीमध्ये आणि वरून घरंगळत आलेल्या अजस्त्र दगडामध्ये त्याचा उजवा हात अडकला. पाच दिवस, सात तास त्या अवस्थेत खिंडीमध्ये अडकून राहिल्यानंतर आणि सुटकेचे सगळे मार्ग असफल ठरल्यानंतर, अ‍ॅरनने निरतिशय मनोधैर्य दाखवून, स्वतःचा हात कापून आपला जीव वाचवला. त्याच्या ह्या साहसी अनुभवाबद्दल पुढे अ‍ॅरनचं खूप कौतुक झालं. १२७ अवर्स: बिटवीन अ रॉक अँड अ हार्ड प्लेस हे त्याचं आत्मचरित्र चांगलंच गाजलं आणि पुढे २०१० साली त्यावर, डॅनी बायलने दिग्दर्शित केलेला १२७ अवर्स हा चित्रपटसुद्धा निघाला. अपघातानंतर त्याला कृत्रिम हात बसवला गेला. त्या हातानिशी, अ‍ॅसनने लागलीच २००४ साली साहसीखेळ खेळायला सुरुवात केली. त्याच्या ह्या अचाट शौर्याबद्दल अ‍ॅरनचं अजूनच कौतुक झालं आणि त्यानंतर त्याला आपल्या अनुभवावर बेतलेल्या प्रेरणादायी भाषणं देण्याची आमंत्रणं येऊ लागली. त्यानुसार अ‍ॅरन प्रेरणादायी वक्ता म्हणूनही प्रसिद्ध झाला आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
TE 127 TAS Rating Star
Add To Cart INR 360

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
तुषार साखरे, अमरावती

“दुर्दम्य”, केंद्रीय उत्पाद व सीमा शुल्क विभागातील सेवेत असलेल्या एका अतिशय प्रामाणिक, कडक व आपल्या तत्वांशी कधीही तडजोड न करणाऱ्या दमदार अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारीत सुंदर अस व्यक्तिचित्रण. दुसऱ्याचे दोन रुपये चाळीस पैसे देण्यासाठी स्वतःचे शंभर ुपये खर्च करायची तयारी ठेऊन दाखवलेला प्रामाणिकपणा असो अथवा “गमतीदार हेकेखोरी” मध्ये “पंख्याच्या असमान गतीमुळे कागद उडाले, त्यात माझी चूक नाही” अस म्हणून, आपलंच खर करणाऱ्या एकनाथनचं वास्तव रूप लेखकाने यशस्वीपणे वाचकांसमोर मांडले. “बदललेला भूगोल” वाचताना चंदूभाऊ पवारांचा हजरजबाबीपणा आणि त्यावर एकनाथन ची प्रतिक्रिया... लाजवाब. विशेष म्हणजे अमरावती करांच्या बिनधास्त आणि बेधडक स्वभावाचे चित्रण यातून दिसून आले. “जीवघेणी मस्करी”, “नैतिक दबाव”, “मजेदार प्रायश्चित्त”, “नवीन तंत्रज्ञानाचे झेंगट”, “उच्चाधिकाऱ्यांमध्ये दहशत”, “मनाचा मोठेपणा” व “एकटा जीव” या व इतर प्रत्येक कथेतून एकनाथनच्या स्वभावाचे विविघ पैलू वाचताना मजा आली. “पॉर्न चित्रपटाची पटकथा” यातील चौकीदार बायको पोरांसहित एकनाथनच्या चेंबर मध्ये एसी लावून झोपल्याचा प्रसंग तर अप्रतिम. वाघाचं काळीज असलेल्या एकनाथनच्या व्यक्तिमत्वाच हुबेहूब चित्रण करण्यात जी.बी.देशमुख नक्कीच यशस्वी झाले. म्हणूनच “दहा करोडात एक” असा उल्लेख करूनही त्यात कुठेच अतिशयोक्ती वाटत नाही याच श्रेय लेखकाच्या लेखन शैलीला नक्कीच द्यावे लागेल. जी.बी.देशमुख म्हणजे विदर्भाच्या साहित्याच्या खाणीत गवसलेला हीरा व त्याच मोल जाणणारे मेहता पब्लिशिंग म्हणजे उत्तम समीकरण. जी.बी.देशमुख यांचा “महारुद्र” पासून सुरु झालेला साहित्य प्रवास अविरत राहो. त्यांच्या लेखन प्रवासास सदिच्छा. ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
हेमंत कान्हे, अमरावती.

जी.बी.देशमुख ह्यांच्याद्वारे लिखित `दुर्दम्य` हे पुस्तक सत्य घटनांवर प्रस्तुत केलं गेलं असून, मनोगत तसेच संपूर्ण पुस्तक वाचतांना अंगावर अक्षरशः काटा उभा राहतो. एकंदरीत हे पुस्तक जबरदस्त आहे. लेखकाच्या लेखनक्षमते विषयी लिहावं तेवढं कमीच आहे. लेखकासह्या साहित्य कृतीकरीता मनापासून सॅल्युट. ...Read more