SUNITA DEOSTHALI

About Author

Birth Date : 29/10/1956


SUNITA DEOSTHALI, NEE HEGDE WAS BORN IN VADODARA ON 29TH OCTOBER, 1956 WHERE SHE COMPLETED HER SCHOOLING AND HIGHER EDUCATION AS WELL. AFTER GRADUATING IN PSYCHOLOGY FROM MAHARAJA SAYAJIRAO UNIVERSITY, SHE PURSUED HER B.ED. DEGREE. SHE ALSO COMPLETED M.A (HINDI) FROM GUJARAT UNIVERSITY AS HINDI LANGUAGE FASCINATED HER. SHE STARTED HER CAREER AS A HINDI TEACHER AND THEN WENT ON TO WORK IN A NATIONALIZED BANK FOR 26 YEARS. AS A CHILD, CREATIVE WRITING WAS HER FAVORITE PASTIME. RIGHTLY SO, SHE HAS BEEN AWARDED MANY PRIZES FOR THE SHORT-STORY COMPETITIONS HELD AS A PART OF THE ANNUAL LITERATURE ASSEMBLY HELD IN VADODARA. HER CAREER AS AN AUTHOR TOOK A LEAP AFTER SHE OPTED FOR VOLUNTARY RETIREMENT FROM HER BANK JOB IN 2006. STORY WRITING WAS HER MOST LOVED AREA OF WRITING. HER FIRST SHORT STORY “DUDHAVARCHI SAAY” GOT SELECTED TO BE PRINTED IN THE DIWALI SPECIAL ISSUE OF “MAHER” MAGAZINE PUBLISHED BY MENAKA PRAKASHAN. SOON MANY SHORT STORIES AUTHORED BY HER WERE PUBLISHED IN WELL-KNOWN MAGAZINES SUCH AS MAHER, MAZI VAHINI, PRUTHA, SAMATOL, ANNAPURNA AND SO ON. SUNITA MAM WAS GIVEN FIRST PRIZE IN 2008 BY “SNEH PUNE” INSTITUTE FOR A KIDS’ DRAMA WRITTEN BY HER. SHE ALSO SERVED AS A CO-EDITOR FROM 2014 TO 2016 FOR THE MARATHI EDITION OF “PRANVAYU” MAGAZINE THAT FOCUSED ON MEDICAL ISSUES AND WAS PUBLISHED FROM SURAT. SHE HAS ALSO WORKED EXTENSIVELY AS A TRANSLATOR OF GUJARATI TO MARATHI LANGUAGE, APART FROM HER USUAL WRITING. SHE HAS TRANSLATED 7 BOOKS AND 45 FORTNIGHTLIES WRITTEN BY FAMED GUJARATI AUTHOR VANARAJ MALAVI INTO MARATHI FOR MUMBAI’S SELF DEVELOPMENT PUBLICATION. HER ONE-ACT PLAY “BAIKO EITIT NAVRA KATRIT” WAS PUBLISHED IN 2007 AND RAN FOR MANY SHOWS. THIS PLAY WAS SELECTED FOR AUDIO PRESENTATION ON THE RADIO CHANNEL “VIDYAVAANI” AS WELL. HER COLLECTION OF SHORT STORIES WILL BE PUBLISHED BY MEHTA PUBLISHING HOUSE SOON. SHE IS CURRENTLY COLLABORATING WITH MANY ORGANIZATIONS FOR TRANSLATION WORK ALONG WITH HER PERSONAL WRITING PROJECTS. MOREOVER, SHE DELVES IN WRITING POEMS AND SCREENPLAYS FOR LEISURE TOGETHER WITH SHORT-STORY WRITING.S

सौ. सुनीता देवस्थळी या पूर्वाश्रमीच्या सुनीता हेगडे. जन्म बडोद्याचा (२९.१०.१९५६). शालेय तसेच महाविद्यालयीन शिक्षण बडोद्यातच झाले. बडोद्याच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठातून मानसशास्त्राची पदवी संपादन करून पुढे बी.एड.ची पदवीही प्राप्त केली. हिंदी विषयाची आवड असल्याने गुजरात विद्यापीठातून हिंदी विषयात एम.ए. पूर्ण केले. काही काळ हिंदी शिक्षक म्हणून काम केल्यावर पुढील २६ वर्षे राष्ट्रीयीकृत बँकेत कार्यरत. लेखनाचा छंद लहानपणापासूनच होता. बडोद्याला दर वर्षी होणाऱ्या वाङ्मय परिषदेत घेतल्या जाणाऱ्या लघुकथा स्पर्धेत अनेक पारितोषिके प्राप्त. २००६ मध्ये बँकेतून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर लेखनकार्याला गती मिळाली. कथालेखन हे आवडते क्षेत्र. पहिली लघुकथा दुधावरची साय २००८ मध्ये मेनका प्रकाशनच्या माहेर या मासिकात प्रसिद्ध झाली. त्यानंतर अनेक कथा माहेर, माझी वहिनी, पृथा, समतोल, अन्नपूर्णा वगैरे मासिकांतून प्रकाशित झालेल्या आहेत. त्यांनी लिहिलेल्या बालनाटकाला स्नेह पुणे या संस्थेतर्फे २००८ सालचा प्रथम पुरस्कार मिळाला. २०१४ ते २०१६ या काळात सुरतेहून प्रकाशित होणार्या प्राणवायू या वैद्यकीय विषयावरील मासिकाच्या मराठी आवृत्तीची सहसंपादक म्हणून काम केले, लेखनाव्यतिरिक्त गुजराथीतून मराठीत भाषांतराचे भरपूर काम केले आहे. मुंबईच्या सेल्फ डेव्हलपमेंट पाब्लिकेशनसाठी प्रसिद्ध गुजराती लेखक वनराज मालवी यांच्या मानसशास्त्र व व्यक्तिमत्त्वविकास यावरील ७ पुस्तकांचा, तसेच ४५ पाक्षिकांचा मराठी अनुवाद केला आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 2 of 2 total
NACOHUS Rating Star
Add To Cart INR 195
RUNANUBANDH Rating Star
Add To Cart INR 230

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more