* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: DEVDAS
  • Availability : Available
  • Translators : MRUNALINI GADKARI
  • ISBN : 9788177663310
  • Edition : 4
  • Publishing Year : AUGUST 2002
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 124
  • Language : TRANSLATED FROM BENGALI TO MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :MRUNALINI GADKARI BIRTHDAY OFFER-14 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
FIRST PUBLISHED IN BENGALI IN 1917, THE TRAGIC TALE OF DEVDAS HAS ENTHRALLED READERS AND FILMGOING AUDIENCES ALIKE FOR THE BETTER PART OF A CENTURY. THIS NEW TRANSLATION BRINGS THE CLASSIC TALE OF STAR-CROSSED LOVERS ALIVE FOR A NEW GENERATION OF READERS.
‘देवदास’ शरदबाबूंच्या लेखणीतून साकारलेली एक अजरामर प्रेमकहाणी. ही त्यांची (१८७६-१९३८) लहान, पण गाजलेली कांदबरी.ह्या लहानशा कादंबरीतही शरदबाबूंची बहुतेक सर्व लेखन-वैशिष्ट्ये उतरलेली दिसतात. ह्यातील व्यक्तिरेखांना शरदबाबूंच्या प्रतिभेचा परीसस्पर्श झाल्यामुळे त्या विलक्षण असूनही जिवंत वाटतात. प्रेम-असूया, त्याग-लोभ, माणुसकी-अमानुषता, समंजसपणा-बेजबाबदारपणा, सेवापरायणता-आपमतलबीपणा, औदार्य-कृपणता, निरागसता-धूर्तपणा ह्या परस्पर-विरोधी भावनांबरोबरच ममता, वात्सल्य ह्या भावनांची मनोहर गुंफण ह्या कथानकात दिसून येते. वरवर अतिशय साधे वाटणारे पण बरंच काही सांगून जाणारे संवाद हे ह्या कादंबरीचं बलस्थान आहे. त्या विशिष्ट काळातील समाज हा पाश्र्वभूमी म्हणून आला असला तरी आपल्या सहजसुंदर लेखनशैलीनं शरदबाबू त्याचे सम्यक दर्शन घडवतात. शरदबाबूंची प्रासादिक भाषा थेट रसिक मनालाच हात घालते. ह्यामुळेच ही प्रेमकहाणी फक्त शोकांतिकाच न ठरता त्याही पलीकडे जाऊन पोहोचते. म्हणून आजही ती मनाला आकर्षित करते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #DEVDAS #DEVDAS #देवदास #FICTION #TRANSLATEDFROMBENGALITOMARATHI #MRUNALINIGADKARI #मृणालिनी गडकरी #SARATCHANDRACHATTOPADHYAY "
Customer Reviews
  • Rating StarShrikant Adhav

    DEVDAS by Sarat Chandra Chattopadhyay देवदास’ शरदबाबूंच्या लेखणीतून साकारलेली एक अजरामर प्रेमकहाणी. ही त्यांची (१८७६-१९३८) लहान, पण गाजलेली कांदबरी.ह्या लहानशा कादंबरीतही शरदबाबूंची बहुतेक सर्व लेखन-वैशिष्ट्ये उतरलेली दिसतात. ह्यातील व्यक्तिरेखांन शरदबाबूंच्या प्रतिभेचा परीसस्पर्श झाल्यामुळे त्या विलक्षण असूनही जिवंत वाटतात. प्रेम-असूया, त्याग-लोभ, माणुसकी-अमानुषता, समंजसपणा-बेजबाबदारपणा, सेवापरायणता-आपमतलबीपणा, औदार्य-कृपणता, निरागसता-धूर्तपणा ह्या परस्पर-विरोधी भावनांबरोबरच ममता, वात्सल्य ह्या भावनांची मनोहर गुंफण ह्या कथानकात दिसून येते. वरवर अतिशय साधे वाटणारे पण बरंच काही सांगून जाणारे संवाद हे ह्या कादंबरीचं बलस्थान आहे. त्या विशिष्ट काळातील समाज हा पाश्र्वभूमी म्हणून आला असला तरी आपल्या सहजसुंदर लेखनशैलीनं शरदबाबू त्याचे सम्यक दर्शन घडवतात. शरदबाबूंची प्रासादिक भाषा थेट रसिक मनालाच हात घालते. ह्यामुळेच ही प्रेमकहाणी फक्त शोकांतिकाच न ठरता त्याही पलीकडे जाऊन पोहोचते. म्हणून आजही ती मनाला आकर्षित करते.अजरामर साहित्यकृती... दुसरं महायुद्ध हा आधुनिक जगाच्या जीवनातला एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. दुसऱ्या महायुद्धानंतर जुनं जग कोसळून पडलं आणि एक नवीन जग अस्तित्वात आलं, असं समजतात. जीवनाच्या हरेक क्षेत्रात नवी व्यवस्था, नवी मूल्यं उदयाला आली. शरच्ंद्र चट्टोपाध्याय किंवा चटर्जी हे १८७६ साली म्हणजे एकोणिसाव्या शतकात जन्मले आणि १९३८ साली म्हणजे दुसऱ्या महायुद्धापूर्वी मरण पावले. म्हणजे वास्तविक ते दोनदा कालबाह्य ठरायला हवे होते. पण तसं घडलेलं दिसत नाही. वास्तविक शरदबाबू हे बंगाली लेखक. इतर प्रांतातल्या लोकांना त्यांची माहिती असण्याचं कारण नाही. परंतु जवळपास सर्व हिंदुस्थानी भाषांमध्ये शरदबाबूंच्या कादंबऱ्या भाषांतरीत झालेल्या आहेत. एवढंच नव्हे, तर आजही नव्या लेखकांना त्यांची भाषांतरं करावीशी वाटतात नि प्रकाशकांना ती पुस्तकं छापावीशी वाटतात. याचं कारण एवढंच की; काळ कितीही बदलला तरी मानवी भावभावना चिरंतर असतात. त्या भावना जो जाणू शकतो. समर्थ शब्दांमध्ये पकडून अक्षरबद्ध करू शकतो, त्याचं साहित्य स्थळकाळाच्या बंधनांपलिकडे पोचून पिढ्यान् पिढ्यांच्या काळाजाला स्पर्श करू शकतं. देवदास’ ही शरदबाबूंच्या लेखनप्रवासातली सुरुवाती-सुरुवातीची कादंबरी. तिचा एकूण आटोप अगदी छोटा आहे. कथानक तसं म्हटलं तर अगदी साधं, गुंतागुंत नाही, व्यक्तिरेखाही पुष्कळ नाहीत, झपाटेबंद घटना नाहीत आणि तरीही ती कथा वाचकाला सुन्न करून टाकते. ‘देवदास’ हा बंगाली जमीनदाराचा मुलगा. तो आणि पार्वती लहानपणापासून एकत्र वाढलेले. पार्वतीचं घराणं आपल्या तोलाचं नाही म्हणून देवदासचे आई-वडील हे स्थळ नाकारतात. अत्यंत श्रीमंत आणि उच्चशिक्षित असूनही देवदासची आईवडिलांविरुद्ध बंड करण्याची हिंमत होत नाही. पार्वती एका श्रीमंत बिजवराची घरधनीण बनून निघून जाते. आतल्या आत घुसमटणारा, स्वत:च्या मनोदौर्बल्यावर स्वत:च जळफळणारा देवदास दारू पिऊन हृदयाची आग गमवू पाहतो. गाणारणींच्या माड्या चढतो. स्वत:च्या पायांनी तो विनाशाकडे चालत जातो. कर्त्या पुरुषाने वेळेवर निर्णय न घेणं आणि त्यामुळे अटळ विनाश ओढवून घेणं ही देवदास या व्यक्तीचीच नव्हे तर तत्कालीन संपूर्ण समाजाचीच शोकांतिका होती. किंबहुंना आजही आहे. आमच्या समाजाचे, आमच्या राष्ट्राचे बहुसंख्य प्रश्न याच निर्णय क्षमतेच्या अभावातून निर्माण झालेले आहेत. त्यांच सगळ्यात चिघळतं उदाहरण म्हणजे कश्मीर प्रश्न. वास्तविक मद्यासक्ती आणि नायकिणं माडी म्हणजे हल्लीच्या ललित लेखक घबाडच. पण व्यसनी बनलेल्या देवदासच चित्रण करताना किंवा माडी थाटून बसलेली चंद्रमुखी रंगवताना शरदबाबूंची लेखणी रेसभरही तोल सोडत नाही. शरदबाबूचा देवदास हा क्षणभरही एखादा बेवडा भाव नाही वा चंद्रमुखी ही कुणी कसबीण वाटत नाही. या दोन्ही व्यक्तिरेखा सतत विलक्षण वजनदारपणेच व्यक्त होतात. तर शरदबाबूंचं वैशिष्ट्य, हेच तर यांचं लेखणीचं सामर्थ्य. प्रस्तुत ‘देवदास’ची नवी आवृत्ती मे प्रकाशनाने प्रसिद्ध केली आहे. अनुवाद केला आहे मृणालिनी गडकरी यांनी. देवदास चित्रपटातील देवदास कादंबरीला मागणी येणार आणि मामा वरेरकरांनी केलेल्या भाषांतराची आवृत्ती दुरुस्ती झाल्यामुळे नवी आवृत्ती चांगली खपणं असा अचूक व्यावसायिक अंदाज बांधून पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. अर्थात त्या वावगं काहीच नाही. एक दर्जेदार साहित्यकृती वाचकांना उपलब्ध करून देण्याचं महत्त्वाचं काम त्यातून घडलं आहे.चित्रपटाच्या निमित्तानेच हे पुस्तक निघालं आहे. तेव्हा एकंदर विषयाच्या समजुतीस त्याबद्दलही दोन शब्द नमूद करायला हवेत. ‘देवदास’ वर प्रथम बंगाली चित्रपट निघाला. मूळ कादंबरीशी जास्तीत जास्त इनाम राहिला असल्यामुळेच खूप चालला. मग न्यू थिएटर्स कोलकत्याच्या प्रखात कंपनीने सैगलला नवा बनवून त्यावर हिंदी चित्रपट काढला मूळ कथेत काही बदल असूनही उत्तम दिग्दर्शन, संयत अभिनेता आणि सैगलची गाणी यांमुळे हा चित्रपट खूप गाजला. मग बिमल रॉयने दिलीपकुमारला घेऊन पुन्हा देवदास काढला तो साफ पडला. त्या सचिनदेव बर्मनचं संगीत गाजलं, पण ..... शरदबाबूंच्या खानदानी नायकाला रस्त्यावर बेवड्याची कळा आणली. संजय भन्साळी .... शाहरुख खान यांनी मिळून त्या बिचाऱ्या देवदास किती दीनवाणा बनवून टाकलाय याची तुलना करून पाहण्यासाठी मूळ देवदास वाचायलाच हवा. मृणालिनी गडकरी यांचं मराठी भाषांतर ... मेहतांची निर्मिती सुबक. चंद्रमोहन कुलकर्णी रेखाचित्रं आणि मुखपृष्ठ आकर्षक. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 17-11-2002

    ‘देवदास’चा सरस अनुवाद... प्रसिद्ध बंगाली लेखक शरदचंद्र चट्टोपाध्याय यांनी त्यांच्या आरंभ काळातील लेखन प्रक्रियेत ‘देवदास’ ही कादंबरी लिहिली. (सुमारे शंभर वर्षांपूर्वी) ती कादंबरी निव्वळ बंगाली वाचकांपुरतीच मर्यादित न राहता इतर भाषांतील रसिकांच्याही संतीस उतरली. ‘देवदास’ या छोट्याशा कादंबरीचे अनेक अनुवाद प्रकाशित झाले. मराठी रसिकांनी तिचे मनापासून स्वागत केले. ‘देवदास’ कादंबरी चित्रपट रूपातूनही अनेकदा भेटली. रसिकांनी तिचेही अगदी मनापासून स्वागत केले. शरदबाबूंनी रेखाटलेल्या हळुवार प्रेमकथेला वेगवेगळी परिमाणे लाभली. कथेचा मूळ आत्माच सशक्त असल्याने कादंबरीचा गाभाच रसिकांसमोर येत राहिला. देवदासची प्रीती म्हणूनच कुठे तरी प्रत्येकालाच भावली. निरागस बाल्यावस्थेत असणारी बालसुलभ ओढ तारुण्यात पदार्पण करताना प्रेमात परावर्तित होते आणि विलक्षण तरल प्रेमकहाणी आकाराला येते. शेवट देवदासच्या मृत्यूने होतो; पण तो शेवट नसतोच मुळी. तेथेच त्याग, संवेदनक्षमता, उत्कटता, अनिवार्यता यांची रूपे स्पष्ट होतात. तारुण्यात पदार्पण केलेला देवदास कोलकत्याला पोहोचता. तेथे त्याला पारूला विसरल्याचा भास होतो, भ्रम होतो; मात्र तेथेच त्याला पारूच्या ओढीतील आर्तता समजते. तिच्याशिवाय आपलं आयुष्य अपूर्ण असल्याची जाणीव होते आणि इकडे पारू विजोड भुवनबाबूचा स्वीकार करून त्याचा संसार सावरायला लागते. लग्न करून ती भुवनच्या घरात जाते खरी; पण तिच्या मनावर मात्र देवदासचे नाव कायमचे कोरले गेलेले आहे. विवाहाचा उपचार सहजपणे स्वीकारून ती जगत आहे. ती जबाबदारी तिने पेलली आहे. तिचा संयम, त्याग थक्क करणारा आहे. नवऱ्याबरोबर खोट्या प्रतिष्ठेची झूल पांघरून, खोट्या कल्पना जपत ती जगत आहे; मात्र स्वत:च्या कोमल भावनाही तिनं त्याच ताकदीने दाबून ठेवलेल्या आहेत. खोट्या प्रतिष्ठेपायी तिची देवदासशी ताटातूट होते; मात्र याला देवदासही तितकाच जबाबदार आहे. तो दुबळ्या स्वभावामुळे निर्णय घेऊ शकत नाही. पारूच्या भावनेतील अस्सलपणा त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. तसेच त्याला स्वत:चं मनही ओळखता येत नाही. त्याच्यात अहंकार आहे, जमीनदारामध्ये असणारी मग्रुरी त्याच्यात आहे, मात्र परंपरेची चौकट मोडण्याचे धैर्य, बंडखोरपणा त्याच्यात नाही आणि म्हणूनच तो स्वत:ची वंचना करून घेतो आणि व्यसनात स्वत:लाच बुडवून घेऊन आत्मनाश ओढवून घेतो. चंद्रमुखी पतिता जरूर आहे. पण सवंग नाही. तिच्या स्वच्छ मनात देवदासबद्दल अपार प्रीती आहे आणि म्हणूनच ती पारूचं त्याच्यावरचं प्रेम ओळखू शकलेली आहे. त्या काळातही तिच्यात असणारी अकृत्रिम भावना म्हणूनच वेगळी ठरते. नि:स्वार्थी चंद्रमुखी म्हणूनच लक्ष वेधून घेते. शंभर वर्षांपूर्वीच्या कालखंडातील ती म्हणूनच लक्षात राहते. मुख्य तिन्ही व्यक्तिरेखा वेगवेगळ्या आहेत; मात्र एकमेकांशी अनामिक बंधने बांधलेल्या आहेत, हे जाणवत राहते. साध्या साध्या शब्दांतून त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य उभे केले आहे. हळुवार संवाद मनाला साद घालत राहतात. तुटलेला दाह, फुलणारे मन, जळणारे हृदय, भीषण वास्तवातून आलेली व्याकुळता हे सारे अगदी ओघाने येत राहून मनाची पकड घेत राहते. मृणालिनी गडकरी यांनी देवदासचा अनुवाद करताना सरळसं अनुवाद केलेला नाही. मूळ कादंबरीचा पोत स्पष्ट करण्यात त्या यशस्वी ठरल्यात भाषेची लय, कथेचा अंत:स्वर, मूळे कथेचा प्रवाह जपताना त्यांनी सरस अनुवाद केला आहे. संवादात असणारा सोपेपणा भिडण्याची वृत्ती जशीच्या तशी ठेवण्यात त्या यशस्वी झाल्यात. त्यामुळे एकाच बैठकीत कादंबरी पूर्ण करण्याची अनावर इच्छा रोखता येत नाही. -प्रसाद इनामदार ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 16-02-2003

    अजरामर साहित्यकृती... दुसरं महायुद्ध हा आधुनिक जगाच्या जीवनातला एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. दुसऱ्या महायुद्धानंतर जुनं जग कोसळून पडलं आणि एक नवीन जग अस्तित्वात आलं, असं समजतात. जीवनाच्या हरेक क्षेत्रात नवी व्यवस्था, नवी मूल्यं उदयाला आली. शरच्ंद्र चट्टोपाध्याय किंवा चटर्जी हे १८७६ साली म्हणजे एकोणिसाव्या शतकात जन्मले आणि १९३८ साली म्हणजे दुसऱ्या महायुद्धापूर्वी मरण पावले. म्हणजे वास्तविक ते दोनदा कालबाह्य ठरायला हवे होते. पण तसं घडलेलं दिसत नाही. वास्तविक शरदबाबू हे बंगाली लेखक. इतर प्रांतातल्या लोकांना त्यांची माहिती असण्याचं कारण नाही. परंतु जवळपास सर्व हिंदुस्थानी भाषांमध्ये शरदबाबूंच्या कादंबऱ्या भाषांतरीत झालेल्या आहेत. एवढंच नव्हे, तर आजही नव्या लेखकांना त्यांची भाषांतरं करावीशी वाटतात नि प्रकाशकांना ती पुस्तकं छापावीशी वाटतात. याचं कारण एवढंच की; काळ कितीही बदलला तरी मानवी भावभावना चिरंतर असतात. त्या भावना जो जाणू शकतो. समर्थ शब्दांमध्ये पकडून अक्षरबद्ध करू शकतो, त्याचं साहित्य स्थळकाळाच्या बंधनांपलिकडे पोचून पिढ्यान् पिढ्यांच्या काळाजाला स्पर्श करू शकतं. ‘देवदास’ ही शरदबाबूंच्या लेखनप्रवासातली सुरुवाती-सुरुवातीची कादंबरी. तिचा एकूण आटोप अगदी छोटा आहे. कथानक तसं म्हटलं तर अगदी साधं, गुंतागुंत नाही, व्यक्तिरेखाही पुष्कळ नाहीत, झपाटेबंद घटना नाहीत आणि तरीही ती कथा वाचकाला सुन्न करून टाकते. ‘देवदास’ हा बंगाली जमीनदाराचा मुलगा. तो आणि पार्वती लहानपणापासून एकत्र वाढलेले. पार्वतीचं घराणं आपल्या तोलाचं नाही म्हणून देवदासचे आई-वडील हे स्थळ नाकारतात. अत्यंत श्रीमंत आणि उच्चशिक्षित असूनही देवदासची आईवडिलांविरुद्ध बंड करण्याची हिंमत होत नाही. पार्वती एका श्रीमंत बिजवराची घरधनीण बनून निघून जाते. आतल्या आत घुसमटणारा, स्वत:च्या मनोदौर्बल्यावर स्वत:च जळफळणारा देवदास दारू पिऊन हृदयाची आग गमवू पाहतो. गाणारणींच्या माड्या चढतो. स्वत:च्या पायांनी तो विनाशाकडे चालत जातो. कर्त्या पुरुषाने वेळेवर निर्णय न घेणं आणि त्यामुळे अटळ विनाश ओढवून घेणं ही देवदास या व्यक्तीचीच नव्हे तर तत्कालीन संपूर्ण समाजाचीच शोकांतिका होती. किंबहुंना आजही आहे. आमच्या समाजाचे, आमच्या राष्ट्राचे बहुसंख्य प्रश्न याच निर्णय क्षमतेच्या अभावातून निर्माण झालेले आहेत. त्यांच सगळ्यात चिघळतं उदाहरण म्हणजे कश्मीर प्रश्न. वास्तविक मद्यासक्ती आणि नायकिणं माडी म्हणजे हल्लीच्या ललित लेखक घबाडच. पण व्यसनी बनलेल्या देवदासच चित्रण करताना किंवा माडी थाटून बसलेली चंद्रमुखी रंगवताना शरदबाबूंची लेखणी रेसभरही तोल सोडत नाही. शरदबाबूचा देवदास हा क्षणभरही एखादा बेवडा भाव नाही वा चंद्रमुखी ही कुणी कसबीण वाटत नाही. या दोन्ही व्यक्तिरेखा सतत विलक्षण वजनदारपणेच व्यक्त होतात. तर शरदबाबूंचं वैशिष्ट्य, हेच तर यांचं लेखणीचं सामर्थ्य. प्रस्तुत ‘देवदास’ची नवी आवृत्ती मे प्रकाशनाने प्रसिद्ध केली आहे. अनुवाद केला आहे मृणालिनी गडकरी यांनी. देवदास चित्रपटातील देवदास कादंबरीला मागणी येणार आणि मामा वरेरकरांनी केलेल्या भाषांतराची आवृत्ती दुरुस्ती झाल्यामुळे नवी आवृत्ती चांगली खपणं असा अचूक व्यावसायिक अंदाज बांधून पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. अर्थात त्या वावगं काहीच नाही. एक दर्जेदार साहित्यकृती वाचकांना उपलब्ध करून देण्याचं महत्त्वाचं काम त्यातून घडलं आहे. चित्रपटाच्या निमित्तानेच हे पुस्तक निघालं आहे. तेव्हा एकंदर विषयाच्या समजुतीस त्याबद्दलही दोन शब्द नमूद करायला हवेत. ‘देवदास’ वर प्रथम बंगाली चित्रपट निघाला. मूळ कादंबरीशी जास्तीत जास्त इनाम राहिला असल्यामुळेच खूप चालला. मग न्यू थिएटर्स कोलकत्याच्या प्रखात कंपनीने सैगलला नवा बनवून त्यावर हिंदी चित्रपट काढला मूळ कथेत काही बदल असूनही उत्तम दिग्दर्शन, संयत अभिनेता आणि सैगलची गाणी यांमुळे हा चित्रपट खूप गाजला. मग बिमल रॉयने दिलीपकुमारला घेऊन पुन्हा देवदास काढला तो साफ पडला. त्या सचिनदेव बर्मनचं संगीत गाजलं, पण ..... शरदबाबूंच्या खानदानी नायकाला रस्त्यावर बेवड्याची कळा आणली. संजय भन्साळी .... शाहरुख खान यांनी मिळून त्या बिचाऱ्या देवदास किती दीनवाणा बनवून टाकलाय याची तुलना करून पाहण्यासाठी मूळ देवदास वाचायलाच हवा. मृणालिनी गडकरी यांचं मराठी भाषांतर ... मेहतांची निर्मिती सुबक. चंद्रमोहन कुलकर्णी रेखाचित्रं आणि मुखपृष्ठ आकर्षक. -मल्हार कृष्ण गोखले ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 06-10-2002

    प्रेम करायलाही हवा असतो एक ‘देवदास’... खूप गाजावाजा होऊन प्रदर्शित झालेला आणि अगदी काल परवापर्यंत चर्चेत राहिलेला ‘देवदास’ चित्रपट प्रसिद्ध बंगाली लेखक शरदचंद्र चट्टोपाध्याय यांच्या गाजलेल्या ‘देवदास’ या छोटेखानी कादंबरीवरून साकारला. या कादंबरीचा मृालिनी गडकरी यांनी केलेला हा मराठी अनुवाद चांगला उतरला आहे. चित्रपटामुळे ‘देवदास’ बाबत लोकांमध्ये जे आकर्षण निर्माण झाले आहे त्याचे औचित्य साधून हा अनुवाद प्रसिद्ध करून मेहता पब्लिशिंग हाऊसने व्यावसायिक कौशल्य तर साधले आहेच, शिवाय चित्रपट पाहिल्यानंतर किंवा चर्चेमुळे म्हणा, मूळ कादंबरी वाचण्याची जिज्ञासा ज्या मराठी वाचकांत निर्माण झाली असेल ती यामुळे पूर्ण होईल. या अगोदर या कादंबरीचा मराठी अनुवाद मामा वरेरकर यांनी केला होता. १९३०-४० असा तो जुना काळ आहे. त्यांनी केलेल्या अनुवादाचे पुस्तक सध्या सापडत नाही. ते दुर्मिळच आहे. त्यानंतर म्हणजे सुमार ६२ वर्षांच्या काळानंतर हा मराठी अनुवाद प्रसिद्ध होतो आहे. अत्यंत साध्या, सोप्या, सरळ भाषेची ‘नजाकत’ काय असते याचा अनुभव हा अनुवाद वाचताना लक्षात आल्याशिवाय राहत नाही. भाषेचा डामडौल न मिरवता सहज, उत्स्फूर्त अशी शरदबाबूंची भाषा अनुवादातही कायम ठेवण्यात गडकरी या यशस्वी झालेल्या आहेत. त्या-त्या भाषेचा आपला असा खास जामानिमा असतो. तो तसाच ठेवून अर्थाला आणि वळणाला धक्का न लावता अनुवाद साधणे हे कौशल्यच असते. ‘देवदास’ ही प्रेमकहाणी आहे हे सांगायला नको. प्रेमाच्या अनुषंगाने वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर जो संघर्ष या कादंबरीमध्ये दाखविला आहे. त्यामधून मानवी परस्पर विरोधी भावनांचे विलोभनीय दर्शन अनुभवायला मिळते. देवदासची दुर्दशा प्रेमभंग झाल्याने झाली. ती तशी होणं किंवा करून घेणं याला जबाबदर कोण या प्रश्नाचे उत्तर व्यक्तीसापेक्ष असू शकेल. मात्र शरदबाबूंनी कादंबरीच्या शेवटी त्यांचं मत सांगून टाकलंय. तेच खरं मनाला चटका लावून जाते. देवदासच्या मृत्यूनंतर त्यांनी शेवटी लिहिलंय. ‘‘आता पार्वती कशी आहे? तिचं पुढं काय झालं माहीत नाही. विचारायचीही इच्छा नाही. फक्त देवदासबद्दल खूप वाईट वाटतं तुम्ही कोणीही कथा वाचलीत तर आमच्यासारखं तुम्हालाही दु:ख होईल. जर देवदाससारख्या दुर्दैवी, मद्यासक्त, पाप्याबरोबर तुमची ओळख झाली तर त्याच्यासाठी प्रार्थना करा, त्याच्यासारखं मरण दुसऱ्या कोणाला कधीही येऊ नये, अशी प्रार्थना करा. मरणात हानी काही नाही. पण त्या वेळी एखादा प्रेमळ हात त्याच्या कपाळावर असावा, एखादा ममताळू स्नेहशील चेहरा पाहत-पाहत जीवनाचा अंत व्हावा, कोणाच्यातरी डोळ्यांतील अश्रू पाहता पाहता डोळे मिटावेत.’’ कादंबरीतील कथानकांच्या तोंडून जे संवाद घडतात ते वाचकाला विचार करायला लावतात. तशा प्रकारच्या संवादातूनच कथानक हळू-हळू फुलले आहे. देवदास आणि पारू, देवदास आणि चंद्रमुखी यांच्यातील संवाद त्यापैकीच. चंद्रमुखी आणि देवदास यांची अखेरची भेट होते. त्यावेळचा दोघांमधील संवाद साधा, सरळ वाटला तरी अर्थपूर्णतेमुळे तो वाचकांना निश्चितच भावतो. चंद्रमुखी थोडी थांबली. मग आवंढा गिळून म्हणाली, ‘‘मी आयुष्याचा बराच काळ प्रीतीचा धंदा करण्यात घालवलाय. पण प्रेम एकदाच केलंय, ते प्रेम फार किमती आहे. ती खूप शिकले. प्रेम वेगळं आणि रुपाचा मोह वेगळा. ह्या दोघांत गोंधळ केला जातो. पुरूषच तो जास्त करतात. रुपाचा मोह तुमच्यापेक्षा आम्हाला कमी असतो. म्हणूनच आम्ही तुमच्यासारख्या मस्तवाल होत नाही. तुम्ही बोलण्यावागण्यातून प्रेम दाखविता. पण आम्ही बोलत नाही. आमच्या मनातलं दु:ख कोणाला दिसत नाही.’’ (पृष्ठ ८५) ही प्रेमकहाणी असूनही भाषेतील सुसंस्कृतपणा शेवटपर्यंत थोडाही ढळलेली नाही. विसाव्या शतकाच्या आरंभीचा बंगाली ढाच्याचा काळाचा संदर्भ असल्याने त्या काळातील सामाजिक रुपरेषाही ही कादंबरी वाचताना लक्षात येते. ‘देवदास’बद्दलची केवळ जिज्ञासा म्हणूनच नव्हे तर प्रासादिक शैलीतील एका उत्तम साहित्यकृतीचा अनुभव घेण्यासाठी मराठी वाचकांनी हा अनुवाद वाचायलाच हवा. -प्रसाद शां. पोतदार ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more