* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789353175054
  • Edition : 1
  • Publishing Year : DECEMBER 2020
  • Weight : 5.00 gms
  • Pages : 316
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
MANIBHADRA A SMART BOY FROM A RURAL AREA HAS A PHD EAGER TO GET THE OPPORTUNITY TO BECOME THE FUTURE DHARMAGURU OF KATYAYINI MATH COMES TO HIM AND HE ACCEPTS IT BUT BECAUSE OF THAT HE HAS TO REMAIN A CELIBATE FOR THE REST OF HIS LIFE
ग्रामीण भागातील हुशार मुलगा मणिभद्र यास पीएच.डी. मिळवण्याचा ध्यास... कात्यायिनी मठाचा भावी धर्मगुरू होण्याची संधी त्याच्याकडे चालून येते आणि तो ती स्वीकारतो...मात्र त्यामुळे त्याला आजन्म ब्रह्मचारी राहावं लागणार असतं...डॉ. नभा महंती ही तरुण अध्यापिका तिच्या प्रकल्पासाठी सहायक म्हणून मणिभद्रची निवड करते...ती त्याच्या प्रेमात पडते...सुरुवातीला तिच्या या भावनेपासून अनभिज्ञ असलेल्या मणिभद्रला तिची भावना कळते...मात्र धर्मशास्त्रातील आणि शिक्षणशास्त्रातील यशाच्या पायऱ्या चढलेला मणिभद्र नभाचं प्रेम स्वीकारू शकत नाही...वासनारहित, आत्मिक प्रेमाची महती मणिभद्र नभाला सांगू पाहतो...धर्मातील अनिष्ट रूढी-परंपरा दूर करून समाजाला विधायक मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करताना मणिभद्र धर्मगुरू होतो...मात्र त्याला स्वत:च्या भावनांचा बळी द्यावा लागतो...धर्म आणि लौकिक जीवन यांच्यातील द्वंद्वाचं प्रभावी चित्रण करणारी कादंबरी ‘नभांतमणी’.
१) मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय-विलेपार्ले शाखा पुरस्कृत मराठी कादंबरी वाङ्मय प्रथम पुरस्कार २०२२-२०२३
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#नभांतमणी #कादंबरी #प्रा.शशिकांतकुगांवकर #मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #NABHANTAMANI #PROF.SHASHIKANTKUGAVKAR #NOVEL #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
  • Rating StarPrakash Lahoti

    आदरणीय प्रा.श्री शशिकांतजी कुगॉंवकर *बार्शी*(सोलापुर) सर, आमचे व्याही श्री विनोदजी सोमाणी ह्यांच्या सौजन्याने आपन लीहलेली कादंम्बरी *नभांतमणी* वाचन्याचा योग आला. आपन जीवशास्त्रा(विज्ञान) चे प्राध्यापक व साहीत्य ्षेत्रातिल आपली *नभांतमणी* रूपाने घेतलेली *गरुड़ झेप* *क्षीतीजा ला तारांकित* करुण गेली आहे. आपला हा प्रयास नक्कीच प्रशंसनीय व कौतुकास्पद आहे. कादंबरी वाचतांना उत्कृष्ट ... शब्दरचना, प्रभावी...विचारशैली, प्रसंगांची...लयबद्धता ही प्रमुख्याने जाणवते. रेखाटलेले प्रसंग..., पात्रांच्या भावना..., निवडलेले संवाद..., समयोचित आहेत. आपल्या लिखानातील मला समजलेले जीवनोपयोगी संदेश... १- स्त्री-पुरुष यांच प्रेम जीवनात फक्त शारिरीक सुखासाठीच नसत तर जीवनभर एक दुसऱ्या ला समजून घेवून व समर्पण भावनेनी दिलेली समर्थ साथ हेच सुखी जीवनाचे आनंदमय स्वरूप असावे... हा विचार आपल्या कादंबरी चा पाया आहे... मूळ मंत्र आहे . २- विषम परिस्थिती त आवश्यकते नुसार वेळोवेळी घेतलेले निर्णय हे जीवन प्रवाहात आपले सहकार्य करतात व मार्गदर्शक सिध्द होतात. ३- सीमित संसाधन (छोटेसे गांव, अपुरी शिक्षण व्यवस्था) असून ही आपली इच्छा शक्ति प्रबळ असेल तर आपन प्रगतिपथा वर अग्रसर राहु शकतो. ४- आपल्या शिक्षणाला निस्वार्थ कार्या ची जोड़ असली तर अनेक समविचारी लोक सोबत येतात व आपन समाजात असलेल्या अनेक घातक व रूढ़िवादि परंपरा मोडून समाज सुधारक, जनउपयोगी कार्य करु शकतो. सर, आपले लिखान *अप्रतिम* व *जनजगृती* साठी सशक्त आधार आहे. माता *सरस्वती* ने आपल्या लेखनी ला अधिक शक्तिशाली करावे व आपले हे व्रत अखण्ड वृधींगत होत रहावे... अनेक अनेक *शुभेच्छा* 🙏🏼🙏🏼 आपला स्नेही, डॉ.प्रकाश लाहोटी हिंगणघाट, जि.वर्धा ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BACKSTAGE
BACKSTAGE by MONTEK SINGH AHLUWALIA Rating Star
बाबाराव घोरमाडे, अमरावती.

नियोजन आयोगाचे माजी उपाध्यक्ष मॉंटेक सिंग अहलुवालिया लिखीत आणि अनुवादकार जी बी देशमुख यांनी मराठीत अनुवादित केलेले बॅकस्टेज हे पुस्तक वाचून झाले . भारत सरकारच्या अर्थ विभाग विविध प्रकारच्या उच्च पदावर काम केलेल्या माँटेकसिंग अहलुवालिया यांचे ह पुस्तक. 1990 ते 2014 पर्यंत अर्थ विभाग, त्या पुर्वी आंतरराष्ट्रिय मुद्रानिधी,व गागतीक बँकेत उच्च पदावर नियुक्ती . भारतीय अर्थ विभाग , योजना आयोग इत्यादी अनेक ठिकाणी त्यांनी काम केले. पुस्तकात वैयक्तीक तपशीलात नजाता अर्थ विषयक पडद्यामागील घडामोडीचा तपशील या पुस्तकात समाविष्ट केला आहे . सन1990 ते2014 हा कार्य काळ म्हणजे नरसिंहराव ,वाजपेयी, द ग्रेट मनमोहनसिंग यांच्या आर्थिक सुधारणांचा कार्यकाळ. याच काळातील घडामोडींचा तपशील या पुस्तकात समाविष्ट आहे. अर्थ विषयक माहिती आवड असलेल्या वाचकाला हे पुस्तक जरूर आवडेल. अनुवादकार जी बी देशमुख यांनी केलेला इंग्रजी ते मराठी असा अनुवादचा प्रवास सुंदर झाला आहे. Oxford return लेखकाच्या इंग्रजी चे मराठी भाषांतर......द ग्रेट.... ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
गणेश झोले, नाशिक.

जी.बी. देशमुख लिखीत `दुर्दम्य` पुस्तक एका बैठकीत वाचून काढलं. मस्त मज्जा आली. खुप भारी झालंय पुस्तक. सर्वात थ्रीलींग कोणती कथा वाटली सांगू? `जीवघेणी मस्करी`. लेखकाच्या पेशन्सला व सहनशक्तीला मानलं…. लेखकावर मुख्य संशय घेत आहे हे कळल्यावर किती ेंशन आले असेल ते सुद्धा असल्या खतरनाक प्रशासकाचे….. अजून अनेक ठीकाणी खुप मज्जा आली अक्षरशः मोठ्याने हसलो… आधीच्या स्टेनोबाई च्या किस्सा…. वाटवे साहेबांचा किस्सा. मला असं वाटतं की मला चरित्रनायकाचे व्यक्तिमत्व बऱ्याच अंशी कळले. प्रशासनातच असल्याने लेखकाला सांगायचे असलेले किस्से मी चांगले कोरिलेट करून समजू शकलो. लोक अशा व्यक्तीला वेडा म्हणून मोकळे होतील पण त्याचा हा वेडेपणा कशासाठी होता हे 90 % लोक समजूच शकत नाही. खुप मोठा त्याग हिंमत व प्रचंड आत्मविश्वास लागतो वेड्यांच्या जगात असे वागायला आणि तो त्यांच्याजवळ होता. हे लेखकाने खुप छान सांगितलय. अत्यंत वाचनीय पुस्तक. ...Read more