* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE TRUE FORBIDDEN LOVE STORY OF TWO MEN, A SAMURAI AND A PEASANT IN EDO JAPAN. CAN A JAPANESE SAMURAI OF IMPECCABLE LINEAGE IN EDO PERIOD JAPAN GET AWAY WITH BEING GAY? CAN HE BREAK ALL THE RULES OF SOCIETY AND GET AWAY WITH IT? IT ALL STARTED WHEN AN AGING SAMURAI TOOK AN ECCENTRIC INTEREST IN A TEENAGE PEASANT BOY WHO HAD THE UNUSUAL GIFT OF WRITING AND ONE DAY HE BROUGHT HIS SON, LORD OKIMOTO TO THE PEASANT`S HOUSE. THE EYES OF THE SAMURAI`S SON AND THE TEENAGE PEASANT MET AND SPAWNED A FORBIDDEN LOVE AFFAIR WHICH BROKE ALL THE RULES OF JAPAN`S EDO PERIOD SOCIETY AND A FEUDAL CLASS SO SHARPLY DEFINED THAT IT COULD CUT LIKE A KNIFE. FOUR CENTURIES LATER, AN ANCESTOR OF LORD OKIMOTO FINDS A DIARY WRITTEN BY HIS PEASANT LOVER UNFOLDING THE ANGUISHED TALE OF A FORBIDDEN LIFE WENT WRONG, LEAVING BEHIND A TRAIL OF DESTROYED LIVES, BROKEN DREAMS AND A FEW DEATHS. THE SPIRIT OF THE GAY SAMURAI WHO PUT DUTY AND OBLIGATIONS ABOVE HIS POIGNANT LOVE TRAVELS ONE WHOLE CIRCLE TO ARRIVE TO THE 21ST CENTURY IN A FINAL TWIST TO THIS INTRIGUING STORY OF HOW TWO YOUNG MEN DARED TO BREAK ALL THE RULES IN CONSERVATIVE UNFORGIVING 18TH CENTURY JAPAN.
``तू आहेस का फुसावो? किती काळ मी तुझ्याशिवाय होतो? मला चैन पडत नव्हतं. ये. मला सुख दे. तू नेहमी देतोस तसं....`` फुसावो त्या विश्वास ठेवणा-या चेह-यापासून दूर झाला. एक बारीकशी किंकाळी फोडून आपल्या थरथरत्या हातातला सुरा त्यानं आपल्या प्रियकराच्या छातीत जोरानं खुपसला. तो सुरा मुठीपर्यंत आत जाईतो, तो थांबला नाही. बाहेर काढून आणखी एकदा, त्याच, त्याच्याविषयीच्या प्रेमानं, विश्वासानं आणि त्याच्या इच्छेनं भरलेल्या हृदयात.... त्याला जाणवलं की, खोलीत कोणीच नव्हतं आणखी. आणि ओकिमोटोच्या ओठांवर शब्द होते, ``फुसावो, फुसावो, तू आलास?`` त्याच्या दगडी बनलेल्या चेह-यावरून अश्रूंचा लोट वाहत होता. धक्का बसलेल्या त्या मुखातून त्याचंच नाव पुन:पुन्हा येत होतं, आणि एकच प्रश्न – का, का? रक्ताचा एक प्रवाह छातीतून, फुसावोला परिचित, अतिपरिचित असलेल्या त्या शरीरातून वाहू लागला. समलिंगी आकर्षणाच्या गर्हणीय प्रवाहात वाहवत गेलेल्या सामुराई आणि सामान्य शेतक-याचा मुलगा यांच्या प्रमाथी प्रेमकहाणीची हृदय हेलावणारी शोकांतिका.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #JAPANESEMAGNOLIA(MARATHI) #JAPANESEMAGNOLIA #जॅपनीजमॅग्नोलिया #FICTION TRANSLATED FROM ENGLISH TO MARATHI NIRMALA MONE निर्मला मोने REI KIMURA रेई किमुरा #JAPANESEORCHID(MARATHI) #AWAMARUTITANICOFJAPAN(MARATHI) #JAPANESEROSE #MIERIC #"
Customer Reviews
  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 12-3-2010

    ‘जॅपनीज मॅग्नोलिया’ हे रेई किमुरा या मूळ जपानी लेखिकेची कादंबरी निर्मला मोने यांनी अनुवादित केली आहे. अत्यंत नाजूक विषय तितक्याच सहज सुंदरतेने मांडत ही कादंबरी वाचकांना कथानकात गुंगवून ठेवते. किमुरा या व्यवसायाने वकील आहेत. अनेक चांगल्या कादंबऱ्या तयांच्या नावावर आहेत. अशियाई आणि युरोपियन भाषांमध्ये त्यांचे अनुवादही झाले आहेत. बहुतेक लेखन ऐतिहासिक घटनांवर आधारित असून त्या ऐतिहासिक काळातल्या अनेक घटना, प्रसंग, व्यक्तिमत्त्व जिवंत करतात. ‘जॅपनीज मॅग्नोलिया’ ही अशीच एक काहाणी आहे. कादंबरीचा विशय समलिंगी आकर्षणावर आधारित आहे. या आकर्षणात वाहत गेलेला सामुराई आणि सामान्य शेतकऱ्याचा मुलगा यांची प्रेमकहाणी वाचकाचे मन हेलकावून टाकते. ऐतिहासिक दस्तऐवजातून उलगत जाणारी ही कादंबरी सुसंस्कृत अशा मार्गाने चरम टप्प्यावर पोहोचते. शेतकऱ्याचा मुलगा त्यांचे आई-वडील, पत्नी, सामुराईची कौटुंबिक पार्श्वभूमी दोघांमधील सामाजिक आर्थिक अंतर यांचे चित्रण अत्यंत चपखलतेने येत राहते. सामुराई आणि शेतकऱ्याचा मुलगा या दोघांमधील संबंध अत्यंत संयत पद्धतीने, सुसंस्कृत व्यवहाराने वाचकांसमोर येतात. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MI GALIB BOLTOY
MI GALIB BOLTOY by SHABBIR ROMANI Rating Star
लोकमत २५.९.२०२३

शब्बीर रोमानी हे व्यवसायाने वकील. मातृभाषा अर्थात उर्दू आणि शिक्षण मराठी माध्यमातून झालेले. २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या उर्दू पुस्तकाला, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या साहित्य अकादमी केंद्राचे पुरस्कार लाभले आहेत. आता मिर्झागालिबवरचे नवे पुस्तक, `मी गालिब बोलतोय...!` लक्ष वेधून घेत आहे. गालिबच्या एका शेरची पहिली ओळ घेऊन सांगायचे झाल्यास, जिक्र गालिबचा आणि खूबसूरत बयान लेखकाचे असे या पुरस्काराबद्दल म्हणता येईल. मिर्जा असदुल्ला खां,`गालिब` या श्रेष्ठ शायरची शायरी, त्याचे पत्रलेखन, चरित्र यावर आजवर शेकडो पुस्तक प्रसिद्ध आहेत. लेखकाने प्रस्तावनेत नमूद केल्यानुसार गालिबवर अनेक लेखकांनी लिहिले आहे. मराठी, हिंदी-उर्दू लेखकांची ते तपशील पाहून आचंबा वाटतो. शिवाय शब्बीर रोमानी यांनी इथे आपल्या लेखनाचे प्रयोजन सांगताना म्हटले आहे, कि गालिबबद्दल अनेक उलट-सुलट प्रकारच्या कहाण्या, विनोद, (कसलेही शेर गालिबच्या नावाने सांगत राहणे) प्रचलित आहेत; त्यामुळे गालिबची कथा, त्याच्या पत्रांमधल्या मनोरंजक गप्पा-गोष्टी आणि त्याच्याशी निगडित आठवणी हे सगळं साध्या सोप्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न म्हणजे हे पुस्तक. सर्वसामान्य माणसाच्या जगण्यातल्या सर्व भावछटा गालिबच्या काव्यातून दिसत असतात. पुस्तक वाचताना गालिबची प्रकृती, त्याची विनोद बुद्धी, संवेदनशील वृत्ती हे आपल्याला जाणवत राहते, आणि लेखकाची तळमळसुद्धा. या पुस्तकाचे वैशिष्टय म्हणजे, मोठी प्रकरण टाळून किस्से सांगावेत अशी रचना. शिवाय लेखकाची साधी-सरळ भाषा, यामुळे शायरीची आणि गालिबबद्दलची सर्वसाधारण माहिती आणि कुतुहूल असणाऱ्या वाचकांना हे पुस्तक रंजक वाटेल. सहसा गालिबचे गाजलेले शेर, किस्से हे आपल्या वाचनात असतात. या पुस्तकात गालिबचे अनेक दुर्मिळ शेर, शिवाय फारसी रचनाही या पुस्तकात समाविष्ट असल्याने त्याला एक संदर्भ ग्रंथाचेही स्वरूप आलेले आहे. गालिबला आंबे फार आवडायचे, `मिर्झा गालिब` या गाजलेल्या चित्रपटातला तो प्रसंग आजही लक्षात आहे. आंबे खाताना एक मित्र गालिबला तुच्छतेने म्हणतो, `आम तो गधेभी नही खाते!` त्यावर गालिबने त्वरित उत्तर देतो. `सिर्फ गधेही नाही खाते!` शब्बीर रोमानी यांनी हा प्रसंग व विनोद म्हणून सांगितला नाही, तर त्याचे तपशिलाने वर्णन तर केलेच शिवाय आंब्यावरची गालिबची मोठी गजल त्यांनी दिलेली असल्याने त्या किश्श्याला एक गांभीर्य आलेले आहे. असाच एक किस्सा, ते कलकत्त्याला असताना साध्या चिकणी-सुपारीवर गालिबला कुणी छेडले होते, यावर तुमची शायरी होऊन जाऊ द्या! असे आवाहन केले. या सुपारीच्या दिसण्या-असण्यावरच्या अफलातून शायरीची भली मोठी झलकच गालिबने पेश केली! गालिबच्या एक महत्वाचा शेर आहे. जिक्र ऊस परी-वंश का और फार बयां अपना बन गया रिकीब आखिर, था जो राजदां अपना त्या परिच्या सौंदर्याचे वर्णन आणि तेही माझ्या भाषेतून, माझ्याकडून ऐकले आणि माझा जवळचा असा मित्र आता या प्रेमाच्या नात्यात माझा प्रतिस्पर्धी झाला (आता तो तिच्यावर प्रेम करायला लागला) कलकत्त्याला गालिब दीडेएक वर्ष राहिला होता. तिथल्या धनिकांनी मुशायरे, मुजरे आयोजित केलेले असायचे, गालिबचा तिथे सन्मानही व्हायचा. गालिबने या बद्दल फार जिव्हाळ्याने लिहिले आहे. या मुशायऱ्यामध्ये गालिबचे फारसीचे काव्यवाचन ऐकून फारसी भाषेचे तज्ञ त्याच्यावर नाराज झाल्याची आठवण आहे! गालिबच्या तोंडून फारसीचे कौतुक ऐकून लोकांनी आक्षेप घेतला! गालिब हा आपल्या दुःख, विवंचनेवर हसणारा अद्भुत असा कलावंत होता. हा शेर वाचल्यावर आपल्याला मुन्शी प्रेमचंद यांच्या `पूस कि रात` मधला हलकू आठवतो! मिर्झा गालिबच्या कुतुहूल असणाऱ्या वाचकांना हा संग्रह आवडण्यासारखाच आहे. लेखनातल्या भाषिक काही त्रुटी वगळल्यास, गालिबचे किस्से, त्याची शायरी हे सगळे रोचक आहे. ...Read more

MRUTYUNJAYEE
MRUTYUNJAYEE by RATNAKAR MATKARI Rating Star
पुस्तकप्रेमी

मीना कश्यप शाह *मृत्युंजयी* भयकथा हा रत्नाकर मतकरींच्या लेखनाचा हातखंडा. मी दहावीच्या सुट्टीत असताना भयकथा वाचायला सुरुवात केली आणि त्यांनी मला पुरात झपाटून टाकलं होतं. ही पुस्तकं असायचीही सुटसुटीत जाडीची. त्यामुळे जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी पुस्तक लगणाऱ्या मला सगळीकडे ती घेऊन जात येत असत. क्लास मध्ये लवकर पोहोचले - वाच पुस्तक, बससाठी उभी आहे, वाच पुस्तक; झोप येत नाही, वाच (हे बहुदा चक्राकार रित्या सुरु राहायचं, झोप नाही म्हणून वाचायचं आणि वाचत असायचे म्हणून झोप नाही... त्या वयात असं सगळं चालायचं - लहानपण देगा देवा...) मृत्युंजयी सुरु केली तेव्हा आधीच खेकडा, रंगांधळा वाचून झालं होतं. अजूनही एक संपवलं होतं, पण नाव नाही आठवत (बहुतेक कबंध). त्या पार्श्वभूमीवर मृत्युंजयी फार आवडलं नाही, आणि खरं तर त्यामुळे रत्नाकर मतकरींच्या भयकथा वाचणं थांबलं. अलीकडेच हे इ-बुक मिळालं किंडल वर, पुन्हा वाचलं - आतासुद्धा शेवटच्या परिच्छेदात काय वळण मिळतं त्याची उत्सुकता होती, पण एकूणच माझा patience खूपच कमी झालाय त्यामुळे skip reading, quick reading करत पुस्तक पटकन वाचून संपलं. मृत्यू, अखेर, शेवट ही भावना प्रत्येकासाठी भीतीदायकच. त्या भीतीवर बेतलेल्या कथा ह्या संग्रहात आहेत. अतिमानवीय, फँटसी, भुताटकी अशा धक्कातंत्राचा उपयोग अनेक लेखक करतात. पण मतकरीचं वैशिष्ठय असं, की ते जळमटं सारखी कथा लिहून जातात. मृत्युंजयी मधील कथांमध्ये मृत्यूची अनेक रूपं दिसतात, कथा जिवंत माणसांच्या - पण मृत्यूची चाहूल, त्याची भीती, कधी त्याचं हवेहवेपण, कधी त्याच्याकडे आपणहून जाणे, अशा अनेक रंगढंगांनी मतकरी गूढता कायम ठेवतात. ह्या पुस्तकातील, मृत्यू अवतीभवती असलेल्या प्रत्येक कथेत, आपणा सर्वांना नक्कीच सुप्त आकर्षण वाटत असलेल्या अनेक गूढ गोष्टी येतातच... मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी करण्याची अतिमानवीय साधना... स्त्री-पुरुषातील शारीरिक आणि मानसिक ओढ... पूर्वी केलेल्या चुका आणि त्याबद्दलचा सल... जुलमाचा प्रतिशोध... अतिमानवीय शक्तींनी झपाटणे... भूतबाधा, भूतांशी गाठभेट... मृत्यूच्या अनेकविध तऱ्हा... मानसिक संतुलन ढळणे... आणि तत्सम. ह्या कथाप्रकारात महत्वाचं असतं, ते शेवटच्या काही वाक्यांमधे कथेला दिलेलं वळण आणि त्यामुळे वाचकाला बसलेला धक्का. रत्नाकर मतकरींच्या गूढकथा म्हणूनच खूप प्रभावी ठरतात. आता मात्र हे धक्का तंत्र बऱ्याच जागी पाहायला मिळतं - OTT वरच्या अनेक चित्रपट किंवा नाट्यमालांमधे हे तंत्र कथाकार वापरतात, आणि लोकांना हे पहायला खरंच खूप आवडतं, म्हणूनच त्या प्रसिद्ध होतात. अलीकडचं उदाहरण "वाळवी" चित्रपट! मृत्युंजयी मधे देखील काही कथा असा आनंद देऊन जातात. पण असं आहे ना "अति सर्वत्र वर्जयेत" - त्यामुळे बऱ्याच कथांच्या शेवटचा अंदाज लागतो आणि त्यांचा प्रभाव कमी होतो. सुरुवातीला जी गूढकथांची पुस्तकं मी वाचली, तेव्हा हे धक्कातंत्र मला नवीन होतं, त्यामुळे त्यात हा अंदाज लागत नव्हता. कदाचित मृत्युंजयी तेव्हा वाचलं आणि आताही वाचलं ते ह्या तंत्राचा अति वापर झाल्यावर वाचलं गेलं म्हणून असेल, पण कमी प्रभावी वाटलं हे खरं. अर्थात प्रत्येक गोष्टीत (सध्या इतर कथांमधे फारसे न सापडणारे) एक समान सूत्र आहे - ते म्हणजे, *वाईटाचं कधीच भलं होत नाही*. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, कधीही उचलून वाचायला सुरुवात करून काही मिनिटात एक गोष्ट संपते. सध्याच्या व्यग्र काळात हे पुस्तक पुन्हा वाचायला सोपे गेले, नक्कीच. आणि मी पुन्हा एकदा ह्या कथाप्रकाराकडे आकर्षितही झाले आहे... पुन्हा सगळी गूढकथांची पुस्तकं वाचायला हवीत. ...Read more