* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
 • Ebooks:
 • Print Books:
WHY DOES MAN CHANGE WHEN HE GAINS WEALTH? WEALTH EXPOSED THE HIDDEN VICES AND VIRTUES. THE VICES WHICH GENERALLY ARE ROOTED DEEP WITHIN, SURFACE IN THE PRESENCE OF WEALTH. WEALTH CHANGES HUMANS. A MISER BECOMES GREEDY WHEN HE BECOMES RICH. AN AVARICIOUS SPENDS A LOT IN BUYING VAST PROPERTY. A SELFISH BECOMES LUXURIOUS. A GENEROUS PERSON BECOMES ENDOWER. THOSE WHO HAVE NO LUST FOR MONEY ARE LEAST BOTHERED BY THE PRESENCE OR ABSENCE OF MONEY. WEALTH TRULY REVEALS THE COLOURS OF HUMAN NATURE AND RELATIONS
पैसा आला की, माणूस का बदलतो? पैसा आला की, माणसाच्या अंतर्यामी दडलेले गुणअवगुण बाहेर येतात. पैसा नसताना दडलेले अवगुण; पैसा आला की, बाहेर येतात... पैसा हा एखाद्या रावकाचेसारखा असतो. म्हणूनच कंजूस माणूस श्रीमंत झाला की, लोभी बनतो. अधाशी माणूस जमीनजुमला खरेदी करतो. स्वार्थी माणूस विलासी बनतो. उदार माणूस दानी बनतो. ज्यांना पैशाचा मोह नाही, त्यांना जवळ पैसा असला काय किंवा नसला काय; काहीच फरक पडत नाही. पैशामुळे खयाखुया मानवी संबंधांचं दर्शन घडतं.

No Records Found
No Records Found
Keywords
#SUDHA MURTY #N.R.NARAYANA MURTY #LEENA SOHONI #UMA KULKARNI #WISE & OTHERWISE #GOSHTI MANSANCHYA #PUNYABHUMI BHARAT #THAILIBHAR GOSHTI #SUKESHINI AANI ITAR KATHA #BAKULA #AYUSHYACHE DHADE GIRAVTANA #AAJICHYA POTADITALYA GOSHTI #MAHASHWETA #DOLLAR BAHU #SAMANYATALE ASAMANYA #PARIGH #PITRURHUN #ASTITVA #HARAVALELYA MANDIRACHE RAHASYA #TEEN HAJAR TAKE #SARPACHA SOOD #GARUDJANMACHI KATHA #TRISHANKU #A BETTER INDIA A BETTER WORLD #NARAYAN MURTY : MULYA JAPNARA EK ADWITIYA AAYUSHYA #सुधा मूर्ती #एन.आर.नारायण मूर्ती #लीना सोहोनी #उमा कुलकर्णी #वाइज अँड अदरवाइज #गोष्टी माणसांच्या #पुण्यभूमी भारत #थैलीभर गोष्टी #सुकेशिनी #बकुळा #आयुष्याचे धडे गिरवताना #आजीच्या पोतडीतल्या गोष्टी #महाश्वेता #डॉलर बहू सामान्यांतले असामान्य #परीघ पितृऋण #अस्तित्व #हरवलेल्या मंदिराचे रहस्य #तीन हजार टाके #सर्पाचा सूड #गरुडजन्माची कथा #त्रिशंकू #अ बेटर इंडिया अ बेटर वर्ल्ड : नारायण मूर्ती #नारायण मूर्ती : मूल्यं जपणारं एक अद्वितीय आयुष्य
Customer Reviews
 • Rating StarShubhada Borse

  नुकतेच सुधा मूर्ती यांच परीघ हे पुस्तक वाचलं. खूप छान कादंबरी आहे. ही कादंबरी मृदुला या पात्रांभोवती फिरते जी समाजातील एक सर्वसामान्य तत्वनिष्ठ तसेच कुठलीही भौतिक सुख गौन मानते. कादंबरीत सुधा ताईंनी समाजातील वेगवेगळ्या घटकांचे प्रतिनिधित्व करणारी पातरे रेखाटली आहेत .त्यामुळे हे कथानक आपल्या आजूबाजूलाच कुठेतरी घडलं आहे असं वाटतं. वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत डॉक्टर संजय, प्रत्येक गोष्टीत केवळ व्यवहार बघणाऱ्या रत्नम्मा, श्रीमंतीचं ढोंग करणारी लक्ष्मी व शंकर, सरकारी कार्यालयातील बाबुंच प्रतिनिधित्व करणारे चिकनांजप्पा इत्यादी पात्र कथेला वास्तव बनवतात. सुधारणा इंची खूप सुंदर व वाचनीय कलाकृती. ...Read more

 • Rating StarChaitali Bandisode

  नमस्कार, नुकतेच सुधा मूर्ती यांचे परीघ हे पुस्तक वाचले . अंतर मनाला स्पर्श करणारी कथा आहे. या कथेतिल प्रमुख पात्र मृदुला आणि संजय जणू आपल्याच परिचयाची आहेत असा भास होतो. पैसा आणि अधिकार आल्यावर व्यक्ती कशी बदलत जाते हे खुप सुंदररित्या लिहले आहे. या ुस्तकातून शिकण्यासारखे खूप काही आहे. आपण आपल्या जवळ च्या माणसांनाबद्दल् आपल्या मनात एक मत तयार केलेले असते आणि आपण त्यावर विश्वास ठेवून एका वर्तुलात् (circle) फ़िरत असतो. पण जेव्हा आपल्या विश्वासाला तडा जातो तेव्हा आपण त्याच वर्तुलात् अडकले जातो व आपली घुसमट होते. पण हे सगळे सहन न करता आपण स्वतःसाठी मोकळा श्वास घेणे देखील आवश्यक असते. स्वतभोवतिचे परीघ ओलांडून स्वतःला संधी देणे सुद्धा गरजेचे आहे. हेच पुस्तकच्या मुखपृष्ठातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे असे मला वाटते. नक्की वाचा. ...Read more

 • Rating StarPankaj Datare

  पैसा आला की, माणूस का बदलतो? पैसा आला की, माणसाच्या अंतर्यामी दडलेले गुण-अवगुण बाहेर येतात. पैसा नसताना दडलेले अवगुण; पैसा आला की, बाहेर येतात... पैसा हा एखाद्या रावकाचेसारखा असतो. म्हणूनच कंजूस माणूस श्रीमंत झाला की, लोभी बनतो. अधाशी माणस जमीनजुमला खरेदी करतो. स्वार्थी माणूस विलासी बनतो. उदार माणूस दानी बनतो.ज्यांना पैशाचा मोह नाही, त्यांना जवळ पैसा असला काय किंवा नसला काय; काहीच फरक पडत नाही.’ पैशामुळे खऱ्याखुऱ्या मानवी संबंधांचं दर्शन घडतं. पैसा असताना आणि नसताना मानवी स्वभावाच्या दोन टोकांचं दर्शन बहुतांश वेळा घडतं. मानवी संबंधांमध्ये पैशाला महत्त्व नाही अशी माणसं क्वचितच आढळतात. पैसा आला की माणूस बदलताना दिसतो, त्याचे पूर्वी न पाहिलेले रंगढंग दिसायला लागतात. पैशामुळे खर्‍याखुर्‍या मानवी संबंधांचं दर्शन घडतं. हेच परीघ कादंबरीमध्ये सुधा मूर्ती यांनी मांडलं आहे. ...Read more

 • Rating StarAtharva Sangita Rajendra Khamkar

  सुधा मूर्ती यांची जीवनशैली जितकी साधी आहे तोच साधेपणा त्यांच्या प्रत्येक साहित्यामध्ये उतरलेला दिसतो. आपल्या समाजामध्ये असणाऱ्या विविध प्रवृत्तीच्या माणसांचे चित्रण त्यांच्या लेखनातून प्रकर्षाने जाणवते . त्याच पठडीतले सुधा मूर्तींचे एक पुस्तक म्हणजे रीघ ! आपल्या आजूबाजूला पाहिलं तर आपल्याला दिसतं की काही माणसं भोगवादाला महत्त्व देतात तर काही जण आदर्शवाद पाळतात. ह्याच दोन वृत्तींच्या मधलं द्वंद्व लेखिकेने या पुस्तकात मांडले आहे. उत्तर कर्नाटकातल्या एका लहान गावातून आलेल्या , छोट्या गोष्टींमध्ये समाधानी असणाऱ्या मृदुलाची आणि तिच्या जीवनात येणाऱ्या हेलकाव्यांची ही गोष्ट ! गोष्टीचं आशय दिसताना अगदी साधा सरळ वाटतो ; पण त्यातला गभितार्थ खूप गहिरा आहे. साधा विषय अत्यंत खोलात जाऊन मांडणे हे सुधा मूर्तींच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे आणि ते ह्या पुस्तकातून प्रकर्षाने जाणवते. साध्या सरळ स्वभावाची , सगळ्या गोष्टींच्या मध्ये समाधानी असणारी , आदर्श वादाला प्राधान्य देणारी मृदुला , सुरुवातीला तत्व आणि मूल्य यांची पाठराखण करणारा परंतु काळाच्या ओघात आणि पैशाच्या कैफ चढल्याने भोगवादात सुख मानणारा तिचा नवरा संजय , भौतिक गोष्टींच्या हव्यासापायी पैशाची हवी तशी उधळपट्टी करणारे , थोड्याशा आतल्या गाठीची मृदुलाची नणंद लक्ष्मी आणि तिचा नवरा शंकर , काटकसर आणि पैसे साठवण्याच्या सवयीमुळे साध्या खर्चाला ही उधळपट्टी मानणारी तिची सासू , गावाकडे राहणाऱ्या आणि तेवढ्याच साध्या स्वभावाचे मृदुलाचे आईवडील , सुरुवातीला उत्साह आणि उपभोग यांच्यात रमलेली परंतु काही अपघातांच्या मुळे विरक्ती कडे वळलेली मृदूलाची मैत्रीण अनिता , अतीलाडाने बिघडलेला मृदुलाचा मुलगा शिशिर आणि मृदुला च्या आयुष्यात वेळीच येऊन तिला सावरणारे तिचे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. राव यांसारख्या कितीतरी परस्पर विरोधी पात्र , त्यांचे संवाद आणि त्यांची अवस्था वाचताना खरच आपण अंतर्मुख होऊन जातो. उत्तर कर्नाटक ते बेंगलोर पर्यंत बदलत्या कर्नाटकाच्या विविध छटांचे आरेखन , माणसाच्या आत चाललेल्या द्वंद्वाचे कथन , एकाच समाजात किंबहुना एकाच घरात राहणाऱ्या व्यक्तींच्या विविध मनोवृत्तीचे चित्रण आणि कुठेही अतिशयोक्ती वाटणार नाहीत अश्या प्रसंगांची मांडणी ही ह्या पुस्तकांची वैशिष्ट्ये मानायला हवीत. कथेचा शेवट जरी सुखांतिके कडे वळणारा असला तरीही हे पुस्तक ठिकठिकाणी आपल्या मनावर प्रभाव पडून जात. वाचताना ठिकठिकाणी आपल्याला दोन गोष्टींच्या मधली एकची निवड करायला भाग पाडत आणि शेवटी एक मोठा इम्पॅक्ट मनावर ठेऊन जात. आयुष्याबद्दल गंभीरपणे विचार करण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचायला हवं ! ...Read more

 • Read more reviews
Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MRUTYUNJAYEE
MRUTYUNJAYEE by RATNAKAR MATKARI Rating Star
पुस्तकप्रेमी

मीना कश्यप शाह *मृत्युंजयी* भयकथा हा रत्नाकर मतकरींच्या लेखनाचा हातखंडा. मी दहावीच्या सुट्टीत असताना भयकथा वाचायला सुरुवात केली आणि त्यांनी मला पुरात झपाटून टाकलं होतं. ही पुस्तकं असायचीही सुटसुटीत जाडीची. त्यामुळे जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी पुस्तक लगणाऱ्या मला सगळीकडे ती घेऊन जात येत असत. क्लास मध्ये लवकर पोहोचले - वाच पुस्तक, बससाठी उभी आहे, वाच पुस्तक; झोप येत नाही, वाच (हे बहुदा चक्राकार रित्या सुरु राहायचं, झोप नाही म्हणून वाचायचं आणि वाचत असायचे म्हणून झोप नाही... त्या वयात असं सगळं चालायचं - लहानपण देगा देवा...) मृत्युंजयी सुरु केली तेव्हा आधीच खेकडा, रंगांधळा वाचून झालं होतं. अजूनही एक संपवलं होतं, पण नाव नाही आठवत (बहुतेक कबंध). त्या पार्श्वभूमीवर मृत्युंजयी फार आवडलं नाही, आणि खरं तर त्यामुळे रत्नाकर मतकरींच्या भयकथा वाचणं थांबलं. अलीकडेच हे इ-बुक मिळालं किंडल वर, पुन्हा वाचलं - आतासुद्धा शेवटच्या परिच्छेदात काय वळण मिळतं त्याची उत्सुकता होती, पण एकूणच माझा patience खूपच कमी झालाय त्यामुळे skip reading, quick reading करत पुस्तक पटकन वाचून संपलं. मृत्यू, अखेर, शेवट ही भावना प्रत्येकासाठी भीतीदायकच. त्या भीतीवर बेतलेल्या कथा ह्या संग्रहात आहेत. अतिमानवीय, फँटसी, भुताटकी अशा धक्कातंत्राचा उपयोग अनेक लेखक करतात. पण मतकरीचं वैशिष्ठय असं, की ते जळमटं सारखी कथा लिहून जातात. मृत्युंजयी मधील कथांमध्ये मृत्यूची अनेक रूपं दिसतात, कथा जिवंत माणसांच्या - पण मृत्यूची चाहूल, त्याची भीती, कधी त्याचं हवेहवेपण, कधी त्याच्याकडे आपणहून जाणे, अशा अनेक रंगढंगांनी मतकरी गूढता कायम ठेवतात. ह्या पुस्तकातील, मृत्यू अवतीभवती असलेल्या प्रत्येक कथेत, आपणा सर्वांना नक्कीच सुप्त आकर्षण वाटत असलेल्या अनेक गूढ गोष्टी येतातच... मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी करण्याची अतिमानवीय साधना... स्त्री-पुरुषातील शारीरिक आणि मानसिक ओढ... पूर्वी केलेल्या चुका आणि त्याबद्दलचा सल... जुलमाचा प्रतिशोध... अतिमानवीय शक्तींनी झपाटणे... भूतबाधा, भूतांशी गाठभेट... मृत्यूच्या अनेकविध तऱ्हा... मानसिक संतुलन ढळणे... आणि तत्सम. ह्या कथाप्रकारात महत्वाचं असतं, ते शेवटच्या काही वाक्यांमधे कथेला दिलेलं वळण आणि त्यामुळे वाचकाला बसलेला धक्का. रत्नाकर मतकरींच्या गूढकथा म्हणूनच खूप प्रभावी ठरतात. आता मात्र हे धक्का तंत्र बऱ्याच जागी पाहायला मिळतं - OTT वरच्या अनेक चित्रपट किंवा नाट्यमालांमधे हे तंत्र कथाकार वापरतात, आणि लोकांना हे पहायला खरंच खूप आवडतं, म्हणूनच त्या प्रसिद्ध होतात. अलीकडचं उदाहरण "वाळवी" चित्रपट! मृत्युंजयी मधे देखील काही कथा असा आनंद देऊन जातात. पण असं आहे ना "अति सर्वत्र वर्जयेत" - त्यामुळे बऱ्याच कथांच्या शेवटचा अंदाज लागतो आणि त्यांचा प्रभाव कमी होतो. सुरुवातीला जी गूढकथांची पुस्तकं मी वाचली, तेव्हा हे धक्कातंत्र मला नवीन होतं, त्यामुळे त्यात हा अंदाज लागत नव्हता. कदाचित मृत्युंजयी तेव्हा वाचलं आणि आताही वाचलं ते ह्या तंत्राचा अति वापर झाल्यावर वाचलं गेलं म्हणून असेल, पण कमी प्रभावी वाटलं हे खरं. अर्थात प्रत्येक गोष्टीत (सध्या इतर कथांमधे फारसे न सापडणारे) एक समान सूत्र आहे - ते म्हणजे, *वाईटाचं कधीच भलं होत नाही*. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, कधीही उचलून वाचायला सुरुवात करून काही मिनिटात एक गोष्ट संपते. सध्याच्या व्यग्र काळात हे पुस्तक पुन्हा वाचायला सोपे गेले, नक्कीच. आणि मी पुन्हा एकदा ह्या कथाप्रकाराकडे आकर्षितही झाले आहे... पुन्हा सगळी गूढकथांची पुस्तकं वाचायला हवीत. ...Read more

MAHASAMRAT RANKHAINDAL
MAHASAMRAT RANKHAINDAL by VISHWAS PATIL Rating Star
गंधार

नमस्ते सर, काल रात्री मी रणखैनदळ मध्ये आपण लिहलेला पावनखिंडीतील थरार वाचून काढला. कालची रात्र मी कधीच विसरणार नाही. जणू काही मीच महाराजांसोबत प्रवास करणारा एक मावळा आहे. महाराज थकल्यावर त्यांच्या तळपायांना राईचं तेल चोळून देतो आहे, त्यांच्यासह नाचणीच भाकर खातो आहे असं मला वाटतं होतं. सर, एखाद्या लहान मुलाला आकाशातल्या तारका दाखवाव्यात त्याचप्रमाणे आपण इतिहासाच्या नभांगणातील असंख्य तारकांचं दर्शन घडवून आणता आणि छत्रपती शिवराय हा अर्थातच ताऱ्यांमधील तारा असा ध्रुवतारा आहे ज्याचं अनोखं असं दर्शन महासम्राट मधून घडतंय. सर, माझी केवळ मागच्या जन्मीची पुण्याई म्हणून मी आपल्याला भेटू शकलो. ...Read more