* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
NOONI IS A CITY GIRL WHO IS VERY SURPRISED AT THE UNEXPECTED PACE OF LIFE IN HER GRANDPARENT’S VILLAGE IN THE STATE OF KARNATAKA. NOT BEING FAZED WITH THE TURN OF EVENTS, SHE ENGAGES HERSELF IN MANY OF THE ODD JOBS THAT ARE AVAILABLE IN THE VILLAGE. SHE RESORTS TO DOING WORK LIKE PAPAD MAKING, ORGANISING ENJOYABLE PICNICS, LEARNING TO RIDE A CYCLE AND A LONG LIST OF ACTIVITIES WITH HER NEW FOUND FRIENDS.JOIN THE VERY CURIOUS CHARACTER OF NOONI AS SHE UNFOLDS THE MYSTERY BEHIND THE STEPWELL. HER INCESSANT URGE TO ABSTRACTING INFORMATION IS WHAT LEADS HER ON THIS ADVENTURE.
भारताच्या लाडक्या कथाकार सुधा मूर्ती यांच्या लेखणीतून साकार झालेली एक नवी साहस कथा. शहरात वाढलेली मुलगी अनुष्का सुट्टीत आपल्या आजी-आजोबांच्या गावी येते. खेड्यातलं संथ जीवन बघून तिला आश्चर्याचा धक्का बसतो; पण ती लगेचच तिथे रुळते. तिथल्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये ती सहभागी होऊ लागते. पापड बनवणं, सहलीला जाणं, सायकल चालवायला शिकणं आणि नव्या मित्र-मंडळींबरोबर झालेली दोस्ती या सगळ्यात तिचे दिवस भराभर जाऊ लागतात... आणि एक दिवस गावाजवळच्या रानात आपल्या मित्र-मंडळींबरोबर सहलीला गेलेली असताना अनुष्काला एका जुन्या, पायऱ्या असलेल्या विहिरीचा शोध लागतो. या विहिरीबद्दल तिनं नुकतीच आजीकडून एकदंत कथा ऐकलेली असते. निर्भय अनुष्का सोबत एका नव्या साहसासाठी तयार व्हा! सुधा मूर्ती यांच्या लेखणीतून उतरलेल्या या पुस्तकाची गोडी अवीट आहे. ते एकदा हातात आल्यावर खाली ठेवावंसं वाटणारच नाही!

No Records Found
No Records Found
Keywords
#SUDHA MURTY #N.R.NARAYANA MURTY #LEENA SOHONI #UMA KULKARNI #WISE & OTHERWISE #GOSHTI MANSANCHYA #PUNYABHUMI BHARAT #THAILIBHAR GOSHTI #SUKESHINI AANI ITAR KATHA #BAKULA #AYUSHYACHE DHADE GIRAVTANA #AAJICHYA POTADITALYA GOSHTI #MAHASHWETA #DOLLAR BAHU #SAMANYATALE ASAMANYA #PARIGH #PITRURHUN #ASTITVA #HARAVALELYA MANDIRACHE RAHASYA #TEEN HAJAR TAKE #SARPACHA SOOD #GARUDJANMACHI KATHA #TRISHANKU #A BETTER INDIA A BETTER WORLD #NARAYAN MURTY : MULYA JAPNARA EK ADWITIYA AAYUSHYA #सुधा मूर्ती #एन.आर.नारायण मूर्ती #लीना सोहोनी #उमा कुलकर्णी #वाइज अँड अदरवाइज #गोष्टी माणसांच्या #पुण्यभूमी भारत #थैलीभर गोष्टी #सुकेशिनी #बकुळा #आयुष्याचे धडे गिरवताना #आजीच्या पोतडीतल्या गोष्टी #महाश्वेता #डॉलर बहू सामान्यांतले असामान्य #परीघ पितृऋण #अस्तित्व #हरवलेल्या मंदिराचे रहस्य #तीन हजार टाके #सर्पाचा सूड #गरुडजन्माची कथा #त्रिशंकू #अ बेटर इंडिया अ बेटर वर्ल्ड : नारायण मूर्ती #नारायण मूर्ती : मूल्यं जपणारं एक अद्वितीय आयुष्य
Customer Reviews
  • Rating StarPawan Chandak

    `हरवलेल्या मंदिराचे रहस्य` वाचकांच्या नजरेतून उलगडणारी कादंबरी सुधा मूर्ती लिखित व लीना सोहोनी अनुवादित रहस्यमय पण तितकीच मनाला भावणारी, अत्यंत सोप्या शब्दात मांडलेली इतकेच नाही तर लहान मुलांना जरी वाचून दाखवली तर एका बैठकीत समजणारी अशी अप्रतिम कदंबरी आज एका बैठकीत वाचून झाली. ही कादंबरी वाचतांना माझे लहान होऊन लहानपणी च्या दिवसांत जाऊन सुधा आज्जी मला ही गोष्ट सांगत आहे आणि मी देखील आज वयाच्या चाळिसाव्या वर्षी तितक्याच आवडीने ऐकतोय असं वाटत होतं. एका आटपाट नगरात सोमनायक नावाचा दानशूर राजा एका शिल्पकाराच्या मदतीने पायऱ्यांची विहीर, सात शिवमंदिर, शिल्प, खांब असे सुंदर मंदिर व अमृतमय पाण्याचा झरा असलेली विहीर तयार करतो. व स्वतः पाहरेकरी ठेऊन ती विहीर प्रदूषित होण्यापासून रक्षण करतो. पण तो तीर्थयात्रेला गेल्यावर त्याचा पुत्र हा नियम मोडून मित्रांसोबत जलविहार करून लावलेले सर्व नियम मोडून हे पाणी प्रदूषित करतो ज्यामुळे प्रजेला दूषित पाण्यामुळे आजार व पुढे परक्रीय आक्रमण आदींमुळे हे विहिर पूर्ण बुजवण्यात येते. ही झाली सोमहळी गावविषयी दंतकथा. तर मित्रानो अनुष्का तिच्या आजोळी सुटयात जाते तिथे तिची मैत्री अमित, मेधा, आनंद आणि महादेव यांच्याशी होते. आणि ते गावातील ग्रामीण जीवन, पर्यटन, शेती, गावातील नदी, टेकडी, बगीचा, जंगल, गाय गोठा, वन्यजीव, पक्षी आदी निसर्गमय वातावरणात रमतात. या सर्व गावातील जीवनाचा आनंद घेत असताना एकदा त्यांची आज्जी आजोबा वर लिहिलेली हरवलेल्या मंदिर व विहीर ची गोष्ट त्यांना सांगते. एकदा वळवाचा पावसानंतर नदी काठचे सौंदर्य पाहण्यासाठी अनुष्का आणि तिचे 4 मित्र भटकंती साठी निघतात तेंव्हा अनुष्का चा पाय चिखलात खोलवर रुतल्यावर त्यांना रहस्यमय खड्डा आहे की विहीर आहे की गुफा याचा शोध लागतो. पुढे पडणारे प्रश्न आज्जी आजोबांना ही गोष्ट सांगायची का की आपण एकट्याने खोद काम करायचे ? गावातील लोकांना कळल्यावर ते काय म्हणतील की मदत करतील ? पुरातत्व विभागाची यावर काय भूमिका राहील ? शासकीय वेळकाढू वृत्तीमुळे खोदकाम होईल का ? त्या खड्यात खरच आज्जीने सांगितल्या दंत कथे नुसार नक्कीच विहीर , सात शिवमंदिर, पाण्याचा अमृतमय झरा असेल का ? तर वाचक मित्रांनो एकदा नक्कीच वाचून पहा आणि आपल्या मुलांना देखील वाचून दाखवा त्यांना देखील आवडेल डॉ पवन चांडक एक वाचक ...Read more

  • Rating StarPankaj Datare

    *📖हरवलेल्या मंदिराचे रहस्य*📖 ही कादंबरी म्हणजे अनुष्का या बारा वर्षांच्या मुलीची साहसकथा आहे. शहरात वाढलेली अनुष्का सुट्टीत आपल्या आजी-आजोबांच्या गावी जाते. गावातील जीवन शहरापेक्षा वेगळे असल्याचे तिच्या लक्षात येते. पण तिला ते हळूहळू आवडू लागते तिथल्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये ती सहभागी होऊ लागते. पापड बनवणं, वरदा नदीच्या काठी सहलीला जाणं, सायकल चालवणे, नवे मित्र-मैत्रिणी या सर्वात तिची सुट्टी छान चाललेली असते. यात आणखी एक गंमत म्हणजे आजीकडून गोष्टी ऐकणे. अशीच आजीने तिला गावातील एका जुन्या पायऱ्या असलेल्या विहिरीची गोष्ट सांगितलेली असते. एक दिवस ती गावाजवळच्या रानात आपल्या मित्रमंडळींबरोबर सहलीला गेलेली असताना तिला त्याच जुन्या, पायऱ्या असलेल्या विहिरीचा शोध लागतो. पुढे या विहिरीत काय काय सापडते, हे जाणून घेण्यासाठी ही साहसकथा वाचायलाच हवी. गावातील जीवन, तिथले लोक यांची ओळख होत होत पुढे एका गुपिताच्या शोधापर्यंतचा अनुष्काचा प्रवास कसा होत जातो, हे वाचणे हा नक्कीच एक आनंददायी अनुभव आहे. पुस्तकात निरनिराळ्या प्रसंगांसाठी चित्रांचाही समावेश करण्यात आला आहे. एका गुपिताच्या शोधाची ही कहाणी सांगताना मूर्ती यांनी ग्रामीण जीवनातील साधेपणाचे, निसर्गाशी येणाऱ्या सहवासाचे तसेच तिथल्या सकारात्मक परंपरांचेही वर्णन अतिशय प्रांजळपणे केले आहे. त्यामुळे लहानांबरोबरच मोठय़ांनीही वाचावी अशी ही साहसकथा आहे. ...Read more

  • Rating StarTrupti Kulkarni

    पुस्तक वाचण्याची आवड असलेला माणुस कोणतंही पुस्तक वाचतो मग ते बालवाङ्‌मय का असेना. उलट त्यामुळं प्रसंगी लहान-मोठं होण्यातली मजाही तो अनुभवू शकतो. मला अशीच मजा अनुभवायला मिळाली ती सुधा मूर्तींच्या "हरवलेल्या मंदिराचे रहस्य" या अनुवादीत पुस्तकामुळं. मेहा पब्लिशिंगचं हे पुस्तक येत्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांनी आर्वजून वाचावं असं आहे. यातल्या अनुष्काच्या करामती वाचताना आपण आपल्या लहानपणी वाचलेल्या "चिंगी" ची आठवण होते. क्वचित प्रसंगी ही आधुनिक चिंगीच आहे की काय असंही वाटून जातं. त्यामुळं आपल्या मनात बालपण जपून असलेल्या प्रत्येकानं हे पुस्तक वाचायला हरकत नाही. किंबहुना ज्यांच्या लहानपणीच्या सुट्टया आजोळी गेल्या आहेत त्यांना तर ते बालपणीचे दिवस नक्की आठवतील. याशिवायही या पुस्तकात अजुन खुप गमती जमती आहेत, काही उल्लेखनीय गोष्टीही आहेत. पुस्तकाची उल्लेखनीय बाब म्हणजे त्याची प्रस्तावना. फारच सुंदर आणि योग्य शब्दांत त्यांनी लिहली आहे. शिवाय हे पुस्तक सुधा मूर्तींनी त्यांच्या नातीला म्हणजेच अनुष्काला अर्पण केलं आहे. तर अशा या धाडसी अनुष्काच्या करामती सांगणाऱ्या एकुण तेरा कथा आहेत. या कथाप्रकांरांच वैशिष्ट्य म्हणजे त्या म्हणल्या तर प्रत्येक स्वतंत्र कथा आहेत आणि म्हणलं तर ती एक छोट्यांची छोटीशी कादंबरिकाही आहे. बंगळूर सारख्या शहरात सीबीएसर्इ बोर्डाच्या शाळेत शिकणारी अनुष्का सुट्टी निमित्त "सोमनहळ्ळी" सारख्या लहानशा खेड्यात आपल्या आजीआजोबांकडे रहायला येते. तीचे आर्इवडील कामानिमित्त परगावीच राहतात. आणि मग अनुष्काच्या आयुष्यात ज्या ज्या धमाल गोष्टी घडतात त्या वाचताना आपण रंगुन जातो. तिला निर्सगाची अद्‌भुत रहस्यं, चमत्कार पहायला आणि अनुभवायला मिळतात. अशीच एकदा आजी आजोबांकडुन ऐकलेल्या कथति गोष्टीच्या रहस्यानं अनुष्का भारावलेली असते आणि तिच्याही नकळत त्या रहस्यमय गोष्टीचा ती एक मोठा भाग होते. म्हणजे नक्की काय घडतं? ते जाणण्यासाठी हे पुस्तक वाचायला हवं. आता ही कथा वाचताना मला जाणवलेली आणखी एक गोष्ट म्हणजे एखाद्या गावाच्या किंवा शहराच्या बाबतीतही काही लोककथा असतात. ज्याला कोणी सांगोवांगीच्या गोष्टी म्हणतो तर कोणी कपोलकल्पित कथा म्हणतं. तशीच त्या गावच्या हजारो वर्षांपुर्वीच्या सोमनायक नावाच्या सद्‌शील राजाची कथा सगळ्यांना ऐकीव माहित असते. पण तीच कथा सांगण्याची आजीची पद्धत निराळी, आजोबांची निराळी, शिवाय गावातले इतर गावकरीही ती निराळ्या पद्धतीनं सांगत असतात. इथं कानगोष्टीच्या खेळाची आठवण आल्यावाचुन रहात नाही. आणि शेवटी घडतंही तसंच अगदी कानगोष्टी सारखं. मुळ कथा काही वेगळीच असते. पण एक मात्र आहे ती सत्यकथा असते. आणि त्या गोष्टीची सत्यता पडताळण्यासाठी, रहस्यांचा शोध लावण्यासाठी सगळे गावकरी एकत्र येऊन जे सहकार्य करतात ते तर वाखाणण्याजोगं आहे. या सगळ्या धमालीत अजुनही काही गोष्टी आवर्जून जाणवतात. ते म्हणजे आजीआजोबा आणि नातवंड यांच्यातलं नातं, दोन पिढ्यातलं अंतर, शहरी आणि ग्रामिण जीवनातला फरक. शिक्षण पद्धतीतला फरक. मुलांच्या नैसर्गिक क्षमतांचा वापर कसा होऊ शकतो याची जाणीव. अशा अनेक लपलेल्या वाटा सापडतात. खरंतर हे पुस्तक केवळ मुद्रित माध्यमापुरतंच मर्यादित न राहता याचं दृकश्राव्य माध्यमात माध्यमांतर झालं तर अधिक चांगल्या प्रकारे त्याचा आस्वाद घेता येर्इल आणि ते अधिकाधिक परिणामकारक ठरेल. तृप्ती कुलकर्णी ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 05-02-2017

    लहान मुलांचे जग हे एक निराळेच विश्व असते. लेखिका सुधा मूर्ती यांनी हे विश्व संवेदनशील नजरेने अनुभवले आहे. अनुष्का ही शहरात राहणारी मुलगी. सुटीसाठी ती आजी-आजोबांकडे गावाला जाते आणि तिथल्या जगात रमते. अनेक नव्या गोष्टी शिकते. पापड बनवणे, सहलीला जाणे, सयकल चालवायला शिकणे याबरोबरच तिला नवी मित्रमंडळीही मिळतात. एक दिवस ती गावाजवळच्या रानात आपल्या मित्रमंडळींबरोबर सहलीला जाते. तेव्हा तिला पायऱ्या असलेल्या एका जुन्या विहिरीचा शोध लागतो. या विहिरीची दंतकथा तिने आपल्या आजीकडून ऐकलेली असते. अनुष्काची शाळेची सुटी संपते आणि ती शहरात परत जाते. तिथपर्यंत हा कथाभाग आहे. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more