* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: CARRY ON MR. BOWDITCH
 • Availability : Forthcoming
 • Translators : VIJAY TENDULKAR
 • ISBN : 0
 • Edition : 0
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 112
 • Language : Translated From ENGLISH to MARATHI
 • Category : FICTION
 • Sub Category : HISTORICAL, MODERN & CONTEMPORARY FICTION
Quantity
READERS TODAY ARE STILL FASCINATED BY “NAT,? AN EIGHTEENTH-CENTURY NAUTICAL WONDER AND MATHEMATICAL WIZARD. NATHANIEL BOWDITCH GREW UP IN A SAILOR?S WORLD—SALEM IN THE EARLY DAYS, WHEN TALL-MASTED SHIPS FROM FOREIGN PORTS CROWDED THE WHARVES. BUT NAT DIDN?T PROMISE TO HAVE THE MAKINGS OF A SAILOR; HE WAS TOO PHYSICALLY SMALL. NAT MAY HAVE BEEN SLIGHT OF BUILD, BUT NO ONE GUESSED THAT HE HAD THE PERSISTENCE AND DETERMINATION TO MASTER SEA NAVIGATION IN THE DAYS WHEN MEN SAILED ONLY BY “LOG, LEAD, AND LOOKOUT.? NAT?S LONG HOURS OF STUDY AND OBSERVATION, COLLECTED IN HIS FAMOUS WORK, THE AMERICAN PRACTICAL NAVIGATOR (ALSO KNOWN AS THE “SAILORS? BIBLE?), STUNNED THE SAILING COMMUNITY AND MADE HIM A NEW ENGLAND HERO.
‘आगे बढो’ ही विख्यात लेखक विजय तेंडुलकर यांनी अनुवाद केलेली कादंबरी आहे. मूळ लेखिका जी. एल. लेथम यांच्या ‘कॅरी ऑन, बो-डिच’ या कादंबरीचा हा अनुवाद आहे. या कादंबरीचा नायक नॅट उर्फ बो-डिच् केवळ पराक्रमी नव्हता, केवळ दर्यावर्दी नव्हता; तर तो श्रेष्ठ गणितीसुद्धा होता. गणितातील अभ्यासाच्या आधारे अठराव्या शतकात त्याने जगाच्या नौकानयनशास्त्रात काही मोलाची भर घातली. नॅट अर्थात बो-डिच्ला लहानपणापासूनच गणित विषयाची, काही नवे जाणून घेण्याची, ते करून पाहाण्याची आवड होती. शाळेत तर तो सर्वात आधी तोंडी गणित सोडवून मला आणखी मोठे गणित सोडवायला द्या, असे सांगून मास्तरांना थक्क करून सोडत असे. मोठेपणी हार्वर्ड विद्यापीठात शिकून पदवी मिळवण्याची त्याची इच्छा होती; पण घरच्या परीस्थितीमुळे शाळा सोडून त्याला वडिलांना त्यांच्या कामात मदत करावी लागत असे. कुटुंबातील जवळजवळ सर्व पुरुष दर्यावर्दी असल्याने साहजिकच नॅटलाही समुद्रप्रवासाची ओढ होती. गणित चांगले असल्यामुळे जहाजावर हिशेबनीस म्हणून काम करताना कप्तान व इतर खलाशांकडून तो सागरीप्रवासातील त्यांचे अनुभव जाणून घेत असे. नॅट हिशेबाच्या कामात तर तरबेज होताच; पण ते काम पूर्ण झाल्यावर फावल्या वेळामध्ये तो पुस्तके (विशेषतः जलप्रवासासंदर्भातील माहितीपूर्ण पुस्तके) वाचत असे तसेच आवश्यकतेनुसार तो लॅटिन व स्पॅनिश याप्रमाणे देशोदेशीच्या भाषा शिकला. नॅटचा हिशेबीपणा आणि उत्साही व मनमिळाऊ स्वभाव यामुळे जहाजाचे मालक आणि कप्तान यांच्याकडून त्याला एकापाठोपाठ एक समुद्रप्रवासासाठी बोलावणे येत असे आणि प्रत्येक वेळी तो अतिशय उत्साहाने तो त्यात सहभागी होत असे. तसेच जलप्रवासादरम्यान आपल्याकडे असलेले ज्ञान व अनुभवाविषयी जहाजावरच्या इतर नवीन खलाशांना तो माहिती देऊन मार्गदर्शन करीत असे. अमेरिकन आटर्स अँड सायन्सेस अ‍ॅकॅडमीचा ‘फेलो’ म्हणून नॅटची निवड झाली होती. नॅटचे कौटुंबिक जीवन अन्य खलाशांप्रमाणेच होते. त्याला जीवनात एलिझाबेद आणि पोली अशा दोन प्रेमळ मैत्रिणी लाभल्या. नॅटने गणिताच्या अभ्यासाच्या आधारे मूअरच्या ‘नौकानयन’ पुस्तकातल्या असंख्य चुका शोधल्या; प्रत्येक चुकीला नॅटकडे भक्कम गणिती पुरावा होता. या अनुभवामुळे नॅटने स्वतःच अशा प्रकारचे एक पुस्तक लिहायचे ठरवले. त्यामध्ये या पुस्तकातल्या माहितीव्यतिरिक्त इतरही बऱ्याच गोष्टी त्याने समाविष्ट केल्या आणि त्या साऱ्या साध्या खलाशांनाही समजतील, उपयोगी पडतील अशा सोप्या पद्धतीने, साध्या शब्दांत लिहिल्या. मुख्य म्हणजे या ग्रंथाबद्दल नॅटला नेहमीच हवीशी वाटत असलेली हार्वर्डची पदवी हार्वर्डमध्ये शिकायला न जाता मिळाली. तो ‘मास्टर ऑफ आटर्स’ झाला आणि त्याचे स्वप्न साकार झाले.
Video not available
Keywords
Customer Reviews
Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ANANDTARANG
ANANDTARANG by GRECHEN RUBIN Rating Star
DAINIK LOKMAT 13-10-2019

परिवर्तनाचे बारा महिने... माणसाला मिळालेल्या आयुष्याला प्रवाहीपणाचे वरदान लाभले आहे. परंतु, कधी कधी माणूस एखाद्या चक्रव्यूहात अडकत जातो. एव्हाना त्याच्या आयुष्यात आनंद, समाधान, सुख, शांतता हे शब्द त्याला निरर्थक वाटू लागतात. ग्रेचेन रुबिनला पण आयुष्ाच्या एका विशिष्ट टप्प्यावर अनपेक्षितपणे वेळेचे महत्त्व अधोरेखित होते आणि तेथून पुढे सुरू होतो, त्याच्या आनंदाचा नवा शोध. त्याच परिवर्तनाच्या नांदीला हाताशी ती एक वर्ष हॅपीनेस प्रोजेक्टला वाहून घेते. आनंदी कसे व्हावे, याविषयी उपजत आलेले शहाणपण, युगायुगाचे संशोधन आणि माहिती यांच्या आधारे तंत्रशुद्ध शिक्षण घेते. हा तिचा बारा महिन्यांचा प्रवास म्हणजे नेमके काय आहे, त्यात तिने कोणकोणते प्रयोग केले त्याची रोचक कहाणी म्हणजे आनंदतरंग हे पुस्तक. ...Read more

EKA LALASENE
EKA LALASENE by MANJUL BAJAJ Rating Star
DAINIK LOKSATTA (LOKRANG) 13-10-2019

मानवी मनोव्यापारांचे भेदक चित्रण... ‘एका लालसेने’ हा मंजुल बजाज या लेखिकेच्या इंग्रजी कथासंग्रहाचा डॉ. शुचिता नांदापूरकर-फडके यांनी मराठीत केलेला अनुवाद आहे. समकालीन भारतीय लेखक-लेखिका इंग्रजी भाषेत कोणत्या प्रकारचे साहित्य लिहितात, त्यांच्या आस्थेच विषय काय आहेत... हे समजून घेण्यासाठी एक नमुना म्हणून हा अनुवादित कथासंग्रह महत्त्वाचा आहे. बजाज यांनी या कथासंग्रहात भारतातल्या विविध राज्यांतील, गाव-खेड्यांतील, शहरांतील लोकांचे जीवन, त्यांच्या मनोव्यापाराचे विविध पदर यातील कथांमधून उलगडून दाखवले आहेत. कथांमधील पात्रांचे सशक्त व्यक्तिचित्रण आणि कोणत्याही सामाजिक संकेतांचा दबाव न घेता थेटपणे व्यक्त होणे हे बजाज यांच्या लेखनाचे, कथांचे वैशिष्ट्य आहे. स्वार्थलोलुपता, लालसा, माणसांचे कामजीवनासंबंधीचे विचार, इच्छा-आकांक्षांची तृप्तता न झाल्यास माणसांना येणारी विफलता असे सारे काही त्यांच्या कथांमध्ये कोणताही आडपडदा न ठेवता चितारलेले आहे. आपल्याकडे ज्या प्रकारची समाजरचना आहे. त्यात स्त्रीच्या सर्वच प्रकारच्या इच्छा-आकांक्षांना दुय्यम लेखले जाते, त्यातूनही एखादीनं आपल्याला हवे तसे जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर अशा स्त्रीला नैतिकतेच्या कठोर चौकटीतून पाहिले जाते. साहित्यातही अशा सामाजिक परिस्थितीचेच तर प्रतिबिंब उमटते... मात्र बजाज यांच्या कथांमधील नायिका अशा रूढ वाटेने चालण्याचेच नाकारतात. या नायिकांना आत्मभान आहे. स्वत:च्या आनंदासाठी काही करण्यातून त्यांना अपराधगंड येत नाही, हेच या कथांचे बलस्थान आहे. याशिवायही भवतालत सतत घडत असणाऱ्या व्यावहारिक, राजकीय, आर्थिक बदलांचे तीव्र भान लेखिकेला आहे. या बदलांकडे ती संवेदनशीलतेने आणि अनेक कोनांमधून पाहते. या साऱ्याचा प्रत्यय या कथासंग्रहातील कथा वाचताना येत राहतो. ...Read more