* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: THE FIRST INDIAN
 • Availability : Available
 • Translators : MUKTA DESHPANDE
 • ISBN : 9789353172169
 • Edition : 1
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 300
 • Language : Translated From ENGLISH to MARATHI
 • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
 • Sub Category : MEMOIRS, DIARIES, LETTERS & JOURNALS
Quantity
Buying Options:
 • Ebooks:
 • Print Books:
AN ENGROSSING NARRATIVE OF ONE MAN’S STRUGGLE TO ACHIEVE HIS DREAM AGAINST ALL ODDS, THIS IS BOTH A FAST-PACED ADVENTURE AND A TELLING COMMENTARY ON HOW HEROES ARE OFTEN MADE DESPITE THE SYSTEM THEY OPERATE IN, BY DINT OF SHEER PERSEVERANCE AND COMMITMENT TO A CHOSEN PATH. ABOVE ALL, IT’S A PAEAN TO THE POWER OF SELF-BELIEF THAT SERVES TO INSPIRE, MOTIVATE AND EXHILARATE. ON 19 MAY 2010, AS HE SAILED INSV MHADEI INTO MUMBAI HARBOUR, COMMANDER DILIP DONDE EARNED HIS PLACE IN INDIA’S MARITIME HISTORY BY BECOMING THE FIRST INDIAN TO COMPLETE A SOLO CIRCUMNAVIGATION UNDER SAIL, SOUTH OF THE 3 GREAT CAPES. THE FEAT, SUCCESSFULLY COMPLETED BY JUST OVER 200 PEOPLE IN THE WORLD, HAD NEVER BEEN ATTEMPTED IN HIS COUNTRY BEFORE. IN HIS OWN WORDS, THE BOOK CHRONICLES HIS PROGRESS OVER FOUR YEARS, FROM BUILDING A SUITABLE BOAT WITH AN INDIAN BOAT-BUILDER; WEAVING HIS WAY THROUGH THE ‘SEA-BLIND’ AND OFTEN QUIXOTIC BUREAUCRACY; AND TRAINING HIMSELF WITH NO PRECEDENT OR KNOWLEDGE BASE IN THE COUNTRY, TO FINALLY SAILING SOLO AROUND THE WORLD. DURING THIS GRUELLING TASK HE WAS MENTORED BY SIR ROBIN KNOX-JOHNSTON, THE FIRST MAN TO SAIL SOLO NON-STOP AROUND THE WORLD.
आयएनएसव्ही ‘म्हादेई’ या शिडाच्या बोटीतून एकट्याने पृथ्वीप्रदक्षिणा करणारे कमांडर दिलिप दोंदे हे अशा प्रकारची पृथ्वीप्रदक्षिणा करणारे पहिले भारतीय ठरले. ‘सागरी परिक्रमेचा पराक्रम’ या पुस्तकात त्यांचा पाच वर्षांतील प्रवास व प्रगती त्यांच्याच शब्दांत मांडण्यात आली आहे. अनेक अडथळे आणि संकटांना तोंड देत त्यांनी पृथ्वीप्रदक्षिणा कशी पूर्ण केली, याचे अत्यंत रोचक वर्णन त्यांनी केले आहे. विपरीत परिस्थितीचा सामना करताना एका माणसाने आपली स्वप्ने कशी साध्य केली, याची गुंगवून टाकणारी ही कहाणी एक साहसयात्रा तर आहेच, पण त्याबरोबर स्वतःवरच्या अटळ विश्वासाची विजयगाथाही आहे.

No Records Found
No Records Found
Keywords
#दफर्स्टइंडियन #सागरीपरिक्रमेचापराक्रम #दिलीपदोंदे #मुक्तादेशपांडे #नमळलेलीवाट #अमूल्यउमेदवारी #सुयोग्यबोटीच्याशोधात #पुन्हाउमेदवारी #गोदी(बोटयार्ड) च्याशोधात #जुन्यापुराण्यासमीरवरप्रशिक्षण #गणवेशातलाविनोद #प्रशिक्षणबोट #एल्दमेरचाकिस्सा #नझालेल्याप्रशिक्षणाचीरणधुमाळी #नवीनबोटीसाठीगर्भगृह #रॉबिनयांचीपहिलीभेट #पहिलाअडथळा #म्हादेईचीपहिलीपावलं #मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #THEFIRST INDIAN #SAGARI PARIKRAMECHA PARAKRAM #DILIP DONDE #MUKTADESHPANDE #MHADEI #A PATHLESSTRAVELLED #ANINVALUABLEAPPRENTICESHIP #ASUITABLEBOAT #APPRENTICESHIPAGAIN #FINDINGABOATYARD #TRAININGONOLD SAMEER #HUMOUR INUNIFORM #TRAINING BOAT #THEELDEMEREPISODE #TRAININGSORTIETHAT WASNT #AWOMB FORTHEBOAT #FINALLYSOMESAILING #ROBINSFIRSTVISIT #THE FIRSTHURDLE #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
 • Rating StarAjinkya Kulkarni

  एका साहसवीराची यशोगाथा.... मला आजही लख्ख आठवतय, साधारणातः एम एस सी च्या पहिल्या वर्षाला असेन मी. सकाळी-सकाळी काॅलेजला जायची गडबड असायची. जाता जाता दारात पडलेला लोकसत्तेवर नजर फिरवून जायची मला सवय होती. एक दिवस अचानक लोकसत्तेच्या पहिल्या पानावर कुणतरी अभिलाष टाॅमी नामक एका भारतीय नौदलातील अधिकाऱ्याने न थांबता एकल सागर परिक्रमा (solo circumnavigation of the globe) पुर्ण केल्याची बातमी मी वाचली. त्या बातमीतलं अजून एक नाव माझ्या चांगलं लक्षात राहिले. त्याचं कारण म्हणजे त्या दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर अभिलाषच्या आधी सागरी परिक्रमा पुर्ण करण्याचा विक्रम नोंदवला गेला होता. अशी सागर परिक्रमा एकट्याने पुर्ण करणारे ते पहिले भारतीय. ती व्यक्ती म्हणजे कॅ.दिलिप दोंदे होय. सावरकर म्हणतात त्या सप्तबंदीतली एक बंदी म्हणजे समुद्र न ओलांडणे ! यामुळे म्हणा किंवा `ठेविले अंनंते तैसेचि रहावे` या वृत्तीमुळे साहसी,धाडसी गोष्टी करणे हा प्रकारच आपण गमावून बसलो आहोत. याला अपवाद असतात कॅ.दिलिप दोंदे सारखे काही साहसवीर. " भारतात सव्वाशे अब्ज लोकसंख्या असताना तसेच साडेसात हजार किमी इतका मोठा समुद्र किनारा लाभलेला असताना २०१० पर्यंत कुणीच कसं एकट्याने सागरी परिक्रमा केली नाही?" हा प्रश्न सातत्याने कुणी ना कुणी कॅ. दोंदेंना विचारत असे. भारतीय नौदलात कार्यरत असलेले ॲडमिरल मनोहर आवटी यांनी एकल सागरी परिक्रमा करण्यासाठी नौदलाकडे सातत्याने तगादा लगवालेला होता. पण नौदलाने मात्र त्यांना यासाठी कधीही परवानगी दिली नाही. पुढे अशा परिक्रमेचा जेव्हा नौदलाने विचार केला तेव्हा दिलिप दोंदेंना ती संधी देण्यात आली. विचार करा! या अगोदर कोणत्याही भारतीयाने अशी एकट्याने सागर परिक्रमा केलेली नव्हती. त्यावेळी अशी सागर परिक्रमा करणारे दिलिप दोंदे हे जगातले १७५ वे खलाशी ठरले व भारतातील प्रथम. दोंदेंच्या आईने जेव्हा या मोहिमेसाठी होकार भरला तेव्हा यांचा आत्मविश्वास वाढला. घरची, नौदलाची परवानगी मिळाली म्हणजे झालं का सगळं? अजिबात नाही! खरा संघर्ष इथून पुढे सुरु होतो. या संघर्षाचे दोंदे दोन भाग करतात. एक म्हणजे जो लढा त्यांनी जमिनीवर दिला आणि दुसरा जो त्यांनी समुद्राशी दोन हात करताना केला. नौदलाच्या अधिकाऱ्यांचा गलथान कारभार वाचताना उबग येतो. हे…आपले नौदल अधिकारी आहेत? असा संताप होतो आपला वाचाताना अक्षरशः. सगळ्यात आधी या प्रवासाची अचुक माहीती गोळा करणे हे एक मोठे काम होते. दुसरे मोठे काम म्हणजे या प्रवासाला लागणारी अत्याधुनिक शिडाची बोट. अशी बोट ना भारातात उपलब्ध होती ना त्यासंबंधी कुणी जाणकार व्यक्ती उपलब्ध होता. पण आता शिडाची बोट तर भाराताच बांधायची असा निश्चिय दोंदेनी केला. मग अशी बोट भारातात कोण बांधून देणार? हे आव्हान स्वीकारले ते गोव्यातल्या रत्नाकर दांडेकरांनी. त्यांनी व त्यांच्या ॲक्वेरिअस फायबरग्लासचे कर्माचाऱ्यांनी अथक मेहनत घेऊन एक भारतीय बनावटीची शिडाची बोट तयार केली व तिचे नामकरण केलं गेलं `म्हादेई`. म्हादेई हेच नाव का? ते कसं आलं ते सविस्तर पुस्तकात वाचावं. या सागर परिक्रमेसाठी आलेला खर्च हा जवळजवळ सहा कोटी रूपयांपेक्षा जास्त होता. सरकारी लालाफितीतून इतकी मोठी रक्कम मंजूर करणे हे ही एक दिव्यच होतं. नोकरशाहीने दिलेला त्रास, दोंदेंचा पदोपदी केलेला अपमान हे सर्व सहन करत दोंदेंनी आपली ही सागर परिक्रमा पुर्ण केली होती. सागरी परिक्रमा करण्याची कल्पना ज्या कुणाच्या डोक्यात पहिल्यांदा आली असेल त्याला खरोखर मनोमन नमस्कार आहे. त्याने अशी परिक्रमा करण्याचा प्रयत्न केला की नाही तो त्यात यशस्वी झाला का नाही झाला हे गौण आहे. कारण या अशा परिक्रमा करण्यासाठी उदंड साहस अंगात असावं लागतं. स्वतःहून आपला जीव धोक्यात घालावा लागतो. आपल्यात जगातील नवीन क्षीतिजे पादाक्रांत करण्याची उर्मी अनावर असावी लागते. तो उत्साह आपल्याला शेवटपर्यंत टिकवता आला पाहिजे. शारीरिक, मानसिक क्षमतेची प्रचंड कसोटी पाहणाऱ्या या मोहिमा असताता. समुद्रात कधी काय होईल काही सांगता येत नाही. वारा, लाटा तुमच्या बोटीला कुठे घेऊन जातील कशाचा काही भरवसा नाही. समुद्रात ही एकटी बोट पाहून कधी कोणत्या बाजूने समुद्री चाचे हल्ला करतील काही सांगता येत नाही. चहूबाजूने अथांग समुद्र त्यात हे बोटीवर एकटे. बोलायला एकजण सुद्धा कुणीही आसपास नाही. अभिलाष टाॅमीने तंत्र साहायक्काची भूमिका चोख बजावली होती. साहसावर, धाडसावर प्रेम असणाऱ्या कुणीही हे पुस्तक वाचावं. पुस्तकातील फोटो फार सुरेख आहेत. त.टी - मुक्ता देशपांडे यांनी अनुवादित केलेलं `अ बाॅय इन अ स्ट्रॅप्ड पजामा` हे पुस्तक मी वाचलेलं होतं. मी मुळ इंग्रजी `द फर्स्ट इंडियन` हे पुस्तक मी वाचलेलं नाहीये, तरीपण अनुभवाने हे सांगू शकतो की अनुवाद चांगला झालाय. मुळ इंग्रजी पुस्तकावरच्या मजकुरावर जर चांगला संपादकीय हात फिरला असता तर हे पुस्तक अजून चांगले होऊ शकले असते. तीस चाळीस पानांनी पुस्तकाच्या पानांची संख्या कमी केली असती तर चांगलं आटोपशीर पुस्तक झाले असते. काही ठिकाणी आलेल्या जास्तीच्या मजकूरामुळे पुस्तक मध्ये मध्ये जरा रटाळ होते. ...Read more

 • Rating StarKALYANI GADGIL

  Dear Mukta Deshpande, I just finished reading Commander Dilip Donde" book translated by you "Saagaree Parikramecha Parakram". The book is written very well and you have translated it very well too. It sounds like it is written in Marathi itself I can see your command on the language as well as your efforts to learn new technological words. Please accept my heartfelt congratulations. With regards, Kalyani ...Read more

 • Rating StarDAINIK SAMANA, 03-NOV-2019

  शिडाच्या बोटीतून पृथ्वीप्रदक्षिणा करणाऱ्या कमांडरची साहसगाथा... कमांडर दिलिप दोंदे - शिडाच्या बोटीतून एकट्याने पृथ्वीप्रदक्षिणा करणारे भारताच्या सागरी इतिहासातील पहिले भारतीय. त्यांनी १९ मे २०१० या दिवशी आयएनएसव्ही ‘म्हादेई’ ही शिडाची बोट मुंबई बंदरत आणली आणि हा विक्रम त्यांच्या नावावर नोंदवला गेला. जगातील २००पेक्षाही कमी लोकांनी साध्य केलेली ही कामगिरी करण्याचा प्रयत्न यापूर्वी आपल्या देशात कोणीही केला नव्हता. या पृथ्वीप्रदक्षिणेचे आणि तिच्या पूर्वतयारीचे अनुभव ‘द फर्स्ट इंडियन’ या पुस्तकात दिलिप दोंदे यांनी शब्दबद्ध केले आहेत. या पुस्तकाचा अनुवाद ‘सागरी परीक्रमेचा पराक्रम’ या शीर्षकासह मुक्ता देशपांडे यांनी केला आहे. एका नौदल अधिकाऱ्याने सहज बोलता बोलता शिडाच्या बोटीतून पृथ्वीप्रदक्षिणा करण्याची कल्पना मांडली आणि तितक्याच सहजतेने ती कल्पना प्रत्यक्षात आणण्याची तयारी दिलिप दोंदे यांनी दर्शवली आणि मग सुरू झाली त्या मोहिमेची पूर्वतयारी. अर्थातच त्यासाठी शिडाच्या बोटीतून प्रवास करणे, ती बोट चालवणे, त्या प्रवासादरम्यान बोटीच्या बाबतीतील तांत्रिक गोष्टी शिकून घेणे, त्या प्रवासादरम्यान काय समस्या उद्भवू शकतात, याची चाचपणी करणे इ. गोष्टींचं प्रशिक्षण घेणं आवश्यक होतं. त्या प्रशिक्षणासाठी शिडाच्या बोटीतून जगप्रवास केलेल्या लंडनच्या सर रॉबिन यांच्याकडे दोंदे यांनी उमेदवारी केली. त्या उमेदवारीत दोंदे यांना बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. या उमेदवारी दरम्यानचे अनुभव दोंदे यांनी नोंदवले आहेत. मग बोट चालवण्याच्या प्रशिक्षणासाठी म्हणा किंवा अनुभवासाठी म्हणा कोणतीही संधी दवडण्याची दोंदे यांची तयारी नव्हती. दक्षिण आफ्रिकेतून अमेरिकेत एक बोट घेऊन जाण्याची संधी त्यांना दक्षिण आफ्रिकेतील नौदलातल्या कमांडरने देऊ केली होती. त्या संधीचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रांची जी पूर्तता करायची होती, त्यासाठी त्यांच्या हातात फक्त आठ दिवसांचा कालावधी होता. तरीही त्यांनी त्या पूर्ततेसाठी यातायात केली; पण अगदी शेवटच्या क्षणी ती संधी त्यांच्या हातून निसटली. तो अनुभव वाचल्यानंतर वाचकही हळहळतो. ‘समीर’ या जुन्यापुराण्या बोटीवर त्यांचं प्रशिक्षण सुरू होतं. त्यांच्या पृथ्वीप्रदक्षिणेसाठी जी बोट तयार करायची होती, त्यासाठी चार बोट यार्डांकडून निविदा मागवण्यात आल्या. त्यातील जी निविदा कमी खर्चाची असेल, ती निविदा स्वीकारायची असं ठरलं आणि त्यानुसार ‘अ‍ॅक्वेरियस फायबर ग्लास’ या कंपनीची निविदा स्वीकारण्यात आली. पृथ्वीप्रदक्षिणेसाठीची बोट या कंपनीचे रत्नाकर दांडेकर करणार होते. गोव्याला हे बोटनिर्मितीचं काम होणार होतं. बोटीची गर्भगृहनिर्मिती, ती बोट तयार करताना रत्नाकर यांना आलेल्या अडचणी, उदा. बोटीचा गाभा बनविण्यासाठी आणलेलं लाकूड पुरेसं वाळलेलं नसणं, बोटीच्या लॅमिनेशनमध्ये आलेली अडचण आणि या अडचणीवर रत्नाकर यांनी शोधलेले उपाय, या बोटीसाठी ‘म्हादेई’ हे नाव कसं सुचलं, रॉबिन यांचं बोटबांधणीच्या संदर्भात रत्नाकर यांना झालेलं मार्गदर्शन, सांगाडा उलटा करून बोट लॅमिनेशनने आच्छादण्याचं कष्टाचं काम, बोट नाळेवर बसवणे, बोटीची रंगरंगोटी, पौर्णिमेच्या दिवशी बोटीची पूजा करून बोटीने नदीत केलेला प्रवेश, बोट तयार करताना सर रॉबिन आणि योहान यांचं झालेलं मोलाचं मार्गदर्शन, बोटीवर उपकरणं बसविण्याचं महत्त्वपूर्ण काम, तिची घेतली गेलेली चाचणी आणि या बोटीने माजी व्हाइस अ‍ॅडमिरल आवटी यांच्यासह दोंदे यांनी गोवा ते मुंबई असा केलेला प्रवास इत्यादी या बोटीच्या संदर्भातील तपशीलवार विवेचन वाचताना वाचक अक्षरश: भारावून जातो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिलेल्या वेळेच्या मर्यादेत या बोटीची निर्मिती आणि त्यानंतरच्या चाचण्या, त्या चाचण्यांनंतर करायच्या सुधारणा हे सगळं साध्य करायचं होतं. प्रत्यक्ष मोहीम सुरू होईपर्यंतचे अनेक अनुभव दोंदे यांनी सांगितले आहेत. मोहीम सुरू झाल्यानंतर ते ब्लॉग लिहून वृत्तपत्राकडे पाठवत होते. त्या ब्लॉग्जमधून समुद्रसफरीतील त्यांचे अनुभव वाचायला मिळतात. अगदी ते कोणते खाद्यपदार्थ करत होते, कोणती पुस्तकं त्यांनी या प्रवासादरम्यान वाचली, चाचांची भीती, जलचरांचे दर्शन, जीवघेणे प्रसंग इ. वर्णन त्यांनी या ब्लॉग्जमधून केलं आहे. परदेशातील ज्या दोन ठिकाणी ते थांबले होते, तिथेही त्यांचं खूप छान स्वागत करण्यात आलं. तेही अनुभव त्यांनी नोंदवले आहेत. एकूणच, दोंदे यांनी पृथ्वीप्रदक्षिणा करण्याचं ठरवल्यापासून ते त्यांची सफर पूर्ण होईपर्यंतचा हा प्रवास रोमहर्षक आहे; पण त्यादरम्यान नोकरशाहीच्या अडेलतट्टूपणाचं, झापडबंदपणाचं जे दर्शन त्यांना घडलं त्याचेही अनुभव त्यांनी लिहिले आहेत. जसं, त्यांची बोट तयार करायलाही सुरुवात झालेली नसताना त्यांना प्रवासाची तारीख निश्चित करायला लावणे आणि एवूâणच ज्या ज्या वेळेला परवानगीची आवश्यकता होती त्या त्या वेळेला सरकारी ऑफिसेसचे झिजवावे लागलेले उंबरठे, त्यात झालेली दमछाक आणि कालापव्यय याबद्दल त्यांनी लिहिले आहे. कागदी घोड्यांचा हा अट्टहास एखाद्याच्या महत्त्वाकांक्षेची, सहनशक्तीची कित परीक्षा पाहतो, हे या अनुभवांतून सूचित होतं. कोणतीही चांगली गोष्ट करताना देश-परदेश असा भेदभाव राहत नाही, तर मदतीचे, प्रोत्साहनाचे अनेक हात पुढे येतात, ही जाणीव पुस्तक वाचल्यानंतर होते. त्यांच्या या मोहिमेशी ज्या व्यक्ती जोडलेल्या होत्या, त्यापैकी रत्नाकर दांडेकर यांच्या पहिल्यावहिल्या बोटनिर्मितीला, त्यांच्या समर्पित वृत्तीला सलाम करावासा वाटतो. सर रॉबिन आणि योहान यांचा अनुभव आणि त्यांनी रत्नाकर यांना केलेली मोलाची मदत, यामुळे त्या दोघांबद्दल वाचकाच्या मनात आदर निर्माण होतो. हे दोघं, रत्नाकर आणि माजी अ‍ॅडमिरल आवटी यांच्याशी असलेल्या दोंदे यांच्या भावबंधाचंही मनोज्ञ दर्शन या पुस्तकातून घडतं. ८० वर्षांच्या आवटींचा उत्साह स्तिमित करतो. हे सगळे अनुभव दोंदे यांनी अगदी साध्या, सोप्या, ओघवत्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवले आहेत. त्यामुळे हे पुस्तक वाचनीय झालं आहे. दुर्दम्य जिद्द, जबरदस्त इच्छाशक्ती यांचं दर्शन घडविणारी ही साहसगाथा मुळातून वाचण्यासारखी आणि प्रेरणादायक आहे. ...Read more

Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

TEEN HAJAR TAKE
TEEN HAJAR TAKE by SUDHA MURTY Rating Star
Vaishali Patil Waghirkar

सुधा मुर्ती यांच्या या कथासंग्रहातील सर्व कथा सत्य कथा आहेत.मानवी स्वभावाचं सौंदर्य आणि त्यांच घृणास्पद हे दोन्हीही उघड करुन दाखावणा-या या कथांमधुन आयुष्य सन्मानानं कसं जगता येत, हेच प्रतिबिंबित होत.त्यांची खास शैलीत त्यांच निरीक्षण नेमक्या शब्दात माडलेले आहे. ...Read more

BINDUSAROVAR
BINDUSAROVAR by KHER RAJENDRA, KHER RAJENDRA Rating Star
Vaishali Joshi Nagarkar

नुकतेच बिंदू सरोवर हे पुस्तक वाचले, रम्य, रहस्यमय कथानक. एक वेगळे पुस्तक म्हणून नक्कीच वाचनीय.