* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789392482144
  • Edition : 2
  • Publishing Year : JANUARY 2022
  • Weight : 100.00 gms
  • Pages : 148
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :G.B.DESHMUKH COMBO SET
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
IN THIS EXCITING STORY COLLECTION MR.G.B.DESHMUKH TAKES US ON THE THRILLING JOURNEY OF THE FOREST IN MELGHAT. THOUGH MELGHAT FOREST IS KNOWN FOR THE EXISTENCE OF THE GREAT INDIAN TIGER, IT IS NOT EASY TO CATCH HIM IN A JUNGLE TOUR. EVEN FOREST OFFICERS TRAVEL MANY MILES, DAY & NIGHT TO HAVE A GLANCE OF THE TIGER. FOREST OFFICER RAVINDRA WANKHEDE SHARES & MR.DESHMUKH PENS IT DOWN SUCH NUMEROUS & HILARIOUS EXPERIENCES DURING HIS POSTING IN MELGHAT IN THIS UNPUTDOWNABLE BOOK.
कोरकु भाषेत ‘कुला’ म्हणजे वाघोबा. मेळघाटच्या जंगलातला हा कुलामामा जेवढा काळजात धडकी भरवणारा, तितकीच त्याच्याबद्दलची उत्सुकताही अधिक. रानवाटा तुडवत कुलामामाचं दर्शन घेताना इथं वनअधिकाऱ्यांनाही जद्दोजहद करावी लागते...पण त्यातूनच काही खुसखुशीत प्रसंग, पेचप्रसंग निर्माण होतात. असेच हे ‘कुलामामाच्या देशातले’ रंगतदात प्रसंग. वनाधिकारी रवींद्र वानखडे यांच्या सुरस जंगलकथा आणि जी.बी. देशमुख यांच्या खुमासदार लेखनशैलीचा हा अद्भुत मिलाफ.

No Records Found
No Records Found
Keywords
#KULAMAMACHYADESHAT #G.B.DESHMUKH #MELGHATFOREST #THEGREATINDIANTIGER #RAVINDRAWANKHEDE #MARATHISTORIES #MEHTAPUBLISHINGHOUSE #SHORTSTORIES #कुलामामाच्यादेशात #जीबीदेशमुख #रविंद्रवानखेडे #मराठीविनोदीकथा #भारतीयवाघ #मेळघाट #जंगलकथा #मराठीपुस्तके #मेहतापब्लिसिंगहाऊस
Customer Reviews
  • Rating Starडॉ शिंदे निलेश, अमरावती

    `कुलमामाच्या देशात` वाचून काढले. प्रत्येक कथा खुप वाचनीय आहे. `कपारीत वाघोबा` मध्ये रवींद्र वानखडे ह्यांनी पहाटे चार ते 10 नुसती भ्रमंती केली आहे.. सकाळची सूर्यकिरण अंगावर पडली असताना वाघ बघायला भेटणं ही एक अप्रूप वाटणारी गोष्ट आहे. `डरकाळीचा रार` वानखडे साहेबांनी बेलसरें सोबत अनुभवला आहे. `जिवाची पर्वा` न करता वानखडे साहेब पाळण्यात विसावले होते. गव्याच्या पिलावर वाघीणीने हल्ला केला नाही.. हे वानखडे साहेबांनी स्वतः बघितले व आम्हाला देखील समजले.. वाघाच्या पंजाची कशी प्रतिकृती तयार करतात हे सांगितले परंतू मला लक्षात आले नाही (मी प्रत्यक्ष बोलून जाणून घेईन). `मेहमान रह गया` या कथेत वाघाने माणसाची शिकार कशी केली त्यानंतर वनविभागाने बसची सोय करून मुलांना मदत कशी झाली हे देखील सांगितले व आपल्या सारखे वन अधिकारी काय करू शकतो हे प्रांजळ पणे नमूद केले आहे.. सेमडोह येथील गजराजाची कथा अजून देखील लोक सांगतात त्यातील तुम्ही त्याला वाचवयाचा प्रयत्न केला परंतू तो नियतीला मान्य नसेल. बाणा का घुंगरू- मधील हल्ला व घटना मन विचलित करणारी वाटली व मेळघाट मधील वन कर्मचारी किती कामसू आहेत हे त्या वरून दिसले.. मला बाणा ढाप प्रत्यक्ष बघायला आवडेल.. `रानगव्यांची कवायत` मध्ये रानगवे स्वतःच रक्षण कश्या पद्धतीनं करतात हे मला पहिल्यांदा समजले.. कोकटु इथं तीन दिवस आपण वाघ बघण्याची केलेली हॅट्रिक ही जंगलाने तुम्हा वनाधिकार्‍यास दिलेली सलामी आहे. `शिकार हो गया` - माहुल वेलीचा कसा उपयोग केला जातो व पोळी तयार करतात हे देखील वेगळी गोष्ट वाटली.. आपण सांबर शिकार कशी थांबवली व वन्यजीवनाची साखळी अबाधित राखली.. वाघ खेकडे मारून खातो हे ऐकून नवल वाटले.. असा सॉलिड वन अधिकारी मेळघाटला लाभला हे या कथां मधून मला समजलं व प्रत्येक वाचकाला हे जंगल, इथले लोक या विषयी कायम आकर्षण निर्माण करत राहील.. ...Read more

  • Rating Starविभा मिटकरी, मुंबई.

    `कुलामामाच्या देशात` ह्या पुस्तकाचे लेखक जी.बी.देशमुख ह्यांची लेखन शैली फार छान आहे. ओघवत्या लेखन शैली मुळे पुस्तक वाचताना प्रत्येक प्रसंग डोळ्यांसमोर उभा राहतो, आपण घरात नसून जंगलात वावरतोय असा अनुभव येतो, प्रत्येक कथा उत्कंठा वाढवणारी आहे आणि वन्यजवना बद्दल खूप महत्त्व पुर्ण माहिती देणारी आहे. माझी जी.बी.देशमुखांना विनंती कि त्यांनी श्री.रवींद्र वानखेडे साहेबांच्या संग्रही असणारे असेच अनेक चित्तथरारक अनुभव आम्हा वाचकांसाठी शब्द बद्ध करावे. ...Read more

  • Rating Star...गणेश जोशी, पुणे.

    मी मूळचा अमरावतीचाच परंतु आता पुण्यास स्थायिक झालॊ आहे. या प्रस्तावनेस कारण की मी नुकतेच जी.बी.देशमुख ह्यांनी शब्दबद्ध केलेला श्री. रवींद्र वानखडे यांच्या मेळघाटच्या जंगलातील अनुभव कथा `कुलामामाच्या देशात ` हा कथा संग्रह वाचला. खुपच आवडला. त्यातील `माकाय आकांत` ही कथा मनाला चटका लावून जाते.. एकंदरीत सर्वच कथा खूप छान शब्द बद्ध केल्या आहेत. मी स्वतः भारतीय स्टेट बँकेत असतांना जवळपास १० वर्षे परतवाड्यास होतो त्यामुळे मेळघाटशी माझा खूप जवळचा संबंध आला आहे. ...Read more

  • Rating Starअशोक वासुदेव बक्षी सातारा

    आजच आपले ज्येष्ठ वनाधिकारी श्री रवींद्र वानखडे यांच्या अनुभवावर आधारित ` कुलामामाच्या देशात` हे पुस्तक वाचले वाचून आनंद झाला. सेंट्रल एक्साईज चा खाजगी नोकरीत काम करताना माझा २५ वर्षे संबंध आला. या काळात अनेक अधिकाऱ्यांशी अगदी शिपायापासून ते अपीलेट मिशनर पर्यंत अनेक लोक पाहिले. पण आपल्या सारखा रसिक लेखक एकही पाहण्यात आला नाही. आपण अशा रुक्ष खात्यात काम करूनसुद्धा आपली रसिकता जोपासली आणि तिचा आनंद वाचकांना आपण विविध पुस्तकांद्वारे आणि दैनिकातील लेखांद्वारे दिलात या बद्दल आपले अभिनंदन आणि आभार. २०११ साली मी कुपोषणासाठी काम करणाऱ्या एका NGO ने आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरासाठी १० दिवस मेळघाटात राहिलो होतो. त्याच्या आठवणी जाग्या झाल्या. मेळघाट, तिथले प्राणी, तिथली माणसे आपण अगदी आपल्या लेखणीतून जिवंत केली आहेत. पुस्तक वाचल्यावर कुलामामाबद्दल आम्हाला प्रेम वाटू लागले. पुस्तकातली रेखाटने खूपच सुंदर आहेत आणि ती लेखाच्या परिणामकारकतेत भरच घालतात. पुस्तक वाचताना जणू काही श्री वानखडे साहेब आमच्याशी गप्पा मारताहेत असेच वाटत होते. वानखडेसाहेब आपल्या लेखणीतून आमच्याशी बोलले असेच श्री वानखडे साहेबाना आपण बोलते करून हे पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल आपल्याला धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच आहेत. श्री वानखडे साहेबाना सुद्धा आमचे धन्यवाद सांगा. असेच लिहीत राहा आणि वाचकांना आनंद देत राहा. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
Vaishali Dhande, Amravati.

Their is no doubt that G.B.Deshmukh`s writings are very well but when you come across the characters in this book which you had heard from the author himself then the reading felt like you are also part of that story.... the author deserves many cngratulations for this wonderful book "Durdamya ". Amazingly written balancing humor as well as seriousness... It also taught importance of learning the language of the state you work in otherwise Amravati will also have one Udhampur in it. ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
सि.एम. भागडे, नागपूर.

"दुर्दम्य" पूर्ण वाचुन झालं. लेखकाने एकनाथन साहेबांविषयी खुप छान लिहिलं आहे. ते माझे पहीले एसी होते. नवीन निरीक्षक असतांना, त्यांना व्हरांड्यात बसलेले पाहुन, लपुन छपुन रेंज ची डाक देऊन मी पळून जात असे. तेव्हा दर्शन घेऊन प्रत्यक्ष भेटलो असतो तर बे झाले असते, असं आता वाटते. ...Read more