* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: ON THE WINGS OF EAGLES
 • Availability : Available
 • Translators : Jyotsna Lele
 • ISBN : 8177664603
 • Edition : 2
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 340
 • Language : Translated From ENGLISH to MARATHI
 • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
On Wings of Eagles is the account of an incredible rescue by a Green Beret colonel and a group of corporate executives hastily trained into a fighting team. When Ross Perot, millionaire head of the Dallas-based company EDS, discovered that two of his key men in Iran had been jailed, he turned to the one man in America who could help. Colonel ‘Bull’ Simons, famed World War II and Vietnam commando, agreed to do what the US government could not – go in and get the men out. This is the stuff of Follet’s fiction – a secret penetration into a dangerous territory; a dramatic jailbreak; a harrowing overland escape to the Turkish border – and all the more extraordinary because it is fact.
इराणमध्ये इलेक्ट्रॉनिक डाटा सिस्टीम कॉर्पोरेशन(इ.डा.सि.) या अमेरिकन कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांना विनाकारण, विनाचौकशी तुरुंगात डांबले. जामीन ठोठावला. प्रचंड १३,०००,००० अमेरिकन डॉलर! ही वार्ता अमेरिकेत वणव्यासारखी पसरली. रॉस पेरो ह्या कंपनीच्या मालकाची, तळपायाची आग मस्तकाला पोहोचली. क्रांतीच्या अंदाधुंद वातावरणात सर्व सनदशीर मार्ग ठप्प झाले होते. आपल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी तळमळत असणाऱ्या ह्या आगळ्या वेगळ्या धन्यासमोर आता एकच धोकादायक मार्ग होता.`इराणच्या अभेद्य तुरुंगाला भगदाड पाडणे` ` ऑपरेशन हॉट फूट` ह्या धाडसी योजनेचा सूत्रधार होता निर्भेद, निवृत्त आर्मी कर्नल`बुल सायमन` योजना असफल झाल्यास दोनजणांऐवजी अनेकांना प्राण गमवावे लागणार! आणि वर अपरिमित नुकसान व मानहानी! सायमनने इ.डा.सि.च्याच अकरा कर्तबगार अधिकाऱ्यांना हाताशी धरले. ही योजना कशी आखली? अल्पशा काळांत सर्वांना प्रशिक्षण कसे दिले? तुरुंग फोडला का? ही चित्तथरारक, परमशौर्याची सत्यकथा आपल्यासमोर उलगडत जाते व उत्कंठा शिगेला पोहोचते. `सुटका पथकाच्या बारा जणांनी घेतलेली ही जबरदस्त गरुडझेप`
Video not available
Keywords
Customer Reviews
 • Rating StarSANGEETA DESHMUKH

  मूळ लेखक,केन फोलेट, अनुवाद जोत्स्ना लेले.मेहता पब्लिशिंग चे हे पुस्तक, हे कथानक इराणमध्ये घडतं.(इ.डा.सि.) इलेक्ट्रॉनिक डाटा सिस्टीम या अमेरिकन कंपनीच्या , दोन अधिकार्‍यांना विनाचौकशी, विनाकारण तुरुंगात डांबून १३,०००,०००लाख अमेरिकन डॉलर चा जामिन ठोठावा जातो.ही बातमी वणव्याप्रमाणे अमेरिकेत पसरते.या कंपनीचा मालक रॉस पेरो याच्या तळपायाची आग मस्तकाला गेली.इराणमध्ये क्रांतीचे अंदाधुंद वातावरण, सर्व सनदशीर मार्ग ठप्प झाले होते.आपल्या कर्मचार्‍यांच्या सुरक्षिततेसाठी तळमळत असणार्‍या या मालकाला एकच मार्ग समोर दिसत होता.`इराणच्या अभेद्य तुरुंगाला भगदाड पाडणे` ऑपरेशन हॉट फूट , ठरवले जाते.या धाडसी योजनेचा सुत्रधार म्हणून निर्भिड , निवृत्त आर्मी कर्नल `बुल सायमन`ची निवड केली जाते.पुढे ही कथा कशा प्रसंगातून उलगडत जाते.चित्तथरारक , आणि तेवढ्याच शौर्याची ,ही सत्यकथा बारा जणांनी घेतलेली जबरदस्त गरूडझेप.नक्कीच हातातून सुटणार नाही असे पुस्तकं. ...Read more

 • Rating StarKiran Borkar

  इलेक्ट्रॉनिक डाटा सिस्टीम हि एक अमेरिकन कंपनी .या कंपनीत इराणमध्ये काम करीत असलेल्या दोन वरिष्ठ कर्मचाऱ्यांना अटक होते .इराणमध्ये शहा आणि खोमेनी यांचे युद्ध चालू आहे . दोन्ही कर्मचाऱ्यांना कोणतेही कारण दिले गेले नाही . कंपनीचा मालक पेरो हा स्वतः या गष्टीत जातीने लक्ष घालतो आहे . पण त्याचे सगळे कायदेशीर मार्ग खुंटले आहेत ,अमेरिकन सरकार हि त्यांना काही मदत करीत नाही. शेवटी पेरोनी एक धाडसी निर्णय घेतला ,तेहरानचा तुरुंग फोडून त्यांना पळवून आणायचे ,मग त्यासाठी वाटेल ती किंमत भोगावी लागली तरी चालेल. त्याने निवृत्त कर्नल सायमनला हाताशी धरले. सायमन हा या कामात हुशार आहे .ऑपरेशन हॉट फूट असे या योजनेचे नाव .हि योजना असफल झाली तर दोनऐवजी अनेकजणांना आपले जीव गमवावे लागतील.पेरो तर आयुष्यातून उठेल.सायमनने अकरा अधिकाऱ्यांना हाताशी धरून एक योजना बनवली आहे . होईल का तो त्यात यशस्वी??? एक उत्कंठा वाढविणारी सत्यकथा. ...Read more

 • Rating StarDAINIK TARUN BHARAT 08-05-2005

  उत्कंठावर्धक थरारनाट्य... कधीही एखादी चित्तथरारक कथा कोणालाही ऐकायला आणि वाचायला आवडेल. त्यातून ती जर सत्यकथा असेल तर मग सोन्याहून पिवळं. अशीच एक चित्तथरारक कथा म्हणजे केन फोलेट यांची ‘ऑन द विंग्ज ऑफ इगल्स’ ही कादंबरी होय. ही कथा १९८०च्या दशकातील आह. ज्यावेळी इराणमध्ये यादवी युद्ध चालू होतं. त्यावेळी तेथील अमेरिकनांना या युद्धाला कसं तोंड द्यावं लागलं याचं वर्णन तर यामध्ये आहेच, पण मूळ कथा ही एक सुटका नाट्याची आहे. एखाद्या सिनेमाची वाटावी अशी ही एक सत्यघटना आहे. मूळ इंग्रजी कादंबरी ज्योत्स्ना लेले यांनी मराठीत अनुवादित केली असली तरी मूळ कादंबरी जितकी मजेशीर किंवा वाचनीय असेल तेवढीच अनुवादित कादंबरीही वाचनीय आहे. ज्योत्स्ना लेले यांनी केलेला अनुवादही उत्तम वठला आहे. ही कथा इराणमध्ये घडते. इडासी या अमेरिकन कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांना कुठल्याही कारणाशिवाय तुरुंगात डांबण्यात येते. त्याचबरोबर अवास्तव जामीनही ठोठावला जातो. हा जामीन भरणं फारच कठीण असतं. याच दरम्यान इराणमध्ये यादवी युद्धालाही सुरुवात होते. आपल्या दोन अधिकाऱ्यांना कुठल्याही कारणाशिवाय तुरुंगात टाकल्याचा इडासीचा मालक रॉस् पेरो याला अत्यंत राग येतो. तो आपल्या या अधिकाऱ्यांना सोडविण्यासाठी जीवाचं रान करतो. क्रांतीच्या अंदाधुंद वातावरणात सर्व सनदशीर मार्ग ठप्प झाले होते. अशा वेळी आपल्या कर्मचाऱ्यांना सोडवून आणण्याचा एकच मार्ग रॉस पेरोकडे होता आणि तो म्हणजे इराणच्या तुरुंगातून त्यांना पळवून आणणे. सर्व काही ठीक चाललं असताना इराणमध्ये हळूहळू यादवी युद्ध सुरू होते. याच सुमारास इडासी कंपनीचे दोन कर्मचारी पॉल व बिल यांना अचानक अटक होते व अवास्तव जामीनही ठोठावला जातो. त्यांच्या अटकेमागे इराण सरकार कुठलंही सबळ कारण देऊ शकत नाही. ही बातमी जेव्हा इडासीच्या अमेरिकेतील मुख्य कार्यालयात पोहचते त्यावेळी कंपनीच्या मालकाची तळपायाची आग मस्तकात पोहोचते. आपल्या कर्मचाऱ्यांना सोडवून आणण्यासाठी रॉस सर्व प्रयत्न करून बघतो. पण कायदेशीर मार्गाने पॉल व बिल सुटतील असं वाटत नसल्याने कायदा मोडून त्यांना तुरुंगातून पळवून आणण्याचा विचार रॉस पेरो करतो. इराणच्या अभेद्य तुरुंगातून या दोघांना पळवून आणण्याचा विचार पेरो आपल्या काही कर्मचाऱ्यांना बोलून दाखवतो. अर्थातच हे कर्मचारी म्हणजे पॉल व बिलचे सहकारी व इराणमध्ये ज्यांनी काम केलं आहे असेच होते. पण हे सहज शक्य नव्हतं. त्यासाठी योजनाबद्ध आखणी असणं महत्त्वाचं होतं. तसंच अशा प्रकारच्या सुटकेचा ज्याला माहिती किंवा अनुभव आहे अशी व्यक्ती असणंही गरजेचं होतं. यासाठी रॉस निवृत्त आर्मी कर्नल बुल सायमनची निवड करतो. अर्थात बुल सायमनसुद्धा या गोष्टीला मान्यता देतो व सुटका पथकाचं नेतृत्व करण्यास तयार होतो. ‘ऑपरेशन हॉट फूट’ या नावाने या योजनेला सुरुवात होते. योजना आखली जाते. बुल सायमनच्या नेतृत्वाखाली इडासीचे अकरा कर्मचारी योजना आकाराला आणण्यासाठी कार्यरत होता. यामध्ये अमेरिकेत ही योजना कशी आखली जाते, पण इराणमध्ये आल्यावर कळतं की इथली परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. त्यामुळे योजना कशी बदलली जाते, योजना बदलताना त्यामध्ये कशा अडचणी येतात, कोणकोणता बदल करावा लागतो त्याचबरोबर ही योजना गुप्त राहण्यासाठी कसे प्रयत्न केले जातात, पॉल व बिलला तुरुंगातून बाहेर कसं काढलं जातं, त्यानंतर त्यांना इराणबाहेर काढणं आणि मायदेशी नेणं किती कठीण होतं व ते कसं नेलं जातं याची ही कथा आहे. कथा वाचताना ती प्रत्येक प्रकरणागणिक उत्कंठावर्धक होत जाते. कारण दोन व्यक्तींना सोडवताना इतर बाराजणांचेही प्राण पणाला लागले होते. त्यामुळे दोघांमुळे इतर बाराजणांनाही तुरुंगवास भोगायला लागला असता किंवा मरण पत्करायला लागलं असतं. कादंबरीच्या सुरुवातीला काही व्यक्तिरेखा समजण्यास कठीण जातात. कारण बरीच नावं सारखी असल्याने हा गोंधळ होतो; परंतु नंतर हा गोंधळ कमी होऊन थरारनाट्याला सुरुवात होते. या कादंबरीला इराण आणि अमेरिकेचे संबंध कसे होते. इराणची सामाजिक व राजकीय परिस्थिती कशी होती तसेच त्या काळात एकूणच जागतिक परिस्थिती कशी होती हेही कळते. आज जेवढं जागतिकीकरण झालं आहे तेवढं त्या काळात नव्हतं. थोडक्यात तो काळ जागतिकीकरणाचा नव्हता. त्यामुळेच या सुटका नाट्याला एक वेगळं वळण मिळालं व हे फारच थरारक बनलं. ज्यांना अशा कथा वाचायला आवडतात त्यांच्यासाठी तर ही खूपच उत्तम कादंबरी आहे. पण इतरांनीही ही कादंबरी वाचावी. कारण अतिशय उत्तम अशी कादंबरी तर आहेच पण ही एक सत्य घटनाही आहे. भांडवलशाहीतही आपल्या कर्मचाऱ्यांच्या सुटकेसाठी तळमळणारा मालक आपल्याला बघायला मिळतो. त्यासाठी तो स्वत:ही आपला जीव धोक्यात घालतो. एकूणच ही कादंबरी वाचताना कुठेही कंटाळा येत नाही. तसेच जसजसे नाट्य उलगडत जाते तसतशी उत्कंठाही वाढत जाते व शेवटी अगदी ती शिगेला पोहचते. ज्यावेळी ही योजना यशस्वी होते तेव्हाच उत्कंठा शांत होते, तर अशी ही वाचनीय कादंबरी एकदा तरी वाचावीच. -श्रेया खरे ...Read more

 • Rating StarDAINIK LOKSATTA 29-08-2005

  कल्पनेपेक्षा रम्य सत्यकथा... ‘ऑन द विंग्ज ऑफ ईगल्स’ ही केन फोलेट यांची कादंबरी. ज्योत्स्ना लेले यांनी तिचा मराठीत अनुवाद केला आहे. ही कादंबरी म्हणजे एक सत्यघटना आहे. इराणमधील क्रांतीच्या धुमसत्या काळात घडलेली. ‘युद्धस्य कथा रम्या’ असं म्हटलं जातं. ह प्रत्यक्ष युद्धाची कथा नसली तरी अत्यंत धमासान काळात इराणमधल्या तुरुंगातून सुखरूप पलायन करून अमेरिकेला परतणाऱ्यांची ही चित्तथरारक कहाणी आहे. ‘इलेक्ट्रॉनिक डाटा सिस्टिम’ या अमेरिकन कंपनीच्या इराण शाखेतील दोन अधिकाऱ्यांना विनाचौकशी तुरुंगात डांबण्यात आले. त्यांना सोडवून आणण्यासाठी त्यांच्या बॉसने केलेला आकाशपातळ एक करणारा प्रयत्न हा या कादंबरीचा विषय. डलास, तेहरान, इस्तंबूल, वॉशिंग्टन हा या सत्यकथेचा पट. कोणत्याही राजकीय घटनेशी संबंधित नसणाऱ्या, निव्वळ आपल्या कंपनीचे कर्मचारी असल्यामुहे अडचणीत सापडलेल्या आपल्या कर्मचाऱ्यांना सोडवण्यासाठी रॉस रोशे हा इलेक्ट्रॉनिक डाटा सिस्टीम कॉर्पोरेशनचा अध्यक्ष अक्षरश: जिवाचं रान करतो. आपण इराणमध्ये सापळ्यात अडकले जात आहोत याची जाणीव झाल्यापासून सुटकेपर्यंतचा ‘इडीसि’च्या कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात घालून केलेला प्रवास, तुरुंग फोडून त्यांना बाहेर काढून इराणबाहेर पोहोचवण्याचा प्रवास अत्यंत चित्तथरारक असाच आहे. साहसकथांची आवड असणाऱ्यांसाठी सत्य हे कल्पितापेक्षाही अद्भुत कसे असते याचा दाखला देणारी ही कहाणी आवर्जून वाचावी अशीच आहे. ...Read more

 • Read more reviews
Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ASHI MANASE YETI
ASHI MANASE YETI by VASANT JOSHI Rating Star
DAILY LOKSATTA LOKRANG 13.1019

मान्यवरांची उल्लेखनीय व्यक्तिचित्रणे हृदांच्या सहवासातून समृद्ध होण्याचा अनुभव जोशी यांनी या लेखांतून मांडला आहे. लेखक व संशोधक अशी ओळख असलेल्या दिवंगत डॉ. वसंत जोशी यांनी ‘अशी माणसे येती’ या व्यक्तिचित्रणपर पुस्तकाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील नावंत बुद्धिजीवी व्यक्तिमत्त्वांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. दत्तो वामन पोतदार, प्रा. ना. सी. फडके, रणजित देसाई, तपस्वी संशोधक डॉ. भाऊसाहेब कोलते, प्रा. राम शेवाळकर, डॉ. श्रीधर कुलकर्णी, तंजावरचे तुळेंद्रराजे भोसले अशा व्यक्तिमत्त्वांवरील उत्तम लेख या पुस्तकात वाचायला मिळतात. ही सारी मंडळी महाराष्ट्राच्या साहित्य, संशोधन, अध्यापन क्षेत्रात मोठे योगदान दिलेली अशी आहेत. जोशी यांना यापैकी अनेक मान्यवरांचा सहवास लाभला. या सुहृदांच्या सहवासातून समृद्ध होण्याचा अनुभव जोशी यांनी या लेखांतून मांडला आहे. ...Read more

TARANG
TARANG by KALYANIRAMAN BENNURWAR Rating Star
DAINIK SAMANA 13-10-2019

काही कोरलेली स्मरणशिल्पे... ‘तरंग’ हा कल्याणीरमण यांचा आठवणींवर आधारित कथासंग्रह आहे. कल्याणीरमण यांचे सामाजिक व सांस्कृतिक जीवन सतत कार्यमग्न असल्यामुळे अत्यंत समृद्ध आहे. लेखकाने चरित्र, कथा, कादंबरी, बालसाहित्य असे विपुल लेखन केले असून त्यांच्या तर भाषांमध्ये अनेक आवृत्त्याही निघाल्या आहेत. लेखकाच्या भावविश्वातल्या विविध आठवणींच्या पदरांमधून हे ‘तरंग’ उमटलेले आहेत. यात काही कडूगोड क्षण आहेत, काही समर्पित तर काही वैचित्र्यपूर्ण व्यक्तिचित्रे आहेत. काही प्रसंग काही आठवणी आणि काही गोष्टी आहेत. ‘पीआयएल.’ ‘पाच नंबर सिंगल रूम’ या कथांची भट्टी उत्तम जमली आहे. पुरावा ही कथा एक जोरदार धक्का देते. ‘नाडीपरीक्षा’, ‘गौरीहार’ या फसवणुकीच्या कथा असूनही त्यांचा पोत मात्र भिन्न आहे. ‘बडा साब’चा राउंड’, ‘दिवसा पण खेळ चाले’ या कथा तुम्ही विश्वास ठेवा किंवा ठेवू नका, पण जगात भुते आहेतच असे सहज सांगून जातात. ‘पावलीची कोपरी’ चटका लावणारी कथा. खरंच असे कधी होते का? असा एक जिव्हारी लागणारा खडा सवालही टाकते. ‘श्रमही निमाले’मधील आणि ‘पावलीची कोपरी’मधील आईचा मृत्यू ही घटना कशी सुन्न करते याचा गहिरा अनुभव देते. ‘अश्रू’मधील हरिपंत चापेकरांची व्यक्तिरेखा भावुकता आणि कठोर वास्तव यांच्या सीमेवरील अश्रूंची किंमत सांगते. मयूर गोरे हे पात्र अगदी अस्सल साकारले आहे त्याचा दुर्दैवी शेवट हा त्याच्याच कर्माने झालेला असूनही हे पात्र सगळ्यांना गुतवून ठेवते हे त्याचे यश आहे. बालय्या स्वामी हे आपल्या विचारशक्तीच्या आणि कल्पनाशक्तीच्या मर्यादा ओलांडून पांढरपेशा समाजातील अपरिचित असा जीवनपट उलगडत जाते. ‘सिंगल रूम’मधील संघर्ष वास्तववादी आहे, पण शेवट मात्र धक्का नक्की देतो. ‘पीआयएल’मधील ‘पोएटिक जस्टीस’ एक पाठ देते तर ‘कर्मयोगी’मधील अनंत राव एक उत्तम वस्तुपाठ घालून देतात. ‘पाच नंबर’मधील नायिकेची घालमेल आपली कधी होऊन जाते ते कळतच नाही म्हणूनच हे ‘तरंग’ अवश्य अनुभवण्यासारखे आहेत. ...Read more