* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SPY PRINCESS
  • Availability : Available
  • Translators : BHARATI PANDE
  • ISBN : 9788190734493
  • Edition : 2
  • Publishing Year : NOVEMBER 2008
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 256
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
AN INDIAN PRINCESS, WHO IS IN THE LINEAGE OF TIPU SULTAN, PARTICIPATES IN THE SECOND WORLD WAR, SHE SPIES FOR THE BRITISH. THIS BRAVE AND FIERCE TIGRESS GETS CAUGHT BY THE GERMANS, AS A RESULT OF TREACHERY. HER FUTURE IS CLEAR; SHE SUFFERS IMMENSE PAINS AT THE HANDS OF GERMANS. TREACHERY, TORTURE AND TERRIBLE TORMENT.. ONE DAY, A BULLET REVEALS HER FROM ALL THIS TORTURE. SHE WAS THE ONE WHO KEPT THE FLAME OF BRAVERY ENLIGHTENED.
टिपू सुलतानाची वंशज असलेली एक भारतीय राजकन्या दुसऱ्या महायुद्धात सामील होते, ब्रिटिश गुप्तहेर बनून! नसानसांत अपार धैर्य भिनलेली ही शूर वाघीण, अखेर जर्मनांच्या हाती लागते. विश्वासघात, अनन्वित छळ आणि प्राणांतिक यातना... पिस्तुलाची गोळीच तिची यातून मुक्तता करते. शौर्याचं अनोखं स्फुल्लिंग जागतं ठेवणारी...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #SHRABANIBASU #BHARATIPANDE #SPYPRINCESS #BIOGRAPHYA&TRUESTORIES
Customer Reviews
  • Rating StarPUJA KUCHEKAR

    टिपू सुलतान ची वंशज असलेली एक भारतीय राजकन्या. दुसऱ्या महायुद्धात सामील होते एक "ब्रिटिश गुप्तहेर" बनून!!!!! नसानसांत अपार धैर्य भिनलेली हि शूर वाघिण, अखेर जर्मनांच्या हाती लागते. विश्वासघात ,अनन्वित छळ आणि प्राणांतिक यातना..... पिस्तुलाची गोळच तिची यातून मुक्तता करते. शौर्याचं अनोखं स्फुल्लिंग जागत ठेवणारी एक रोचक ,थरारक सत्यकथा . गुप्तहेर युवराज्ञी "नूर इनायत खान" हिची. ...Read more

  • Rating StarDAINIK DESHDOOT 04-04-2010

    नूरच्या शौर्याचा मागोवा... नूर इनायत खान एका पारंपरिक आणि आध्यात्मिक वळणाच्या मुस्लीम कुटुंबातील मुलगी गुप्तहेर बनते आणि दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या काळात सर्वांत धोकादायक अशा सुद्धक्षेत्रात गुप्तहेर म्हणून काम करते. या एकाच गोष्टीने मूळ लेखिका श्रवणी बसू यांचे लक्ष वेधले आणि तिने नूरचा तपशीलावर अभ्यास करण्याचे ठरवले. नूरचा मुळाचा पिंड हेरगिरीचा नव्हता, तर तीही सर्वसामान्य चारचौघींसारखीच स्वप्नाळू, सुंदर आणि सौम्य मुलगी होती. तिला मुलांसाठी कथा लिहिणे फार आवडे. नेमबाज, विशेष शारीरिक कौशल्य यापैकी कोणतीही गोष्ट सूरकडे नव्हती. तरीही तिने प्रचंड धैर्य, हिंमत दाखवली. नूरने युद्धकाळात जी गुप्तहेरगिरी केली त्या वेळचे तिचे सर्व सहकारी फ्रान्समध्ये मारले गेले. तिचे वरिष्ठी हयात नसल्याने नूरचे कुटुंबीय भाऊ, एसओई कंपनीच्या गुप्त फाइल्स एवढ्याच आधारावर नूरचे जीवन उलगडले. नूर ही मुळची भारतीय. तिचे वडील सूफी तत्त्वज्ञानी. त्यांनी नूरला ती एक भारतीय राजकन्या असून तिच्या नसानसात टिपू सुलतानचे रक्त खेळत असल्याची शिकवण दिली. त्यामुळेच ती ब्रिटिश गुप्तहेर बनली. नसानसात अपार धैय भिनलेली ही शूर वाघीण अखेर जर्मनीच्या हाती लागते. जर्मन अधिकारी अंधार कोठडीत तिचा अन्वनित छळ करतात. पण तरीही नूर त्या अधिकाऱ्यांना आपल्याबरोबरच्या गुप्तहेर सहकाऱ्यांची नावे सांगत नाही. एखादी स्त्री जरा हटके पेशा पत्करून एवढे धाडस दाखवते हे वाचतानाही अंगावर काटा येतो. नूरच्या बरोबर तीन महिला गुप्तहेरांना तुरुंग अधिकाऱ्यांनी मानेच्या मागच्या बाजूला गोळ्या घालून संपवले. पण नूर हिच्यावर अतिशय धोकादायक असा शिक्का असल्यामुळे तिला अधिक छळ करण्यासाठी निवडण्यात आले. जर्मन अधिकाऱ्यांनी मृत्यूच्या आदल्या दिवशी तिला रात्रभर लाथाबुक्यांनी रक्तबंबाळ केले आणि सकाळी तिच्या डोक्याशी अगदी जवळून गोळी घातली तेव्हा नूरने ‘लिबर्ते’ (स्वातंत्र्य) शब्दाचा उच्चार करून प्राण सोडला त्यावेळी नूरचे वय अवघे तीस वर्षे होते. केवढे धाडस होते तिच्या अंगी. शत्रूची गोळी खातानाही ‘मी मुक्त झाले आहे’ याचाच आनंद नूरला होता. पिस्तुलाच्या गोळीने तिची यमयातनांमधून मुक्तता केली. नूरच्या शौर्याने अनोखे स्फुल्लिंग जागते ठेवणाऱ्या या स्फूर्तिदायक सत्यकथेवर आधारित ही कादंबरी अंगावर थरार आणणारी आहे. ...Read more

  • Rating StarMAITRIN 01-03-2011

    टिपू सुलतानाची नात ब्रिटिश गुप्तहेर... नोरा इनायत खान या भारतीय गुप्तहेर तरुणीला जर्मनांनी छळ छावणीत डांबून निर्घृणपणे ठार मारले. टिपू सुलतानाच्या वंशातील या तरुणीची माहिती आपल्याला फारशी नाही किंवा खरे तर अजिबात नाही. दुसऱ्या महायुद्धातील एस ओ ई चीगोपनीय कागदपत्रे आता उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे नोरा इनायत खानच्या कार्याची आणि बेडरपणाची कहाणी आता सुसूत्रपणे सांगता येणे शक्य झाले आहे. श्रावणी बासू या लंडनमधील पत्रकार महिलेने मूल कागदपत्रे अभ्यासून नूरचे चरित्र लिहून ‘स्पाय प्रिन्सेस’ या नावाने प्रसिद्ध केले. त्याचा मराठी अनुवाद भारती पांडे यांनी केला असून तो मेहता पब्लिशिंग हाऊसने बाजारात आणला आहे. सुफी पंथाचा प्रभाव असलेल्या एका मुस्लीम कुटुंबातील नूर ही मुलगी स्वप्नाळू, सुंदर आणि समंजस होती. तिचे वडील इनायत खान. आई अमेरिकन. मुलांसाठी कथा लिहिण्याची तिला आवड होती. दिसायला नाजूक, मूळ भारतीय पण आता पॅरिसमध्ये स्थायिक. विलायत आणि हिदायत हे तिचे धाकटे भाऊ. ती ब्रिटिश, फ्रेंच आणि भारतीय होती. ब्रिटिशांची गुप्तहेर म्हणून ती पॅरिसमध्ये काम करू लागली. पॅरिस जर्मनांच्या ताब्यात गेल्यावर तिला पकडण्यात आले आणि जर्मनीतील छळछावणीत पाठविण्यात आले. तिचा भयंकर छळ करण्यात आला आणि शेवटी तिला गोळ्या घालून ठार करण्यात आले. जनरल चार्ल्स द गॉल यांनी तिच्या मृत्यूनंतर तिला क्वा द गेर हा सर्वोच्च मुलकी पुरस्कार देऊन सुवर्णताऱ्यासह तिचा गौरव केला. सन्मानपत्रात म्हटले आहे. ‘‘ए.एस.ओ. नोरा इनायत खान, डब्ल्यू एएएफ, हिला १६ जून १९४३ रोजी लायसँडर विमानाने फ्रान्समध्ये पाठविण्यात आले. बिनतारी यंत्रचालक म्हणून पॅरिसमधील बंडखोरांची एक संघटना आणि लंडन यांच्यातील संपर्क चालू ठेवण्याची कामगिरी तिच्यावर सोपवलेली होती. त्या बंडखोर संघटनेतील अनेक लोकांना पकडण्यात आले. तेव्हा तिला पळून जावे लागले. तरीही तिने आपले काम चालू ठेवले. १९४३ जुलैमध्ये ती ग्रिग्राँ येथे चकमकीत सापडली. जर्मन सैनिकांना जखमी करून तिने पळ काढला. परंतु तिला ऑक्टोबर १९४३ मध्ये पकडूनच जर्मनीला पाठविण्यात आले.’’ या प्रशस्तिपत्रासोबत सुवर्ण ताऱ्यासह तिला क्रवा द गेर हा सन्मान देण्यात आला. जनरल द चार्ल्स द गॉल यांची स्वाक्षरी या पत्रावर आहे. नोराला १९४९ मध्ये जॉर्ज क्रॉस देण्यात आला. खरे तर भारतीय स्वातंत्र्यासाठी लढण्याची तिची इच्छा होती. १९४२ मध्ये आर.ए.एफ. मध्ये नोकरीसाठी तिने अर्ज केला होता आणि इंग्लंडमध्ये मी युद्धकाळात ब्रिटिशांना सहाय्य करीत असले तरी युद्ध संपल्यावर भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होणार आहे असे ती स्पष्ट सांगत होती... डाखाऊ येथे तीस हजार व्यक्तींची रक्षा पुरण्यात आली आहे. तेथेच नूरचे स्मरण जागवणारी छोटी फुलबाग आहे. एका भारतीय पराक्रमी स्त्रीची नव्याने ओळख करून देणारे हे पुस्तक वाचनीय आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
हेमंत कान्हे, अमरावती.

जी.बी.देशमुख ह्यांच्याद्वारे लिखित `दुर्दम्य` हे पुस्तक सत्य घटनांवर प्रस्तुत केलं गेलं असून, मनोगत तसेच संपूर्ण पुस्तक वाचतांना अंगावर अक्षरशः काटा उभा राहतो. एकंदरीत हे पुस्तक जबरदस्त आहे. लेखकाच्या लेखनक्षमते विषयी लिहावं तेवढं कमीच आहे. लेखकासह्या साहित्य कृतीकरीता मनापासून सॅल्युट. ...Read more

BACKSTAGE
BACKSTAGE by MONTEK SINGH AHLUWALIA Rating Star
महाराष्ट्र टाईम्स.. ६.९.२०२६

भारताच्या आर्थिक सुधारणांवर अनेक पुस्तके आजवर प्रसिद्ध झाली आहेत. काहींमध्ये आकडेवारीचे जंजाळ असते, काही धोरणांचे विश्लेषण करतात, तर काही विशिष्ट नेत्यांची जाहिरातबाजी करतात. मात्र माँटेकसिंग अहलुवालिया यांचे `बॅकस्टेज : भारताच्या उच्च वाढीच्या र्षांमागची कहाणी` हे पुस्तक या सगळ्यांपेक्षा वेगळे ठरते. कारण हे पुस्तक भारताच्या आर्थिक परिवर्तनाची कथा बाहेरून पाहणाऱ्या अभ्यासकाने नव्हे, तर त्या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी उभ्या असलेल्या व्यक्तीने सांगितलेली आहे. जी. बी. देशमुख यांनी मूळ इंग्रजी पुस्तकाचा केलेला मराठी अनुवाद सरस उतरला आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच माँटेकसिंग एक गोष्ट स्पष्ट करतात, ती म्हणजे, हे पुस्तक आत्मकथन नाही. आत्मप्रौढी मिरवण्यासाठी नव्हे, तर भारताच्या आर्थिक सुधारणांचा प्रवास समजावून सांगण्यासाठी अहलुवालिया हे पुस्तक लिहितात. विषयाच्या अनुषंगाने पुस्तकात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संदर्भ येतात, पण ते आर्थिक आणि राजकीय घडामोडी समजावून सांगण्यापुरतेच. सिकंदराबादमधील मध्यमवर्गीय वातावरणातून सुरू झालेला त्यांचा प्रवास दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ऑक्सफर्ड, जागतिक बँक, अर्थ मंत्रालय, योजना आयोग आणि अखेर देशाच्या सर्वोच्च आर्थिक धोरणनिर्मितीच्या केंद्रापर्यंत पोहोचतो. हा प्रवास वाचताना स्वतंत्र भारताच्या आर्थिक विचारसरणीचा विकासक्रम उलगडत जातो. पुस्तकाचे केंद्रस्थान अर्थातच १९९१च्या आर्थिक संकटाचे आहे. त्यावेळी देशाकडे काही आठवड्यांच्या आयातीपुरताही डॉलर शिल्लक नव्हता. सोन्याचा साठा गहाण ठेवण्याची वेळ आली होती आणि आर्थिक दिवाळखोरीची शक्यता प्रत्यक्ष समोर उभी होती. अशावेळी सरकारने घेतलेले निर्णय, त्यामागील तणाव, राजकीय अनिश्चितता आणि प्रशासकीय संघर्ष यांचे वर्णन पुस्तकात अत्यंत जिवंतपणे आले आहे. नाणेनिधी किंवा जागतिक बँकेच्या दबावामुळे या सुधारणा झाल्याची धारणा माँटेकसिंग ठामपणे नाकारतात. हे पुस्तक आर्थिक सुधारणांना कोणत्याही प्रकारच्या विचारधारेच्या चष्म्यातून पाहत नाही. लेखक ना मुक्त बाजाराचे अंधसमर्थन करतात, ना राज्यनियंत्रित व्यवस्थेचे. त्यांचा दृष्टिकोन व्यवहारवादी आहे. भारतासारख्या लोकशाही देशात सुधारणा एका झटक्यात होत नाहीत; त्या राजकीय वास्तवाशी जुळवून घेत हळूहळू पुढे सरकतात, हे ते वारंवार. अधोरेखित करतात. पुस्तकात अनेक ठिकाणी `सुधारणा` हा आर्थिक नव्हे, तर राजकीय प्रक्रियेचाही विषय आहे, हे प्रकर्षाने जाणवते. अहलुवालिया या पुस्तकात अनेक व्यक्ती, अधिकारी, अर्थतज्ज्ञ आणि राजकीय नेत्यांच्या योगदानाचा उल्लेख करतात. नरसिंह राव, मनमोहन सिंग, पी. चिदंबरम, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह यांच्यापासून ते विविध सनदी अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांची भूमिका ते प्रामाणिकपणे नोंदवतात. योजना आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना अहलुवालिया यांनी जवळून अनुभवलेला काळ येथे उभा राहतो. सन २००४ ते २०११ या काळातील उच्च आर्थिक वाढ, दारिद्रयनिर्मूलनातील प्रगती, पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ आणि ग्रामीण विकासाच्या कार्यक्रमांचे मूल्यमापन ते करतात. विशेषतः भारताने सलग अनेक वर्षे सात ते आठ टक्क्यांच्या दरम्यान वाढ नोंदवली, ती केवळ जागतिक परिस्थितीचा. परिणाम नव्हती; १९९० नंतरच्या सुधारणांनी घातलेल्या पायावर उभे राहून ती शक्य झाली, हा त्यांचा युक्तिवाद पटण्याजोगा वाटतो. मात्र पुस्तकाचे खरे सामर्थ्य यशोगाथेत नाही, तर आत्मपरीक्षणात आहे. यूपीए-२ दरम्यान निर्माण झालेली निर्णयप्रक्रियेतील अडचण, गुंतवणुकीतील वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक मंदी, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे निर्माण झालेले वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक थेट भाष्य करतात. अनुवादक जी. बी. देशमुख यांनी मूळ पुस्तकातील आर्थिक संकल्पना सहज आणि प्रवाही मराठीत मांडल्या आहेत. यात कृत्रिमता जाणवत नाही. आर्थिक विषयावरील पुस्तक असूनही भाषा जड वाटत नाही. आर्थिक सुधारणांच्या व्यापक सामाजिक परिणामांचा स्वतंत्र आणि सविस्तर ऊहापोह येथे अपेक्षेपेक्षा कमी आढळतो. मात्र, हे पुस्तक ज्या उद्देशाने लिहिले गेले आहे त्या उद्देशात ते अत्यंत यशस्वी ठरते. `बॅकस्टेज` हे केवळ पुस्तक नाही; ते भारताच्या आर्थिक परिवर्तनाचा प्रत्यक्षदर्शी दस्तऐवज आहे. १९९१ नंतर भारताने घेतलेल्या वळणाचा अर्थ समजून घ्यायचा असेल, उच्च वाढीच्या वर्षामागील वास्तविक कथा जाणून घ्यायची असेल आणि धोरणनिर्मितीच्या पडद्यामागे काय घडत असते याचा मागोवा घ्यायचा असेल, तर हे पुस्तक अभ्यासणे आवश्यक ठरते. भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक सुधारणांचा इतिहास आणि त्यांचे परिणाम समजून घेण्यासाठी हे पुस्तक एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ म्हणून ओळखले जाऊ शकते. मराठीत उपलब्ध असलेला हा अनुवाद त्या दृष्टीने विशेष स्वागतार्ह आहे. ...Read more