* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE DRESSMAKER OF KHAIR KHANA
  • Availability : Available
  • Translators : VARSHA VELANKAR
  • ISBN : 9789386175069
  • Edition : 1
  • Publishing Year : SEPTEMBER 2016
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 200
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
  • Discount : OCTOBER EXHIBITION 2026(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Print Books:
THE RIVETING TRUE STORY OF KAMILA SIDIQI AND OTHER WOMEN OF AFGHANISTAN IN THE WAKE OF THE TALIBAN’S FEARFUL RISE TO POWER. IN WHAT GREG MORTENSON, AUTHOR OF THREE CUPS OF TEA, CALLS “ONE OF THE MOST INSPIRING BOOKS I HAVE EVER READ,” LEMMON RECOUNTS WITH NOVELISTIC VIVIDNESS THE TRUE STORY OF A FEARLESS YOUNG WOMAN WHO NOT ONLY REINVENTED HERSELF AS AN ENTREPRENEUR TO SAVE HER FAMILY BUT, IN THE FACE OF FEROCIOUS OPPOSITION, BROUGHT HOPE TO THE LIVES OF DOZENS OF WOMEN IN WAR-TORN KABUL.
अफगाणिस्तानाचं भविष्य अधांतरीच आहे. ‘द ड्रेसमेकर ऑफ खैरखाना’ मात्र तुम्हाला अशा अफगाणिस्तानाची सैर घडवतं, जे कुणीही पाहिलेलं नाही आणि ज्याची वाच्यता कुठल्याही वर्तमानपत्रांच्या मथळ्यांमध्ये केली गेली नाही. ही खचितच एका युद्धाची कथा आहे. पण ती स्त्रियांच्या एकतेचीही कथा आहे आणि दु:खालाही लाजवणा-या साहसाची कथा आहे.कमिलाचा प्रवास प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे. पण त्याचबरोबर तिचा हा प्रवास वाचकाला एका जटिल राजकीय आणि मानवीय घटनाक्रमाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्यासाठी भाग पाडेल, हे निश्चित.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #KHAIRKHANACHIVASTRAUDYOJIKA #THEDRESSMAKEROFKHAIRKHANA #खैरखानाचीवस्त्रोद्योजिका #BIOGRAPHY&TRUESTORIES #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #VARSHAVELANKAR #GAYLETZEMACHLEMMON "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 30-09-2017

    अफगाणिस्तानमधील स्त्रियांच्या एकतेची कथा... तीन वर्षात काबुल, लंडन आणि वॉशिग्टंन डीसी येथे घेतलेल्या मुलाखती आणि संशोधन यातून उलगडलेल्या सत्याला लेखिकेने पुस्तकातील प्रत्येक प्रसंग आणि कथानकाच्या माध्यमातून वाचकांसमोर ठेवलं आहे. या काळात अफगाणिस्तानतील एकंदर राजकीय व सामाजिक परिस्थिती फारच खालावली होती. गेल झेमॉक ले मॉन या सुप्रसिद्ध एबीसी न्यूजमध्ये त्या काम करत असताना २००४मध्ये त्यांनी हार्वर्डमध्ये एमबीए करण्यासाठी नोकरी सोडली जगातील संघर्षांना तोंड देणाऱ्या किंवा संघर्षातून उभारी घेऊ पाहणाऱ्या देशातील महिला उद्योजकांसंदर्भात गेल यांनी अभ्यास केला. या देशामध्ये अफगाणिस्तान, बोस्निया आणि रवांडा या देशांचा समावेश होता. ‘द ड्रेसमेकर ऑफ खैरखाना’ या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद वर्षा वेलणकर यांनी केला आहे. तालिबान नावाचं दृष्टचक्र अफगाणिस्तान आणि तेथील लोकांच्या नशिबी बहुधा कायमस्वरूपी आहे. याचा जास्तीत जास्त त्रास या देशातील महिलांनी भोगला. आपापल्या परीनं त्यांनी या परिस्थितीचा सामना केला. गेल झेमॉक लेमॉन या पत्रकार महिलेनं एक अशी नायिका जगापुढे आणण्याचा चंग बांधला आणि संकटांनी घेरलेल्या देशातील महिला उद्योजिकांचा शोध घेण्याच्या मोहिमेवरच ती निघाली. अफगाणिस्तानातील तिच्या या सफरीत तिला कमिला सिद्दीकी भेटली. तालिबान आणि त्यांच्या देशांची संस्कृती (?) जपण्यासाठी सुरू झालेली मोहीम यांचा पहिला बळी महिला वर्ग होता. स्त्री ही पुरुषांना अनैतिकतेकडे घेऊन जाणारी एक बला आहे आणि तिला दूर सारण्यासाठी तिच्या पायाचं नख ही दिसता कामा नये, अशा विक्षिप्त विचारांच्या या राज्यकर्त्यांनी देशातील सगळ्या महिलांना वेठीस धरलं आणि मनमानी करण्यास सुरुवात केली. मुलींना शिक्षणासाठी केलेली बंदी मात्र अनेकांच्या जिव्हारी लागली. तेव्हाच एका छुप्या संघर्षाला सुरुवात झाली. बंधनांना झुगारून न देता त्यांच्या दायऱ्यात राहून या महिलांनी आपलं स्वत्व जपण्यासाठी जे केलं, त्याचं प्रतिनिधीत्व करणारी कमिला सिद्दीकी ही एक तरुणी आहे. प्रचंड आशावादाच्या जोरावर तिनं स्वत:च्या कुटुंबासाठीच नाही तर समाजासाठीही जे जे केलं त्याची अतुलनीयता निर्विवाद आहे. हे पुस्तक लिहिताना लेखिकेच्या हाती होतं ते फक्त सत्य. सत्याला शब्दबंबाळ करण्याची कधीच गरज नसते. त्यामुळे पुस्तकाची ओघवती भाषाशैली वाचकाला थेट कमिलाच्या पुढ्यात घेऊन जाते. अफगाणिस्तान, तिथली राजकीय परिस्थिती, महिलांचे हाल किंवा आणखी बरंच काही या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकाला कळतं. पण वाचकाच्या मनाला सगळ्यात जास्त भिडणारी गोष्ट म्हणजे व्यक्तीच्या अंगभूत विरोधाभासी वृत्तीमधल्या योग्य वृत्तीची निवड करण्याची पद्धत. संकट असामान्य आणि कुणालाही नेस्तनाबूत करण्याची क्षमता असलेलं होतं. पण तशा परिस्थितीतही एका तरुणीनं स्वत:तील एका योग्य वृत्तीची निवड करून आयुष्यात कसे बदल घडवून आणले, याची ही कहाणी आहे. अगदी प्रत्येकानं वाचावी अशी! काबूलमधील वास्तव्यात लेखिकेला एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली. येथील स्त्रियांमधला एकोपा विलक्षण होता. या एकोप्याला समजूतदारपणा, हास्यविनोद, धाडस, जगातील घडामोडीचा मागोवा घेण्याची जिज्ञासा आणि आपल्या कामावरील निष्ठा या साऱ्या छटा होत्या. आपला व्यवसाय सुरू करताना आणि इतर स्त्रियांना त्यात सामावून घेताना आपण आपल्या हलाखीच्या परिस्थितीतही देशाला मदत करू असा ठाम विश्वास कमिलाच्या मनात असल्याचं लेखिकेला त्यांच्या पहिल्या जाणवल्या होत्या. ही जिद्द, ही जाणीव कुठून आली होती? कमिलाच्या या कथेचा मागोवा घेताना अफगाणिस्तानचं भविष्य आणि अमेरिकेचा या देशातील सहभाग याबद्दल काय जाणून घेता येईल? लेखिकेतील पत्रकाराला ही उत्सुकता शांत बसू देईना. हीच कहाणी लेखिका आपल्याला सांगत आहे. -शैलजा यादवाड ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 29-01-2017

    ही एक विलक्षण कहाणी आहे. अत्यंत बिकट आणि कठीण परिस्थितीवर मात करून पुढे जाण्याची प्रेरणा या कहाणीतून मिळते. ही कथा आहे अफगाणिस्तानातील एका तरुणीची... स्त्रियांना मिळणारी अत्यंत दुय्यम वागणूक, तालिबान्यांचा दहशतवाद, शैक्षणिक मागासलेपण, राजकीय अस्थैर्यम्हणजे अफगाणिस्तान म्हणजे हा देश, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. तालिबान्यांच्या कारवायांमध्ये पहिला बळी स्त्रियांचा गेला. स्त्री म्हणजे अनैतिकता असा विचार रुजविण्याचा तेथे प्रयत्न झाला. तेथील राज्यकत्र्यांनी स्त्रियांवर जुलूम केले. या दडपशाहीतही काही स्त्रियांनी आपले स्वत्व जपले. अन्यायाविरुद्ध लढा दिला. कमिला ही त्या स्त्रियांपैकीच एक... तिच्या संघर्षाची ही चित्तथरारक कहाणी आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL, SAPTARANG 22-01-2017

    अफगाणिस्तानातल्या काबूलमधल्या खैरखाना या उपनगरातल्या कमिला सिद्दिकीची ही प्रेरणादायी कहाणी. हार्वर्डमधल्या अभ्यासाचा एक भाग म्हणून गेल झेमॉक लेमॉन पत्रकार महिलेनं अफगाणिस्तानातल्या महिला उद्योजकांचा शोध घ्यायचे ठरवलं. त्यातूनच तिला कमिलाची कहाणी सापडी आणि त्यातून ‘ड्रेसमेकर ऑफ खैरखाना’ हे पुस्तक तयार झालं. त्याच पुस्तकाचा हाच अनुवाद. तालिबानी राजवटीत अनेक जुलूम, हिंसाचार चालू असतानाही कमिलानं स्वत:मधल्या उद्यमशीलतेला झळाळी दिली. शिवणकाम करून तिनं तो व्यवसाय वाढवत नेला. कमिलाची धडपड, इतरांच्या सुरक्षिततेसाठी स्वत:चा जीव धोक्यात घालण्याची वृत्ती, तिची बंडखोरी, सर्जनशीलता, तिच्या बहिणी, त्यांचं कुटुंब, त्यांची धडपड यांची ही कहाणी. या कहाणीत अफगाणिस्तानामधलं भयाण वास्तव उलगडत जातं आणि त्याच वेळी कमिलाची आणि एकूणच तिथल्या महिलांची सकारात्मकताही समोर येते. ...Read more

  • Rating StarAjinkya

    Excellent !

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
विजय भास्कर, अमरावती

*दुर्दम्य : दहा कोटीत एक असा अजब ऑफिसर* *प्रामाणिकपणाचा दर्प, माणुसकीचा स्पर्श आणि एकाकी आयुष्याची कहाणी. काही माणसं आपल्या आयुष्यात येतात, आपल्या कामाचा आणि जगण्याचा ठसा उमटवतात; पण त्यांना एका शब्दात चांगलं किंवा वाईट ठरवणं कठीण अतं. त्यांच्या स्वभावातील विरोधाभासच त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवतात. ‘दुर्दम्य – अजब ऑफिसरची गजब गोष्ट’ हे जी. बी. देशमुख यांचं पुस्तक अशाच एका विलक्षण व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देतं. केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात सुमारे पंचवीस वर्षे सहकारी म्हणून अनुभवलेले सी. व्ही. कृष्णन एकनाथानन, म्हणजेच एकनाथन, यांचं व्यक्तिचित्र लेखकाने कोणताही कृत्रिम मुलामा न देता रेखाटलं आहे. त्यांच्या कठोर शिस्तीमागची तत्त्वनिष्ठा, विचित्र वाटणाऱ्या सवयींमागची भूमिका आणि एकाकीपणाच्या आड दडलेली माणुसकी उलगडत जाते. त्यामुळे हे केवळ एका अधिकाऱ्याचं चरित्र राहत नाही; ते माणसाला समजून घेण्याचा प्रयत्न ठरतं. *पहिली भेट : हात मागे घेतला!* ४ जुलै १९८८. चंद्रपूरहून अमरावतीला बदली होऊन आलेल्या लेखकाची एकनाथन यांच्याशी पहिली भेट. उंच, धिप्पाड आणि गंभीर व्यक्तिमत्त्वाच्या या अधिकाऱ्यांसमोर लेखकाने हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत एवढंच म्हटलं— “So you are reporting today. Okay.” या कोरड्या प्रतिसादातून त्यांच्या स्वभावाची पहिली झलक दिसते. मात्र, पुढे लेखकाने दिलेल्या टंकलेखनाच्या कामाची अचूकता पाहून आणि तो मेजर पी. के. बापट यांच्याकडे काम करून आल्याचं समजल्यावर एकनाथन म्हणाले— “Only a military man can carve out such workers. I am impressed.” कडक शिस्तीचा आग्रह धरणारा हा अधिकारी गुणवत्तेची दखल घ्यायलाही तितकाच तत्पर होता. पहिल्या भेटीत हात मागे घेणारा माणूस कामातील गुणवत्तेसमोर मात्र मनमोकळेपणाने दाद देतो. इथूनच या व्यक्तिमत्त्वातील विरोधाभासांची रंजक ओळख सुरू होते. *दोन रुपये चाळीस पैशांतून दिसलेलं तत्त्वज्ञान* एका व्यापाऱ्याकडून चुकून दोन रुपये चाळीस पैसे जास्त घेतले गेल्याचं लक्षात आल्यानंतर एकनाथन यांनी ती रक्कम परत करण्यासाठी स्वतःचे शंभर रुपये खर्च करून माणूस पाठवला. रक्कम छोटी होती; पण हिशेबातील तत्त्व मोठं होतं. त्यांच्या दृष्टीने पैशाची किंमत त्याच्या रकमेवर नव्हे, तर तो योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचण्याच्या प्रामाणिकपणावर ठरत होती. नियम पाळताना ते कोणतीही तडजोड करत नसत. मात्र, कर्मचाऱ्याचा न्याय्य लाभ असेल, तर त्याला मंजुरी देण्यासही ते मागेपुढे पाहत नसत. नियमभंग करणाऱ्यांसाठी कठोर आणि हक्कासाठी पात्र असणाऱ्यांसाठी तत्पर, ही त्यांच्या कार्यपद्धतीची दोन टोकं होती. त्यांची वक्तशीरपणाची कल्पनाही विलक्षण होती. उशिरा येणं चुकीचं; पण वेळेच्या खूप आधी येणंसुद्धा शिस्तीच्या चौकटीबाहेरचं! “Before time is also not the right time.” या भूमिकेतून त्यांच्या नियमप्रियतेचा अतिरेक जाणवतो; पण त्याच वेळी प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःची एक काटेकोर चौकट असणारा माणूसही दिसतो. *शिस्तीच्या पोलादी चौकटीमागचा माणूस* एकनाथन यांची शिस्त कधी कधी इतरांना विक्षिप्तपणाच्या जवळ जाणारी वाटे. स्फोटक कारखान्यातील सुरक्षानियमांचं काटेकोर पालन असो किंवा बंदुकीच्या हाताळणीतील खबरदारी, नियम म्हणजे केवळ कागदावरचे शब्द नव्हेत, अशी त्यांची धारणा होती. पण या कठोरतेला दुसरी बाजूही होती. कार्यालयातील शिपाई पत्नी-मुलांसह त्यांच्या वातानुकूलित दालनात झोपलेला आढळला. अशा वेळी कारवाई होईल, अशी अपेक्षा असताना एकनाथन यांनी त्याला विचारलं, “तुम हमारे चेंबर मे सोता?” या प्रश्नात नियम मोडल्याची जाणीव होतीच; पण त्याहून आधी दुसऱ्या माणसाच्या परिस्थितीची जाणीव होती. त्यांच्या स्वभावातली ही माणुसकी मोठ्या भाषणांतून नव्हे, तर अशा छोट्या प्रसंगांतून व्यक्त होते. म्हणूनच त्यांचं व्यक्तिचित्र एकरेषीय होत नाही. *एकटेपणाचा स्वीकार की त्याची किंमत?* एकनाथन यांनी अविवाहित राहणं, मोजक्याच वस्तूंमध्ये आयुष्य घालवणं, दूरचित्रवाणी-रेडिओपासून दूर राहणं आणि सामाजिक समारंभ टाळणं पसंत केलं. स्वतःच्या अवकाशाबाबत ते अत्यंत आग्रही होते. नातेसंबंधांच्या गर्दीपेक्षा एकांत त्यांना अधिक जवळचा वाटत होता. मात्र, आयुष्याच्या उत्तरार्धात आजारपणाने त्यांची शारीरिक स्वायत्तता हिरावून घेण्यास सुरुवात केली. कर्करोगावरील उपचारांसाठी केरळला गेल्यानंतर भावाच्या घरी राहणंही त्यांना अवघड वाटलं. आपल्यामुळे भावाच्या कुटुंबाला गैरसोय होऊ नये, या विचाराने त्यांनी हॉटेलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. स्वाभिमान आणि स्वावलंबन यांची ही भूमिका समजण्यासारखी असली, तरी तिची किंमत एकटेपणाच्या रूपाने मोजावी लागते. लेखकाने दिलेल्या वडिलांच्या जुन्या पलंगावर अखेरच्या काळात त्यांना आधार मिळाला, हा तपशील मनाला स्पर्शून जातो. आयुष्यभर व्यवहारात काटेकोर राहिलेल्या एकनाथन यांनी त्या पलंगाचा स्वीकार केला. काही नाती शब्दांनी नव्हे, तर अशा साध्या कृतींनी व्यक्त होतात. २०१९ मध्ये मोठ्या शस्त्रक्रियेनंतर त्यांनी लेखकाला म्हटलं— “Is this life, Deshmukh? I have to struggle for reaching even upto toilet.” आणि त्यानंतरची त्यांची विनंती अधिक बोलकी होती— “Try to come more frequently. I know it is a long distance. But I need to talk to someone like you with whom I can interact.” जगापासून अंतर राखणाऱ्या माणसालाही अखेरीस संवादाची गरज भासते. दुसऱ्या दिवशी त्यांचं निधन झालं. आयुष्यभर स्वावलंबनाचा आग्रह धरणाऱ्या या माणसाच्या शेवटच्या शब्दांत मात्र सोबत हवी असल्याची साधी, मानवी ओढ होती. *दहा कोटीत एक हीच खरी ओळख* एकनाथन यांच्यात दोष नव्हते, असं लेखक सांगत नाही. त्यांच्या कठोरतेचा अतिरेक, सामाजिक अलिप्तता आणि विचित्र वाटणाऱ्या सवयी लपवण्याचाही प्रयत्न करत नाही. यामुळेच हे व्यक्तिचित्र अधिक विश्वासार्ह बनतं. एखाद्या माणसाचं मोठेपण सिद्ध करण्यासाठी त्याला निर्दोष ठरवण्याची गरज नसते. निवृत्तीपूर्वी एकनाथन यांनी लेखकाला विचारलं होतं, आपण गेल्यानंतर लोक आपल्याला चांगलं म्हणतील की वाईट? त्यावर लेखकाने दिलेलं उत्तर या पुस्तकाच्या शीर्षकाचा अर्थ उलगडतं— “I won`t tell people as to whether he was a good man or bad man, but whenever such reference comes I would certainly say that he was a man one in ten crore!” ‘दहा कोटीत एक’ ही उपाधी म्हणजे एखाद्या माणसाला देवत्व देणं नव्हे. ती त्याच्या असामान्य व्यक्तिमत्त्वाची, तत्त्वांशी असलेल्या निष्ठेची आणि सहज वर्गीकरणात न मावणाऱ्या स्वभावाची नोंद आहे. एकनाथन यांचं व्यक्तिमत्त्व समजून घेताना ‘अंतरंगीचे आभाळ : एक काव्यवर्तुळ’ या काव्य संग्रहातील ‘माणसातले सुंदर गुण’ ही कविता आठवते. “संकट येता कुणाचा हात पुढे सरतो; नाव न विचारता माणूस माणसाला धरतो.” एकनाथन यांच्या आजारपणात लेखकाने केलेली मदत आणि चंदूभाऊ पवार यांनी दाखवलेली माणुसकी या ओळींना जगण्याचा संदर्भ देतात. माणुसकी नेहमी गोड शब्दांतूनच व्यक्त होते असं नाही. कधी ती एखाद्याच्या हक्कासाठी ठामपणे उभी राहते, कधी चुकीच्या गोष्टीला विरोध करते, तर कधी आजारी माणसाच्या एकटेपणात त्याला संवादाची सोबत देते. एकनाथन यांच्यातील गुण आणि मर्यादा दोन्ही समजून घेताना ही कविता माणसाकडे पाहण्याची एक खिडकी उघडते. कारण माणसातले सुंदर गुण गाजावाजा करून येत नाहीत; ते एखाद्या कृतीतून, एखाद्या स्पर्शातून किंवा दुसऱ्याच्या दुःखापाशी थांबण्यातून प्रकट होतात. कवितेच्या शेवटच्या ओळींत म्हटल्याप्रमाणे— “माणूस जपता माणूस— अंतरी उघडे आभाळ.” कदाचित एकनाथन यांच्या आयुष्याकडे पाहण्याची हीच एक दृष्टी असू शकते. त्यांच्या सगळ्या स्वभाववैशिष्ट्यांशी सहमत न होताही त्यांच्यातील माणूस समजून घेणं, हीच या पुस्तकाची आणि त्यातून मिळणाऱ्या अनुभवाची खरी कमाई आहे. जी. बी. देशमुख यांनी आठवणींच्या आधारे उभं केलेलं हे व्यक्तिचित्र वाचकाला एका प्रश्नासमोर उभं करतं—माणसाला त्याच्या गुणदोषांच्या बेरजेतून समजून घ्यायचं, की त्याच्या संपूर्ण जगण्याच्या संदर्भात? ‘दुर्दम्य’ हे पुस्तक एका अजब अधिकाऱ्याची गजब गोष्ट सांगतं; पण त्याचबरोबर शिस्त, स्वाभिमान, माणुसकी आणि एकटेपणा यांच्या सीमारेषांवरही विचार करायला लावतं. काही माणसं आपल्याला आवडतात म्हणून लक्षात राहत नाहीत; ती आपल्याला विचार करायला भाग पाडतात म्हणून लक्षात राहतात. एकनाथन हे त्यापैकीच एक. माणसाला समजून घेण्याची, त्याच्या गुणदोषांसह त्याच्याकडे पाहण्याची आणि माणुसकीच्या अर्थाचा नव्याने शोध घेण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाने ‘दुर्दम्य – अजब ऑफिसरची गजब गोष्ट’ हे पुस्तक अवश्य वाचावं. कारण काही पुस्तकं केवळ एका व्यक्तीची ओळख करून देत नाहीत; ती आपल्याला माणसांकडे पाहण्याची नवी दृष्टी देतात. हे पुस्तक त्यापैकीच एक. ..... विजय भास्कर , अमरावती ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
नरेंद्र तायडे, अमरावती

*दुर्दम्य* पुस्तक आज हाती घेतलं, शेवट कधी झाला कळलंच नाही. अक्षरशः डोळे पाणावले कधी गदगद हसुन तर कधी गहिवरून *खरंच* दहा करोडात एक होता एकनाथन अप्रतिम शब्दप्रपंचाने घडले व्यक्तीदर्शन... ...... नरेंद्र तायडे, अमरावती