* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KON-TIKI
  • Availability : Available
  • Translators : SHREEYA BHAGWAT
  • ISBN : 9789386175090
  • Edition : 1
  • Publishing Year : SEPTEMBER 2016
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 280
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
  • Discount : SPECIAL OCTOBER DISCOUNT 33/50 PERCENT(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Print Books:
KON-TIKI IS THE RECORD OF AN ASTONISHING ADVENTURE—A JOURNEY OF 4,300 NAUTICAL MILES ACROSS THE PACIFIC OCEAN BY RAFT. INTRIGUED BY POLYNESIAN FOLKLORE, BIOLOGIST THOR HEYERDAHL SUSPECTED THAT THE SOUTH SEA ISLANDS HAD BEEN SETTLED BY AN ANCIENT RACE FROM THOUSANDS OF MILES TO THE EAST, LED BY A MYTHICAL HERO, KON-TIKI. HE DECIDED TO PROVE HIS THEORY BY DUPLICATING THE LEGENDARY VOYAGE. ON APRIL 28, 1947, HEYERDAHL AND FIVE OTHER ADVENTURERS SAILED FROM PERU ON A BALSA LOG RAFT. AFTER THREE MONTHS ON THE OPEN SEA, ENCOUNTERING RAGING STORMS, WHALES, AND SHARKS, THEY SIGHTED LAND—THE POLYNESIAN ISLAND OF PUKA PUKA.
‘‘मग तू स्वतःच हा प्रवास करून का पाहत नाहीस?’’ प्रश्न आव्हानात्मक होता. आणि आव्हाने घ्यायची, धाडस करायची वृत्तीच मुळी त्या तरुण संशोधकाच्या अंगी भिनली होती. थॉर हेयेरडाल या तरुण संशोधकाने तराफ्यावरून हजारो सागरी मैलाचा प्रवास करून प्रशांत महासागरापल्याडचा पोलिनेशिया गाठायचा, हे ठरविले. अर्थातच अनेकांनीR त्याला वेड्यात काढले; पण तो ठाम राहिला. कारण त्याच्या सिद्धान्तानुसार कैक हजार वर्षांपूर्वी- अश्मयुगात असेच एका संस्कृतीचे स्थानांतरण झाले होते. मग त्याने अनेक अडथळ्यांवर मात करून, त्या लोकांसारखाच तराफा सिद्ध केला. ही कहाणी, या ‘वेड्या’, अद्भुत वाटाव्या अशा साहसी प्रवासाची... ही कहाणी मानवी संस्कृती, निसर्ग, समुद्री जीवन, जलचर, वादळवारे यांची; मानवी इच्छाशक्तीची, एका शोधाची आणि एका तराफ्याची– ‘कॉन-टिकी’ची!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #KON-TIKI #KON-TIKI #कॉन-टिकी #BIOGRAPHY&TRUESTORIES #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SHREEYABHAGWAT #THORHEYERDAHL "
Customer Reviews
  • Rating StarDivya Marathi 17-2-17

    पूर्वीचे सारेच दर्यावर्दी लाेक हे अाशिया खंडाच्या अाग्नेय भागातून जहाजे वल्हवित प्रशांत समुद्रात गेले हाेते. हे लेखक थाॅर हेयेरडाल यांना मान्य नव्हते. वारे अाणि सगारी प्रवाह विचारात घेतले तर अाशिया खंडातून सरळ पूर्वेस जाणे त्यांना शक्य झाले नसते, पण ाेलिनेशियाकडे जाऱ्याचे दाेन सागरी मार्ग त्यांना उपलब्ध हाेते. पहिला म्हणजे अाग्नये अशियामधून माेठा वळसा घेत वायव्य अमेरिकेकडून हवाई बेटांपर्यंत जाणारा मार्ग अाणि दुसरा म्हणजे दक्षिण अमेरिकेकडून थेट पाेलिनेशियच्या पूर्व किनाऱ्यास जाण्याचा. प्रागैतिहासिक काळात दक्षिण अमेरिकेपासून असा प्रवास करणे शक्य हाेते हे सहा तरुणांनी कसे सिद्ध करून दाखवले, त्याची गाेष्ट या पुस्तकात सांगितली अाहे. वैज्ञानिक अाणि खलाशी यांनी ही शक्यता अाजवर कधी विचारात घेतली नव्हती. दक्षिण अमेररिकेमधील बाल्सा लाकडाचा केलेला तराफा नियमितपणे किनाऱ्यावर नेऊन वाळवला नाही, तर पाण्यात पडेल, असे अभ्यासकांचे ठाम मत हाेते, प्रत्यक्षात मात्र ताे बुचाप्रमाणे अलगद तरंगत राहिला. तसेच प्राचीन काळात अमेरिकेहून जलमार्गाने पाेहाेचण्यास असंभाव्य वाटणारा पाेलिनेशिया हा देश प्रत्यक्षात मात्र पेरूमधील अादिवासी जलप्रवाशांच्या अावाक्यात हाेता, असे सिद्ध झाले. अापली चूक सिद्ध करून दिल्यावर विज्ञान अाणि वैज्ञानिकांकडून काेणती प्रतिक्रिया अाली, तर प्रागाैतिकहासिक नाैकानयनामधील जगातील सर्वात विख्यात अधिकारी म्हणून अाेळखले जाणारे हार्वर्ड विद्यापीठाचे अभ्यासक डाॅक्टर, एस. के. लाॅथ्राॅप यांनी अापली चूक सर्वप्रथम मान्य केली. याच अभ्यासकाचा बाल्सा लाकडाच्या तराफ्याविषयीचा सिद्धांत चूक असल्याचे दाखविण्यात अाले. काॅन-टिकी पुस्तकाने लाेकप्रियतेचा कळस गाठला. ते बेस्टसेलर बनले, पुढे त्याचे ६५ भाषांमध्ये भाषांतर झाले अाणि अाम्ही तयार केलेला काॅन-टिकी प्रवासाचा माहितीपट अाॅस्कर पारिताेषिक विजेता ठरला. १९५१ सालचा सर्वाेत्कृष्ट माहितीपट असे पारिताेषिकही त्याला मिळाले. याच पुस्तकाचा मराठी अनुवाद श्रीया भागवत यांनी केला अाहे. समुद्र ही चीज काय असते हे काॅन-टिकी माेहिमुळे अनुभवायला मिळते. समुद्र हे प्रवासाचे माध्यम अाहे, एकाकीपण भाेगण्याची सजा नाही. अरण्यांमधून वाट काढत रस्ते बांधणे, चक्राचा शाेध लावणे अाणि घाेड्याला माणसाळवून त्यांचा वापर करणे, पाण्यावर तरणारी जहाजे बांधणे या सर्वांच्या अाधी समुद्रच मानवाचा महामार्ग बनला हाेता हेदेखील वाचकाला या पुस्तकातून लक्षात येते. ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 23-OCT-2016

    हे लेखन म्हणजे अद्भुत सागरी सफरीचे कथन आहे. थॉर हेयेरडाल या संशोधकाने तराफ्यावरून हजारो सागरी मैलाचा प्रवास करून प्रशांत महासागरापलीकडचा पोलिनेशिया गाठायचा, असे ठरवले. संकटांशी सामना करीत, सर्व अडथळ्यांना पार करीत त्याने ही मोहीम पूर्ण केली. त्या मोहमेचाच हा थरारक वृत्तांत आहे. हा प्रवास म्हणजे कॉन-टिकी सिद्धांत आहे. वारा आणि सागरी प्रवाहांच्या मदतीने ‘फातू हीवा’ नावाच्या सागरी बेटांवर कसे जाऊन पोहोचले याचा अभ्यास करण्याचे उद्दिष्ट ठेवून त्यांनी हा प्रवास केला. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MI GALIB BOLTOY
MI GALIB BOLTOY by SHABBIR ROMANI Rating Star
Arvind deshpande

Mirza Ghalib is the Jewel in the Urdu literature. He is the pioneer in setting new trend in it. Authar Shabbir Romani excellently explained it. Everyone who is not acquainted with urdu literature should go throw it. The socio political and historicalenviorn of that time is skillfully reflected in his poetry and was narrated by author shabbir Romani. ...Read more

NADIMUKH
NADIMUKH by PERUMAL MURUGAN Rating Star
गार्गी म्हात्रे

पेरुमाल मुरुगन ह्या तामिळ लेखकाच " नदीमुख" हे अनुवादित पुस्तक वाचले. मराठी मध्ये दाक्षिणात्य भाषां मधल्या तामिळ भाषेच्या उत्तम साहित्याची वाचन संधी या पुस्तकाच्या निमित्ताने मिळाली. साठच्या दशकात जन्मलेल्या पिढीला वेगाने ,खर तर अती वेगाने बदलत जाणाऱ्ा तंत्रज्ञान व तरुण पिढीची मानसिकता यांचे सुंदर चित्रण या कादंबरी मध्ये करण्यात आले आहे. माणूस किंवा असुर पालक असला की मुलांच्या भविष्याची चिंता त्यामधून उद्भवणारा संघर्ष साध्या सोप्या पण प्रवाही भाषेमधून आपल्या समोर उभा राहातो. कुमारासुराच्या एकसुरु झापडे लावून घेतलेल्या आयुष्यात `नदीमुख` दर्शना नंतर झालेली तगमग व बदल यांचे खूप सुंदर वर्णन शेवटी आलेल आहे. डॉ. मानसी जयंत केळकर यांनी अतिशय प्रवाही भाषेत व उत्कृष्ट समर्पक शब्दात पुस्तक अनुवादित केल्यामुळे कांदबरीची मजा घेता येते. मराठी व्यतिरिक्त अन्य भाषेतील साहित्य वाचनाला उपलब्ध करुन दिल्या बद्दल मेहता पब्लिशिंग हाऊस व डॉ मानसी केळकर यांचे आभार ! ...Read more