* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: NAGKESHAR
  • Availability : Available
  • ISBN : 9789353172244
  • Edition : 2
  • Publishing Year : JANUARY 2019
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 400
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :VISHWAS PATIL COMBO SET - 10 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE FAMOUS NOVELIST SHREE. PATIL’S LATEST WRITING IS BASED ON THE SUGAR FACTORY, FAMILY CONFLICTS OVER THE OWNERSHIP OF THE SAME AND POLITICS. THE TWO BROTHERS, BAPURAO AND BABAN NANA, ARE FROM THE PRESTIGIOUS DONGARE-DESHMUKH FAMILY. THEY OWN THE GAJARA CO-OPERATIVE SUGAR FACTORY. NOW, EACH ONE WISHES TO HAVE UNLIMITED OWNERSHIP OF THE SAME WITHOUT HAVING TO DO ANYTHING WITH THE OTHER BROTHER. THIS CREATES INDIFFERENCE OF OPINIONS, ARGUMENTS WHILE GIVING RISE TO POLITICS. BAPURAO, THE LEARNED ONE IS INITIALLY A SCHOOL TEACHER. WHEREAS, BABAN NANA HAS VERSATILE INTERESTS EXCEPT EDUCATION. LUCK BEING ON HIS SIDE, BABAN BECOMES THE CHAIRMAN OF THE SUGAR MILL. IN AN ATTEMPT TO MAKE HIS ENTRY EASY, HE HELPS BAPURAO IN ANY KIND OF CRISIS OR PROBLEM. RAJKUMAR, ALIAS PRINCE IS BAPU’S SON WHEREAS BAJIRAO IS BABAN’S SON. NETRADEVI WISHES TO MARRY PRINCE. BUT, SHE HAS TO INSTEAD CHOSE BAJIRAO AS HER HUSBAND. SHALAKA IS A STRONG WOMAN WHO HAS COME BACK TO HER PARENTAL HOME AS SHE IS FED UP WITH THE BEATING AND ATROCITIES AT HER HUSBAND’D HANDS. PRINCE ACCEPTS SHALAKA AS HIS WIFE. PRINCE IS THE ONLY SON OF BAPURAO. BEING A NATURE-LOVER, HE HAS NO INTEREST IN SUGAR MILL, CO-OPERATIVE FIELD OR THE ESTATE. NETRA IS SURE THAT SHE BEING THE DAUGHTER IN LAW, THE CHAIRMANSHIP OF THE SUGAR FACTORY WILL EITHER BE HERS OR HER HUSBAND’S. SHE IS ALSO SURE THAT ALONG WITH GAJARA MILL, THE IMMENSE WEALTH WILL AUTOMATICALLY REMAIN WITH BABAN NANA’S FAMILY, AND ULTIMATELY WITH BAJIRAO. IN REALITY, WITH BAPURAO’S SHREWDNESS, THE SUGAR INDUSTRY, DISTILLERY AND THE GAJARA EDUCATIONAL TRUST COME UNDER THE DIRECT REIGN OF PRINCE AND SHALAKA. NANA AND HIS FAMILY RECEIVE A PARTICULAR AMOUNT FROM THE PROFITS INCURRED. HOWEVER, BABAN NANA, BAJIRAO AND NETRA ARE ALL DYING TO OWN THE SAME. NANA’S WIFE CHANCHALA KINDLES THE FIRE OF DESIRE CONSTANTLY. OWING TO THEIR CONSPIRACIES, PRINCE AND SHALAKA HAS TO DETHRONE THE CHAIRMANSHIP. THE NEW OWNERS BAJIRAO AND NETRA ARE HOWEVER UNAWARE OF THE MANY SKILLS THAT ARE REQUIRED TO KEEP THE SHIP FLOATING IN THE HIGH TIDES. THIS TIRES THE OFFICERS AND MEMBERS WHO IN TURN REELECT PRINCE AND SHALAKA. SHALAKA, AN INDUSTRIOUS PERSON BY NATURE, IMPRESSES THE PRIME MINISTER SO MUCH THAT HE PROVIDES HER WITH THE OPPORTUNITY OF BEING A MINISTER. SHE HUMBLY REFUSES AND INSTEAD HELPS HER HUSBAND- PRINCE- TO BECOME THE MP, MEMBER OF PARLIAMENT. LATER, DURING THE ELECTION FOR MLA BAJIRAO AND HER FIRST HUSBAND RAMESH DIWASE STAND IN HER OPPOSITION. SUPER PRINCE, THE ARROGANT BULLYING SON OF NETRA AND BAJIRAO TRIES TO PUT MANY HURDLES IN SHALAKA’S WAY. ABHISHEK, HER OWN SON FROM RAMESH ALSO JOINS IN. AFTER MANY DRAMATIC EVENTS, SHALAKA WINS WITH A VERY FEW BOTES. THUS, THIS BECOMES A RIVALRY BETWEEN TWO FAMILIES. PATIL GIVES MANY TWISTS AND TURNS TO MAKE IT ENJOYABLE, READABLE AND MOVING.
प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांची ‘नागकेशर’ ही डोंगरे-देशमुख या एकाच कुटुंबातील सहकारमहर्षी बापूराव आणि बबननाना या दोन भावांमधील सत्तासंघर्षाची कहाणी आहे. हा संघर्ष त्यांच्या पुढच्या पिढ्यांमध्येही चालू राहतो. बापूराव गजरा साखर कारखान्याचे चेअरमन होतात, तर बबननाना कारखान्यात शिरकाव करण्याच्या हेतूने बापूरावांना कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी हरप्रकारे मदत करण्याची भूमिका पत्करतात. बापूंचा मुलगा राजकुमार अर्थात प्रिन्स आणि नानांचा मुलगा बाजीराव. प्रिन्सशी विवाह करण्याची मनीषा बाळगणाऱ्या नेत्रादेवीला विचित्र दैवगतीमुळे बाजीरावच्या गळ्यात वरमाला घालावी लागते; तर नवऱ्याच्या छळाला व मारझोडीला कंटाळून आश्रयाला आलेल्या जिद्दी, करारी व देखण्या शलाकाचा प्रिन्स पत्नी म्हणून स्वीकार करतो. कारखाना, डिस्टीलरी आणि गजरा एज्युकेशनल ट्रस्टची सूत्रे प्रिन्स आणि शलाकाकडेच जातात; पण कारस्थानी सल्लागार बबननाना, रगेल पैलवान बाजीराव आणि स्वार्थांध नेत्रा व तिची सासू चंचलानानी यांच्या कट-कारस्थानांमुळे प्रिन्स आणि शलाकाला सत्तेवरून पायउतार होणं भाग पडतं. प्रिन्स आणि शलाका ती सत्ता परत मिळवतात का, प्रिन्स आणि शलाकाचा राजकारणात प्रवेश, तिथेही शलाकाचा आधीचा नवरा रमेश दिवसे आणि बाजीराव - नेत्राचा चढेल मुलगा सुपरप्रिन्स यांनी शलाका आणि प्रिन्सच्या विरोधात उभे ठाकणे, रमेश - शलाकाचा मुलगा अभिषेकने निवडणुकीत उतरणे, अशा अनेक नाट्यपूर्ण घडामोडींमुळे वाचकाची उत्सुकता शेवटपर्यंत ताणणारी ही कादंबरी अवश्य वाचावी अशी आहे.
डाॅ.इंदिरा गोस्वामी राष्ट्रीय साहित्य पुरस्कार २०१९ , कवी अनंत फंदी साहित्य पुरस्कार, संगमनेर २०१९ , शंकर पाटील सृजन साहित्य पुरस्कार, कोल्हापूर २०१९ ,

No Records Found
No Records Found
Keywords
#28TH NOV #SAMBHAJI(1.SAHAKAR MAHARSHI SHANKARRAO MOHITE PATIL PURSKAR 2005 2.KAVI MADHAV PURSKAR 2006 3.AKSHARGANDH PURSKAR 2006 ) #NOT GONE WITH THE WIND #BANDA RUPAYA #KRANTISURYA #NAGKESHAR #संभाजी(१.सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील २.कवी माधव पुरस्कार २००६ ३.अक्षरगंध पुरस्कार २००६) #नॉट गॉन विथ द विंड #बंदा रुपया #क्रांतिसूर्य #नागकेशर
Customer Reviews
  • Rating StarJayashree Deshmukh

    आज मी प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांच्या" नागकेशर " या कादंबरीचा परिचय करून देणार आहे. २०१९ मध्ये या कादंबरीची प्रथम आवृत्ती प्रसिद्ध झाली आहे.मूल्य ४५० रुपये.या आधी मी त्यांची " झाडा झडती" आणि "पांगिरा" ही दोन पुस्तके वाचलेली आहेत . धरणानंतर निर्माण झालेले प्रश्न आणि कारखानदारी मुळे निर्माण झालेले सामाजिक ,राजकीय स्थित्यंतर असा या दोन कादंबऱ्या च मुख्य विषय आहे. आज आपण" नागकेशर "या कादंबरी विषयी बोलूयात. तर आधी नागकेशर म्हणजे काय? नागकेशर ही एक प्रकार ची वेल वर्गीय वनस्पती असून ती जर उसाच्या फडात शिरली तर अख्खा उसाचा फड नष्ट करून टाकते. कादंबरीचे शीर्षक स्तुत्य आहे.कारण संपूर्ण कादंबरी ही उसाचा कारखाना, त्याअनुषंगाने येणारे राजकारण ,कौटुंबिक कलह ,खून अमाप पैसा,ढासळलेली नीतिमत्ता....आणि अखेर उध्वस्त....झालेली अनेक आयुष्य. ...या भोवती फिरते. लेखक हे एक प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांना सर्व राजकीय तसेच सामाजिक ,कौटुंबिक प्रश्नांची सर्वांगीण जाणीव आहे.त्यामुळेच कादंबरीत ती आपल्याला प्रत्ययास येते. कथेविषयी थोडक्यात.... डोंगरे देशमुख हे "गजरा " कारखान्याचे संस्थापक ,चेअरमनअसतात.त्यांना एक मुलगा असतो. प्रिन्स त्याचे नाव. त्याची पत्नी शलाका..एखाद्या चित्रपटात शोभावे असे वर्णन आहे ..... तर या बापूराव देशमुख यांना एक भाऊ असतो..नाना.त्यांचा मुलगा बाजीराव, सून नेत्रा देवी ,,नातू सुपर प्रिन्स... कारखान्यावर वर्चस्व राहावे.जिल्हा ,तालुका पातळीवरील राजकारण,घरातील भाव भावकीचे मतभेद.टोकाचा संघर्ष.संपत्तीचा हव्यास...या सर्व गोष्टींचा.शेवटी कडेलोट होतो.तीव्र इर्षा विनाशाकडे घेऊन जाते..आणि बाजीराव चा फारसा सहभाग इच्छा नसताना इतरांच्या महत्वाकांक्षी स्वभावामुळे मृत्यू होतो. एक कुटुंब उध्वस्त होते.. ही थोडक्यात कथा.आता कथेची जमेची बाजू ही आहे.की कथा अतिशय वेगवान आहे. कुठंही कंटाळवाणी होत नाही.एखादा चित्रपट पाहतो असे वाटते.(मसाला) ३९६ पानाची ही कादंबरी वाचकास नक्कीच खिळवून ठेवते.वाक्य रचना रंजक आहे. तीव्र इर्षा .सत्तासंघर्ष,. संवादातून आणि पात्रांच्या भूमिकेने खूप परिणामकारक रीतीने व्यक्त होते. कादंबरी शेवटपर्यंत कुतूहल टिकवण्यात यशस्वी होते. अनेक धक्कादायक वळण कादंबरीत येत राहतात.चित्रपट पाहत आहोत असे मात्र वाटत राहते. ही एक मनोरंजक, वेगवान घडामोडींनी युक्त ,गावपातळीवरील राजकारणाचा सत्तासंघर्ष दाखवणारी कथा आहे.एक वेगळा बाज आहे. एक वेगळा अनुभव, वाचनाचा प्रयोग म्हणून नक्की वाचून बघावी .. ...Read more

  • Rating Starडॉ. सदानंद देशमुख

    आपली ‘नागकेशर’ ही कादंबरी नुकतीच वाचली. आपल्या इतर कादंबऱ्याप्रमाणेच ती आवडली. यापूर्वी आपल्या पानिपत, पांगिरा, झाडाझडती, चंद्रमुखी, संभाजी, महानायक या कादंबऱ्या मी वाचल्या आहेत. झाडाझडती आणि पांगिरा या आपल्या कादंबरीत सामान्य जनमाणसांचे प्रभावी चित्ण आले आहे. विशेषत: पांगिरा आणि झाडाझडतीमधील शेतकऱ्यांचा संघर्ष खूपच प्रत्ययकारी रीतीने आला आहे. ‘नागकेशर’मधून आपण दोन पिढ्यातील राजकीय संघर्षाचे प्रभावी चित्रण केले आहे. दोन कुटुंबातील राजकीय संघर्ष असेही त्याला म्हणता येईल. महाभारतात जसा कौरव आणि पांडव यांचा संघर्ष आला आहे. त्याचप्रमाणे हा दोन चुलतभाऊ आणि त्यांच्या बायकांमधील संघर्ष आलेला दिसून येतो. बापुराव डोंगरे देशमुख आणि बबननाना हे दोन भाऊ... आधी शिक्षक असणारे बापुराव डोंगरे. आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर राजकारणात जम बसवतात, सहकार क्षेत्र आणि साखर कारखानदारीच्या माध्यमातून ते खूप श्रीमंत होतात. ते आपल्या मुलाला बाजीरावला त्यांचा राजकीय वारस म्हणून निवडतील, असं बबननानाला वाटत असते. कादंबरी पुढे नेत असताना या दोन कुटुंबातील संघर्षाचे आणि त्यातून उद्भवलेल्या कट-कारस्थानाचे खूप प्रभावी चित्रण केले आहे. नाट्यमय घटनांचा क्रम सीमित करणारा आहे. बापुरावांचा मुलगा प्रिन्स याच्या लग्नाचे वातावरण खूप सुरेख आहे. त्यांचा सरंजामी थाट पानापानावर प्रभावी शब्दात वर्णन केलं आहे. प्रिन्ससाठी बापुरावांनी बडोदा येथील श्रीमंताची लेक पसंत केलेली असते. मात्र लग्नघडी जवळ येत असताना प्रिन्स मात्र रमेश दिवसेची बायको शलाका हिच्या प्रेमात पडतो. तिच्या व्यक्तिमत्त्वावर आणि रूप सौंदर्यावर भाळतो. खरं म्हणजे शलाकाला रमेश दिवसेपासून एक मुलगा झालेला आहे. मात्र नवऱ्याची मारझोड आणि छळवाद याला कंटाळून ती न्याय मागण्यासाठी प्रिन्सकडे जात असते. इथे मात्र तिच्या नशिबात वेगळेच ताट मांडून ठेवलेले असते. प्रिन्स आपल्या नियोजित वधुला टाळून शलाकाशी लग्न करायचा हट्ट धरतो आणि तडीस नेतो. त्यामुळे बापुराव हबकून जातात आणि मुलाच्या हट्टापुढे हार पत्करतात. हा नव्या आणि जुन्या पिढीतील वैचारिक संघर्ष या कादंबरीत आपण फारच ठळकपणे अधोरेखित केला आहे. तो बापुरावसाठी जसा धक्कादायक आहे. तसाच तो वाचकांनाही धक्का देतो. बाप-मुलातील भावा-भावातील असे संघर्ष आपल्याला सर्वांना दिसून येतात. या निमित्ताने मराठा समाजाची मानसिकता, त्यांचे सत्ता संघर्ष आणि स्वभावदर्शन अणि भावबंदकी हा सगळाच भाग ग्रेट वाटतो. विशेषत: भाऊ भावाचा वैरी’ या उक्तीप्रमाणे बबननाना बापुरावला जयश्री प्रकरणात प्रवृत्त करतात आणि बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. तो वैरभावाचा कहर वाटतो. या एकाच प्रसंगातून दोन गोष्टी लेखक म्हणून आपण साध्य केल्या आहेत. एक म्हणजे बापुरावाच्या मनावर खोलवर परिणाम होतो आणि जन्मभर ते अपराधभावाने त्रस्त होतात. तर बबननाना मात्र सूडभावना, सूडकथा साध्य झाली म्हणून आसुरी आनंद घेतो. बापुरावाच्या आयुष्यातील जसे जयश्री प्रकरण आहे तसेच त्याचा पोरगा प्रिन्स याच्या आयुष्यातील शलाका प्रकरण आहे. दुसऱ्याची बायको आणि एक मुलगा असलेल्या बाईशी त्याने लग्न करणे ही बाब त्याच्यासाठी सामाजिकदृष्ट्या जन्मभरासाठी कमीपणा आणणारी आहे व तिचा लाभ बरोबर घेण्याचा प्रयत्न बबननाना त्यांची बायको चंचलादेवी, मुलगा बाजीराव आणि सून नेत्रादेवी मोठ्या शिताफीने आणि कटकारस्थाने रचून घेत राहतात. या युद्धावर आधारित कादंबरीचा व्यापक पट पुढे पुढे उलगडत जातो. तो भाग खूप छानपणे आणि प्रत्ययकारी रीतीने आपण मांडला आहे. या निमित्ताने महाराष्ट्रातील राजकारणातील व्यक्तीचे, निवडणुकातील लटपटी-खटपटीचे प्रसार व प्रचार तंत्राचे वास्तववादी चित्रण करण्याची संधी आपल्याला घेता आली. बापुरावाची पत्नी सुजाता देवी आणि मुलगी संध्या यांचे व्यक्तिचित्रण खास झाले आहे. संध्या आपल्या बापाच्या कृतीने तर सुजातादेवी नवऱ्याच्या कृतीने घायाळ झालेल्या अबला स्त्रिया आहे. त्यातही आपल्या पतीची आणि मुलांची, संसाराची काळजी घेणारी घरंदाज मराठा स्त्री म्हणून सुजाता देवीची व्यक्तिरेखा कायमची लक्षात राहते. प्रिन्स आणि त्याची पत्नी शलाका आपल्या जीवनात दोन पातळीवर संघर्षाला तोंड देताना समर्थपणे उभे राहतात. एकीकडे बबननाना, चंचलादेवी, बाजीराव आणि त्याची महत्त्वाकांक्षी पत्नी नेत्रादेवी यांच्याशी त्यांचा राजकीय वर्चस्वाचा आणि कारखानदारीतून झालेला सत्तासंघर्ष आहे. तो त्यांच्याशी त्या-त्या पातळीवर लढा देऊन ते यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करतात. तर दुसऱ्या बाजूला शलाकाचा पहिला पती रमेश दिवसे आणि तिचा पहिल्या नवऱ्यापासून झालेला मुलगा अभिषेक यांच्याशीही त्यांचा संघर्ष हा होत राहतो. मात्र या प्रकरणात दोघेही पती-पत्नी एकमेकांना समजून घेऊन सहानुभूतिपूर्वक आणि आस्थेने त्यांच्याशी वर्तन करून ममताळू वृत्तीने या संघर्षात यशस्वी होतात. विशेषत: प्रिन्सने आपल्या पत्नीच्या प्रेमासाठी तिचा पहिल्या नवऱ्यापासून झालेल्या मुलाला स्वीकारणे हे खूपच थोर वाटते. ही बाब असंभवनीय म्हणून अपवादात्मक वाटते. एकीकडे प्रिन्स आणि शलाका अभिषेकवर प्रेम करत असतात. तो मात्र त्यांचा तिरस्कारच करतो. रमेश दिवसे बाजीरावाच्या कंपूत सामील होऊन निवडणुकीत उभा राहतो. ते मात्र त्याचा प्यादा म्हणून बळीचा बकरा म्हणून उपयोग करत असतात. अभिषेकलाही आपल्या आईची आणि तिच्या पतीची माया कळत नाही तो विशिष्ट हेतूने त्यांच्याशी वागत राहतो. आपल्या बापाशी झालेल्या संवादातून त्याची वृत्ती-प्रवृत्ती ठळकपणे झळकते. तो म्हणतो, ‘तुमच्यासारखा उगीच भेजाला त्रास देत मी खोल पाण्यात उडी घेत नाही. कोणी कोणाला फसवलं, कोणाला जीव लावला, कोणाला कोणी वाचवलं किंवा नाचवलं. या साऱ्या गोष्टी उडत. मला मात्र आपल्या सुपरप्रिन्स दादा भारी लकी वाटतो. किती भाग्यवान ज्याला बाजीरावसारखा बाप आणि नेत्रादेवीसारखी आई मिळाली. तेच बघा माझं लाइफ किती बेकार. माझ्या नशिबाला तुमच्यासारखा खत्रूड बाप मिळाला. उगाच मी तुमच्या पोटी जन्माला आलो. त्या ऐवजी मी बाजीराव शकुंतला आणि नेत्रादेवीच्या पोटी जन्माला आलो असतो, तर किती मजा आली असती.’ अभिषेकच्या बोलण्यातून आजच्या तरुण पिढीचीच भावना प्रतिनिधिक स्वरूपात व्यक्त होताना दिसते व ती वास्तव वाटते. कारण आजच्या पिढीच्या संदर्भात मायकलच्या वाटेला आलेलं ते कटू सत्य वाटते. बाजीराव आणि नेत्रादेवीचा पोरगा सुपरप्रिन्ससुद्धा त्याच वाटेचा प्रवासी आहे. कादंबरीतील लहान-मोठी असंख्य पात्रे, त्यांची स्वभावचित्रे खास झाली आहेत. आपापल्या ताणतणावात जगणाऱ्या बायका-माणसांची त्या-त्या प्रसंगातील. भावावस्था प्रत्ययकारी रीतीने व्यक्त झाली आहे. रमेशची हत्या आणि बाजीरावची आत्महत्या हा कादंबरीतील महत्त्वाचा भाग वाटतो. आपली निवेदन शैली, संवाद, भाषेचा डौल, शिव्या, म्हणी वाक्प्रचार आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गतिमान असे कथासूत्र आणि प्रवाही निवेदन शैली. यामुळे ही कादंबरी एक प्रदीर्घ असा चित्रपट पाहण्याची अनुभूती देते. कादंबरीचा प्रिन्स, शलाका, आणि अभिषेक यांच्यावर बेतलेला शेवटही समर्पक वाटते. संपूर्ण कादंबरीला असलेली सूडकथेची, कटकारस्थानाची अशी तीव्र धार त्यामुळे मधुर वाटते. कादंबरीभर असलेला विशिष्ट प्रकारचा ताण आणि तीव्र बोचरेपणा यात सुखद झुळूक अनुभवायला यावी असा हा शेवट प्रभावी वाटतो. आला आला रूखवत, त्यात होते लसूण अन रामरावाची बाईल चालली शामरावाच्या मोटारीत बसून अशा उखाणेवजा ओळी कथाशयाच्या अंगाने समर्पक वाटतात आणि लक्षात राहतात. एक दीर्घ चित्रपट कथा वाचल्याचा अनुभव आपली ‘नागकेशर’ देते आणि कायमची लक्षात राहते. ...Read more

  • Rating StarRahul Patwardhan

    विश्वास पाटील याचे लेखणीतून उतरलेली सत्तासंघर्ष कुटुंबातही कसे थैमान घालतो या ज्वलंत व जळजळीत विषयावरील कादंबरी. काल्पनिक पात्रे सत्ताधीश,जेते,योद्धे आदींच्या लढाया, डावपेच, मोहिमा करत नाहीत.ती सत्ता, प्रतिष्ठा, पैसा, प्रभाव कसही करून काबी करण्याच्या जीवघेण्या स्पर्धेतील प्यादी आहेत. भले वजीर,हत्ती,घोडे,उंट नसतीलही; पण तोच झगडा करतात.तसेच वागतात.तसाच खुनशीपणा करतात.तशीच लालसा बाळगतात.तसेच छुपे डावपेच आखतात. तशीच उघड ईर्षा करत मत्सराचे फुत्कार सोडत एकत्र रहातात.तशीच बेपर्वाई दाखवत जीवन जगतात.आणि तितक्याच कोडगेपणे परिणामांना सामोरे जातात. मानवी जीवनातील खेळते प्रवाह व सुप्त अंतःप्रेरणा शेवटी एकच आहेत हे सूत्र मनावर बिंबवतात. काम,क्रोध,मद,मोह इत्यादि षड्रिपू यांनी प्रत्येकाचा भावनिक पिंड बनलेला आहे. कोणी बाह्यजगाने बहाल केलेली पद व सत्ता ही कवचकुंडलांचे आड या तमोगुणांना झाकतो. कोणी यांची ढाल वापरून आपली लालसा व कामना पूर्ण करतो.कुणी या कवचांनी लादलेली जबाबदारी गुंडाळतो व लोक,नोकरवर्ग, कामगार,शेतकरी,मतदार यांना दारीही उभा करत नाही. आणि आपली स्वप्ने व हाव यांचे दावणीला बांधतो. माणस शहरी असोत वा खेडूत , सभ्यता व संस्कृती यांचा किमान सामाजिक बुरखा संपत्ती व ऐयाशी हा भुलभुलैया प्राप्त करणेकरता कसा टरटरा फाडतात याचे बिनधास्त वर्णन "नागकेशर"मध्ये आहे ...Read more

  • Rating StarPratik Yetavadekar

    नागकेशर विश्वास पाटील नागकेशराचा वेल हुमनी किड्यापेक्षा जालीम ! रानात उगवला तर बोल-बोल म्हणता अख्खा फड खाऊन फस्त करतो. एक प्राथमिक शिक्षक असणारा माणूस सहकार क्षेत्राच्या जोरावर कसा मोठा होतो.साखर कारखाना,मेडिकल कॉलेज या माध्यमातून स्वतःचे एक ाम्राज्य उभे करतो.स्वतःचा एक दबदबा गल्ली पासून दिल्लीपर्यंत निर्माण करतो. हे त्या माणसापुरते त्याने केलं म्हणून कौतुकास्पद च मात्र त्याच्या जीवावर मोठेपण रुबाब मिरवणाऱ्या पुढच्या पिढीतील दोन कुटुंबातला संघर्ष.कधी छुपा तर कधी उघड उघड, शह-काटशह चे राजकारण,या धगधगत्या निखाऱ्यावर आप्तस्वकीय,दुय्यम नेतेमंडळी यांनी भाजून घेतलेली स्वार्थाची पोळी. बापूराव डोंगरे-देशमुख आणि बबननाना डोंगरे-देशमुख या सख्ख्या भावांच्या पुढच्या पिढीतील वारसदार प्रिन्स आणि शलाका देशमुख व बाजीराव आणि नेत्रा देशमुख यांच्यातील साखर कारखाना त्यातील संचालक पद, चेअरमन पद, मेडिकल कॉलेज मधील केपीटेशन फी,डोनेशन यांच्या भागीदारीचा वाद आणि त्यातून रंगत गेलेले हेवेदावे आणि त्यातून मांडला गेलेला एक राजकीय अस्तित्वासाठीचा पट कधी फासे या गटाचे तर कधी त्या गटाचे पानोपानी उत्कंठा वाढवत नेणारी पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील राजकीय हेवेदाव्यांचे चित्रण असणारी कादंबरी. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more

I HAVE A DREAM
I HAVE A DREAM by RASHMI BANSAL Rating Star
Krishna Diwate

‘स्टे हंग्री स्टे फूलीश’ आणि ‘कनेक्ट द डॉटस’ या बेस्ट सेलर पुस्तकाच्या लेखिका ‘समाजातल्या परंपरागत समस्या सोडवण्याचा नवा मार्ग शोधून काढणार्‍या वीस सामाजिक उद्योजकांच्या प्रेरणादायी कहाण्या’ हे वाक्य पुस्तकाचे पहिले पान उघडले आणि दिसले. त्यामुळे माझ कुतुहल चाळवले आणि ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. मनोगतात लेखिका म्हणतात की, आता नव्या दमाचे, डोक्याने आणि मनाने ही विचार करणारे काही जण एखाद्याच्या नजरेतील दुःख ओळखतात, पेटून उठतात; पण ते त्याच्यावर विचार एखाद्या उद्योजकाप्रमाणे करतात. म्हणून ते ‘सामाजिक उद्योजक.’ नफा मिळविण्याचा हव्यास नसला तरी ते बिझनेस मधील तत्वे वापरून ती गोष्ट साध्य करतात. हे काही तरी वेगळे आपण वाचत आहोत असे मला वाटले. त्यामुळेच ते पुस्तक वाचायला घेतले. ह्या मध्ये वीस लोकांची चरीत्रे आहेत. ते सर्व भारतीय, उच्चशिक्षित तरूण तरूणी आहेत. कोणी त्यातील शास्त्रज्ञ आहेत तर कोणी मरिन बायोलॉजिस्ट, आयआयटी, आयआयएम ग्रॅज्युएट आहेत पण कोणत्या कोणत्या सामाजिक प्रश्नाने ते अस्वस्थ झाले आणि नेहमीच्या मार्गाने न जाता वेगळीच वाट पकडली. पुस्तकात ‘रेनमेकर्स,’ ‘चेंजमेकर्स’ व ‘स्पिरिच्युअल कॅपिटॅलिस्ट’ असे तीन भाग आहेत. प्रत्येकात अनुक्रमे अकरा,सहा व तीन व्यक्तीमत्वांची ओळख करून दिली आहे. ‘सुलभ’ ही आधुनिक टॉयलेटस उभारणारे बिंदेश्वर पाठक ह्याच्या चरित्राने पुस्तकाची सुरुवात होते. जातीने बिहारमधील ब्राह्मण. पण लहानपणी टॉयलेटस साफ करणार्‍याला हात लावला त्यामुळे आजीने अक्षरशः शेण, गोमुत्र खायला लावले. पण त्याच बिंद्रेश्वरांनी अगदी योगायोगाने ह्याच क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. अर्थात ही वाट निश्चितच सोपी नव्हती. अनेक हालअपेष्टा सोसत, जगाचे धक्के खात, अनेक समस्यांना तोंड देत आपले स्वप्न ‘सुलभ शौचालयाच्या’ माध्यमातून सुरु केले. तो सगळा खडतर प्रवास अर्थात पुस्तकातूनच वाचायला हवा. त्यासाठी त्यांनी केवळ ती यंत्रणा तयार केली नाही तर ती टॉयलेटस बांधून, त्यासाठी लागणारी प्रेरणा, शिक्षण, संभाषण, ट्रेनिंग, पाठपुरावा अशा सर्वच गोष्टी ‘सुलभ’ तर्फेच संभाळल्या जातात. सध्या ही संस्था स्वबळावर चालते. 100 ते 125 कोटी इतके तिचे वर्षाचे उपन्न आहे. इतकेच नाही पूर्वी जे लोक सफाईचे काम करत असत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च संस्था करत आहे. ‘सुलभ पब्लिक स्कूल’ नावाने शाळा सुरु केली आहे. तरूणांसाठी व्होकेशनल क्लासेस चालवले जातात. म्हणजे मिळालेला नफा पुन्हा त्याच सफाई कामगारांच्या कल्याणासाठी वापरला जातो. टॉयलेटस बांधून भरपूर पैसा मिळवता येतो हे वाक्य पचायला जरा जडच जाते. अनिता आहुजा ही दिल्लीत सुखवस्तू कुटूंबात रहाणारी सामान्य स्त्री. पण कचरा वेचणार्‍या मुलांचे हाल पाहून त्यांच्यासाठी काही तरी करावे असे तिने ठरविले. तिने 1998 मध्ये कॉन्झर्व्ह नावाची संस्था उभी केली. व त्यातून पहिला प्रोजेक्ट सुरु केला तो म्हणजे आजुबाजूच्या परिसरातील कचरा उचलून त्याचे कंपोस्टखत तयार करणे. कचरा गोळा करण्यासाठी चांगल्या ढकलगाड्या आणल्या, युनिफॉर्म, आय कार्डची सोय केली. 2002 पर्यंत एक पूर्ण वेळ काम करणारी मोठी संस्था बनली. त्याचवेळी त्यांनी प्लॅस्टीकच्या कचर्‍यावर प्रयोग सुरु केले. तिचे पती शलभ ह्यांनी बिटस पिलानी मधून इंजिनिअरींग केले आहे. त्यांच्या मदतीने तिने फॅक्टरी सुरु करण्याचे ठरविले. शलभने मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक शीटस निर्मिती करू शकेल असे मशीन तयार केले. त्यासाठी अर्थातच अनेक प्रश्न समोर उभॆ राहिले. चुका झाल्या, ठोकरा खाल्या पण त्यातून वाट काढत त्यांनी चिकाटीने प्रयत्न सुरुच ठेवले. आज दोघे मिळून कचर्‍यातील प्लॅस्टिक पिशव्या वापरून आकर्षक अशा हॅडबॅगस तयार करण्याचा कारखाना चालवतात. जे लोक सुरुवातीला केवळ कचरा उचलण्याचे काम करत होते, त्यांच्या काही कौशल्य दिसले की त्यांना वेगळे काढून ट्रेनिंग दिले जाते. मशीनवर असिस्टंटचे काम करू लागतात त्यातून काही लोक तर ग्रुप लिडर ही झाले आहेत. कटींग करणॆ, क्वालिटी तपासणॆ, फिनिंशींग, पॅकिंग अशी सर्व महत्वाची कामे ते करतात. आता ते कामगार झाल्यामुळॆ त्यांना चांगला पगार, प्रॉव्हिडंट फंड, ओव्हरटाईम अशा सुविधा मिळू लागल्या त्यापेक्षा ही जास्त त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळाली. त्यांच्या साठी हे नवीनच आहे. अनिता व शलभ दोघॆही मेहनत घेतात पण एनजीओ असून ही भरपूर पैसा कमावणे त्यांना चुकीचे वाटत नाही. कारण आज ह्या एका उद्योगामुळे कित्येक कुटूंबाची आर्थिक स्थिती बदलून गेली आहे. अशीच अजून एक प्रेरणादायी कथा दिल्लीतील रंगसूत्र कंपनी चालविणार्‍या सुमिता घोस ह्यांची. स्वतः ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर मास्टर इन इकॉनॉमिक्स ची पदवी घेतल्यावर संजॉय घोस ह्या या आय आर एम मधून शिक्षण घेतलेल्या ध्येयवादी तरूणाशी लग्न केले. पण दुर्दैवाने आसाममध्ये काम करत असताना त्यांची 1998 मध्ये उल्फाच्या अतिरेक्यांनी हत्या केली. त्यानंतर अनेक टक्केटोणपे खात, दोन लहान मुलांचा संभाळ करत सुमिताने ‘रंगसूत्र’ नावाची कंपनी काढली. त्याच्या मार्फत ती खॆडॆगावातल्या लोकांकडून कापड, शोभॆच्या वस्तू, बनवून घेते आणि त्या फॅब ईंडीयासारख्या प्रसिध्द कंपन्यांना विकते. जैसलमेर, बारमेर जिल्ह्यातले कारागिर तिच्यासोबत काम करत आहेत. अजून एक अशीच ध्येयवादी तरूणी म्हणजे इशिता खन्ना. डेहराडून मध्ये जन्म झालेली एक सर्वसामान्य मुलगी. पण निसर्गसंवर्धन आणि भूगोल या विषयांची आवड असलेली. म्हणूनच तिने आपल्या ग्रॅज्युएशन नंतर टाटा इंन्स्टीट्यूट मधून मास्टर्स केले. पर्यावरण क्षेत्रातच काम करायचे आहे हे निश्चित ठरवून तिने काही वर्षे नोकरी केली. त्यानंतर 2002 मध्ये नोकरी सोडून आपल्या दोन मित्रांसोबत स्पिती व्हॅलीमध्ये मूस नावाची एन्जीओ सुरु केली. तेथील स्थानिक महिलांचे ग्रुपस करून त्यांना तिथे असणार्‍या सीबक थॉर्न ह्या फळांच्या लागवडीचे ट्रेनिंग दिले. त्यावर प्रक्रिया करायला शिकवले. ही झाडॆ मातीला धरून ठेवतात त्यामुळे धूप रोखली जाते, शिवाय नायट्रोजन ही धरून ठेवत असल्याने जमिनीचा पोत सुधारतो. त्यामुळे ह्या फळांवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे तिथल्या बायकांना चांगला रोजगार मिळू लागला. त्याचबरोबर तिने स्थानिक तरूणांना पर्यटकांना ट्रेक किंवा जीप सफारीसाठी नेणे, कॅम्प लावणे, गरज पडल्यास प्रथमोपचार करणे ही कामे ही करायला शिकवले. कारण हळूहळू तिथे पर्यटन वाढू लागले. ते इको-फ्रेंडली करण्याकडॆ तिच्या इकोस्पियर संस्थेचा भर आहे. आता दरवर्षी पर्यटनातून 35 ते 40 लाखाचे उत्पन्न मिळते.आणि त्यातून नफा ही मिळतो. इकोस्पियर संस्थेने शेजारच्य़ा ‘लाहुल’ व्हॅलीमध्ये ही विकास कामे सुरु केली आहेत. पर्वतावर तयार होणार्‍या कचर्‍याच्या समस्येवरही तिला काहीतरी करायचे आहे. तिची संस्था लोकांना मुद्दाम तिथले लोक किती अवघड परिस्थितीत रहातात हे दाखवते. अतिशय थंडीत तिथे तापमान मायनस 35 पर्यंत खाली गेल्यावर हॅंडपंपने पाणी काढणे सुध्दा किती कठीण होते हे सांगितले जाते. तेव्हा आपल्यासारख्य़ा पर्यटकांना काय काय करता येईल याबद्दल ती जागरूकता निर्माण करते. मूळात हे पुस्तक 2012 साली लिहिलेले आहे. त्यामुळे आता ह्या वेगवेगळ्या प्रकारचे काम करणार्‍या संस्थेचे काम या दहा वर्षात खूपच वाढले असेल यात काही शंका नाही. दीनबंधू साहू हे मरिन बायोलॉजिस्ट आहेत पण ते प्रयोगशाळेतून बाहेर पडून समाजासाठी काम करतात. ‘प्रोजेक्ट चिलका’ ह्या त्यांच्या संस्थेमार्फत ओरिसातील लोकांना समुद्राची शेती करायला शिकवतात. ओरिसा मधील पुरी येथे जन्म झालेल्या दीनबंधूनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतल्यानंतर दिल्लीत एमएसीला ॲडमिशन घेतली. परंतु योगायोगाने १९८७ मध्ये अंटार्क्टिक वर जाण्याची संधी मिळाली. नंतर पीएचडी पूर्ण केल्यानंतर अनेक देशांमध्ये नोकरी निमित्ताने फिरले. पण तरीही शेवटी दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर म्हणून काम सुरू केले. त्यांना समुद्री वनस्पती बद्दल विशेष आस्था होती; पण त्या बद्दल आपल्या देशात फारशी जागरूकता नव्हती. ही लागवड पर्यावरण पूरक असते शिवाय त्यातून स्थानिक लोकांना उत्पन्नाचे साधन मिळते. त्यासाठी डिएसटीने निधी मंजूर केला. मग त्यांनी चिल्का सरोवराची पहाणी केली, त्यामध्ये वाढू शकतील अशा चार जातींची निवड करून स्थानिक लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत माहिती दिली. प्रात्यक्षिके दाखवली, वर्कशॉप्स घेतली. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना रोजगार मिळू लागला. यातूनच पर्यावरण संरक्षण ही होऊ लागले. यातून त्यांना प्रत्यक्ष कांहीं आर्थिक फायदा होत नसला तरी ते म्हणतात, की आम्हाला दोघांना दिल्लीत चांगली नोकरी आहे. त्यामुळे पैसे कमावणे हा उद्देश नाही; पण अजून तीस वर्षांनंतर मला मी काही तरी काम केलेले दिसेल. असे जर काहीच तुम्हाला दिसणार नसेल तर जगायचे कशाला? भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का? हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार? ह्याच वाक्याने मी आपली ह्या आठवड्यात रजा घेते. उद्या पासून सुरु होणार्‍या नवीन सत्रासाठी सारिका ताईंना हार्दिक शुभेच्छा. ...Read more