* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE NEGOTIATOR
  • Availability : Available
  • Translators : LEENA SOHONI
  • ISBN : 9788171612079
  • Edition : 2
  • Publishing Year : MARCH 1994
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 420
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE KIDNAPPING OF A YOUNG MAN ON A COUNTRY ROAD IN OXFORDSHIRE IS BUT THE FIRST BRUTAL STEP IN A RUTHLESS PLAN TO FORCE THE PRESIDENT OF THE UNITED STATES OUT OF OFFICE. IF IT SUCCEEDS, HE WILL BE PSYCHOLOGICALLY AND EMOTIONALLY DESTROYED. ONLY ONE MAN CAN STOP IT - QUINN, THE WORLD`S FOREMOST NEGOTIATOR, WHO MUST BARGAIN FOR THE LIFE OF AN INNOCENT MAN, UNAWARE THAT RANSOM WAS NEVER THE KIDNAPPER`S REAL OBJECTIVE . . . THE NEGOTIATOR UNFOLDS WITH THE SPELLBINDING EXCITEMENT, UNCEASING SURPRISE AND RIVETING DETAIL THAT ARE THE HALLMARKS OF FREDERICK FORSYTH, THE MASTER STORYTELLER.
ऑक्सफोर्डशायरमधल्या एका गावरस्त्यावरून एका युवकाचे अपहरण हा अमेरिकेच्या अध्यक्षाला त्याच्या पदावरून हुसकावून लावण्याच्या, आत्यंतिक व्रूर अशा कारस्थान-नाट्यातील पहिला प्राणांतिक अंक होता. तो यशस्वीरित्या पार पाडला गेला, तर हा अध्यक्ष या अनपेक्षित धक्क्याने मानसिक आणि भावनिकदृष्ट्या खचून अकार्यक्षम होईल, हा एकमेव हेतू या अपहरणामागे होता. हा दुर्दैवी प्रकार जगातील फक्त एकच व्यक्तीR थोपवून धरू शकत होती– क्वन! अपहरणाच्या अशा प्रकारांमध्ये सातत्याने यशस्वी ठरलेला जगद्विख्यात मध्यस्थ. अपहरणकत्र्यांच्या मूळ हेतूविषयी अल्पांशानेही कल्पना नसताना या निष्पाप युवकाचे प्राण वाचवण्यासाठी स्वत:च्या आयुष्याची बाजी लावणारा मध्यस्थ.या अपहरणनाट्याचा उलगडा होत असताना श्वास रोखून ठेवणाNया औत्सुक्याने वाचक कधी कमालीचा उत्तेजित होतो, कधी आश्चर्याने चकित होतो, तर कधी अंगावर कोसळणाNया तपशिलांमुळे गोठल्यासारखा होतो. प्रेÂडरिक फॉर्सिथ या जागतिक कीर्तीच्या लेखकाने विलक्षण कौशल्याने विणलेली ही चित्तचक्षुचमत्कारिक कहाणी वाचताना थरारक अनुभवांमुळे तुम्ही पानापानांवर स्तंभित होणार आहात.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #MADHYASTHA #THENEGOTIATOR #मध्यस्थ #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #LEENASOHONI #लीनासोहोनी #FREDERICKFORSYTH #फ्रेडरिकफॉर्सस्थ "
Customer Reviews
  • Rating StarRajendra Thite

    गुप्तहेर कथा , रहस्य कथा , साहस कथा . भले मग त्या सत्यकथा असोत अथवा काल्पनिक . साहित्यात त्यांचेही स्थान महत्वाचे असतेच .आजूबाजूचे सर्व वातावरण विसरायला लावून वाचकाची मती क्षणभर गुंग करण्याची शक्ती या प्रकारात असते . चला अशाच एका साहसी मोहमेवर निघूया . पुस्तक प्रेमी च्या सदस्यांना या मूळ पुस्तकाचे कर्ते फ्रेडरिक फोर्सिथ नवीन नाहीत . त्यांच्या the fox या मूळ कादंबरीचा मा . सुधांशु नाईक यांनी आपल्या गृपला परिचय करून दिलाच आहे . त्यांचेच हे आणखी एक पुस्तक . इंग्रजी साहित्यिक फ्रेडरिक फोर्सिथ यांनी बी बी सी मध्ये पोलिटिकल कॉरस्पॉन्डन्ट म्हणूनही काम केले आहे . प्रस्तुत काल्पनिक कादंबरीत त्यांनी आपल्या तिथल्या कामकाज व अनुभवाचा चपखलपणे वापर केला असावा . काही राजकीय नेतृत्वाची नावे त्यांनी कादंबरीत पदासकट वापरली आहेत . 1971 मध्ये दी डे ऑफ दि जॅकल्स हि त्यांची आणखी एक कादंबरी गाजली होती . या कादंबरीवर याच नावाचा पुढे चित्रपट निघाला . आज आपण परिचय करून घेत असलेल्या कादंबरीवर सुद्धा दी निगोशिएटर हा चित्रपट येऊन गेलाय . विलक्षण गतिमान कथानक हे त्यांचे वैशिष्ट्य . अनुवाद कर्त्या लीना गुळवणी यांच्या नावावर देखील बरीच पुस्तके जमा आहेत . त्यांनी मराठी अनुवाद केलेल्या आयुष्याचे धडे गिरविताना ( सुधा मूर्ति ) व टू सर विथ लव्ह. ( ई आर ब्रेथवेट ) या पुस्तकांचा अनुक्रमे चित्रा सोहोनी व प्रदीप तळेकरजी यांनी आपल्या गृपवर करून दिलेला परिचय रसिकांना आठवतच असेल . आता पुस्तकाकडे वळूया . अमेरिका व रशिया या दोन जागतिक स्तरावरील बलाढ्य शक्ती . या एकमेकांच्या जरी कट्टर प्रतिस्पर्धी असल्या , तरीही प्रस्तुत कादंबरीत महा विघातक , महा विध्वंसक अशी संरक्षण विषयक मिसाईल्स निर्मिती करण्यासाठी दोन्ही राष्ट्रांना बंधने घालवीत या हेतूने या दोन देशात `नानटेक्त` करार होऊ घातला आहे . या पार्शवभूमीवर कथानक सुरु होते . हा करार होऊ नये असे दोन्ही देशातील उद्योगपतीना आर्थिक हितसंबंधा साठी , तर दोन्हीकडील राजकीय शक्तींना पक्षीय राजकारण ,वैयक्तिक महत्वाकांक्षा यामुळे गैरसोयीचा ठरणार असल्याने नकोसा असतो . साहजिकच तो करार हाणून पाडण्यासाठी जो तो निकराने प्रयत्नास लागतो .त्यातच एक खतरनाक संधीसाधू आंतर राष्ट्रीय गुन्हेगार टोळी यात एन्ट्री घेते . या टोळीचे संबंध व लागेबांधे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या दोन्ही देशातील मंत्रालयात मोठ्या पदांवर सभ्यते चे पांढरपेशी बुरखे घालून काम करणाऱ्या , उच्च पदस्थ , महत्वाचे अतिमहत्त्वाचे अधिकारी यांच्या पर्यंत पोचलेले असतात . जरी हे चित्र बहुदा सर्वच देशात असले तरी सामान्य नागरिकांच्या आकलन शक्तीच्या पार पल्याड असे हे एक निराळे जग असते . हा नानटेक्ट करार होऊ नये यासाठी मग सर्व पातळीवर सर्व शक्ती कार्यरत होतात . याची काहीशी कुणकुण लागून सीआयए व केजीबी देखील जागरूक होते . पण घडायचे ते घडतेच . अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या एकुलत्या एक मुलाचे रशियन भूमीतून अपहरण होते . अपहरणकर्ते खंडणी मागतात . आणि त्याची सुटका करायसाठी नेमला जातो *`क्वीन* हा व्यावसायिक *मध्यस्थ* सुरवातीला फक्त अपहरण कर्त्यांशी वाटाघाटी करून मुलाची सुखरूप सुटका करून देणे एवढच काम असणारा क्वीन चक्क अपयशी ठरतो . रक्कम ही जाते आणि मुलाची हत्या पण होते . पण दरम्यान क्वीन च्या हाती बरेचसे मोडके तोडके धागेदोरे लागलेले असतात . त्यामुळे तो हे प्रकरण एकट्याने लढायचा निर्णय घेतो . केजीबी व सीआयए यांचा विरोध पत्करून , त्यांना आपल्या पाठीवर घेऊन , या कृत्या मागची पसरलेली पाळेमुळे रशिया अमेरिका इंग्लंड व आणखी काही युरोपीय देशातून खणून काढतो .एकांडा शिलेदार बनलेला निराधार क्वीन हत्या करणाऱ्या संपूर्ण टोळीचा मागोवा तर घेतोच पण त्यांना कळसूत्री प्रमाणे त्यांना नाचवणाऱ्या आंतर राष्ट्रीय सभ्य गुंडांचाही , उच्च राजकीय नेत्यांचाही पर्दाफाश करतो . कथानकाचा हा सारा प्रवासच सापशिडी सारखा अंदाज न येणारा . विस्मय कारक कलाटण्या देणारा.गुंता गुंतीचे कूट प्रश्न निर्माण करणारा . राजकारण्यांच्या ,स्वार्थाच्या ,क्रूरतेच्या , बुद्धीचातुर्याच्या अशा एका अनोख्या विश्वात आपण क्वीन बरोबरच गुंतून जातो .त्यातील जीवघेण्या पाठलागाचे थरार आपल्या काळजाचे ठोके चुकवतात.उत्कंठा शिगेला पोचते .आणि अखेरीस फ्रेडरिक या कोड्याची एखाद्या कुशल सर्जन प्रमाणे हळुवार चिरफाड करत असताना आपल्यालाही एक उत्तम दर्जेदार कादंबरी वाचल्याचे समाधान मिळते . मूळ लेखकाला जरी हे श्रेय देणे योग्य , तरी त्याच बरोबर मी तरी अनुवादक लीना सोहोनी याना हे श्रेय काहिसे अधिकच देईन . याचे मुख्य कारण इंग्रजी पुस्तके वाचताना आपल्याला स्वतः च्या शब्द संग्रहाची मर्यादा पडते .व्याकरणाचा पुरेसा अभ्यास नसेल तर सौन्दर्य समजत नाही . म्हणूनच अनुवादक इथे फार महत्वाचा दुवा ठरतो . लीना सोहोनी यांनी वरील जबाबदारी - पुस्तकातील क्वीन या मध्यस्था - इतकीच चोख पार पाडली आहे . क्वीन या कथानायकाची व्यक्तिरेखा हा या कादंबरीचा आत्मा आहे . अशा या जेम्स बॉण्ड ची आठवण करून देणाऱ्या व्यक्तिरेखेला मूळ इंग्रजी एवढ्याच ताकदीने त्यांनी मराठी भाषेत रंगवले आहे . आणि हीच ` मध्यस्थ` ची दमदार अशी जमेची बाजू आहे .कोणत्याही प्रसंगवर्णनात अचूक मराठी शब्दयोजना ,मूळ इंग्रजी वातावरण , व्यक्ती , समाज अगदी कशाचा ही मूळ बाज न बदलता त्यांनी हा अनुवाद आपल्या पुढे मांडलाय . केवळ या समर्थ अनुवादा मुळेच मराठी साहित्यात एका दर्जेदार रहस्यकथेची भर पडली आहे असेच मला वाटते राजेंद्र थिटे ...Read more

  • Rating StarKiran Borkar

    रशियातील केजीबी चिंतेत आहे कारण आता त्यांच्याकडे जो तेलसाठा आहे तो फक्त सात ते आठ वर्षे पुरणार आहे .त्यानंतर रशियाचे दिवाळे वाजणार आहे . भरपूर तेलसाठा असणाऱ्या राष्ट्रावर आक्रमण करायची त्यांची योजना आहे . पण सध्याचा अमेरिकेचा अध्यक्ष जॉन कॉरमॅक असतान ते शक्य नाही . अमेरिकेतील तेल व्यवसायिक सायरस मिलर चिंतेत आहे कारण जगभरातील तेलसाठे या वीस वर्षांत संपुष्टात येणार आहे आणि अरबी राष्ट्रांवर त्यांना अवलंबून राहावे लागेल .त्याला आता असे राष्ट्र पाहिजे की ते त्याच्या बोटाच्या इशाऱ्यावर नाचेल पण त्यासाठी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बदलायला हवा. पीटर कॅब अमेरिकेतील मोठा शस्त्रास्त्र निर्माता.त्याने नवीन शस्त्राचा शोध लावलाय त्यासाठी लाखो डॉलर्स मोजलेत. पन्नास हजार माणसे कामाला लावली आहेत.पण अमेरिका आणि रशियाचा शस्त्रास्त्र कपातीचा करार झाला तर तो रस्त्यावर येणार आहे .कसेही करून हा करार होऊ नये यासाठी त्याचे प्रयत्न चालू आहेत त्यासाठी राष्ट्राध्यक्ष बदलायचीही त्याची तयारी आहे . अमेरिका आणि रशियाचा शस्त्रास्त्र कपातीचा करार शेवटच्या टप्प्यात आहे . दोन्ही देशाचे अध्यक्ष सोडल्यास कोणालाही हा करार व्हावा असे वाटत नाही . देशातील संरक्षण खर्चात कपात करणे दोन्ही देशांच्या गुप्तचर संघटनाना आणि लष्करप्रमुखांना मान्य नाही. त्याचवेळी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या मुलाचे ऑक्सफर्डमधून अपहरण होते . त्याच्या सुटकेसाठी जगातील सर्वोत्तम मध्यस्थ निवडला जातो . क्वीन ही एकमेव व्यक्ती आहे जी सुटकेसाठी योग्य वाटाघाटी करू शकेल . क्वीन त्याच्या सुटकेत यशस्वी होतो पण सर्वांच्या समोर त्याची हत्याही होते . वाटाघाटी यशस्वी झाल्या तरीही हत्या का ???? कोण आहेत या हत्येच्या मागे . क्वीन हे रहस्य शोधून काढायचे ठरवितो . एक श्वास रोखून ठेवणारा पाठलाग,भयानक कटाचा हळू हळू होणारा उलगडा पाहून वाचक कमालीचे उत्तेजित होतो तर कधी आश्चर्यचकित .लेखकाने विलक्षण बुद्धिमत्तेनी लिहिलेली ही कहाणी वाचून तुम्ही स्तंभित होणार आहात . ...Read more

  • Rating StarVaibhav Mahajan

    ऑक्सफोर्डशायरमधल्या एका गावरस्त्यावरून एका युवकाचे अपहरण हा अमेरिकेच्या अध्यक्षाला त्याच्या पदावरून हुसकावून लावण्याच्या, आत्यंतिक व्रूर अशा कारस्थान-नाट्यातील पहिला प्राणांतिक अंक होता. तो यशस्वीरित्या पार पाडला गेला, तर हा अध्यक्ष या अनपेक्षित धक्कयाने मानसिक आणि भावनिकदृष्ट्या खचून अकार्यक्षम होईल, हा एकमेव हेतू या अपहरणामागे होता. हा दुर्दैवी प्रकार जगातील फक्त एकच व्यक्ती थोपवून धरू शकत होती– क्वन! अपहरणाच्या अशा प्रकारांमध्ये सातत्याने यशस्वी ठरलेला जगद्विख्यात मध्यस्थ. अपहरणकत्र्यांच्या मूळ हेतूविषयी अल्पांशानेही कल्पना नसताना या निष्पाप युवकाचे प्राण वाचवण्यासाठी स्वत:च्या आयुष्याची बाजी लावणारा मध्यस्थ. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more