* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
 • Ebooks:
 • Print Books:
WHAT IS A COVER? THE `MAYA` WHICH ENGULFS THE TRUTH IN THE FOLDING OF OBLIVION IS THE COVER. SINCE I GAINED MANHOOD, I HAVE BEEN OFTEN WONDERING ABOUT THE TRUTH AND UNTRUTH, IT HAS MADE MY LIFE IMPOSSIBLE. THIS SAME PROBLEM HAS SURFACED UP ON A NATIONAL LEVEL THROUGH THIS BOOK. IT IS VERY TRUE THAT THOSE WHO ARE LIVING TODAY ARE NOT RESPONSIBLE FOR THE ACTIONS DONE IN THE PAST BY SOMEONE ELSE. BUT IF WE ARE GOING TO TAKE THE CREDIT OF BEING THE DESCENDANTS OF OUR ANCESTORS THEN WE WILL HAVE TO CARRY ON THE RESPONSIBILITIES FOR THE DEEDS DONE BY THEM. MATURITY DOES NOT LIE ONLY IN GAINING FROM HISTORY; ON THE CONTRARY MATURITY IS REVEALED MORE PROPERLY IF ONE SUCCEEDS IN CUTTING THE UMBILICAL CORD BINDING ONE TO THE HISTORY. THIS IS APPLICABLE TO ALL THE HUMAN BEINGS APART FROM HIS OR HER RELIGION, CASTE, CREED, AND PERSONALITY. DR. S.L. BHAIRAPPA.
विस्मरणाने सत्य झाकोळून टाकणाऱ्या मायेला`आवरण` म्हणतात... मला कळायला लागल्यापासून `सत्यअसत्याचा प्रश्न` हा छळणारा प्रश्न आहे... हीच समस्या `आवरण`मध्ये समूह आणि संपूर्ण राष्ट्राच्या पातळीवर उफाळून आली आहे... ...मागे कुणीतरी केलेल्या चुकांसाठी आजचे जबाबदार नाहीत हे तर खरंच, पण मागच्यांशी नातं जोडून `आपण त्यांचेच वारसदार` या भावनेत आपण अडकणार असू, तर त्यांनी केलेल्या कर्माची जबाबदारी स्वीकारावी लागेल. इतिहासाकडून मिळवण्याइतकंच, त्याच्याकडून सोडवून घेणं हे परिपक्वतेचं द्योतक आहे. प्रत्येक धर्म, जाती आणि व्यक्तीला लागू पडणारी गोष्ट आहे ही...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#TADA #DR.S.L.BHYRAPPA #UMAKULKARNI #PARV #VANSHVRUKSHA #KAATH #AAVARAN #20JULY1931 #MANDRA #SAKSHI #UTTARKAND
Customer Reviews
 • Rating Starसंतोष रंगापुरे

  डॉ. एस. एल. भैरप्पा यांचे *आवरण* पुन्हा एकदा शांतपणे आणि विस्ताराने वाचून काढले आणि पुन्हा एकदा तोच अत्यवस्थ करणारा अनुभव आला, डोके सुन्न झाले. आपला धर्म, आपली संस्कृती विसरल्यास त्याचे किती गंभीर परिणाम होतात याचे भयचकित करणारे वर्णन भैरप्पा यांनी कले आहे. *आवरण* साठी भैरप्पा यांनी जवळ जवळ 200 ऐतिहासिक आणि दुर्मिळ अशा ग्रंथांचा संदर्भ घेतला आहे, 200 ग्रंथांचा अभ्यास करून सत्याचे अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन करणे ही खरोखरच सोपी गोष्ट नाही. भैरप्पा यांच्या सारखे अभ्यासू लेखक आज समाजात आहेत आणि आपल्या धर्माचा, आपल्या अभिमानास्पद संस्कृतीचा परिचय त्यांच्या अफाट लेखणीतून आपल्याला करून देत आहेत याचा खरंच खूप अभिमान वाटतो,भैरप्पा यांचे प्रत्येक पुस्तक वाचून काढण्याचे ठरवलेच आहे. अनेक वेगवेगळ्या इस्लामी राजवटींनी हिंदू संस्कृती, हिंदू मंदिरं विनाश करून संपूर्णपणे नष्ट करण्याचा पराकोटीचा प्रयत्न केला आणि तथाकथित पुरोगाम्यांनी याच टीपूला, बाबर ला, औरंगजेब ला भव्य दिव्य दाखवण्याचा सततचा खोटा इतिहास लिहून प्रयत्न केला आहे. राजकारण्यांनी पण त्यांचीच तळी उचलली कारण त्यांच्या अल्पसंख्य votebank ची त्यांना नेहमीच काळजी वाटत आली आहे. हिंदू votebank ची काळजी करण्याची त्यांना कधीच आवश्यकता वाटली नाही कारण त्यांनी हिंदूना आधीच जातीपातीत विभागून टाकले आहे. त्यामुळे अशा वातावरणात खोट्या इतिहासा बद्दल, इस्लामी उदात्तीकरणा बद्दल इतक्या परखडपणे लिहायला धैर्य लागते आणि भैरप्पांनी ते उदाहरणां सहीत, इतिहासातील अनेक सत्य दाखल्यांसहीत दाखवून दिले आहे. *आवरण* सुरू होते ते लक्ष्मीच्या कहाणी पासून, बंगलोर पासून जवळच असलेल्या गावातून आलेली मुलगी पुण्यात फिल्म इन्स्टिटय़ूट मध्ये शिकता शिकता अमीर नावाच्या मुस्लीम मुलाच्या प्रेमात पडते आणि पुढे जाऊन इस्लाम स्वीकारून *रझिया* बनते. आधुनिक विचारसरणी आणि चित्रपट क्षेत्रात असल्याने पुढे जाऊन अमीरचे इस्लामिक चालीरीतींना अनुसरून वागणे आणि पुढे जाऊन एकूणच इस्लाम धर्मातील अनेक गोष्टींचा फोलपणा तिला लक्षात येतो. तिचे आप्पा हिंदू धर्माचे अभ्यासक असतात आणि त्यांच्या मृत्यूनंतर लक्ष्मी गावी येते आणि आप्पांची ग्रंथसंपदा चाळत असताना अप्पांचा प्रचंड अभ्यास त्यांची टिपणं पाहून लक्ष्मी स्तब्ध होऊन जाते. इस्लामिक अत्याचारांची मालिका मग ती बाबरी मस्जिद असो, औरंगजेबने काशी विश्वेश्वराचा विध्वंस करून उभी केलेली ज्ञानव्यापी मस्जिद असो किंवा टिपूने हिंदू रयतेवर केलेले अनन्वित अत्याचार असोत या सर्वच गोष्टींनी लक्ष्मी अस्वस्थ होते याच अनुषंगाने खरा इतिहास उजागर करण्यासाठी एक कादंबरी लिहिते, परंतु अशा स्फोटक सत्य लिखाणाला ना साहित्य वर्तुळातून, ना मीडिया कडून कुठूनच तिला सपोर्ट मिळत नाही, उलट अल्पसंख्य votebank दुखावण्याचा प्रयत्न केल्याने तिला अटक करण्याचा प्रयत्न होतो आणि हर प्रकारे त्रास दिला जातो हा संपूर्ण कथाक्रम वाचणे खूपच वेदनादायी आहे. विस्मरणाने सत्य झाकोळून टाकणार्‍या मायेला *आवरण* म्हणतात आणि असत्य बिंबवणाऱ्या कार्याला विक्षेप म्हणतात. इतिहास आपल्याला अनेक गोष्टी शिकवतो, अनेक संदर्भ दाखवतो पण विदृप इतिहासाची पुनरावृत्ती होऊन द्यायची नसेल तर आपला वर्तमान नक्कीच बदलला पाहिजे, इतिहासातील चुका सुधारल्या पाहिजेत तरच त्या इतिहासाचा काहीतरी उपयोग आहे. *आवरण* च्या पार्श्वभुमीवर आज काशी विश्वेश्वराचा जीर्णोद्धार बनारस ला गेलो असताना स्वतः डोळ्याने पाहिला त्यामुळे पुस्तक वाचताना खूप भरून येत होते जे इतक्या शेकडो वर्षात होऊ शकले नाही ते आपल्या डोळ्यांसमोर घडताना पाहून ऊर भरून येतो, आता पुढे राममंदिराची घटना देखील तितकीच ऐतिहासिक महत्त्व असलेली आणि सुखावणारी असेल. प्रत्येकाने आवर्जून वाचावे असे *आवरण*, स्वतःला आतून बदलून टाकणारे *आवरण* नक्की वाचा 🙏🏻🙏🏻🙏🏻 संतोष रंगापुरे. ...Read more

 • Rating StarAbhinav Muley

  बस एकदा नक्कीच वाचावी अशी कादंबरी आपण अभ्यासक्रमात काय इतिहास शिकतो आणि आपल्याला काय शिकवलं बिंबवलं जात हे विचार करायला लावणारी , आदर्श सामाजिक मूल्य शिकवताना सत्यसत्याचा विवेक सदैव अवरणाखाली राहतो की काय असा प्रश्न स्वतःला विचारायला लावणारी कादंरी लेखकाची लेखन शैली आणि अभ्यास आपल्याला वाचताना हरवून टाकते ...Read more

 • Rating StarNishigandha Joshi

  #bookrelatednishi# आत्ताच "आवरण" ही डॉ. एस. एल्. भैरप्पा लिखित आणि उमा कुलकर्णी यांनी अनुवादित केलेली कादंबरी संपवली. वाचून सुन्न होणे म्हणजे काय याचा प्रत्यय आला. कादंबरीची नायिका "लक्ष्मी" उर्फ रझिया, तिचा नवरा "आमिर", लक्ष्मीचे वडील "अप्पाजी", ्यांचे मित्र शेषराय शास्त्री आणि त्यांचा मुलगा प्रोफेसर शास्त्री ही कादंबरीतील प्रमुख पात्रे. कादंबरीचा काळ १९९० नंतरचा आणि त्यासाठी अभ्यासलेल्या ग्रंथांचा काळ साधारण सोळाव्या शतकपासून चा. लक्ष्मीचे धर्म बदलून रझिया होणे आणि आंतरधर्मीय विवाह करणे या संदर्भातून कादंबरीची सुरुवात होते. सत्य इतिहासाचा अभ्यास करत जातानाच राजकारणासाठी तो लपवून खोटा इतिहास लादला जातोय हे सत्य तिच्या तकलादू सुधारणावादी विचारांना हलवून सोडते. जसजशी अभ्यासात खोल बुडत जाते तसतसे तिला आणखीन जोराचे धक्के बसत जातात. बाबरी मशीद पाडली त्याच्या भोवतालचा काळ आणि मुघल सम्राट औरंगजेब याचा काळ यांची संदर्भासाठी केलेली एकत्र गुंफण कादंबरीची परिणामकारकता वाढवते. संपूर्ण हिंदुस्थानचा समृद्ध धार्मिक, सांस्कृतिक वारसा, ज्ञानकेंद्रे आणि त्याचा सोळाव्या शतकापासून बाहेरील आक्रमकांकडून झालेला विध्वंस हा कादंबरीचा मुख्य गाभा आहे. अल्पसंख्यांक असलेल्या धर्माच्या मागासलेल्या रुढी, परंपरा, दुराभिमान, अशिक्षित मनोवृत्ती आणि जीवनपद्धती, असहिष्णुता यावर नायिकेच्या तर्फे लेखक प्रहार करतात. तत्कालीन राजकारण, समृद्ध आणि सहिष्णु परंपरेचा स्वार्थासाठी इतिहास बदलण्याचा समकालीन पुरोगामी आणि बुद्धिवादी लोकांचा अट्टाहास, त्यासाठी झालेली एकजूट, वाचकांना चीड आणल्याशिवाय रहात नाही. वर्षानुवर्षे चांगले दडपण्यासाठी चाललेले, जनकल्याणाचे सोनेरी आवरण घातलेले कपटी कारस्थान वाचकांसमोर उघड होते. बुद्धिवादी, सेक्युलर म्हणवणाऱ्या लोकांचा मुखवटा टराटरा फाडते. कादंबरी पूर्णतः सत्य संदर्भावर आधारलेली आहे. संदर्भ ग्रंथांची यादी कादंबरीत लेखकाने समाविष्ट केली आहे त्यामुळे कादंबरीला वास्तवाचा भक्कम आधार आहे. थक्क करणारा लेखकाचा अभ्यास आणि त्याचबरोबर अपरिमित सांस्कृतिक हानी करण्याचे, खरा इतिहास जाणीवपूर्वक दडपण्याचे हे कारस्थान सुज्ञ वाचकाला सुन्न करून टाकते. लेखकाने खरा सर्वधर्म विचार नायिकेच्या तर्फे मांडला आहे जो सशक्त राष्ट्र उभे करण्यासाठी अत्यंत उपयुक्त शकतो. कादंबरीचा खरा उद्देश हाच आहे असे मला वाटते. प्रत्येकाने कर्तव्य म्हणून वाचावी अशी अभ्यासपूर्ण कादंबरी. ©️निशिगंधा 13/10/21. ...Read more

 • Rating StarUday R. Thombare

  नुकतंच डॉ. एस.एल.भैरप्पा यांचं ` आवरण ` हे पुस्तक अगदी झपाटल्यासारखं वाचून काढलं. पुस्तकाच्या विषयाबद्दल काहीच कल्पना नव्हती. सुरुवात आणि शेवट यांत खूप फरक आहे. पण एकदा का पकड घेतली की माणूस अंतर्बाह्य ढवळून निघतो. आपण कधी कल्पनाही केली नसेल असा वषय अगदी मुद्देसूद, अनेक समर्पक संदर्भासहित कादंबरीतून समजावून दिला आहे. खरंतर पचनी पडेल असा विषय नाही. पण मोजक्या पात्रांभोवती फिरणारं कथानक अनेक वास्तवदर्शी गोष्टींचा उलगडा करत जातं आणि आपणही विचारचक्रात अडकत जातो. अशा पद्धतीचं लिखाण पहिल्यांदाच वाचनात आलं आणि खूप भारावून गेलो. अवश्य वाचावं असं पुस्तक. धन्यवाद 🙏🏻 ...Read more

 • Read more reviews
Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

THE DA VINCI CODE
THE DA VINCI CODE by DAN BROWN Rating Star
V. Pawar

खूप छान कादंबरी आहे. अगदी मनाला गुंतवून ठेवणारी. 👌👌

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
स्वप्निल सोनवडेकर

#वाचनवेडा लेखक रणजित देसाई यांचा मी खूप मोठा चाहता आहे. त्यांची लेखन शैली मला वेगळ्या जगात घेऊन जाते. त्यांच्या पुस्तकात शब्दसंपत्ती मुबलक लाभते.ओघवते लिखाण कांदबरीची पुढील पानं झपझप पलटवतात.त्यांच्या प्रत्येक कादंबरीतलं अलवार लिखाण मनाला भिडणारं असत.राधेय हि अशी कादंबरी आहे,जी प्रत्येक पुस्तकप्रेमीने वाचली आहे.राधेय पुस्तकाचे वैशिष्ट्य असं आहे की आपल्या वाढत्या वयाच्या परिपक्वतेवर ही कादंबरी पुन्हा पुन्हा वाचावी वाटते.जेवढी नव्याने वाचावी ती अजून उलगडत जाते. राधेय वाचताना कर्ण,दुर्योधन,शकुनी तथा महाभारताचा खरा राजकारणी कृष्ण यांची प्रतिमा मेहंदीसारखी रंगू लागते.कारण ती वाचकांच्या ओंजळीत रणजीत देसाई यांनी रेखाटलेली असते. एखाद्या लेखकाने कादंबरी लिहावी आणि ती अजरामर व्हावी ती ही अशी... महाभारतात उपेक्षित ठरलेला योद्धा म्हणजे कर्ण.जन्मानंतर ज्याला स्वतःच्या आईनेच स्वतःपासून दूर केलं असा कर्ण आयुष्यात कधी कुणाचा कसा झाला असता..! सूतपुत्र म्हणून आयुष्यभर हिणवल्या गेलेल्या कर्णाला तो राधेय नाही तर कौंतेय आहे हे कृष्णाकडून उमगतं तेव्हा तो भावविभोर नं होता रोरांवत्या प्रश्नांच्या वादळात गुरफटून जातो.धरणीकंप व्हावा आणि हे सत्य असं ज्वालारसाप्रमाणे बाहेर यावं.ह्या ज्वालारसातील दाह कसा कोणी सहन करावा..! अर्ध आयुष्य जगल्यानंतर,नात्यांची मूळं खोल शिरल्यानंतर हे सत्य ऐकून काय बदलणार होत.?कानात तळपता रस टाकल्याप्रमाणे या सत्याचा त्रासच अधिक होईल. हे सत्य कळल्यानंतर देखील आपल्या मैत्रीला जपणाऱ्या ह्या वीर योद्धाची जीवनगाथा रणजीत देसाई यांनी या पुस्तकात काय सुंदर मांडली आहे. राधेय कादंबरी वाचताना उलगडत जाणारा कर्ण हा उगवत्या इंद्रधनुष्यप्रमाणे वाटू लागतो. त्याच्या व्यक्तिमत्वातील विविध छटा आपल्या मनाला स्पर्श करू लागतात. द्रौपदी स्वयंवर आणि द्रौपदी चीरहरण प्रसंग काय सुंदर मांडले आहेत या कादंबरीत.या पुस्तकातील काही ओळी मला फार भावतात. `हे नरेंद्र धर्म वाकवावा तसा तो वाकतो.` हे वाक्य वाचलं आणि सध्याचं राजकारण डोळ्यांसमोर तरळतं . `अग्रपूजेचा मान बलानं तोलला जात नाही,तो अधिकार धारण करणाऱ्या पुरुषांच्या ठायी सत्वगुणांचा अधिकार असावा लागतो.`ह्या वाक्याला देखील काय सुंदर अर्थ आहे. द्युतपटात तरबेज असणारा शकुनी म्हणतो.`नाना देशींच्या बरोबर मी फासे घोळवले आहेत.प्रियकराला आपल्या सखीची अंगप्रत्यंग जाणवावी तशा कोरलेल्या मुद्रा माझ्या सरावलेल्या हातांना रात्री अंधारातही जाणवतात.` द्रौपदीचे चीरहरण होत असताना तिची अब्रू वाचवायला आलेला कृष्ण उर्मट दुर्योधनाला म्हणतो.`सामर्थ्यशाली पुरुषाला दुर्बलांच्या सभेत प्रवेश करण्यास आमंत्रणाची आवश्यकता नसते.` या पुस्तकातील बरीच वाक्य मी अधोरेखित करून ठेवली आहेत, सगळ्याच ओळी इथे लिहायला गेलो तर अर्ध पुस्तकच लिहावे लागेल. रणजीत देसाई यांच्या कांदबरीवर समीक्षण पोस्ट लिहिणारा मी कोण! ही पोस्ट समीक्षण पोस्ट नसून कौतुक लिखाण आहे. तर राधेय पुस्तकाच्या तुमच्या आठवणी काय आहेत हे नक्की कमेंट्स मध्ये लिहा. ...Read more