* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789386888594
  • Edition : 1
  • Publishing Year : NOVEMBER 2017
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 252
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :SWATI CHANDORKAR COMBO SET - 17 BOOKS
  • Discount : SPECIAL OCTOBER DISCOUNT 33/50 PERCENT(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE STORY OF THE THIRD-CENTURY HIJADE WITH NEGLECTED ELEMENTS IN SOCIETY. THEY ALSO HAVE DIFFERENT TYPES. ANY PERSON BORN FROM A WOMAN OR A MAN IS A THIRD PARTY OR A HIJRA INSTEAD. AFTER THE KNOWLEDGE / UNDERSTANDING OF THE BODY, A WOMAN BECOMES A MAN, SO THAT ANY MAN WOULD BE WILLING TO GO TO NATURE AS A WOMAN TO FEEL ASHAMED OF PAIN AND SUFFERING. A WOMAN IS ATTRACTED TO A WOMAN AND A MAN IS ATTRACTED TO MEN; THESE ARE CALLED LESBIAN. THEY HAVE TO BEG FOR BEGGING FOR THEIR DAILY LIFE, GREETING THEM ON AUSPICIOUS OCCASIONS, OR CONDUCTING SEXUALLY TRANSMITTED PATHS. BEING SEPARATED FROM A DIFFERENT LIFE, AND BECAUSE OF THE NEGLECT OF THE COMMUNITY, THEY ARE ALL LIVING UNDER ONE ROOF. HE IS ALSO A GURU. EVERYONE NEEDS TO SUBMIT THEIR EARNINGS TO THE GURU; IN RETURN, THE GURU SPENDS HIS MEAL-MINE, CLOTHES, SICKNESS. OF COURSE, THE GURU WILL SAY THAT EAST DIRECTION! CHELA CONTINUES TO BE A TEACHER FROM THIS CHAKORI. THEY ALSO HAVE FAMILY AND ARE THE HEROES OF EVERY HOUSEHOLD. THERE IS NO END TO THE STRUGGLE, COMPROMISE AND PAIN THAT HE NEEDS TO LIVE WHILE HE IS YOUNG. IT IS A GREAT CHALLENGE FOR THEM TO GET THE MENTAL STRENGTH TO FACE ILLNESS AND OLD AGE AND YET THIS THIRD CULT IS RIGID. THE TOTAL IS HIS LIFE, WHICH HE DID NOT ASK FOR AS `WANT LIFE` AND YET LUCKILY. THEY ALSO WANT A GOOD LIFE AND FOR THIS GOOD LIFE THEY HAVE ONLY ONE THING - `LIVE US AS A MAN ...`
समाजातील उपेक्षित घटक असणारे तृतीय पंथीय अर्थात हिजडे यांची ही कहाणी. त्यांचेही निरनिराळे प्रकार असतात. कोणी जन्मत:च स्त्री किंवा पुरुषाऐवजी तृतीय पंथी किंवा हिजडा असतो. देहाची जाण/समज आल्यावर कोणी स्त्री आपण पुरुष व्हावे म्हणून तर कोणी पुरुष आपण स्त्री व्हावे म्हणून निसर्गाविरुद्ध जाऊन वाटेल तो त्रास, वेदना सोसायला तयार होतात. एखाद्या स्त्रीला स्त्रीदेहाचे तर एखाद्या पुरुषाला पुरुषदेहाचेच आकर्षण वाटते; अशांना लेस्बियन म्हणतात. दैनंदिन जीवनासाठी त्यांना भीक मागणे, शुभ प्रसंगी बधाईला जाणे किंवा शरीरविक्रय असे मार्ग पत्करावे लागतात. वेगळे जीवन वाट्याला आल्याने आणि समाजाकडून बहुधा तुच्छता तसेच हेटाळणीची वागणूक मिळाल्यामुळे हे सगळे एका छताखाली म्हणजेच एक वस्ती करून राहतात. यांनाही गुरू असतो/असते. सर्वांना आपली कमाई गुरुकडे जमा करावी लागते; त्या बदल्यात गुरू त्यांचे जेवण-खाण, कपडालत्ता, आजारपण यासाठी खर्च करतो/करते. अर्थात गुरू म्हणेल ती पूर्व दिशा! याच चाकोरीतून चेला पुढे गुरू होतो. यांचीही घराणी असतात आणि प्रत्येक घराण्याचा नायक असतो. हिजडा तरुण असताना जगण्यासाठी त्याला करावी लागणारी धडपड, तडजोड, वेदना यांना अंत नाही. आजार आणि म्हातारपण यांचा सामना करण्यासाठी मानसिक बळ मिळवणं हे मोठं आव्हान त्यांच्यासमोर आहे आणि तरीही हा तृतीय पंथ ताठ आहे. एकूण हे त्यांचं आयुष्य आहे, जे त्यांनी ‘असं आयुष्य हवं’ म्हणून न मागितलेलं आणि तरीही नशिबी आलेलं. त्यांनाही चांगलं आयुष्य हवं आहे आणि या चांगल्या आयुष्यासाठी त्यांचं एकच मागणं आहे – ‘आम्हाला माणूस म्हणून जगू द्या...’

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #HISDAY #HISDAY #हिजडे #FICTION #MARATHI #SWATICHANDORKAR #स्वातीचांदोरकर "
Customer Reviews
  • Rating StarTrupti Walunjpatil

    "हिज डे". पुस्तकाच्या नावातल्या दोन शब्दांतली जागा काढली की झाला शब्द "हिजडे". हो, हे पुस्तक "हिजडे" अर्थात तृतीयपंथीयांवरचं आहे. रस्त्यावर, रेल्वे गाड्यांमध्ये भीक मागताना, टाळ्या वाजवताना किंवा शुभकार्याच्या प्रसंगी हक्काने पैसे मागणारे हे लोक आपण ाहिलेले असतात. त्यांच्या बद्दल भीती, किळस, कुतूहल, अनुकंपा अश्या कितीतरी वेगवेगळ्या भावना प्रत्येकाच्या मनात असतात. अश्या सगळ्या अनुभवांना सोबत घेत, कशालाही चूक ना ठरवता आपल्याला त्यांच्या जगात घेऊन जाणारं; त्यांच्या भावना दाखवणारं हे पुस्तक आहे. ...Read more

  • Rating StarMohini Joshi

    ह्या पुस्तकाचा विषय तुमच्यासाठी वेगळा आहे.. कदाचित ह्या जगण्याला, असण्याला समाज काडीचीही किंमत देत नसेल. पण आम्ही आहोत.. स्त्री, पुरुष या जातीत मोडत नसलो तरी बाईमाणूस आहोत.. आजचा अभिप्राय " हिज डे" या पुस्तकासाठी .. मी स्वतः एक crossdresser आहे.. सवाती चांदोरकर या लेखिकेने आम्हा तृतीय पंथी लोकांची व्यथा ह्या पुस्तकातून मांडली आहे. .. कथेची सुरुवात होते ती हेलीना नावाच्या 20 वर्षीय लाजर, बुजरया आणि शारीरिक वाढ पूर्ण न झाल्यामुळे खचलेल्या, जगापासून अलिप्त रहाणार्‍या मुली पासून. मानसोपचार तज्ज्ञ म्हणून शिक्षण घेत असताना तिची मैत्री होते ती चमेली बरोबर जी एक तृतीय पंथी असते.. आणि जया जिला मुलींन बदल आकर्षण असते.. अश्या ह्या तिघींची कथा.. शरीर आणि मन दोन्ही भिन्न असणार्‍यांची ही कथा.. नक्किच वाचा.. मीही त्यातलीच आहे.. शरीर पुरुषी मन मात्र स्त्री च... ...Read more

  • Rating StarSuhas Jadhav

    ही कादंबरी मती सुन्न करते तसेच या लोकांबाबत सहानुभूतीने विचार करण्यास प्रवृत्त करते. ’हिज डे कादंबरी ही ट्रान्स जेंडर, त्यांच्या वेदना क्लेश समस्या यावर आधारित असून ती सत्य आणि काल्पनिक यांची गुंफण. नक्की वाचा मन सुन्न करणारी आणि वाचनात एक नवीन भर टाणारी कादंबरी. ...Read more

  • Rating StarManisha Sanndip

    #पुस्तकंविवेचन #हिज_डे आजचा पुस्तकाचा विषय वेगळा आहे कदाचित या विषयाला, या जगण्याला, त्यांच्या असण्याला काडीचीही किमंत देत नसेल समाज पण ते आहेत,स्त्री, पुरुष या जातीत मोडत नसले तरी माणूस आहेत.. त्यांना हक्क आहे जगण्याचा, मानसम्मान मिळवण्याचा.. आजा अभिप्राय "हिज डे" या पुस्तकासाठी...स्वाती चांदोरकर या लेखिकेने त्रितियपंथी लोकांची व्यथा आपल्यासमोर या पुस्तकातून मांडली आहे....फार पूर्वी शेहनशाह, त्रितियपंथी लोकांना त्यांच्या प्रामाणिकपणामुळे जनानखाण्यात सुरक्षारक्षक म्हणून ठेवत असत... पण पुढे त्यांचा प्रामाणिकपणा इंग्रजांसाठी धोकादायक ठरू शकतो या हेतूने त्यांना विनाकारण बंदी बनवण्यात आले आणि त्यांचा अतोनात छळ करण्यात आला पण एक दिवस एका जेलरला या सगळ्यात प्रकरणात या लोकांची काहीही चुक नाही हे लक्षात येते अन दया दाखवून त्यांना तो एक दिवस मुक्त जगण्यासाठी सोडतो आणि म्हणतो "वन डे इज ऑन्ली हिज डे"आणि त्यांना त्यादिवशी पासून यांना "हिजडे" म्हंटले गेले हा शब्द त्यांच्यासाठी मुक्तीचा दिवस म्हणून मानाचा आहे असें ते मानतात..कथेची सुरवात होते ती हेलीना नावाच्या वीसवर्षीय लाजऱ्याबुजऱ्या अन शारीरिक वाढ पूर्ण न झाल्यामुळे खचलेल्या, जगापासून अलिप्त राहणाऱ्या मुलीपासून..मानसोपचार तज्ज्ञ म्हणून शिक्षण घेत असताना तिची मैत्री होते ती चमेली सोबत जी एका त्रितियपंथी "हाला "ची मुलगी असते तिला लोकांनी जवळपास वाळीत टाकल्यासारखेच असते.. दुसरी मैत्रिण जया तिला मुलींबद्दलचं आकर्षण का वाटतं असते याची नुकतीच जाणीव झालेली.. चमेली अन जया सोबत मैत्री झाल्यानंतर तिचे आयुष्य पूर्णतः बदलून जाते.. चमेलीसोबत राहून ती त्रितियपंथी लोकांना साधे पोट भरण्यासाठी किती कठीण आयुष्य जगावे लागते याचे प्रचिती येते.. या वस्तीतील, शामची श्यामली होताना, आणि "सुक्की"ची "तो" होताना जी शरीराची, मनाची वेदनादायी चिरफाड होते ते वाचून तर अंगावर काटा उभा राहतो.. शरीर अन मन दोन्ही भिन्न असणारी ही लोक निसर्गाची ही दुष्ट्ट देणगी नाकारतात तेंव्हा प्रामाणिकपणे देवाची माफीही मागतात.. प्रामाणिकपणा यांच्यात जन्मतः असतो.. पैशासाठीची खरं तर जगण्यासाठीची धडपड, त्यामुळे करावी लागणारी देहविक्री आणि अस्वछता त्यातून होणारे जीव घेणारे भयंकर आजार, स्वतःच्या लोकांनी नाकारलेले, समाजाने नाकारलेले अश्यामधे हे लोक एकमेकांचा आधार बनतात.. अतिशय हृदयद्रावक व्यथा या पुस्तकातून समोर आणणाऱ्या धाडसी लेखिकेला सलाम, त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींचा तपशील अगदी बेडरपणे पुस्तकात मांडला आहे.. हेलीना, चमेली, जयाचा आणि त्रितियपंथी लोकांचा जीवन प्रवास यातून कसा होतोे जाणून घेण्यासाठी नक्की हे पुस्तकं नक्की वाचा... ©Manisha Sandip ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MI GALIB BOLTOY
MI GALIB BOLTOY by SHABBIR ROMANI Rating Star
Arvind deshpande

Mirza Ghalib is the Jewel in the Urdu literature. He is the pioneer in setting new trend in it. Authar Shabbir Romani excellently explained it. Everyone who is not acquainted with urdu literature should go throw it. The socio political and historicalenviorn of that time is skillfully reflected in his poetry and was narrated by author shabbir Romani. ...Read more

NADIMUKH
NADIMUKH by PERUMAL MURUGAN Rating Star
गार्गी म्हात्रे

पेरुमाल मुरुगन ह्या तामिळ लेखकाच " नदीमुख" हे अनुवादित पुस्तक वाचले. मराठी मध्ये दाक्षिणात्य भाषां मधल्या तामिळ भाषेच्या उत्तम साहित्याची वाचन संधी या पुस्तकाच्या निमित्ताने मिळाली. साठच्या दशकात जन्मलेल्या पिढीला वेगाने ,खर तर अती वेगाने बदलत जाणाऱ्ा तंत्रज्ञान व तरुण पिढीची मानसिकता यांचे सुंदर चित्रण या कादंबरी मध्ये करण्यात आले आहे. माणूस किंवा असुर पालक असला की मुलांच्या भविष्याची चिंता त्यामधून उद्भवणारा संघर्ष साध्या सोप्या पण प्रवाही भाषेमधून आपल्या समोर उभा राहातो. कुमारासुराच्या एकसुरु झापडे लावून घेतलेल्या आयुष्यात `नदीमुख` दर्शना नंतर झालेली तगमग व बदल यांचे खूप सुंदर वर्णन शेवटी आलेल आहे. डॉ. मानसी जयंत केळकर यांनी अतिशय प्रवाही भाषेत व उत्कृष्ट समर्पक शब्दात पुस्तक अनुवादित केल्यामुळे कांदबरीची मजा घेता येते. मराठी व्यतिरिक्त अन्य भाषेतील साहित्य वाचनाला उपलब्ध करुन दिल्या बद्दल मेहता पब्लिशिंग हाऊस व डॉ मानसी केळकर यांचे आभार ! ...Read more