CAROL HIGGINS CLARK

About Author

Birth Date : 28/07/1956


CAROL HIGGINS CLARK IS AN AMERICAN MYSTERY AUTHOR AND ACTRESS. SHE IS THE DAUGHTER OF SUSPENSE WRITER MARY HIGGINS CLARK, WITH WHOM SHE CO-AUTHORED SEVERAL CHRISTMAS NOVELS, AND THE FORMER SISTER-IN-LAW OF AUTHOR MARY JANE CLARK.

ही अमेरिकन रहस्य-कथाकार असून, तिने आपली आई प्रसिद्ध रहस्य-कथाकार मेरी हिगिन्स क्लार्क बरोबर सहायक-लेखक म्हणून अनेक कादंबऱ्यांचे लेखन केले आहे. १९५६ साली न्यूयॉर्क मध्ये जन्मलेल्या कॅरोलचे बालपण न्यू-जर्सीमध्ये गेले. बी.ए.चे शिक्षण पूर्ण करत असताना ती आपल्या आईने लिहिलेल्या कथांचे पुनर्लेखन करत असे. वेळोवेळी ती त्यात बदलही सुचवत असे. चार भावंडांमध्ये एकाट्या कॅरोलनेच लेखक बनण्याचा निर्णय घेतला तो महत्त्वपूर्ण ठरला. आपल्या आईच्या कथा गोष्टीरूपात सांगता सांगताच कॅरोल तिच्यासारखीच रहस्यकथाकार बनली. आईप्रमाणेच लेखिका बनलेल्या कॅरोलचे वैशिष्ट म्हणजे तिच्या रहस्य-कथांमध्ये मार्मिकता दिसून येते. कॅरोलच्या प्रत्येक कथांमध्ये आढळणारा कथा-नायक ‘रेगन’ हा अत्याचारी पुरुषांचे प्रतिनिधित्व करतो. तो संदर्भ हा काल्पनिक नसून वास्तवदर्शी आहे. माउंट होलीयोक कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने अभिनयास सुरुवात केली. १९७५पासून तिने नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. ‘ए क्राय इन द नाइट’ या चित्रपटात तिने मुख्य भूमिका केली. ‘टु टेल द ट्रुथ’ या ‘गेम शो’मध्येही कॅरोलचा सहभाग होता.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
ZAPPED Rating Star
Add To Cart INR 160
TBC Classic Book

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
अनिल सहजे, नाशिक.

`कुलामामाच्या देशात’ हे पुस्तक म्हणजे जंगलातील अनुभवकथांचा एक विलक्षण रम्य प्रवास आहे. रवींद्र वानखडे यांच्या वनाधिकारी म्हणूनच्या प्रत्यक्ष अनुभवातून या कथा जन्माला येतात. प्रत्यक्षात घडलेल्या या कथा इतक्या रंगतदार आहेत की त्या काल्पनिक वाटाव्यात, अी त्यांची गंमत आहे. वानखडे यांच्या अनुभवांमधील कथाबीज अचूकपणे हेरून जी. बी. देशमुख यांनी त्यांना आपल्या रसाळ आणि खुमासदार शैलीत शब्दरूप दिले आहे. देशमुखांची शैली इतकी प्रवाही आणि ओघवती आहे की वाचक कथांमध्ये अक्षरशः गुंगून जातो. एकदा पुस्तक हातात घेतल्यानंतर ते पूर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेवावेसे वाटत नाही. वन हे सामान्य माणसासाठी तसे अपरिचितच क्षेत्र. जंगलातील जीवन, तेथील नियम-कायदे आणि जंगली श्वापदांचे विश्व याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. वानखडे-देशमुख द्वयी केवळ या अनोख्या जगाची ओळख करून देत नाहीत, तर त्याविषयी वाचकाच्या मनात विलक्षण कुतूहलही निर्माण करतात. ‘खुश रहेना मेरे यार’ आणि ‘महाकाय आकांत’ या दोन क्रमशः कथा तर विशेषतः चटका लावून जातात. त्या केवळ थरारक आणि अविश्वसनीय वाटाव्या अशा अनुभवांनी भारलेल्या नाहीत, तर जंगली श्वापदांची एक हळवी, माणुसकीच्या जवळ जाणारी बाजूही त्या प्रभावीपणे उलगडून दाखवतात. जी. बी. देशमुखांची खुमासदार, मिश्कील आणि रसाळ लेखनशैली वाचकाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुंतवून ठेवते. रवींद्र वानखडे यांच्या प्रत्यक्ष अनुभवांची सत्यता आणि देशमुखांच्या कथनकौशल्याचा सुंदर मिलाफ ‘कुलामामाच्या देशात’ घडवतो. हे पुस्तक केवळ जंगलातील अनुभवकथांचे संकलन राहत नाही, ते वाचकाला जंगलाच्या एका अनोख्या, रोमांचक आणि हळुवार विश्वाची सफर घडवते आणि नकळत सांगून जाते, ‘वनस्य कथा रम्यः!’ ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
ॲड. प्रशांत यावले, अमरावती

आज "दुर्दम्य" वाचुन पुर्ण झाले. मराठी साहित्याचा एक अप्रतिम अविष्कार. एक व्यक्तीचित्रण पण अत्यंत प्रभावी लेखन. एकाच व्यक्तीचे वेगवेगळे गुण वेगवेगळ्या कलात्मक वर्णनाने ईतक्या समर्थपणे मांडण्याचे कौशल्यपूर्ण लिखाण. शेवटच्या प्रकरणाने ईतक्या कठोर व्यक्तमत्वा बदल देखील भावना चाळवल्या. त्या व्यक्तीचे खरे नाव माहीती असुन देखील पुस्तक वाचुन संपवल्यावर ते आठवतच नव्हते ईतका प्रभाव "एकनाथन"चा राहीला. खुप सुंदर. ...Read more