MARK VICTOR HANSEN

About Author

Birth Date : 08/01/1948


MARK VICTOR HANSEN IS AN AMERICAN INSPIRATIONAL AND MOTIVATIONAL SPEAKER, TRAINER AND AUTHOR. HE IS BEST KNOWN AS THE FOUNDER AND CO-CREATOR OF THE CHICKEN SOUP FOR THE SOUL BOOK SERIES. BORN: 8 JANUARY 1948 (AGE 74 YEARS), WAUKEGAN, ILLINOIS, UNITED STATES SPOUSE: PATTY HANSEN (M. 1979), CRYSTAL DWYER HANSEN

मार्क हॅन्सन यांचा जन्म जानेवारी, १९४८मध्ये झाला. ते अमेरिकेतील एक स्फूर्तिदायक आणि प्रेरणादायक वक्ते, प्रशिक्षक आणि लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. ओप्राह, द टुडे शो अशा कार्यक्रमांमधून ते दिसले आहेत. युएस टाइम्स, द न्यू यॉर्क टाइम्स, आन्त्रप्रेनॉयर मॅगझिन यांत त्यांनी लेखन केले आहे. सन २०००मध्ये त्यांना नॉर्थवुड विद्यापीठाने असामान्य औद्योगिक नेता म्हणून गौरविले. गुण आणि तत्त्वे यांचे मानवीकरण करणारे म्हणून त्यांना होरॅशिओ अल्गर असोसिएशन ऑफ डिस्टिंग्विश्ड अमेरिकन्सने होरॅशिओ अल्गर पुरस्काराने गौरविले. असे आणखीही अनेक मानाचे पुरस्कार मार्क हॅन्सन यांच्या नावावर आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 11 of 11 total
CHICKEN SOUP FOR THE GRAND PARENTS S... Rating Star
Add To Cart INR 170
CHICKEN SOUP FOR THE SISTERS SOUL Rating Star
Add To Cart INR 250
CHICKEN SOUP FOR THE SOUL Rating Star
Add To Cart INR 250
CHICKEN SOUP FOR THE SOUL INDIAN FATHERS Rating Star
Add To Cart INR 250
CHICKEN SOUP FOR THE SOUL INDIAN FAT... Rating Star
Add To Cart INR 250
CHICKEN SOUP FOR THE SOUL PART 2 Rating Star
Add To Cart INR 280
CHICKEN SOUP FOR THE SOUL PART 3 Rating Star
Add To Cart INR 200
CHICKEN SOUP FOR THE SOUL PART 5 Rating Star
Add To Cart INR 195
CHICKEN SOUP FOR THE SOUL PART 6 Rating Star
Add To Cart INR 250
CHICKEN SOUP FOR THE SOUL TOUGH TIME... Rating Star
Add To Cart INR 220
CHICKEN SOUP FOR THE TEENAGE SOUL BHAG 3 Rating Star
Add To Cart INR 180

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
सौ. जयश्री अनिल आसलकर अमरावती

आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधला मराठमोळा झंझावात - *महारुद्र* काही माणसे मैदान गाजवतात, काही इतिहास घडवतात, काही आपल्या कर्तृत्वाने जग जिंकतात, तर काही आपल्या माणुसकीने मने. पण ज्यांचे कर्तृत्व शब्दांच्या पलीकडचे आणि ज्यांचे माणुसकीचे वैभव वर्णनातीत अशाव्यक्तिमत्त्वाला शब्दांत बांधणे म्हणजे अथांग सागराची विशालता ओंजळीत सामावण्याचा प्रयत्न करणे होय. भीमराव देशमुख हे असेच एक असामान्य व्यक्तिमत्त्व. भीमरावांच्या या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडवणारे ‘महारुद्र’ हे केवळ एका महान फुटबॉलपटूचे चरित्र नाही, तर कर्तृत्व, त्याग, स्वाभिमान आणि माणुसकी यांचा अनमोल जीवनपट आहे त्यांच्या विराट रूपाचे वर्णन करण्यास माझी लेखणी अपुरी पडते आणि शब्दही नतमस्तक होतात. आंतरराष्ट्रीय फुटबॉलच्या मैदानावर आपल्या कर्तृत्वाचा झंझावात निर्माण करणारे भीमराव गावच्या मातीत मात्र सहकाऱ्यांशी समरस होण्यासाठी अनवाणी खेळतात. प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचूनही प्रसिद्धीचा मोह बाळगत नाहीत आणि स्वतःच्या उद्याची चिंता न करता दुसऱ्याच्या अडचणीला धावून जातात. जग जिंकण्याचे सामर्थ्य असतानाही माणुसकी जपणाऱ्या या अवलियाचे मोठेपण त्यांच्या विजयात जितके आहे त्याहून कितीतरी अधिक त्यांच्या त्यागात आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉलच्या मैदानावर कर्तृत्वाचा झेंडा फडकवणाऱ्या भीमरावांकडे निवृत्तीच्या वेळी पैसा, प्रसिद्धी आणि यश सारे काही होते परंतु स्वतःजवळचे इतरांना देऊन टाकण्याच्या त्यांच्या वृत्तीने त्यांना पुन्हा हलाखीच्या परिस्थितीत आणले. स्वतःच्या उद्याची चिंता न करता दुसऱ्याच्या गरजेला प्राधान्य देणाऱ्या या अवलियाने संपत्तीपेक्षा माणुसकीला अधिक मोल दिले. जग जिंकणाऱ्या या खेळाडूने स्वतःसाठी काही जपले नाही पण इतरांसाठी जगण्याचा एक अनमोल आदर्श मागे ठेवला. पुस्तकाचे लेखक श्री. जी. बी. देशमुख यांनी *महारुद्र* च्या माध्यमातून पित्याच्या जीवनातील कर्तृत्व, संघर्ष, त्याग आणि माणुसकीचे जे दर्शन घडवले आहे ते केवळ चरित्र लेखन नाही तर ती एका असामान्य जीवनाला शब्दरूप देण्याची हृदयस्पर्शी साधना आहे. भीमराव देशमुख यांचे व्यक्तिमत्व तसेच कर्तृत्व शब्दांपलीकडचे आणि त्यांचे औदार्य वर्णनातीत. अशा उत्तुंग व्यक्तिमत्त्वाविषयी लिहिताना शब्द अपुरे पडतात आणि अमरावतीच्या ऐतिहासिक वैभवात मोलाची भर घालणाऱ्या कर्तृत्ववान भीमरावांविषयी अभिमानाने मन भरून येते. काही व्यक्तिमत्त्वे इतकी उत्तुंग असतात की त्यांचे वर्णन करण्यापेक्षा त्यांच्यापुढे नतमस्तक होणेच अधिक समर्पक ठरते. लेखक श्री. जी. बी. देशमुख यांचे या अनमोल साहित्यकृतीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! ...Read more

PRATIKSHA
PRATIKSHA by RANJEET DESAI Rating Star
Mahesh Muley

अतिशय सुंदर पुस्तक, आयुष्य जगताना खूप काही हरवले आहे वाटते पण हे पुस्तक नव्याने जगायला आणि आहे ती परिस्थिती स्वीकारायला वाटा शोधायला नवीन प्रेरणा देते, सध्या समाजाची स्थिती बदलली असताना स्त्रियांना आणि त्यांच्या भावनांचा विचार करण्यासाठी नैतिकता जागेकरण्याला हे रणजीत देसाई लिखित पुस्तक खूपच महत्त्वाचे ठरेल... ...Read more