* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: GOLD FINGER
  • Availability : Available
  • Translators : MADHAV KARVE
  • ISBN : 9788177667677
  • Edition : 1
  • Publishing Year : FEBRUARY 2007
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 240
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Print Books:
JAMES BOND 007; A PERSONALITY WHOM WE FIND TO BE VERY REAL, EVEN TODAY, RULING THE WORLD, A HERO ENTERTAINING THE BEAUTIFUL LADIES AND AT THE SAME TIME KILLING THE VILLAINS, A SPY. BOND IS ASSIGNED WITH THE TASK OF FINDING THE SUSPECTED `GOLD FINGER`. HE STARTS REVEALING THE SECRET, ONE BY ONE, HE COMES ACROSS THE CLUES WHILE REACHING THE `GOLD FINGER`, WHO IS CRAZY FOR GOLD AS HIS NAME SUGGESTS, BUT HE RULES HIS GOLDEN KINGDOM TOO. HE HAS SET UP A TERRIBLE PLAN WITH THE RUSSIAN SECRET AGENTS, SMARSH. SO TERRIBLE THAT IT WOULD SHATTER AMERICA WITH THE KILLING OF SO MANY. ACCEPTING THE RELATIONS WITH THE TERRORIST ACTIVITIES. ONLY JAMES BOND CAN STOP THIS CALAMITY. A NEW DRAMA BY BOND, FULL OF SUSPENSE, CHECK AND CHECKMATE, TREACHERY AND CONSPIRACY.
जेम्स बाँड ००७ वास्तव वाटावी अशी, आजही जगावर अधिराज्य गाजवणारी व्यक्तिरेखा. सौंदर्यवतींना रमवणारा आणि खलनायकांना ठेचणारा हिकमती योद्धा, हेर. ‘गोल्डफिंगर’ या संशयास्पद असामीचा वेध घेण्याची कामगिरी बाँडवर सोपवली जाते... रहस्याचे धागे उलगडू लागतात... गोल्डफिंगरला सोन्याचं वेड तर असतंच; पण त्याचं असं सोनेरी साम्राज्यच असतं... ‘स्मर्श’ या रशियाच्या खुनशी हेर संघटनेशी संधान असणा-या गोल्डफिंगरनं एक महाकारस्थानही आखलेलं असतं... मोठा नरसंहार होईल, अमेरिका हादरून जाईल एवढं भयावह... आजच्या अतिरेकी कारवायांशी नातं सांगणारं... ही आपत्ती टाळणं शक्य असतं फक्त जेम्स बाँडला! शह-काटशह, कपट-कारस्थानं, रहस्यानं भारलेलं दमदार बाँड-नाट्य... ‘गोल्डफिंगर!’
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@5%0 #GOLDFINGER #GOLDFINGER #गोल्डफिंगर #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #MADHAVKARVE IAN FLEMING "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAMANA 29-07-2002

    ऑरिक गोल्डफिंगरची गोष्ट... काळ कितीही बदलू दे; कागदी नोटा, प्लास्टिक नोटा, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, आणखी सत्राशे साठ प्रकारची ई-कार्डस् निघोत, अखेर सर्वांत मौल्यवान अशा दोन गोष्टी कायमच राहणार आहेत. जमीन आणि सोनं! यातली जमीन ही अचल आहे, स्थिर आह. त्यामुळे तिच्या विनिमयाला अपरिहार्य मर्यादा आहे, पण सोनं? त्याच्या सहज विनिमयामुळे त्याला कुठेही मुक्त वाव आहे. हे अचूकपणे ओळखलं ऑरिक गोल्डफिंगरने. त्याने हळूहळू, क्रमाक्रमाने ब्रिटनमध्ये, किडुक-मिडुक विकत घेणाऱ्या, सोन्याची किरकोळ खरेदी-विक्री करणाऱ्या दुकानांची साखळी सुरू केली. वरकरणी हा अधिकृत धंदा करतानाच तो सोन्याच्या तस्करीकडे वळला. टनावारी सोनं जमा करून शेवटी हा त्याचं करतो काय, असा प्रश्न बँक ऑफ इंग्लंडचा कर्नल स्मिदर्स याला पडला. आणि तिथून हे प्रकरण ब्रिटिश गुप्तहेर खातं एम.आय.५ चा प्रमुख ‘एम’ आणि त्याचा हुशार हस्तक जेम्स बाँड यांच्याकडे येऊन थडकलं. योगायोग असा की, जेम्स बाँड आणि ऑरिक गोल्डफिंगर यांची एक झडप या अगोदर नुकतीच घडून गेली होती, पण आता तर बाँड अधिकृतपणेच गोल्डफिंगरच्या मागावर सुटला. बाँडच्या लक्षात आलं की, ब्रिटनसह अन्य युरोपीय देशांमधूनही जमा केलेलं सोनं अखेर सोव्हिएत रशियात पोहोचतं. म्हणजे गोल्डफिंगर हा साधा तस्कर नव्हे, तर के.जी.बी. या सोव्हिएत गुप्तहेर संघटनेचा अत्यंत धूर्त असा हस्तक आहे. पण एवढं कळेपर्यंत बाँड गोल्डफिंगरचा कैदी बनतो आणि स्वत:च्या मनाविरुद्ध त्याला गोल्डफिंगरच्या एका लोकविलक्षण योजनेत सामील व्हावंच लागतं. ही योजना असते फोर्ट नॉक्स लुटण्याची. अमेरिकेचं सगळं सोनं जिथे कमालीच्या बंदोबस्तात ठेवलेलं आहे ते फोर्ट नॉक्स हे ठाणं लुटण्याची. अतिशय चित्तथरारक अशी ही कथा इयान फ्लेमिंगच्याच शब्दात वाचली पाहिजे. माधव कर्वे यांनी केलेला मराठी अनुवाद उत्तम. मेहता प्रकाशनाची एकंदर निर्मिती, चंद्रमोहन कुलकर्णींचं मुखपृष्ठ दर्जेदार. ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA SATARA 4-11-2007

    ‘गोल्डफिंगर’ ही जेम्स बाँड या नायकाच्या हुशारीचा एक देदीप्यमान पैलू दाखवणारी थरारकथा. अमेरिकेचा सोन्याचा साठा ज्या अभेद्य इमारतीत आहे, ज्याच्या संरक्षणासाठी घोडदळापासून चिलखती दळाशी संबंधित सैन्याच्या तुकड्या आणि हजारो माणसे तैनातीत आहेत. त्या ‘फोर्टनॉक्स’वर हल्ला चढवून तेथील पंधरा अब्ज डॉलर्स किमंतीच्या सोन्याच्या विटा हस्तगत करून त्या सुरक्षितपणे तेथून बाहेर काढण्याचा एक अफलातून कट गोल्डफिंगर रचतो आणि त्यात जेम्स बाँडलाही तो जबरदस्तीने सामील करून घेतो. त्या कटाची अफलातून महत्त्वकांक्षी कहाणी... जागतिक सुवर्ण व्यवहाराच्या अंगोपंगाची यथार्थ कल्पना देणारी आणि अमेरिकेने जगातील सर्वांत मोठ्या संचयाच्या संरक्षणासाठी उभारलेली कडेकोट यंत्रणा समजावून देणारी ही कहाणी वाचकाची मती गुंग करते. हा गोल्डफिंगर कोण आहे? जेम्स बाँडची आणि त्याची गाठ कशी पडते? गोल्डफिंगरच्या हुशारीला आणि चातुर्याला जेम्स बाँड कसा पुरून उरतो? हे सगळे तपशील या थरारकथेत मोहक रंग भरतात. उत्कंठा वाढवतात. जेम्स बाँड न्यूयॉर्कला जाण्यासाठी मियामी विमानतळावर येतो; पण ते विमान रद्द झाल्याची घोषणा होते. लाऊंजमध्ये ड्रिंक घेत बसलेल्या जेम्स बाँडपुढे तुम्ही मला ओळखलं नसेल- पण आपण भेटलोय आधी...’ असे म्हणत पन्नाशीतला धनाढ्य अमेरिकन उभा राहतो आणि आधीच्या भेटीचे स्मरण देतो. एवढेच नव्हे तर जेम्स बाँडला एक ऑफर देतो. आज रात्री मियामीतच राहून माझा पाहुणचार घ्या... एका समस्येबाबत मला मार्गदर्शन हवयं. पत्त्यांमध्ये तुम्हाला दुहेरी कॅनॅस्टा हा गेम आवडतो का?... बरोबरीच्या भिडूमध्ये बरीच बरोबरी राहू शकेल असा हा गेम... पण त्यात मला एका आठवड्यात २५ हजार डॉलर्सचा गंडा बसला... माझ्या भिडूकडून माझी फसवणूक होतय असे मला वाटते. ही फसवणूक कशी होतेय हे मला कळत नाही.’ जेम्स बाँड विचारतो, ‘हा भिडू कोण आहे?’ ‘ऑरिक गोल्डफिंगर... ब्रिटीश... नॉसॉचा पासपोर्ट... बेचाळीस वय... अविवाहित ब्रोकरचा व्यवसाय.. खूप श्रीमंत असावा. सोन्याच्या व्यवहारात तो पैसा गुंतवतो. सोनं जगभर फिरवतो. जगातल्या धनाढ्य व्यक्तीत त्याची गणना होते.... पण तरी त्याने मला २५ हजार डॉलर्सला गंडा का घालावा हे मला कळत नाही... तुम्ही ते शोधून काढा. त्यासाठी येथे रहा. ते तुम्ही शोधले तर मी तुम्हाला दहा हजार डॉलर्स देईन.’’ ‘तुमचा प्रस्ताव आकर्षक आहे. उद्या रात्री मला न्यूयॉर्कला पोहोचणे भाग आहे. तुम्ही उद्या सकाळी व दुपारी गोल्डफिंगर बरोबर नेहमीसारखं खेळा... मला तुमच्या प्रश्नाचं उत्तर शोधायला बराच वेळ मिळेल. दुसऱ्या दिवशी कॅबॅना क्लबवर गोल्डफिंगर आणि ड्यू पाँट यांचा गेम सुरू होतो. ड्यू पाँट जेम्स बाँडची ‘न्यूयॉर्कमधील मित्र’ म्हणून ओळख करून देतो. गोल्डफिंगरची एक्सरेसारखी नजर आपला आरपार वेध घेत आहे असे जेम्स बाँडला वाटते. हा आपली प्रचंड सुप्त ऊर्जा कशात वापरत असणार? श्रीमंत होण्यात? असा प्रश्न जेम्स बाँडला पडतो. काही वेळ तो दुरून निरीक्षण करतो़. गोल्डफिंगरला त्याच्या जागेवरून काय दिसत असेल असा प्रश्न तो स्वत:लाच विचारतो... समोरच त्याची हॉटेलमधली रूम असते... बाल्कनी... दार... आणि जेम्स बाँड गोल्डफिंगरच्या त्या खोलीत प्रवेश मिळवतो. कॅमेरा बरोबर असतो. तेथे दुर्बिण घऊन बसलेली एक तरूणी दिसते. ती दुर्बिणीतूद ड्यू पाँटच्या हातातले पत्ते बघून काही सूचना देत असते. जेम्स बाँड तिचे फोटो काढतो... तिला सांगतो, ‘मी तुला काही करणार नाही. तुला घाबरल्याबद्दल सॉरी... तू गोल्डफिंगरला पत्ते सांगणे थांबवलेस तर तो काय करील? खेळ बंद करील?’ ‘नाही. प्लग निघाला किंवा काही तरी झाले तर संपर्क तुटतो. तोपर्यंत तो थांबून राहतो.’ गोल्डफिंगरला मग जेम्स बाँड त्या मायक्रोफोनवरून सांगतो, मी जेम्स बाँड बोलतोय... ड्यू पाँटला तुम्ही आतापर्यंत खूप संपलाय... इथली तरुणी, दुर्बिण, मायक्रोफोन, श्रवणयंत्र - सर्व फोटो मजजवळ आहेत. ते मी एफबीआय वा स्कॉटलंड यार्डला पाठवणार नाही... चेकबुक काढा. त्यावर पन्नास हजार डॉलर्स आकडा लिहा. पस्तीस हजार डॉलर्स ड्यु पाँटकडून मिळवलेले... दहा हजार माझी फी... पाच हजार ड्यु पाँटचा वेळ वाया घालवला म्हणून. चेक व्यवस्थित वटेल असे बघा... रात्रीचे माझे हॉटेल मधील बुकिंग करा... काही गडबड केली तर हे सर्व फोटो व बातमी जगजाहीर होईल...मी माझ्याबरोबर ओलीस म्हणून या तरुणीला माझ्याबरोबर न्यूयॉर्कला नेतोय. गोल्डफिंगरशी जेम्स बाँडचा झालेला हा पहिला सामना. दुसरा सामना होतो. गॉल्फ कोर्सवर फक्त एकाच आठवड्याने. त्यातही गोल्डफिंगर जेम्स बाँडला फसवू पाहतो. पण जेम्स बाँड त्याला रंगेहाथ पकडतो. तिसरा सामना होतो तो जेम्स बाँडला बँक ऑफ इंग्लडमधून गोल्डफिंगरच्या सोन्याच्या खरेदीच्या संबंधातील व्यवहाराची चौकशी करण्याची कामगिरी सोपल्यावर! जेम्स बाँड त्या कामगिरीवर असताना गोल्डफिंगरच्या निवासस्थानाला भेट देतो; तेथील कोरियन व जर्मन सुरक्षा कर्मचाऱयांना न्याहाळतो.... त्या ठिकाणी असणाऱ्या प्रयोगशाळेला भेट देतो... त्या प्रयत्नात गोल्डफिंगर त्याला पकडतो... त्याला ठार मारण्याचा विचार रद्द करून, फोर्ट नॉक्समधील सोन्याचा प्रचंड साठा पळवण्यासाठी उपयोग करून घेण्यासाठी त्याचा वापर करण्याचा घाट घालतो. त्यासाठी डेट्रॉइट, मियामी, शिकागो, लासवेगास, सिसिली येथील प्रमुख माफिया टोळ्यांची मदत घेतो. तुम्हाला एकेक अब्ज डॉलर्सचे सोने मिळेल; अशी ऑफर देतो. ‘ऑपरेशन ग्रँडस्लम’ असे या प्रकल्पाला नाव देतो. जेम्स बाँड ती योजना ऐकून म्हणतो, तू पाण्यात जीमी हे द्रव्य मिसळून फोर्ट नॉक्स परिसरात राहणाऱ्या साठ हजार लोकांना मारणार... पाचशे टन सोने ट्रेनने रशियन युद्धनौकेपर्यंत नेणार... शुद्धीवर आहेस का? गोल्डफिंगर हा एक प्रतिभावंत कलाकार होता. गुन्हेगारी शास्त्रज्ञ फोर्ट नोक्सवर दरोडा घालण्याची त्याची अफलातून योजना कोणालाही भयचकित करावं अशीच होती. जेम्स बाँड ही मोहीम त्याच्यावरच उलवटतो. इंग्लिश माणसांना फार कमी लेखतोस. त्यांची गती मंद असेल पण ते पोहोचायचं तिथं पोहोचतात. रशियातून तू सुरक्षित राहशील असं तुला वाटतं. गोल्डफिंगर ज्या विमानातून रशियाकडे निघाला आहे, त्यात जेम्स बाँडही असतो. त्याच्यावर लक्ष ठेवणारा कोरियन ऑडजॉबही असतो आणि त्या मोहिमेत सामील झालेली बायकांची गँग चालवणारी पुसी गॅलोरही असते. त्या विमानात तीन टन सोन्याच्या विटाही असतात... जेम्स बाँड त्या विमानातून सुटण्यासाठी अफलातून युक्ती लढवतो. विमानाच्या एका खिडकीची काच फुटावी अशी क्लृप्ती लढवतो. त्यामुळे येणाऱ्या वाऱ्याच्या झोतात ऑडजॉब खेचला जातो. त्या विमानातून जेम्स बाँड लंडनच्या गॅन्डर नियंत्रण केंद्राशी आणीबाणीचा संपर्क साधावा, ‘आयडलवाइल्ड या ठिकाणी जी एएजीवाय स्पीडबर्डचं अपहरण झालं. या अपहरणाला जबाबदार असणाऱ्या माणसाला मी मारलयं. केबिनमधला हवेचा दाब घालवून विमान अंशत: निकामी केलंय... बंदूक दाखवून विमानतल्या कर्मचाऱयांना शरण आणलयं... गूज वे पर्यंत पोचण्याएवढं इंधन आमच्याकडे नाही. जवळ उतरावं लागेल. समुद्रात आमचे विमान कोसळले.’ रडार व आमचे लक्ष राहील... तुमच्या स्वागतासाठी आम्ही तयार असू असा प्रतिसंदेश येतो. आणि जेम्स बाँड अखेर जायबंदी होऊन का होईना पण मिस पुसो गॅलोरबरोबर सुरक्षित स्थळी अवतरतो. फोर्ट नॉक्सवरील महत्त्वाकांक्षी दरोड्याची ही अफलातून योजना वाचताना (किंवा चित्रपटात बघताना) वाचक त्या पार गुंतून जातो. जेम्स बाँडच्या एकूणच थरार कथांमध्ये गोल्डफिंगर सोन्यासारखीच झगमगीत चकचकीत वाटते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
कौशिक लेले

पुस्तक – अनुवादातून अनुसर्जनाकडे (Anuwadatun Anusarjanakade) लेखिका – लीना सोहोनी (Leena Sohoni) भाषा – मराठी पाने – २३९ प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस. फेब २०२४ छापील किंमत – रु. ३७०/- ISBN – 9789357205337 ह्या परिचयाची माझी वेबसाईट लिंक htps://learnmarathiwithkaushik.com/courses/anuwadatun-anusarjanakade/ मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं. भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ढोबळमानाने बघितलं तर, अनुवाद म्हणजे तर एका भाषेतल्या शब्दांच्या ऐवजी दुसऱ्या भाषेतले शब्द वापरणे. पण प्रत्येक वेळी एका शब्दाच्या बदल्यात दुसरा भाषेतला एक शब्द असं होतंच असं नाही. त्यामुळे काही वेळा शब्दाची फोड करून दाखवावी लागते. तर काही वेळा मूळ मोठं वाक्य लहान होऊ शकतं. कदाचित तिथे पूर्णपणे वेगळीच शब्दयोजना वाक्यरचना होऊ शकते. या प्रत्येक प्रकाराला एक विशिष्ट शास्त्रीय नाव (पारिभाषिक संज्ञा) आहे हे आपल्याला पुस्तक वाचून कळतं. जे शब्दांच्या बाबतीत तेच वाक्यांच्या बाबतीत. मूळ भाषेतल्या शब्दांसाठी नवीन शब्द वापरून वाक्य तयार झालं तरी ते वाचकाला सहज वाटलं पाहिजे. नाहीतर आपण लगेच म्हणू, “अनुवाद खूप बोजड झाला आहे; ठोकळेबाज झाला आहे”. हे टाळायचं तर वाक्यरचना सुद्धा सुधारायला पाहिजे. याची उदाहरणे पुस्तकात दिली आहेत आणि त्या अनुषंगाने पारिभाषिक संज्ञा (terminology) काय आहे हे मराठी आणि इंग्रजी दोन्हीत दिलं आहे. शब्द, वाक्य ह्यांना लावलेल्या कसोटीचा विस्तार करून ती कसोटी “संकल्पनां”ना लावायला पाहिजे. एखाद्या भाषेत, एखाद्या समाजात असणाऱ्या संकल्पना, प्रथा-परंपरा मराठी भाषेत नसतील तर अनुवाद करताना ते जसंच्या तसं ठेवायचं का तिथे काही वेगळी संकल्पना वापरायची ? का तळ टीप देऊन स्पष्टीकरण द्यायचं? असे एकाच गोष्टीकडे बघण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. हा मुद्दा आपण सोदाहरण स्पष्ट केला आहे. हा ऊहापोह वाचल्यासार अनुवादासाठी दोन्ही भाषांवर आपली किती चांगली पकड पाहिजे हे वाचकाच्या लक्षात येईल. त्याचबरोबर जे पुस्तक आपण वाचतोय त्याची पार्श्वभूमी, त्यातल्या प्रसंगाची सामाजिक पार्श्वभूमी, आणि लेखकाला काय ध्वनीत करायचे आहे हे सगळं समजणं सुद्धा किती महत्त्वाचं हे लक्षात येईल. म्हणजे अनुवाद प्रक्रिया दिसताना शब्दांची दिसली तरी “शब्दांच्या पलीकडले” अनुवादकाला पकडता आले तरच मूळ कृतीला न्याय मिळेल. हे या पुस्तकाच्या वाचनातून अधोरेखित होतं. पुस्तकाचा प्रकारानुसार अनुवादकासमोर असणारी आव्हाने सुद्धा बदलतात. कथा-कादंबरीचा अनुवाद वेगळा तर कवितेचा अनुवाद वेगळा. कारण कवितेमध्ये भावभावनांना महत्त्व आहे तितकेच महत्त्व शब्द, लय, शब्दचमत्कृती यांनाही आहे. म्हणूनच तर ते पद्य आहे गद्य नाही. लीनाजींनी ह्याचाही परामर्श घेतला आहे. नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने अजून वेगळी. परिणामकारक संवाद, नेपथ्य, पात्रांची देहबोली, त्याचा प्रेक्षकांवर होणारा परिणाम या सगळ्याचा विचार करून अनुवाद करावा लागतो. म्हणूनच, अनुवाद म्हणजे प्रत्येक वेळी “शंभर टक्के पुस्तक जसेच्या तसे” असं नसतं. तर काही वेळा ते रूपांतर ठरतं. काही वेळा तो स्वैर अनुवाद ठरतो. तर काही वेळा मूळ कलाकृतीवर आधारित नवीन कलाकृती ठरते. हे सुद्धा कितीतरी उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे. हे सगळे मुद्दे एकमेकांशी निगडित आहेत त्यामुळे पुस्तकात बऱ्याच वेळा मुद्द्यांची पुनरावृत्ती झाली आहे असं मला वाटलं. ती पुनरुक्ती टाळून कदाचित थोडी पानं कमी करता आली असती. पण मुद्दा वाचकाच्या मनावर ठसावा, कुठलंही विशिष्ट प्रकरण वाचायला घेतले तरी ते त्या मुद्द्यापुरतं पूर्ण असावं हा त्यामागचा हेतू असेल. पुस्तकात पुढे अनुवादकांना नोकरी, व्यवसायाच्या काय संधी आहेत; कुठल्या संस्था याबद्दलचं शिक्षण देतात; कुठले कोर्सेस उपलब्ध आहेत याबद्दलचा तपशील आहे. अनुवाद करायला सुरुवात करायची असेल तर मजकूरनिवड, प्रकाशकांशी संपर्क, परवानगी ह्याचे मार्गदर्शन आहे. त्यांनतर शाळेत आपण जे प्राथमिक व्याकरण शिकतो; म्हणजे कर्ता, कर्म, क्रियापद, ॲक्टिव-पॅसिव्ह व्हॉइस, वेगवेगळे काळ इत्यादींच्या व्याख्या देऊन सगळ्याची उजळणी केली आहे. ज्याला अनुवाद क्षेत्रात उतरायचे आहे त्याला व्याकरणाचा अजून बराच अभ्यास करावा लागणारच आहे. आणि पुस्तकाचा उद्देश व्याकरण शिकवणं नाही तर अनुवादकासाठी व्याकरण अत्यावश्यक आहे हे ठसवणं आहे. त्यामुळे व्याकरणाचा भाग पुस्तकात नसता तरी चालला असता असं मला वाटलं. पुस्तकातील काही पाने वर दिलेल्या लिंकवर शेअर केली आहेत. म्हणजे तुम्हाला पुस्तकाची, लेखनशैलीची अजून चांगली कल्पना येईल. त्यात पुढील मुद्द्यांबद्दलची पाने आहेत १) अनुवादिका म्हणून येणारे कटुगोड अनुभव. २) प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर ह्यांच्या पुस्तकांचा मराठी अनुवाद लीनाजींनी केला आहे. त्यातून जेफ्री आर्चर ह्यांच्याशी भेटीगाठी झाल्या त्यातला एक प्रसंग. ३) अनुवादाचे वर्गीकरण/प्रकार सांगणाऱ्या प्रकरणातली दोन पाने. अनुवाद प्रक्रियेची किती बारकाईने तांत्रिक चिकित्सा केली आहे हे लक्षात येईल. ४) नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने ह्याबद्दलच्या प्रकरणातली दोन पाने. लीना सोहोनींचे आत्मकथन असणारा पुस्तकाचा पहिला भाग सर्व वाचकांना वाचायला आवडेलच. पुस्तकाचा दुसरा भाग तांत्रिक आहे. तो सर्वसामान्य वाचकाला वाचायला आवडेलच असं नाही. पण तो वाचल्यावर अनुवादक म्हणून काम करताना किती कटकटी असतात, काय व्यवधानं सांभाळावी लागतात हे वाचकाच्या लक्षात येईल. त्यातून अनुवादकांकडे व त्यांच्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून कौतुकाचा आणि कृतज्ञतेचा होईल हे निश्चित. ज्यांना अनुवाद करायचा आहे, या क्षेत्रात शिरायचं आहे किंवा तशी उमेदवारी सुरू झाली आहे त्यांना हा भाग मार्गदर्शक ठरेल. जाण वाढवेल हे नक्की. त्यामुळे या पुस्तकाच्या वाचनातून अनुवादाचा किडा काही वाचकांच्या डोक्यात गेला आणि त्यातून नवे अनुवादक मराठीत निर्माण झाले तर ते सोन्याहून पिवळे ! मराठीत कथा,कादंबऱ्या, चरित्र, सामाजिक विषयांची चर्चा ह्या पद्धतीचे लेखन भरपूर होत असतं. पण ह्या पुस्तकाप्रमाणे शास्त्रीय/तांत्रिक चिकित्सा करणारी, गंभीरपणे शिकवणारी पुस्तकं कमी दिसतात. ती प्रकाशित झाली तरी ती क्रमिक पाठ्यपुस्तक किंवा “अभ्यासाचे पुस्तक” या प्रकारात ढकलली जातात आणि दुर्लक्षित होतात. पण या पुस्तकाच्या लेखिका आणि प्रकाशक यांनी हे पुस्तक मुख्यधारेतल्या पुस्तकाप्रमाणे सादर केलं आहे. त्यातून हे पुस्तक जास्त वाचलं जाईल; जास्त लोकांना विचार प्रवृत्त करेल असं मला वाटतं. अशा प्रकारची पुस्तकं मराठीत प्रकाशित होणे हे मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्यासाठी मोठे योगदान आहे. त्याबद्दल प्रकाशक आणि लेखिका दोघांचेही एक मराठी भाषा प्रेमी म्हणून मी मनापासून आभार मानतो. —————————— मी दिलेली पुस्तक श्रेणी —————————— अनुवाद करणारे असाल किंवा करायची इच्छा असेल तर आवा ( आवर्जून वाचा ) इतरांनी जवा ( जमल्यास वाचा ) ——————————— आवा ( आवर्जून वाचा ) जवा ( जमल्यास वाचा ) वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक ) नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक ) ...Read more

OMKARACHI REKH JANA
OMKARACHI REKH JANA by MANJUSHRI GOKHALE Rating Star
सौ. जस्मिन जोगळेकर

आमच्या पुस्तकप्रेमी समुहावरचा एकही दिवसाचा खंड न पडता सलग 1730 वा पुस्तक परिचय पुस्तक प्रेमी समूह,पुस्तक परिचय अभियान: एकही दिवस खंड पडू न देता पुस्तकांचा परिचय हे पुस्तकप्रेमी समूहाचे यश ! पुस्तक सत्र:- ३ सप्ताह क्रमांक:- २४८ पुस्तक क्रमांक: १७३० दिनांक: १०/०३/२०२५ पुस्तकाचे नांव:- ओंकाराची रेख जना लेखक:- मंजुश्री गोखले पहिली आवृत्ती: फेब्रुवारी २०१२ पृष्ठ संख्या : ३०८ मूल्य: रु. ३२० प्रकाशन: मेहता पब्लिशिंग हाऊस परिचयकर्ती: सौ. जस्मिन जोगळेकर एखाद्या गोष्टीसाठी वेळ यावी लागते म्हणतात, तसं काहीसं झालं माझं. खरंतर पुस्तक वाचनाच्या बाबतीत असं व्हायला नको होतं पण झालं. `हे खूप सुंदर पुस्तक आहे, तुम्ही वाचाच` म्हणून एक पुस्तक आमच्या हाती आलं. अर्थात ज्यांनी सांगितलं त्यांनी त्यांच्या संग्रहातलं पुस्तक दिलं होतं. तसं बरेच दिवस होतं आमच्याकडे. नवऱ्याने वाचून खूपच सुंदर आहे, वाच नक्की सांगितलं देखील मला. पण पुस्तक परत द्यायची वेळ आली तरी वाचलं गेलं नाही. तरी ते नाव डोक्यात फिट बसलं होतं. अखेर एक दिवस ते एकच पुस्तक नव्हे तर त्याच लेखिकेची चार पुस्तकं विकतच घेऊन आले आणि मग ती वेळ आली…. त्या पुस्तकाच्या, पुस्तकातील भाषेच्या आणि त्या लेखिकेच्या प्रेमात पडण्याची. पुस्तक होतं…मंजुश्री गोखले यांनी संत जनाबाईंवर लिहिलेलं `ओंकाराची रेख जना`. `विठू माझा लेकुरवाळा`, `धरिला पंढरीचा चोर` अशा अभंग रचनेतून जनाबाई आपल्या ओळखीच्या आहेत. किंवा विठूराया त्यांना हर कामात मदत करत असतो वगैरे माहीत आहे. पण त्यांचं संपूर्ण चरित्र सगळ्यांना माहीत असेलच असं नाही. ते माहीत करून देण्याचं सुरेख काम या कादंबरीने केलं आहे. जनाबाईंच्या जन्मापूर्वीची आणि नंतरचीही त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती, छोट्या जनाला मागे ठेऊन दुखण्याने तिला सोडून गेलेली तिची आई, त्यानंतरची बिकट वेळ याचं वर्णन वाचताना डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पुढेही काही प्रसंग असे आहेत…भागाबाईचं वागणं असेल किंवा सुळावर चढवायचा प्रसंग असेल… डोळ्यात पाणी येतच राहतं. पण एवढं होऊनही त्यांची पंढरीरायावरची भक्ती मात्र गाढ होती. जनाईसुध्दा त्याला पाहायला आतुर होती. सोसले चटके l पोटी नाही घास l विठ्ठलाची आस l जनाईला ll भेटीसाठी त्याच्या l गोळा तनमन l धाडे आवतान l विठूराया ll अखेर विठुरायाकडून आमंत्रण आल्यावर बापलेक पंढरीची वाट चालू लागतात. काळया देवाला पाहायला आसुसलेली जना आणि लेकीला कायमचं परक्या घरी सोडून यायचं या विचाराने जडावलेला दमा… नशिबाची रेख l भिवरेच्या काठी l विठूराया ओढी l जनाईची ll दोघांचा प्रवास विठ्ठलाच्या विश्वासावर सुरू होतो. पुढं जनाईला दामाशेटींच्या घरी सोडून देणं, त्या घराने जनाला आपलंच म्हणणं, नामदेवांसोबत तिचं मोठं होणं अशा कितीतरी प्रसंगांनी सुखावून जायला होतं. तेव्हाची सामाजिक परिस्थिती, जनाचं अतिशूद्र असणं आणि त्यातून स्त्री असणं…त्यासाठी तिला झेलावे लागणारे त्रास, संत म्हणून मोठेपण मिळाल्यावरही त्यांच्यावर आलेला चोरीचा आळ… त्रास होतो वाचताना. जनाची आणि विठ्ठलाची पहिली भेट आणि तिथून त्यांच्यात दृढ होत जाणारे नाते…वाचताना शहारून जायला होतं. जना ते संत जनाबाई हा प्रवास, त्यात जनाबाईंनी रचलेले अभंग, ज्ञानदेवादि भावंडांचा सहवास आणि मुख्य म्हणजे नामदेव आणि जनाबाई यांचे नाते… गुरू शिष्य ऐसी l जोडी कौतुकाची l जनी नामयाची l संतांमधे ll याबद्दल पुस्तकात आलेले उल्लेख मन लावून वाचण्यासारखे आहेत. विठ्ठलाच्या चरणी झालेला जनाबाईंच्या जीवनाचा शेवट म्हणजे तर 🙏 वृंदा कोमेजली l स्तब्ध वारा पाणी l ओघळले मणी l मंजिऱ्यांचे ll थरारली वीट l कंप राऊळाला l श्वास ओलावला l क्षणभर ll आज नाही घाई l विठोबाला काही l जनाईच येई l चरणाशी ll शांता शेळके यांनी अनुवाद केलेलं `चौघीजणी` जसं मनात कायमचं घर करुन बसलं आहे, त्या जोडीला आता `ओंकाराची रेख जना` हे ही अत्यंत आवडीचं झालं आहे. यापूर्वी संत साहित्य किंवा संतांवर लिहिलेलं साहित्य फारसं वाचलं नव्हतं. लताजी किंवा भीमसेनजींमुळे घराघरात पोहोचलेले अभंग तेवढे माहीत होते. त्यामुळं जनाबाईंवर लिहिलेल्या या पुस्तकाबाबत उत्सुकता होतीच. पहिल्या प्रकरणाच्या अगदी पहिल्या ओळीपासून या पुस्तकाशी जी बांधली गेले ते शेवटपर्यंत. पुस्तकातील सगळं वर्णन अगदी बारीक सारीक तपशील देऊन पुढं जात राहतं आणि त्यात आपल्याला गुंतवून ठेवतं. सुरुवातीची काही प्रकरणं तर डोळ्यात अश्रुंच्या धारा घेऊन, पुसट अक्षरं समोर ठेऊन वाचावी लागतात. प्रसंग सगळे l तपशिलासवे l डोळ्यात आसवे l वाचुनिया ll भाषा ही साजिरी l सत्य हेच वाटे l प्रसंग तो घडे l आसपास ll एकूणच पुस्तकातलं वर्णन इतकं जिवंत आहे की सगळे प्रसंग आपल्या आसपास घडताहेत असंच वाटत राहतं कायम. दमा - कुरुंडचं दुर्दैवी आयुष्य, पोटी मूल नसल्याचं त्यांचं दुःख, विठ्ठलाला त्यासाठी साकडं घालण्यासाठी त्यांनी केलेला पंढरपूरचा प्रवास असो किंवा जनाबाईंच्या खोलीत येऊन विठ्ठलाने त्यांच्याशी मारलेल्या गप्पा, त्यांना कामात केलेली मदत…. सगळे अगदी सगळे प्रसंग आपणच जगतोय असं वाटावेत इतके मनाला भिडून जातात. काही ठिकाणं तर अशी… `अरे विठ्ठला, गडबडीत भलतंच काय उचलतोस. तुझा रत्नहार आणि शेला तर घेऊन जा`...असं आपणच विठ्ठलाला हाक मारून सांगावं असं वाटायला लागतं वाचताना. भाषा, वर्णनशैली फार साजिरी आहे. पुस्तकातला `साजिरी` हा शब्द एकदम आवडून गेलाय. एखादा चेहरा पाहिल्यावर कसं आपल्याला कळून जातं ना की, ही व्यक्ती मायाळू आहे किंवा तुसडी आहे वगैरे…तसं पुस्तकाच्या सुरुवातीलाच यातल्या भाषेबद्दल आपुलकी, प्रेम वाटायला लागतं. भाषा साधी पण सुंदर, शब्दांचा वापर असा की यापेक्षा वेगळा शब्द इथं शोभला नसता असं वाटायला लागेल असा. अनवाणी पायाला चटके बसावेत इतकं हवामान अजून बदललं नव्हतं…यासाठी `अजून मातीने माया सोडली नव्हती`... किती सुरेख वाक्य आहे ना! अशी कितीतरी वाक्य आपल्याला त्यांच्या प्रेमात पाडायला लावणारी यात सापडतील. एकूणच सांगायचं झालं तर पुस्तक अप्रतिम आणि सगळ्यांनी आवर्जून वाचावं असंच आहे. एकाच लेखकाची पुस्तकं सलग एका मागोमाग एक अशी माझ्याकडून वाचली जात नाहीत. पण आता खुणावतंय ते… `जोहार मायबाप जोहार`. ...Read more