* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Print Books:
MMA RAMOTSWE, WHO BECAME ENGAGED TO MR J.L.B. MATEKONI AT THE END OF THE FIRST BOOK, IS STILL ENGAGED. SHE WONDERS WHEN A DAY FOR THE WEDDING WILL BE NAMED, BUT SHE IS ANXIOUS TO AVOID PUTTING TOO MUCH PRESSURE ON HER FIANCE. FOR INDEED HE HAS OTHER THINGS ON HIS MIND - NOTABLY A FRIGHTENING REQUEST MADE OF HIM BY MMA POTOKWANI, PUSHY MATRON OF THE ORPHAN FARM.MMA RAMOTSWE HERSELF HAS WEIGHTY MATTERS ON HER MIND. SHE HAS BEEN APPROACHED BY A WEALTHY LADY - WHOSE FORTUNE COMES FROM SUCCESSFUL HAIR-BRAIDING SALONS - AND HAS BEEN ASKED TO CHECK UP ON SEVERAL SUITORS. ARE THESE MEN JUST INTERESTED IN HER MONEY? THIS MAY BE DIFFICULT TO FIND OUT, BUT MMA RAMOTSWE IS, OF COURSE, A VERY INTUITIVE LADY . . .
डिटेक्टिव्ह एजन्सी चालवणारी प्रौढ स्त्री मॅडम रामोत्स्वे... गॅरेज मालक असलेले प्रेमळ पण भिडस्त सद्गृहस्थ मातेकोनी... रामोत्स्वेचा आणि त्यांचा वाङ्निश्चय झालाय... पण लग्न मात्र मातेकोनी लांबणीवर टाकताहेत... आनाथालयाची चालक-मालक मॅडम पातोक्वानी या कंजूष पण सुस्वभावी आणि धाडसी स्त्रीने मातेकोनींसमोर ठेवलंय विमानातून पॅराशूटच्या साह्याने उडी मारण्याचं आव्हान... मातेकोनी ते आव्हान पूर्ण करतात का? रामोत्स्वेचं आणि त्यांचं लग्न होतं का? या प्रश्नांची सुंदर गुंफण ‘द फुल कबर्ड ऑफ लाइफ’ या कादंबरीत पाहायला मिळते. द नंबर वन डिटेक्टिव्ह एजन्सी या गाजलेल्या मालिकेवर चित्रपटही प्रदर्शित झाला आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#फुलकबर्डऑफलाइफ #अलेक्झांडरमॅक्कॉलस्मिथ #नीलाचांदोरकर #बोट्स्वाना #मॅडमरामोत्स्वे #मातेकोना #मॅडममाकुत्सी #मॅडमपातोक्वानी #जीवजिथेगुंतला #हाऊस्टारबक्ससेव्ह्डमायलाइफ #टीअर्सऑफदजिराफ # मोरॅलिटीफॉरब्यूटिफुलगल्स #THEFULLCUPBOARDOFLIFE #ALEXANDERMCCALLSMITH #BOTSWANAMADAMRAMOTSWE #MATEKONI #MADAMPOTOKWANI #MAKUTSI #MADAMMOCHUDI #JEEV JITHE GUNTALA # MORALITYFORBEAUTIFUL GIRLS #UNCONDITIONALLOVE #TEARSOFTHEGIRAFFE #HOWSTARBUCKSSAVEDMYLIFE
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKMAT 25-08-2019

    स्त्री गुप्तहेराचा रंजक शोध... आपल्या देशाबाहेर पाऊलही न ठेवलेल्या आणि फारसं शिक्षण नसलं तरी त्याची उणीव निसर्गनिर्मित हुशारीने भरून काढणाऱ्या आफ्रिका खंडातील बोटस्वाना या एका समृद्ध देशातील एकमेव खासगी स्त्री गुप्तहेराची कथा म्हणजे ‘द फुल कबर्ड ऑफ ाइफ’ ही अलेक्झांडर मॅक्काल स्मिथ लिखित कादंबरी होय. या कादंबरीचा मराठी अनुवाद नीला चांदोरकर यांनी केला आहे. बोटस्वानात घडणाऱ्या घटनांवर आधारित काही पुस्तके लेखक अलेक्झांडर स्मिथ यांनी यापूर्वी वाचकांच्या हाती सोपवली आहेत. सार्थकी लागणारं आयुष्य माणूस निश्चितपणे जगू शकतो, असा साधासोपा जीवनाचा मथितार्थ ही पुस्तके सांगून जातात. मॅडम रामोत्सवे या महिला गुप्तहेराची ही उत्कंठावर्धक व संवेदनशील मनाचा भावस्पर्श उलगडणारी ही कादंबरी... – दीपक कुलकर्णी ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more