* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
 • Ebooks:
 • Print Books:
TAMASHA, THE TRADITIONAL MARATHI FOLK THEATRE WAS STANDING ON FOUR MAJOR PILLARS- DRAMA, EROTIC SENSUAL LAVANI SONGS AND TRADITIONAL RHYTHMIC MUSIC PLAYED ON PERCUSSIONAL INSTRUMENTS LIKE DHOLKI. ALONG WITH SUCH SOCIAL AND HISTORICAL DRAMAS PLAYED IN THE TAMASHA MOBILE THEATRES IN THE JAMBOREE OF VILLAGE FAIRS, THE GALAXY OF MANY GREAT ACTORS AND FEMALE ARTISTS HAD ALSO CREATED THEIR OWN SIGNIFICANT LORE. VISHWAS PATIL HAS INTERWOVEN HIS NEW NOVEL ON THAT BACKDROP OF MOBILE TAMASHA TROOPS’ HERITAGE AND CULTURE. HERE, PROTAGONISTS ARE BAKERAO, WHO IS A GREAT SINGER, MUSICIAN AND A PROLIFIC ACTOR. BEAUTIFUL RANGAKALI IS THE CREATOR OF HER OWN NEBULA OF SONGS, DANCES AND ACTING. THIS IS A PAINFUL LOVE STORY BETWEEN BAKERAO AND RANGAKALI’S PASSION AND ATTRACTION TOWARDS EACH OTHER’S LEGENDARY ARTISTIC VIRTUES. THEIR SEPERATION IS UNAVOIDABLE BUT THEIR REUNION IS ENCHANTING, AND FINALLY, THAT PUREST LOVE MARCHES TOWARDS THE COBWEBS OF DESTINY. A POWERFUL NOVEL WRITTEN BY TODAY’S MAJOR INDIAN NOVELIST ON THE BACKDROP OF FOLK SONGS, DRAMA AND CULTURE, WILL SURELY ENAMOR THE READERS AND WILL TAKE THEM THROUGH AN ENTIRELY NEW, UNKNOWN AND CAPTIVATING WORLD.
बाकेराव आणि गगनरावचा नामवंत फड...बाकेराव एक गुणी तमाशा कलावंत...त्याच्या जीवनात चाळिसाव्या वर्षी रंगकली नावाची सोळा-सतरा वर्षाची कलावती येते...दोघं एकमेकांच्या कलेवर लुब्ध होतात...विवाहाच्या बंधनात अडकतात...दोघांचंही कलाजीवन बहरतं...पण एका मोहाच्या क्षणी रंगकलीचा पाय घसरतो...बाकेराव तिचा तिरस्कार करायला लागतो...रंगकली गर्भवती असताना फड सोडून निघून जाते...बाकेराव-गगनरावचा वाद विकोपाला जाऊन फड मोडतो...पुढे काय होतं हे जाणून घेण्यासाठी ‘गाभुळलेल्या चंद्रबनात’ वाचायलाच हवं...तमाशा कलावंतांची कला आणि त्यांचं जीवन यांच्या एकमेकांत गुंफलेल्या धाग्यांचं वास्तव चित्रण
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#गाभुळलेल्याचंद्रबनात #विश्वासपाटील #संभाजी #नागकेशर #क्रांतिसूर्य #बंदारुपाया #नॉटगॉनविथदविंड #मराठीसाहित्य #कादंबरी #मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #GABHULELYACHANDRABANAT # VISHWASPATIL #SAMBHAJI #NAGKESHAR #KRANTISURYA #BANDARUPAYA #NOTGONEWITHTHEWIND #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
 • Rating StarVasantrao Jagtap

  "गाभुळलेल्या चंद्रबनात..." लेखक : पानिपतकार विश्वास पाटील.. --------------------------- अत्यंत टोकाच्या संघर्षातून एका लोककलावंतांने मिळवलेले सर्वोच्च यश, व त्यातून त्यातून मिळालेली प्रतिष्ठा...व त्यामुळे गावकऱ्यांनी त्याची काढलेल भव् मिरवणूक.... ....अशा क्लायमँक्समधून सुरू होणारे कथानक...! जेष्ठ व श्रेष्ठ लेखक मा.विश्वास पाटील (IAS) यांच्या सिद्धहस्त लेखनीतून साकारलेली, दोन महान लोककलावंतांची अद्भूत व तितकीच रोमहर्षक प्रेमकहाणी म्हणजे, ..."गाभुळलेल्या चंद्रबनात...!!" बाकेराव व रंगकली...दोघेही प्रतिभासंपन्न कलावंत , यांची ही प्रेमकहाणी..!! कलेचे वेड घेऊन,स्वत:च्या आईबरोबर घरदार सोडून तमाशाच्या फडात दाखल झालेला कलावंत म्हणजे बाकेराव... तर बापाचा ऐश्वर्यसंपन्न वारसा लाभलेली रुपगर्विता म्हणजे रंगकली...! सवाल-जबाबाच्या एका सामन्यात बाकेरावकडून हारल्यानंतर , त्याच्या प्रतिभेवर नितांत प्रेम करनारी नायिका..! व त्या प्रेमापोटी वयाचे अंतर न पाहता, त्याच्या कलाजीवनाची अर्धांगीनी म्हणून तिने स्वत:च्या जीवनाची ठरवलेली दिशा....व त्यातून दोघांनी मिळून सजवलेला तमाशा फड प्रचंड यश मिळवत असताना, रंगकलीकडून एका बेसावध क्षणी चुकून घडलेली तारूण्यसुलभ चूक, दोघांचेही कलाजीवन ऊद्ध्वस्त करून जाते...!! याचाच गैरफायदा `गगनआप्पा` नावाचा खलनायक घेतो... बाकेराव व रंगकलीच्या जीवनात त्यानंतर आलेले वादळ दोघांचेही कलाजीवन ऊद्ध्वस्त करून जाताना,दोघांनाही विलगतेच्या दु:खाच्या खाईत लोटून जाते..! बाकेरावपासून दूर गेल्यानंतर शापित ठरलेल्या ह्या अप्सरेला मात्र तिचे आरसपानी सौंदर्यच तीचे शाप ठरले जाते,व त्यामुळे तिचे होणारी दुर्दशा वाचून, वाचकाचे ह्रुदय हेलावल्याशिवाय राहात नाही..! तर रंगकलीशिवाय एकट्याने कला सादर करताना , बाकेरावला त्यातील जाणवनारा `शुष्कपणा` त्यालादेखील नैराष्याच्या खोल दरीत फेकून देतो..! दोघांच्याही खाजगी जीवनात आलेले प्रचंड वादळ, व त्यातून त्यांची झालेली नकारात्मक मनोभुमिका रेखाटताना मा.विश्वास पाटील,यांच्या सिद्धहस्त लेखनीला शतश: नमन करावे,अशीच भावना कादंबरी वाचताना वाचकाला पानापानावर जाणवल्यावाचून राहात नाही.... एवढे मोठे वादळ येऊनदेखिल बाकेराव व रंगकली आपले कलाजीवन पुन्हा कसे ऊभे करतात,व आपापल्या क्षेत्रात भक्कमपणे पाय रोवून ऊभे राहताना, यशाच्या उत्तूंग शिखरावर कसे पोहोचतात, हे वाचून वाचकाचे मन आश्चर्यचकीत झाल्यावाचून राहात नाही..!! प्रतिष्ठीत अशा `मेहता पब्लिशींग हाऊस` या प्रकाशनसंस्थेने प्रकाशित केलेली ही कादंबरी वारंवार वाचावी अशीच आहे. व जीवनात आलेल्या अपयशाला कसे सामोरे जावे, हे नकळतपणे वाचकाला शिकवून जाणारी कादंबरी म्हणजेच.... ....."गाभुळलेल्या चंद्रबनात..!!" 🙏 वसंतराव जगताप बेल्हे, जि.पुणे (संस्थापक : अध्यक्ष साईक्रुपा सहकारी पतसंस्था. वैष्णवी मल्टीस्टेट को-आँपरेटीव्ह सोसायटी, बेल्हे,ता.जुन्नर, जि.पुणे) ...Read more

 • Rating StarBabaji Korade

  " गाभुळलेल्या चंद्रबनात... " लेखक : विश्वास पाटील ----------------------- ज्या ` पानिपत, महानायक , संभाजी , झाडाझडती.....` यांसारख्या कादंबऱ्यांनी आत्तापर्यंतच्या पुर्विच्या कादंबऱ्यांच्या आव्रुत्ती प्रकाशनाचे सर्वच्या सर्व उच्चाक मोडले गेले, व फक्त भारतीयच नव्हे, तर जागतीक व्यासपिठावरदेखील आपला वेगळा ठसठशीत ठसा ऊमटवून अनेक भाषांमध्ये प्रकाशीत होण्याचा बहूमान मिळाला.... असे जेष्ठ लेखक "मा.विश्वास पाटील...." यांच्या स्वप्नातील व महत्वाकांक्षी नविन कादंबरी म्हणजे .. "गाभुळलेल्या चंद्रबनात..." लोककलाक्षेत्रातील दोन दिग्गज कलावंतांची ही प्रेमकहानी, वाचकांच्या मनाला केवळ हळवी करणारीच नव्हे,तर चटका लावून जाणारी कादंबरी..! `बाकेराव` व `रंगकली` या दोन दिग्गज कलावंतांची प्रेमकहानी.... केवळ बाकेरावच्या कलागुणांवर भाळून स्वत:चे यौवन व बापाचे पिढीजात ऐश्वर्य पतंगासारखे ऊडवून त्याची मनधरनी करणारी नवयौवना म्हणजे ` रंगकली..!` स्वत:ला लाभलेल्या स्वर्गिय सौंदर्याबरोबरच, बापाचा अंगभूत कलावारसा आयुष्यभर जोपासनारी कलावंतीन....जीच्या कलेवर व सौंदर्यावर फिदा होऊन, वेडापिसा झालेल्या पोलिस अधिकाऱ्यालादेखील नकार देनारी... ...एक नटरंगी नार..!! पण बाकेरावसारख्या कलावंतावर जीवापाड प्रेम करनारी प्रेमिका...!! तमाशात एकत्र काम करताना,अनावधानाने घडलेली `तारुण्यसुलभ चुक` , तिला एवढी महागात पडते की, स्वत:बरोबर बाकेरावचेदेखील कलाजीवन ऊद्ध्वस्त करून जाते...!! परंतू यातूनदेखील `बाकेराव` सारखा अस्सल कलावंत स्वत:ला सावरून `रंगकली`विना आपले कलाजीवन कसे साकार करतो,हे वाचून मन थक्क होते.... स्वत:च्या अनावधानाने घडलेल्या चुकीमुळे,बाकेरावपासून दुर गेल्यानंतर रंगकलीला सोसावे लागनारे हाल पाहून,वाचकाचे ह्रुदय पिळवटून गेल्याशिवाय राहात नाही.... त्यातुनही नंतरच्या काळात तिच्या कलाजीवनाला आलेला बहार , वाचकांना विस्मयीत केल्यानाचून राहात नाही...! कादंबरीचे वाचन करताना त्यातील पात्रे व प्रसंग सभोवतालीच फिरत आहेत,असा मनाला भास सदैव होत राहील्यामुळे,स्वत: वाचकच त्यातील एक पात्र कधी बनून जातो ,हे लक्षातही येत नाही,एव्हढे ओघवी भाषासौंदर्य वाचकाला मोहीत करून जाते..! कादंबरीच्या अंतरंगात मात्र, जीवनातील वाट्याला आलेल्या नकारात्मक घटनांमधूनही मनाची `सकारात्मकता` कशी जोपासावी,याचे भान देऊन जानारी ही, `मेहता पब्लिशिंग हाऊस` या प्रथितयश प्रकाशनसंस्थेने प्रकाशीत केलेली दुर्मिळ कादंबरी वाचकांनी आपल्या संग्रही ठेवलीच पाहाजे...! 🙏 बाबाजी कोरडे राजगुरूनगर (वाचक) ...Read more

 • Rating StarSantosh Khedlekar

  अतिशय उत्तम कादंबरी आहे. मराठमोळा ढोलकी फडाचा तमाशा आजवर मराठी साहित्यात कधीच आला नव्हता. मात्र गाभुळलेल्या चंद्रबनात ही कादंबरी प्रचंड अभ्यास करून, प्रचंड भटकंती करून लिहिलेली असल्याने यात खऱ्या अर्थाने पहिल्यांदा मराठमोळा तमाशा आला आहे. जरूर वाचा�👌👌 ...Read more

 • Rating StarPratik Yetavadekar

  मराठी मातीतील लोककला आणि लोकसाहित्य हे आज टिकून आहे. ते अनेक ज्ञात अज्ञात लोककलावंतांनी दिलेल्या योगदानामुळेच. अशी च लोककलावंताची आपल्या कलेप्रती असणारी निष्ठा आणि प्रेम दाखवणारी त्यासाठी करावा लागलेला संघर्ष आणि त्यात आलेले यशापयश याला सोबत घेऊन कलेली लोककलेची पूजा म्हणजेच नवी आलेली कादंबरी `गाभूळलेल्या चंद्रबनात` #संभाजीकार विश्वास पाटील यांची नवी कादंबरी # गाभूळलेल्या चंद्रबनात 📖📚✒️🖋️ ...Read more

Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHOTSAV
MAHOTSAV by V.P.KALE Rating Star
Darshana Gokhale

अप्रतिम कथा

THE GOD OF SMALL THINGS
THE GOD OF SMALL THINGS by ARUNDHATI ROY Rating Star
Mayur Wagh

द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स चा मराठी अनुवाद वाचून पूर्ण झाला. खरोखरच अपर्णा वेलणकर यांनी अनुवाद उत्कृष्टपणे केला आहे. मूळ इंग्रजी कादंबरी रटाळ वाटते, परंतु अनुवाद वाचताना खूपच इंटरेस्ट आला, कदाचित मराठी मातृभाषा असल्याने अस वाटत असेल, पण अनुवाद निश्चितपणे ूळ भाषेपेक्षा भारी आहे. ...Read more