ROB YEUNG

About Author


PSYCHOLOGIST ROB YUNG IS WIDELY RECOGNIZED AS AN AUTHORITY ON THE STUDY OF THE PSYCHE OF HIGH ACHIEVERS. HE EARNED A DOCTORATE IN EXERCISE AND SPORT PSYCHOLOGY BEFORE TURNING TO COUNSELING. THEY ARE NOW GLOBALLY RECOGNIZED. HE HAS HELPED MANY ORGANIZATIONS AND INDIVIDUALS TO REACH THE PINNACLE OF THEIR CAREERS. MANY OF HIS BOOKS HAVE BECOME INTERNATIONAL BEST SELLERS.

मानसशास्त्रज्ञ रॉब युंग उच्च गुणवत्ताधारकांच्या मानसिकतेचा अभ्यास करणारी अधिकारी व्यक्ती म्हणून मुख्यत्वे ओळखले जातात. समुपदेशनाकडे वळण्यापूर्वी त्यांनी व्यायाम व क्रीडा मानसशास्त्र यामध्ये डॉक्टरेट मिळवली. त्यांना आता जागतिक पातळीवर मान्यता मिळाली आहे. त्यांनी अनेक संस्थांना व व्यक्तींना त्यांच्या कारकिर्दीच्या अत्युच्च शिखरावर पोहोचवण्यासाठी साहाय्य केले आहे. त्यांची अनेक पुस्तके आंतरराष्ट्रीय स्तरावर बेस्ट सेलर ठरली आहेत. त्यात ‘कॉन्फीडन्स : द आर्ट ऑफ गेटिंग व्हॉटएव्हर यू वॉन्ट’ याचा समावेश आहे. ते दूरदर्शनवरील लोकप्रिय तज्ज्ञ आहेत. ‘फायनान्शिअल टाइम्स’, ‘द डेली टेलिग्राफ’ आणि ‘द गार्डियन’ यांसारख्या वृत्तपत्रांमध्ये ते लेखन करतात.
Sort by
Show per page
Items 1 to 2 of 2 total
PRAYATNE DHARU YASHPANTH Rating Star
Add To Cart INR 240
SUTRE PRABHAV PADNYACHI Rating Star
Add To Cart INR 350

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
अनिल सहजे, नाशिक.

`कुलामामाच्या देशात’ हे पुस्तक म्हणजे जंगलातील अनुभवकथांचा एक विलक्षण रम्य प्रवास आहे. रवींद्र वानखडे यांच्या वनाधिकारी म्हणूनच्या प्रत्यक्ष अनुभवातून या कथा जन्माला येतात. प्रत्यक्षात घडलेल्या या कथा इतक्या रंगतदार आहेत की त्या काल्पनिक वाटाव्यात, अी त्यांची गंमत आहे. वानखडे यांच्या अनुभवांमधील कथाबीज अचूकपणे हेरून जी. बी. देशमुख यांनी त्यांना आपल्या रसाळ आणि खुमासदार शैलीत शब्दरूप दिले आहे. देशमुखांची शैली इतकी प्रवाही आणि ओघवती आहे की वाचक कथांमध्ये अक्षरशः गुंगून जातो. एकदा पुस्तक हातात घेतल्यानंतर ते पूर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेवावेसे वाटत नाही. वन हे सामान्य माणसासाठी तसे अपरिचितच क्षेत्र. जंगलातील जीवन, तेथील नियम-कायदे आणि जंगली श्वापदांचे विश्व याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. वानखडे-देशमुख द्वयी केवळ या अनोख्या जगाची ओळख करून देत नाहीत, तर त्याविषयी वाचकाच्या मनात विलक्षण कुतूहलही निर्माण करतात. ‘खुश रहेना मेरे यार’ आणि ‘महाकाय आकांत’ या दोन क्रमशः कथा तर विशेषतः चटका लावून जातात. त्या केवळ थरारक आणि अविश्वसनीय वाटाव्या अशा अनुभवांनी भारलेल्या नाहीत, तर जंगली श्वापदांची एक हळवी, माणुसकीच्या जवळ जाणारी बाजूही त्या प्रभावीपणे उलगडून दाखवतात. जी. बी. देशमुखांची खुमासदार, मिश्कील आणि रसाळ लेखनशैली वाचकाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुंतवून ठेवते. रवींद्र वानखडे यांच्या प्रत्यक्ष अनुभवांची सत्यता आणि देशमुखांच्या कथनकौशल्याचा सुंदर मिलाफ ‘कुलामामाच्या देशात’ घडवतो. हे पुस्तक केवळ जंगलातील अनुभवकथांचे संकलन राहत नाही, ते वाचकाला जंगलाच्या एका अनोख्या, रोमांचक आणि हळुवार विश्वाची सफर घडवते आणि नकळत सांगून जाते, ‘वनस्य कथा रम्यः!’ ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
ॲड. प्रशांत यावले, अमरावती

आज "दुर्दम्य" वाचुन पुर्ण झाले. मराठी साहित्याचा एक अप्रतिम अविष्कार. एक व्यक्तीचित्रण पण अत्यंत प्रभावी लेखन. एकाच व्यक्तीचे वेगवेगळे गुण वेगवेगळ्या कलात्मक वर्णनाने ईतक्या समर्थपणे मांडण्याचे कौशल्यपूर्ण लिखाण. शेवटच्या प्रकरणाने ईतक्या कठोर व्यक्तमत्वा बदल देखील भावना चाळवल्या. त्या व्यक्तीचे खरे नाव माहीती असुन देखील पुस्तक वाचुन संपवल्यावर ते आठवतच नव्हते ईतका प्रभाव "एकनाथन"चा राहीला. खुप सुंदर. ...Read more