* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789387789982
  • Edition : 2
  • Publishing Year : JULY 2018
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 136
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
A YOUNG WRESTLER DHANA. HE IS IN LOVE WITH RAJLAXMI- THE DAUGHTER OF SARJERAV, A WELL-KNOWN PERSONALITY, A MAN WITH MEANS. DHANA IS ATTACKED BY A TIGER. WHILE HE IS ADMITTED IN THE HOSPITAL FOR TREATMENT, A PATRIOTIC GROUP KIDNAPS HIM. THEY OFFER HIM THE LEADERSHIP OF THEIR ARMY SO THAT HE WOULD AGREE TO SERVE THE COUNTRY. BUT IN RETURN, THEY EXPECT HIM TO FORGET RAJLAXMI AND ABANDON HIS FAMILY FOREVER. SURYAJI, THE FOREST OFFICER REACHES RAJLAXMI`S VILLAGE. HE FELLS IN LOVE WITH HER. BUT, WHEN HE COMES TO KNOW ABOUT HER SOFT FEELINGS TOWARDS DHANA, HE DECIDES TO BRING THEM TOGETHER. BY NOW, PEOPLE GET WIND ABOUT DHANA AND THE PATRIOTIC GROUP. THE SECRECY OF THE GROUP IS AT STAKE NOW. THEY DECIDE TO FINISH RAJLAXMI AND SURYAJI. RAJLAXMI IS KIDNAPPED. WHO KIDNAPS HER? WHY? DOES SURYAJI SUCCEED IN BRINGING DHANA AND RAJLAXMI TOGETHER? DO SARJERAV AND SURYAJI SUCCEED IN FINDING ABOUT THE SECRET GROUP? ARE THEY ABLE TO REVEAL THE TRUTH ABOUT DHANA? TO FIND THE ANSWERS, EVERYONE MUST READ `DHANA`.
"धना...तरुण पहिलवान. सर्जेराव या तालेवाराच्या मुलीवर राजलक्ष्मीवर प्रेम. धनावर वाघाचा हल्ला. गंभीर जखमी अवस्थेत धना वाघाला ठार मारतो. इस्पितळात उपचार घेत असताना त्याचं एका देशप्रेमी गुप्त फौजेकडून अपहरण. देशसेवेसाठी धनाला फौजेचं राजेपद देण्याची तयारी; मात्र त्याने घराचा आणि राजलक्ष्मीचा त्याग करण्याची अट. इकडे वनखात्याचा अधिकारी सूर्याजी गावात दाखल. सूर्याजीचं राजलक्ष्मीवर प्रेम; पण धनाच्या आणि तिच्या प्रेमाबाबत समजल्यावर त्या दोघांना एकत्र आणण्याचा निश्चय. धनाबाबत आणि त्या गुप्त फौजेबाबत सगळ्यांना कुणकुण लागते. फौजेची गुप्तता धोक्यात येते. त्यामुळे राजलक्ष्मी आणि सूर्याजीला संपवण्याचा फौजेचा निर्णय. त्यानंतर राजलक्ष्मीचं अपहरण. राजलक्ष्मीचं अपहरण कुणी आणि का केलेलं असतं? सूर्याजी त्या दोघांना एकत्र आणण्यात यशस्वी होतो का? सर्जेराव आणि सूर्याजीला फौजेचा ठावठिकाणा लागतो का? त्यांना धनाबाबतचे सत्य समजते का? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी ‘धना’ ही उत्कंठावर्धक कादंबरी जरूर जरूर वाचली पाहिजे. "
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%#DHANA #PAHILWAN GANESH MANUGADE #SARJEROA #RAJLAKSHMI #JUNGLE #SATHMARI #SURYAJI #BANDUK #SENAPATI #VAN KHATE #KOLHAPUR #SATARA #KUSTI #MAIDAN #NARBHAKSHAK WAGH #SHELAR MAMA #RAJE #SAHYADRI #BILLA #धना# पै. गणेश मानुगडे# सर्जेराव# वस्तादकाका# राजलक्ष्मी# जंगल# साठमारी# सूर्याजी# बंदूक# सेनापती# वन खाते# कोल्हापूर# सातारा# कुस्ती# मैदान# नरभक्षक वाघ# शेलारमामा# राजे# सह्याद्री# बिल्ला
Customer Reviews
  • Rating StarShrikant Adhav

    उत्कंठावर्धक कहाणी... पै. गणेश मानुगडे हे नाव समाजमाध्यमांवर कुस्ती या खेळाबद्दलच्या सातत्यपूर्ण लेखनामुळे अनेकांना परिचयाचे आहे. त्यांची ‘धना’ ही कादंबरी अलीकडेच मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केली आहे. पहिलवान असलेला धना आणि राजलक्ष्मी यांच्या परेाची ही कहाणी आहे. राजलक्ष्मी ही सर्जेराव नामक तालेवाराची कन्या. या सर्जेरावचा धनाने कुस्ती खेळण्यास विरोध असल्याने आणि धनाला तो अमान्य असल्याने त्याचा धना-राजलक्ष्मी यांच्या लग्नास विरोध करतो. पुढे नरभक्षक वाघाला ठार करून धना आपले शौर्य दाखवतो. यात जखमी झालेल्या धनाला इस्पितळात दाखल केले जाते. इथून या कहाणीला वेगळेच वळण मिळते. याचे कारण यशवंत महाराज यांची माणसे धनाचे अपहरण करतात. ते धनाला त्यांच्या फौजेचे नेतृत्व देऊ करतात. मात्र, त्यासाठी धनाला राजलक्ष्मीचा त्याग करावा लागणार असतो. राजलक्ष्मीवर प्रेम असूनही धना ती अट मान्य करून फौजेचे नेतृत्व स्वीकारतो. दरम्यान वाघाच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी गावात सूर्याजी हा वन खात्याचा अधिकारी येतो.राजलक्ष्मीचे धनावरील प्रेम पाहून तो या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. मात्र, यात अनेक घटना घडत जातात, त्यातून फौजेची गुप्तता धोक्यात येऊ लागते, राजलक्ष्मी आणि सूर्याजी यांना संपवण्याचा आदेश धनाला दिला जातो... जे सारे कसे आणि का घडते, याचा उलगडा होण्यासाठी ही उत्कंठावर्धक कादंबरी वाचावी लागेल."धना...तरुण पहिलवान. सर्जेराव या तालेवाराच्या मुलीवर राजलक्ष्मीवर प्रेम. धनावर वाघाचा हल्ला. गंभीर जखमी अवस्थेत धना वाघाला ठार मारतो. इस्पितळात उपचार घेत असताना त्याचं एका देशप्रेमी गुप्त फौजेकडून अपहरण. देशसेवेसाठी धनाला फौजेचं राजेपद देण्याची तयारी; मात्र त्याने घराचा आणि राजलक्ष्मीचा त्याग करण्याची अट. इकडे वनखात्याचा अधिकारी सूर्याजी गावात दाखल. सूर्याजीचं राजलक्ष्मीवर प्रेम; पण धनाच्या आणि तिच्या प्रेमाबाबत समजल्यावर त्या दोघांना एकत्र आणण्याचा निश्चय. धनाबाबत आणि त्या गुप्त फौजेबाबत सगळ्यांना कुणकुण लागते. फौजेची गुप्तता धोक्यात येते. त्यामुळे राजलक्ष्मी आणि सूर्याजीला संपवण्याचा फौजेचा निर्णय. त्यानंतर राजलक्ष्मीचं अपहरण. राजलक्ष्मीचं अपहरण कुणी आणि का केलेलं असतं? सूर्याजी त्या दोघांना एकत्र आणण्यात यशस्वी होतो का? सर्जेराव आणि सूर्याजीला फौजेचा ठावठिकाणा लागतो का? त्यांना धनाबाबतचे सत्य समजते का? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी ‘धना’ ही उत्कंठावर्धक कादंबरी जरूर जरूर वाचली पाहिजे. " ...Read more

  • Rating StarVaibhav Mahajan

    एका पेहलवानाची आणि श्रीमंताच्या मुलीची धना-राजलक्ष्मीची ही कहाणी. अतिशय सुंदर, वेगवान कथानक,रोमांचक एकदा हाती घेतल्यानंतर खाली ठेवावीच वाटत नाही.

  • Rating StarAnil Jadhav

    तसा कुस्तीमधलं माझं ज्ञान अगदीच संकुचित आहे. पण #धना वाचताना पै. गणेश मानुगडे गावच्या जत्रेचा माहोल, पाळणे, खेळणी, गावरान लोकांची यात्रेची लगबग डोळ्यासमोर उभी करण्यात पूर्ण यशस्वी होतात. त्यात जमलेला असतो कुस्तीचा फड, समोरच्या पैलवानाला चितपट करयला आसुसलेले तगडे मल्ल, आणि त्यांना चिअर करणारी कुस्ती शौकिनांची गर्दी. आणि त्या गर्दीचा आपण सुद्धा एक भाग कधी होऊन जातो याच भान आपल्याला राहत नाही. त्यात रंगलेली कुस्ती, कुस्तीचा फड सगळं चित्रपटापेक्षा सुंदर चित्रण आपल्या डोळ्यासमोर सुरु होत. एका क्षणाला आपल्याला अशी जाणीव होते की आपणही त्या गर्दीमध्ये सामील आहोत, आणि त्या कुस्ती रुपी द्वंद्व युद्धात आपला पैलवान समोरच्याला कधी चितपट करतोय अशी दुगदुग लागून राहते. (मी आधीच सांगितलंय मला कुस्तीमधलं काहीच कळत नाही. तरीपण माझी अवस्था अशी होती. ) खरंतर गोष्ट फक्त कुस्ती साठी किंवा कुस्तीप्रेमींसाठी मर्यादित नाही आहे. त्यात खूप रोमांचक, उत्कंठा शिगेला पोहचवणाऱ्या घटना आणि महत्वाचं म्हणजे पुस्तकं खाली ठेऊ न देणारे प्रसंग मांडले आहेत. आपल्या कथेला जिवंत करण्याच कसब लेखक #पै_गणेश_मानुगडे यांच्या लेखन शैलीत क.. मा... ल... आहे. पुस्तकाला जिवंत उभ करण्याच त्यांचं थरारक कौशल्य मी #बाजींद मध्ये मनमुराद लुटलंय. वाचन प्रेमी असाल आणि नसाल तरीही एकदा #धना आणि #बाजींद वाचाच. ...Read more

  • Rating StarVaibhav Mahajan‎

    पै. गणेश मानगुडे यांचे `बाजी ` हे पुस्तक मी वाचलं ते मला खुप आवडलं. म्हणुन ` धना ` प्रकाशित झाल्यावर लगेच घेतलं एका पहेलवानाची आणि श्रीमंताच्या मुलीची, धना-राजलक्ष्मी ची ही प्रेमकहाणी, अतिशय सुंदर, वेगवान कथानक, रोमांचक. एकद‍ा हाती घेतल्या नंतर खालीठेवावीच वाटत नाही. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ. जयंत वडतकर.अमरावती

मेळघाटचा एन्सायक्लोपिडीया असलेले निवृत्त वनाधिकारी श्री. रविंद्र वानखडे यांच्या अनुभवांवर आधारित कुलामामाच्या देशात हे पुस्तक वाचले तेव्हापासून या पुस्तकाचे लेखक श्री. जी. बी. देशमुख यांना भेटण्याची इच्छा होती. इच्छाशक्ती असली की योग जुळून येतो असं महणतात. रविंद्र वानखडे सरांच्या माध्यमातूनच तो योग जुळून आला. माझ्या एक पुस्तकाचे प्रकाशन बाबत वानखडे सरांशी चर्चा करीत असताना त्यांनी लेखकाचा संदर्भ दिला व जी.बी. ना भेटून घ्या असे सांगितले. भेट घडून आली. अगदी सहज, घरगुती भेट झाली, गप्पा रंगल्या. यावेळी जी. बी. देशमुख यांनी त्यांचे पहिले पुस्तक महारुद्र मला भेट दिले. आमच्या चर्चेतून आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल मथला मराठमोळा झंझावात महारुद्र, हे या पुस्तकाचे शीर्षक वाचून पुस्तकाचा विषय थोडक्यात समजला. लेखकाचे वडील भीमराव देशमुख यांनी फुटबॉलपटू म्हणून गाजविलेल्या कारकीदींचा आढावा या पुस्तकात होता. एका मुलाने आपल्या वडिलांवर लिहिलेले पुस्तक कसे असेल? असा प्रश्न अन पुस्तक, दोन्ही घेऊन घरी आलो. भेट मिळालेले पुस्तक वेळ मिळाला तसे एका बैठकीत वाचून काढले. आता गल्ली गल्लीत जसं क्रिकेट खेळल्या व बघितले जाते तसं स्वातंत्र्य पुर्व काळात वऱ्हाडात फुटबॉल खेळला जात असे. गावागावांत टीम असायच्या, सामने अर्थात स्पर्धा भरवल्या जात असत. स्वातंत्र्यपूर्व काळात अशाच रुपयांमधून चमकत, वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील एका खेळाडूने थेट मुंबईतील फुटबॉल क्लब व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मुसंडी मारत आपल्या खेळाचा व व्यक्तीमत्त्वाचा ठसा उमटविला होता. तो काळ होता १९३० ते १९५० चा. त्या वल्लीचे नाव होतं भिमराव देशमुख. जी. बी. देशमुख यांनी त्यांच्या वडिलांवर लिहिलेले महारुद्र पुस्तक काही फक्त भिमराव देशमुख यांची जीवन चरित्र नाही. स्वातंत्र्य मिळण्याच्या साधारण वीस वर्षा पुर्वी ३० ते ५० च्या दशकात आपल्या देशातील खेळाची स्थिती कशी होती. विशेषतः वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील स्थिती कशी होती. कुठले खेळ खेळले जात असत. स्पर्धा कशा भरवल्या जात असत. शाळा आणि शिक्षण कसं होतं. आर्थिक स्थिती कशी होती. अमरावती जिल्ह्यातील कोणत्या गावात फुटबॉलच्या नावाजलेल्या टीम होत्या. अमरावती कशी होती याची माहिती सुद्धा या पुस्तकातून वाचायला मिळते. पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणात भीमराव यांचे व्यक्तिमत्व कसं होतं हे सांगण्यासाठी लेखकाने बाबा म्हणून जरी त्यांची ओळख करून दिली असली तरी पुढील सर्व प्रकरणातून त्यांनी भीमराव अशा एकेरी उल्लेखातून हे व्यक्तिमत्व साकारले आहे. वऱ्हाडातल्या आपल्या सवयीनुसार प्रसिद्धी पासून दूर राहिलेल्या एका नामवंत फुटबॉलपटूची कारकीर्द व फुटबॉल पश्चात कौटुंबिक कारकीर्द तटस्तपणे मांडण्यात लेखक यशस्वी झाले आहेत हे आधीच सांगून टाकतो. अमरावती जिल्ह्यातील खारतळेगाव येथील फुटबॉलच्या टीम मध्ये भीमराव देशमुख यांची कारकीर्द सुरु झाली. ती १९३० सालापासून त्यावेळी ते जेमतेम विशीत होते. प्रथम शालेय स्पर्धापासून पुढे क्लब स्पर्धा पासून भीमरावने आपल्या खेळाचा ठसा उमटविला हळूहळू ख्याती विदर्भांत पोहोचली, भीमराव यांचा खेळ बघण्यासाठी लोक खास वेळ काढून येऊ लागेल, १९३८-३९ मध्ये विदर्भात झालेल्या काही स्पर्धात मुबंईच्या काही टीम सहभागी झाल्या होत्या, त्यामुळे नावाजलेल्या ब्रिटीश खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली. मुंबईच्या इंग्रजांच्या टीमला वऱ्हाडातील भीमराव यांच्या टीमने हरविले. वायएमसिए, मुंबईच्या अलेक्झांडर नावाच्या कप्तानाने भीमरावच्या खेळाने प्रभावित होऊन खारतळेगावच्या चार खेळाडूंना मुंबईच्या टीम कडून खेळण्याचे निमंत्रण दिले. १९४० ला भीमराव सह चार खेळाडू मुंबईत पोहोचले. अलेक्झांडरने त्यांना सराव शिबिरीत घातले. पुढील वर्षात भीमराव वायएमसिए टीम कडून खेळण्यासाठी करारबद्ध झाले. जशा आयपीएल मध्ये आज वेगवेगळ्या टीम खेळतात तसे त्यावेळी मुंबईत फुटबॉलचे क्लब होते. पुढील १० वर्षे अनेक टीम कडून खेळत अनेक स्पर्धा गाजविल्या. भीमराव यांचेवर तेव्हाच्या इंग्रजी वृत्तपत्रांतून रकाने छापले जाऊ लागले. मुंबईतील आपल्या १२ वर्षाच्या कार्यकाळात क्लब स्पर्धामधून त्यांनी ४०० सामने खेळले, तब्बल २५० गोल मारलेत. भीमराव वेगवेगळ्या स्पर्धामधून खेळत मैदान गाजवत होते. त्यातूनच १९४८ च्या ऑलम्पिक स्पर्धेच्या टीम मध्ये निवड झाली मात्र एका सराव सामन्यात पाय फॅक्चर झाल्याने देशाकडून खेळण्याची संधी हुकली. पुढील वर्षात भीमराव हे भारतीय टीम सोबत मलेशिया, कंबोडिया, इंडोनेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, हाँगकाँग, थायलंड अशा देशात खेळले, या दौऱ्यातील २० पैकी १९ सामने जिंकले. भीमराव आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू झाले होते. इतके खेळून भीमराव यांचेकडे आर्थिक नियोजन नसल्याने परिस्थिती जेमतेमच होती. अशातच १९५१ साली त्यांनी निवृत्ती घेतली. अमरावती मध्ये परत आल्यावर त्यांनी आपला संसार थाटला, आर्थिक पाठबळ नसल्याने फुटकळ व्यवसाय केले. मात्र मी कधीकाळी आंतरराष्ट्रीय खेळाडू होते याचा कधी उल्लेख सुद्धा केला नाही, प्रसिद्धी पासून ते कायमच दूर राहिले. या काळात भीमराव यांच्या पत्नी अंजीरा यांनी जबाबदारीनं संसार सांभाळला. मुलांना मोठे केले. भीमराव शेवटपर्यंत मेहनत करीत राहिले. समाजात चांगले स्थान निर्माण केले. मात्र ते इतके मोठे फुटबॉलपटू होते ते अमरावतीकरांना काही माहिती झाले नाही. भीमराव यांच्या निधनानंतर या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूचे कार्य पुढील पिढीला माहित व्हावे या उद्देशाने जी. बी. देशमुख यांनी या पुस्तकातून आपल्या तीर्थरुपांचे भावचित्र अगदी सोप्या सरळ भाषेत शब्दबद्ध करून महारुद्र च्या रूपाने वाचकांसमोर ठेवले. या लिखाणासाठी त्यांनी मुंबईत जाऊन त्या काळातील टाईम्स वृत्तपत्रांतील भीमराव यांचा उल्लेख असलेली कात्रणे मिळविली, त्यांच्या समवेत खेळलेल्या खेळाडूंना व पत्रकारांना भेटले, अमरावती मधील त्यांच्या समवयस्क परिचितांकडून त्यांची माहिती गोळा केली. त्यासाठी त्यांनी अथक अशी मेहनत घेतली. व २००५ साली हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या पुढील आवृत्ती मेहता प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केल्याने ते पुस्तक महाराष्ट्रभर पोहोचले. या निमित्त्याने भीमराव यांचे कार्य, त्यांचा फुटबॉल खेळातील झंझावात मराठी माणसाला माहिती झाला. अमरावतीकर या नात्याने मला तर आपल्या मातीतील माणूस त्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर झेंडा गाडून आल्याचा अभिमान वाटला. अशा अनेक अर्थाने महारुद्र महत्वाचे आहे. ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
सलिल तांबे

ज्यांना गोष्टींची आवड आहे अशा मुलांसाठी ही मेजवानी आहेच, पण आपल्या पाल्यांमध्ये संवेदनशीलता आणि निसर्गाप्रती आदर जोपासण्यासाठी मोठ्यांनीही हे पुस्तक वाचायला हवे. प्रदूषणाविरुद्ध लहान हातांनी दिलेला लढा असो किंवा निसर्गाचा खरा आनंद पिशवीत भरून आणण्यापक्षा मनात कसा साठवावा, हे सांगणारा दृष्टिकोन असो; हे पुस्तक प्रत्येक वाचकाला समृद्ध करते. पुस्तकातील प्रत्येक कथा संपताना आपल्याला जगण्याकडे बघण्याची एक नवी दृष्टी देऊन जाते. यातलं काही गूढ, काही थरार आणि खूप सारे हळवे प्रसंग अनुभवण्यासाठी तुम्हाला हे पुस्तक स्वतः वाचायलाच हवं. म्हणूनच, आपल्या संग्रही असावा असा हा `हाटूमुटूचा चंद्र` तुम्ही एकदा नक्की अनुभवा! चला तर मग, आपणही शोधूया आपला स्वतःचा ‘हाटूमुटूचा चंद्र’! ...Read more