* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: AMBIGUOUS LOSS
 • Availability : Available
 • Translators : SUNANDA AMRAPURKAR
 • ISBN : 9788184980608
 • Edition : 1
 • Publishing Year : 2009
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 152
 • Language : Translated From ENGLISH to MARATHI
 • Category : FICTION
Quantity
Buying Options:
 • Print Books:
FROZEN SADNESS THIS IS WHAT WE HAVE WHEN WE CANNOT REALLY KNOW WHAT WE HAVE LOST. AND THIS IS WHAT PAULINE BOSS ILLUMINATES, AND HELPS TO EASE, IN AMBIGUOUS LOSS, AN ORIGINAL AND HUMANE ACCOUNT OF THE RAVAGES OF UNCERTAINTY FACED WHEN WE LOSS A LOVED ONE THROUGH DIVORCE, ADOPTION, ADDICTION, CHRONIC MENTAL ILLNESS, IMMIGRATION, OR ALZHEIMER’S. WITH SENSITIVITY AND LUCIDIRY, BOSS EXPLORES THE RUMULRUOUS EMOTIONS STIRRED UP BY SUCH LOSSES, ESPECIALLY THE WIDE FLUSTUATION BETWEEN HOPE AND HOPELESSNESS. DRAWING ON HER RESEARCH AND CLINICAL EXPERIENCE, BOSS SUGGESTS STRATEGIES THAT CAN CUSHION THE PAIN AND OFFERS HEARTENING NARRATIVES OF THOSE WHO COPE WITH AMBIGUOUS LOSSES AND MANAGE TO MOVE ON. “A COMPASSIONATE EXPLOTATION OF THE EFFECTS OF AMBIGUOUS LOSS AND HOW THOSE EXPERIENCING IT HANDLE THIS MOST DEVAS TATING OF LOSSES... BOSS’S APPROACH IS TO ENCOURAGE FAMILIES TO TALK TOGETHER, TO REACH A CONSENSUS ABOUT HOW TO MOURN THAT WHICH HAS BEEN LOST AND HOW TO CELEBRATE THAT WHICH REMAINS. HER SIMPLE STORIES OF FAMILIES DOING JUST THAT CONTAIN LESSONS FOR ALL. INSIGHTFUL. PRACTICAL, AND REFRESHINGLY FREE OF PSYCHOBABBLE.’’ KIRKUS REVICTUS “COMBINING HER TALENTA AS A COMPASSIONATE FAMILY THERAPIST AND A CREATIVE RESEARCHER, PAULINE BOSS ELOQUENTLY SHOWS THE MANY AND COMPLEX WAYS THAT PEOPLE CAN COPE WITH THE INEVITABLE LOSSES IN CONTEMPORARY FAMILY LIFE. A WISE BOOK, AND CERTAIN TO BECOME A CLASSIC.’’ CONSTANCE R. AHRONS, AUTHOR OF THE GOOD DIVORCE PAULINE BOSS IS PROFESSOR OF FAMILY SOCIAL AT THE UNIVERSITY OF MINNESOTA, PAST PRESIDENT OF THE NATIONAL COUNCIL ON FAMILY RELATIONS, AND A PSYCHOTHERAPIST IN PRIVATE PRACTICE.
जीवन जगत असताना दु:ख आणि हानी कुणाच्या वाट्याला येत नाही? प्रत्येकाला ते भोगावंच लागतं. या हानीचे आणि दु:खाचेही कितीतरी प्रकार असतात. काही शारीरिक आणि मानसिक दोन्ही पातळ्यांवर त्रासदायक; तर काही निव्वळ शारीरिक वेदनेच्या रूपात. काही दु:खे तर अशी, की बराच काळ भोगून झाल्यानंतर माणसाला कळतं, की इतकी वर्ष आपण कोणत्या काळ्या छायेत वावरत आहोत ते! तोपर्यंत त्याच्या बNयाच किमती मोजून झालेल्या असतात! अशा या छुपेपणाने माणसाचं मन आणि जीवन ग्रासून टाकणा-या नकळत होणा-या, किती काळ भोगावं लागणार तेही नक्की नसलेल्या अटळ दु:खासंबंधी डॉ. पॉलिन बॉस या अमेरिकन विदुषीने अनेक वर्षं शोध अभ्यास केला. त्याचं फलित म्हणजे तिचा ‘AMBIGUOUS LOSS’चा शोध. या शोधबद्दल जनसामान्यांना सांगण्याच्या जिव्हाळ्यातून साकारलेलं हे सोप्या भाषेतलं पुस्तक. ‘LOSS’ म्हणजे काहीतरी गमावणं आणि ‘AMBIGUITY’ म्हणजे अनिश्चितता ही दोन्ही, माणसाच्या अनुभवाची प्रमुख अंगे आहेत. ‘AMBIGUOUS LOSS’ मध्ये ती सहजपणे एकमेकांत मिसळली जातात. प्रत्येकाला आयुष्यात केव्हा ना केव्हा ‘AMBIGUOUS LOSS’ अनुभवावा लागतो. त्यावेळेला काहीतरी निश्चित, स्पष्टपणे कळायला हवं, असं आपल्याला वाटत असतं. तसं नाही झालं, तर हे विचित्र, धूसर, उलगडा न होणारं नुकसान; हे दु:ख घेऊन जगावं तरी कसं? असा प्रश्न माणसांना अस्वस्थ करून सोडतो. आपल्या परीने शोधतांना, प्रत्येकाची उत्तरे वेगळीच येत असतात; पण ‘AMBIGUOUS LOSS’ पुस्तक वाचल्यानंतर येणारी उत्तरे ही प्रश्नांपेक्षा सोपी असतील एवढं निश्चित!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #AMBIGUOUSLOSS #AMBIGUOUSLOSS #अँबिग्युअसलॉस #FICTIONTRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SUNANDAAMRAPURKAR #सुनंदाअमरापूरकर #DR.PAULINEBOSS
Customer Reviews
 • Rating Starसौ. शारदाताई दाते

  कालच आपले `अँबिग्युअस लॉस` हे अनुवादित पुस्तक वाचनात आले. खूप आवडले. एवढेच नव्हे तर मनाला एक वेगळेपण जाणवले. आपण खूप सुंदर अनुवाद केलेला आहे. मानवी मनाची रचना आणि जीवनातले भलेबुरे अनुभव जगभरातल्या माणसांच्या बाबतीत सारखेच असतात. माणसांची नावे बदलती, गावे बदलतील, विचार बदलतील, संस्कार बदलतील, पण येणारे भलेबुरे अनुभव सारखेच असतील. मानवी मनाची रचना ही खरोखरीच एकसारखी असते. मला हे अगदी तंतोतंत पटले. कोठेही जा पळसाला पाने तीन असे म्हणतात ते खरेच आहे. ...Read more

 • Rating StarDAINIK GOADOOT 7-2-2010

  वर्षांनुवर्षे कुरतडत राहणारी आठवण, जीव जाळत राहणाऱ्या मानसिक व्यथा, दूरदेशी गेलेल्यांच्या आठवणी, जीवघेण्या आजारामुळे डोळ्यांसमोर दिसत असूनही वास्तवात हरवलेली नाती... अशा सर्व गोष्टींचा या यातना भोगणाऱ्या व्यक्तींवर कळत न कळत परिणाम होत असतो. वरवर सुवयवस्थित चाललेले जीवन कमतरतेच्या जाणिवेने पोखरत जाण्याची भावना त्या व्यक्तींमध्ये आढळते. तिचा केवळ त्या व्यक्तीवरच नव्हे तर कुटुंबातील इतर व्यक्तींवरही परिणाम होत राहतो. ते कुटुंब जर त्यातून सावरले नाही तर कुटुंब उद्धवस्तेकडे झुकते. कौटुंबिक सल्लागाराचे काम करणाऱ्या डॉ. पॉलिन बॉस यांना त्यांच्या बालपणापासूनच या प्रकारच्या कौटुंबिक प्रश्नांना सामोरे जावे लागले. त्यांची आजी मूळची स्वित्झर्लंडमधली. नवऱ्याबरोबर ती अमेरिकेत स्थलांतरित झाली. दशके लोटली तरी तिचे मन मायदेश आणि माहेरच्या नातेवाईकांपासून सुटू शकले नाही. घरच्या गरिबीमुळे एकदाही परत स्वित्झर्लंडला तिला जाता आले नाही. जन्मभर मुलांबाळात व संसारात राहूनही ती त्यात नसल्यासारखी होती. लेखिकेच्या आईला बालपणापासून स्वतःच्या विश्वात हरविलेल्या व मातृसुख देऊ न शकणाऱ्या आईला व नंतर झालेल्या भावंडांना सांभाळून घ्यावे लागले. स्वतःच्या घरातच अशा स्वतःच्या व्यक्तिमत्वाच्या संदिग्धतेच्या फेऱ्यात अडकलेल्या आजीच्या अनुभवाची पार्श्वभूमी लाभलेल्या लेखिकेने आपल्या आयुष्यात त्याच प्रकारच्या कौटुंबिक प्रश्नाचा अभ्यास करण्यास वाहून घेतले. या पुस्तकात वाहून गेलेल्या तीन मुलांच्या आठवणीने व्यावूâळ होऊन ४० वर्षांनंतर त्यांना परतीची हाक देणाऱ्या जोडप्याची व्यथा आहे. कायदा झुगारून रस्त्यावर उतरलेल्या व्हिएतनाममध्ये लुप्त झालेल्या अमेरिकेच्या सैनिकांच्या बायका आहेत, अलझायमर होऊन स्वतःचे व्यक्तिमत्व हरविलेल्या कुटुंबियांच्या नातेवाईकांच्या व्यथा आहेत, घटस्फोट झाल्यानंतरही सोडून गेलेल्या नवऱयांची घरगुती प्रश्नांमध्ये आधार घेणाऱ्या महिला आहेत. घटस्फोट व पुनर्विवाह केलेल्या जोडप्यांच्या मुलांच्या मानसिक कुतरओढीच्या समस्या आहेत, एकत्र कुटुंब पद्धतीतून एकाएकी वेगळ्या, छोट्या स्वकेंद्रित कुटुंब व्यवस्थेत गेलेल्यांच्या व्यथा आहेत. जीवनमान वाढल्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्येला सामोरे जाण्यासाठी योग्य मनोभूमिका स्वीकारण्याचे मार्गदर्शनही या पुस्तकात मिळते. दुसरी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे अमेरिकेतील आदिवासी विशेषतः महिला या प्रकारच्या कौटुंबिक प्रश्नांना अधिक सकारात्मक मनोभूमिकेतून सामोरे जाताना दिसतात. ती ताकद खिश्चन कुटुंबात कमी दिसते. भारतातही यापुढे अशा द्विधा मनःस्थितीत असणाऱ्या लोकांची संख्या वाढणार आहे. तेव्हा त्यांच्या कुटुंबियांना मार्गदर्शक ठरेल असे हे पुस्तक आहे. त्यात दिलेली उत्तरे व मानसिक भूमिका आपल्या समाजालाही लागू होतील. ...Read more

 • Rating StarDAINIK SAGAR 15-3-2010

  न उमजलेलं दु:ख घेऊन जगायचं कसं, त्याची शिकवण ‘अँबिग्युअस लॉस’ असं या पुस्तकावर लिहिलंय. खऱ्या अर्थाने वाचकांना दु:ख घेऊन जगायचं कसं हे या पुस्तकातून कळतं. संशोधक म्हणून नावलौकिक असणाऱ्या डॉ. पॉलिन बॉस यांच्या पुस्तकाचा हा अनुवाद. त्यांनी अनिश्चित दु: घेऊन जी माणसे जगत आहेत, त्यांच्यावर उपचार करणारे आणि त्यांचे नातेवाईक यांनी त्या दु:खी माणसांना पूर्वस्थितीत कसे आणावे, याच्या काही पद्धती या पुस्तकात त्यांनी दिल्या आहेत, जे या पुस्तकाचे मुख्य सूत्र आहे. हे पुस्तक स्पॅनिश, जर्मन, मेनलँड, चायनीज, तैवान, चायनीज आणि जपानी भाषेत अनुवादित झाले आहे. सुनंदा अमरापूरकर यांनी मराठीत याचा अनुवाद करून मराठी वाचकांपर्यंत ही शिकवण पोहोचवली आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचे मुखपृष्ठ लक्षवेधी ठरले आहे. काही शब्दांचे अर्थ वाचकांना उमजले नाहीत, तर त्याचे अर्थ सांगणाऱ्या टिपा शेवटच्या पानावर देण्यात आल्या आहेत. ...Read more

 • Rating StarDAINIK AIKYA SATARA 15-11-2009

  न उमजलेलं दु:ख घेऊन जगायचं कसं, त्याची शिकवण देणारं पुस्तक म्हणून ‘अँबिग्युअस लॉस’चा उल्लेख करण्यात आला आहे. डॉ. पॉलिन बॉस यांच्या या पुस्तकाचा अनुवाद सुनंदा अमपूरकर यांनी केला आहे. छुपेपणाने माणसाचं मन आणि जीवन ग्रासून टाकणाऱ्या, नकळत होणाऱ्या, कितीकाळ भोगावं लागणार तेही नक्की नसणाऱ्या, अटळ अशा दु:खासंबंधी डॉ. पॉलिन बॉस या अमेरिकन विदुषीने अनेक वर्षे संशोधन, अभ्यास केला. त्याचं फलित म्हणजे तिचा ‘अँबिग्युअस लॉस’चा शोध. या शोधाबद्दल जनसामान्यांना सांगण्याच्या जिव्हाळातून हे पुस्तक आकाराला आलं आहे. अत्यंत सोप्या भाषेत लिहिण्यात आलेल्या या पुस्तकाचा मराठी अनुवादही तेवढ्याच सोप्या पद्धतीने करण्यात आला आहे. ‘अँबिग्युइटी’ म्हणजे अनिश्चितता आणि लॉस म्हणजे काही तरी गमवाणं. अँबिग्युअस लॉस’ या नावामध्ये ती सहजपणे एकमेकांमध्ये मिसळली आहे. प्रत्येकाला आयुष्यात केव्हा ना केव्हा अँबिग्युअस लॉस अनुभवावा लागतो. त्यावेळी काही तरी निश्चित, स्पष्टपणे कळायला हवं, असं आपल्याला वाटत राहतं. तसं झालं नाही तर हे विचित्र, धूसर, उलगडा न झालेलं नुकसान, हे दु:ख घेऊन जगावं तरी कसं असा प्रश्न माणसांना अस्वस्थ करुन सोडतो. आपल्या परीने शोधताना प्रत्येकाची उत्तरं वेगळीच असतात. पण अँबिग्युअस लॉस पुस्तक वाचल्यानंतर येणारं उत्तरंही प्रश्नांपेक्षा सोपी वाटतात. हेच या पुस्तकाचं यश म्हणता येईल. ...Read more

 • Read more reviews
Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book