VERA GISSING

About Author

Birth Date : 04/07/1928
Death Date : 12/03/2022


VERA GISSING WAS A CZECH-BRITISH WRITER, TRANSLATOR, AND ONE OF "WINTONS CHILDREN", THE CHILDREN SAVED BY THE ACTIONS OF NICHOLAS WINTON. HER SISTER, WHO ACCOMPANIED HER ON THE KINDERTRANSPORT, WAS THE DIARIST AND NURSE EVA HAYMAN.

वेरा गिसिंग ही एक झेक-ब्रिटिश लेखिका, अनुवादक होती आणि निकोलस विंटनच्या कृतींनी वाचलेल्या "विंटनच्या मुलांपैकी" एक होती. तिची बहीण, जी किंडर ट्रान्सपोर्टवर तिच्यासोबत होती, ती डायरीिस्ट आणि नर्स ईवा हेमन होती.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
ATHAVANINCHE MOTI Rating Star
Add To Cart INR 360

Latest Reviews

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more