* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: EAST OF THE SUN
  • Availability : Available
  • Translators : SHYAMAL KULKARNI
  • ISBN : 9788184984811
  • Edition : 1
  • Publishing Year : MAY 2013
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 612
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Print Books:
AUTUMN 1928. THREE YOUNG WOMEN ARE ON THEIR WAY TO INDIA, EACH WITH A NEW LIFE IN MIND. ROSE, A BEAUTIFUL BUT NAIVE BRIDE-TO-BE, IS ANXIOUS ABOUT LEAVING HER FAMILY AND MARRYING A MAN SHE HARDLY KNOWS.
१९२८ तीन तरुणी भारतात यायला निघतात. प्रत्येकीचे येण्याचे कारण वेगवेगळे असते. नव्या आयुष्याबद्दलच्या अपेक्षा, इच्छा आणि आकांक्षा भिन्न असतात. बॉम्बेला रोझचं लग्न एका इंग्रज अधिकाऱ्याशी होणार असतं, पण सोबत आई-वडील नसल्याने एका अनोळखी माणसाशी अनोळखी प्रदेशात लग्न करायचा ताण तिच्या मनावर येतो. इंग्लंडमध्ये लग्न जमत नाही म्हणून व्हिक्टोरियाची आई व्हिक्टोरियाला जोडीदार शोधण्यासाठी रोझसोबत भारतात पाठवते, तर लेखिका होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणारी व्हिवा, तिच्यावर ओझे झालेल्या भूतकाळाची मुळे शोधायला भारतात येते. बॉम्बेमधील उच्चभ्रू समाज, गरीब वस्त्या, भारतातले इंग्रज, त्यांची भारताबद्दलची मते, तत्कालीन भारतीय समाजाची इंग्रजांबद्दलची मते, भारतीय स्वातंत्र्यलढा अशा व्यापक पाश्र्वभूमीवर विणलेला हा कादंबरीचा पट खिळवून ठेवतो.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #UGAWTICHYADISHELA #EASTOFTHESUN #उगवतीच्यादिशेला #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SHYAMALKULKARNI #JULIAGREGSON "
Customer Reviews
  • Rating StarLOKPRABHA - JULY 2016

    काचेपलीकडचं जग… ही गोष्ट आहे तीन ब्रिटिश मुलींची. त्यांच्याभोवती गुंफल्या गेलेल्या नातेसंबंधांची. एक माणूस आणि त्याच्याभोवतीचं जग, त्याचं अनुभवविश्व, त्याचं आयुष्य ही एक कादंबरी असते असं मानलं तर चीन मुली आणि त्यांच आयुष्य असं सगळं मिळून किती गुंतागंतीचं, नाट्यमय असू शकेल याची कल्पना करता येते. त्यातही या तीन मुली स्वत:च्या आयुष्याचा शोध घेत स्वातंत्र्यपूर्व भारतात आलेल्या असतील तर... हाच सगळा पट मांडला आहे, ईस्ट ऑफ द सन या ज्युलिया ग्रेसमन यांच्या पुस्तकात. श्यामल कुलकर्णी यांनी उगवतीच्या दिशेने त्याचा सुंदर अनुवाद केला आहे. सुरुवात करताक्षणी आपल्याला खिळवून ठेवणारं हे पुस्तक शेवटपर्यंत आपली उत्कंठा वाढवत नेतं. त्याला असलेली वसाहतकालीन भारताची, भारतीय स्वातंत्र्यलढ्याची पार्श्वभूमी आपल्याला या पुस्तकापासून जराही बाजूला होऊ देत नाही. तीन मैत्रिणींचं निखळ विश्व मांडणारं हे पुस्तक आपल्याला शांता शेळके अनुवादित चौघीजणी (लिट्ल विमेन) या पुस्तकाची आठवण करून देत राहतं. ही कहाणी आहे विवा, रोझ आणि टॉर या तीन मुलींची. विशीच्या आतल्या रोझ आणि टॉर एकमेकींच्या जिवलग मैत्रिणी आहेत. विवाची आणि त्यांची ओळखही नाही. पण काच बोटीतून त्या तिघीजणी भारतात यायला निघतात आणि त्यांची एकमेकांशी ओळख होते. सुरुवातीला एकमेकींच्या जवळ जायला फारशा उत्सुक नसलेल्या या मुली बोटीवरून उतरेपर्यंत, म्हणजे भारतात पोहोचेपर्यंत एकमेकींच्या छान मैत्रिणी होतात. नंतरही या ना त्या कारणाने भेटत राहतात आणि त्यांचे एकमेकांशी जिव्हाळ्याचे बंध जुळतात. त्या सगळ्या नातेसंबधांचा तरल आलेख हे पुस्तक मांडतं. भारतात येणारा तत्कालीन ब्रिटिश समाज, त्यांचं जगणं, तत्कालीन भारतीय समाज या दोन्ही समूहांचे एकमेकांशी असलेले लागेबांधे, ताणेबाणे, स्वातंत्र्यपूर्व काळाची ती धगधग ही सगळी पार्श्वभूमी या कादंबरीला आहे. १९२८ साली लंडनमधील ‘लेडी’ नावाच्या एका मासिकात आलेल्या जाहिरातपासून ही कादंबरी सुरू होते. विवा होलावे या अठ्ठाविशीच्या तरुणीने कुणाला भारतात आपल्या मुलांना पाठवायचं असेल तर मुंबईपर्यंतच्या प्रवासासाठी आपण आया म्हणून उपलब्ध आहोत अशी जाहिरात दिलेली असते. या जाहिरातीवरूनच आपल्याला त्या काळात काय चालत असणार याची कल्पना येते आणि पुढे पुढे ती वृfद्धंगत होत जाते. भारतात नोकरीसाठी येणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांची मुलं सुट्टीसाठी संपवून भारतात जात असतं. त्यांना सोबत म्हणून जाण्याचं काम त्या काळी मिळत असे. विवा होलावेला भारतात जायचं असतं ते भारतात मरण पावलेल्या तिच्या आई - वडिलांची एक टंक मसुरीला जाऊन परत घेण्यासाठी. त्या टंकमध्ये आपल्यासाठी घबाड नाही. आणि त्यात जे असेल ते आता खराब झालं असेल हे तिला माहिती आहे, पण तरीही गेली अनेक वर्षे ती मसुरीला जायचं नियोजन करते आहे. आई -वडील-बहीण यांच्या मृत्यूनंतर ती एकटी वाढली आहे. एकटेपणाच्या अपरिहार्यतेतून एक अपयशी प्रेमप्रकरणही तिच्या खाती जमा आहे. त्यामुळे अविश्वास, सावधवपणा, भूतकाळाची भेट म्हणून मिळालेला अस्वस्थपणा या सगळ्यासह ही विवा गाये नावाच्या सोळा वर्षांच्या मुलाची आया किंवा सोबतीण म्हणून भारतात यायला निघते. लेखिका व्हायचं हे तिचं स्वप्न आणि जगण्यासाठी सतत पैसे मिळवण्याची सक्ती या कात्रीत ती अडकलेली आहे. ती ज्याची सोबतीण म्हणून निघाली आहे, तो सोळा वर्षांचा गाय हा मुलगा कुणालाच नको आहे. अतिशय अस्वस्थ, घुसमटलेलं बालपण वाट्याला आलेलो हा मुलगा शाळेत रँगिंगला बळी पडला आहे. तिथून त्याला नाकारलं गेलंय. भारतात असलेल्या आई-वडिलांकडे त्याला पाठवलं जातंय. पण त्यांनाही तो खरं तर नकोच आहे. तो बोटीवर विचित्र वागून, विचित्र परिस्थिती ओढवून घेतो. विवालही अडचणीत आणतो. पण नंतर तिच्यात आणि त्याच्यात एक समृद्ध नातं तयार होतं. असं असलं तरी पौगंडावस्थेतल्या या मुलाची फरफट आपल्याला अस्वस्थ करत राहते. रोझ आणि टॉरे या दोन मैत्रिणी भारतात यायलो निघाल्या आहेत, त्या रोझच्या लग्नासाठी. भारतात ब्रिटिश सैन्यात काम करणाऱ्या जॅकशी रोझ लग्न करणार आहे. जॅक सुनीता नावाच्या एका सुंदर भारतीय मुलीत गुंतलेला आहे. त्या काळात इंग्लंडमध्ये लग्न जमत नसे अशा उपवर मुलींना त्यांचे आई-वडील भारतात आलेल्या तरुणावर गळ टाकण्यासाठी भारतात पाठवून देत. रोझने जॅकशी आधीच जमवलंय. पण तिचे आई-वडील तिच्या लग्नाला येऊ शकणार नाहीयेत म्हणून टॉर ही तिची जिवलग मैत्रिण करवली म्हणून तिच्यासोबत आली आहे. भारतातच असलेली तिची एक नातेवाईक स्त्री हे लग्न लावून देणार आहे.’’ टॉर ही एक टिपिकल बायकीपणाने वागण्याचा तिरस्कार करणारी, आपल्याला हवं तसं वागणारी बिनधास्त, पण गोड मुलगी आहे. प्रेमप्रकरणात सतत अपयशी होणारी टॉर पुन्हा तितक्याच उत्कटतेने प्रेमात पडत राहते. बोटीवर ती फ्रॅंक या डॉक्टरच्या प्रेमात पडते. पण फ्रॅंक विवामध्ये गुंतत जातो आणि स्वत:च्या स्वाभिमानाची, स्वच्छंदी जगण्याची आस असलेली विवा त्याच्यात गुंतूनही त्याला झिडकारत राहते. भारतात उतरल्यानंतरचं सगळ्यांचं जगणं, भारतात त्यांना येणारे वेगवेगळे अनुभव, त्यांचं हळूहळू बदलत गेलेलं आयुष्य आणि ते एकमेकांशी शेअर करण्याची त्यांची आच या सगळ्यांतून ही कादंबरी एक विलोभनीय दुनिया आपल्यासमोर उभी करते. एरवी आपण तत्कालीन ब्रिटिशांकडे राज्यकर्ते या एकाच नजरेने पाहतो पण या राज्यकर्त्या वर्गातले वेगवेगळे थर, त्यांचे प्रश्न, त्यांचं जगणं हे सगळं कसं होतं ते या कादंबरीमुळे आपल्याला काचेच्या त्या बाजूकडून समजतं. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
Vaishali Dhande, Amravati.

Their is no doubt that G.B.Deshmukh`s writings are very well but when you come across the characters in this book which you had heard from the author himself then the reading felt like you are also part of that story.... the author deserves many cngratulations for this wonderful book "Durdamya ". Amazingly written balancing humor as well as seriousness... It also taught importance of learning the language of the state you work in otherwise Amravati will also have one Udhampur in it. ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
सि.एम. भागडे, नागपूर.

"दुर्दम्य" पूर्ण वाचुन झालं. लेखकाने एकनाथन साहेबांविषयी खुप छान लिहिलं आहे. ते माझे पहीले एसी होते. नवीन निरीक्षक असतांना, त्यांना व्हरांड्यात बसलेले पाहुन, लपुन छपुन रेंज ची डाक देऊन मी पळून जात असे. तेव्हा दर्शन घेऊन प्रत्यक्ष भेटलो असतो तर बे झाले असते, असं आता वाटते. ...Read more