ABHIJEET PENDHARKAR

About Author

Birth Date : 17/05/1975




शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण रत्नागिरी येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात झाले. शिक्षण बी. एस्सी बॅचलर ऑफ जर्नलिझम.महाविद्यालयीन काळापासूनच लेखनाला आणि पत्रकारितेला सुरुवात केली. वनस्पतिशास्त्रात पदवी घेतली असली, तरी मूळ ओढा लेखनाकडेच होता. सुरुवातीच्या काळात रत्नागिरीत दै. सागर, दै. सकाळ आणि दै. रत्नागिरी एक्स्प्रेस या वर्तमानपत्रांमध्ये बातमीदार आणि उपसंपादक म्हणून काम केले. पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या (मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम) पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. त्याच दरम्यान पुण्यातील दै. केसरी आणि दै. लोकसत्ता मध्ये संपादकीय विभागात काम केले. सन १९९९ पासून दै. सकाळ मध्ये उपसंपादक म्हणून नोकरी स्वीकारली. सकाळ मधील दैनंदिन संपादकीय कामाबरोबरच चित्रपटविषयक लेखन आणि समीक्षणांमध्ये विशेष रस घेतला. कलारंजन आणि मुक्तपीठ या पुरवण्यांचे काही काळ संपादनही केले. सन २०१२पासून सकाळच्या सेवेतून निवृत्त होऊन चित्रपट आणि दूरचित्रवाणी कार्यक्रमांसाठी स्वतंत्रपणे लिखाण सुरू केले. आत्तापर्यंत दोन अनुवादित पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 2 of 2 total
SEND THEM TO HELL Rating Star
Add To Cart INR 300
UNLIKELY HERO OM PURI Rating Star
Add To Cart INR 350

Shop by