- Shrikant Adhav
उत्कंठावर्धक कहाणी... पै. गणेश मानुगडे हे नाव समाजमाध्यमांवर कुस्ती या खेळाबद्दलच्या सातत्यपूर्ण लेखनामुळे अनेकांना परिचयाचे आहे. त्यांची ‘धना’ ही कादंबरी अलीकडेच मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केली आहे. पहिलवान असलेला धना आणि राजलक्ष्मी यांच्या परेमाची ही कहाणी आहे. राजलक्ष्मी ही सर्जेराव नामक तालेवाराची कन्या. या सर्जेरावचा धनाने कुस्ती खेळण्यास विरोध असल्याने आणि धनाला तो अमान्य असल्याने त्याचा धना-राजलक्ष्मी यांच्या लग्नास विरोध करतो. पुढे नरभक्षक वाघाला ठार करून धना आपले शौर्य दाखवतो. यात जखमी झालेल्या धनाला इस्पितळात दाखल केले जाते. इथून या कहाणीला वेगळेच वळण मिळते. याचे कारण यशवंत महाराज यांची माणसे धनाचे अपहरण करतात. ते धनाला त्यांच्या फौजेचे नेतृत्व देऊ करतात. मात्र, त्यासाठी धनाला राजलक्ष्मीचा त्याग करावा लागणार असतो. राजलक्ष्मीवर प्रेम असूनही धना ती अट मान्य करून फौजेचे नेतृत्व स्वीकारतो. दरम्यान वाघाच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी गावात सूर्याजी हा वन खात्याचा अधिकारी येतो.राजलक्ष्मीचे धनावरील प्रेम पाहून तो या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. मात्र, यात अनेक घटना घडत जातात, त्यातून फौजेची गुप्तता धोक्यात येऊ लागते, राजलक्ष्मी आणि सूर्याजी यांना संपवण्याचा आदेश धनाला दिला जातो... जे सारे कसे आणि का घडते, याचा उलगडा होण्यासाठी ही उत्कंठावर्धक कादंबरी वाचावी लागेल."धना...तरुण पहिलवान. सर्जेराव या तालेवाराच्या मुलीवर राजलक्ष्मीवर प्रेम. धनावर वाघाचा हल्ला. गंभीर जखमी अवस्थेत धना वाघाला ठार मारतो. इस्पितळात उपचार घेत असताना त्याचं एका देशप्रेमी गुप्त फौजेकडून अपहरण. देशसेवेसाठी धनाला फौजेचं राजेपद देण्याची तयारी; मात्र त्याने घराचा आणि राजलक्ष्मीचा त्याग करण्याची अट. इकडे वनखात्याचा अधिकारी सूर्याजी गावात दाखल. सूर्याजीचं राजलक्ष्मीवर प्रेम; पण धनाच्या आणि तिच्या प्रेमाबाबत समजल्यावर त्या दोघांना एकत्र आणण्याचा निश्चय. धनाबाबत आणि त्या गुप्त फौजेबाबत सगळ्यांना कुणकुण लागते. फौजेची गुप्तता धोक्यात येते. त्यामुळे राजलक्ष्मी आणि सूर्याजीला संपवण्याचा फौजेचा निर्णय. त्यानंतर राजलक्ष्मीचं अपहरण. राजलक्ष्मीचं अपहरण कुणी आणि का केलेलं असतं? सूर्याजी त्या दोघांना एकत्र आणण्यात यशस्वी होतो का? सर्जेराव आणि सूर्याजीला फौजेचा ठावठिकाणा लागतो का? त्यांना धनाबाबतचे सत्य समजते का? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी ‘धना’ ही उत्कंठावर्धक कादंबरी जरूर जरूर वाचली पाहिजे. "
- Vaibhav Mahajan
एका पेहलवानाची आणि श्रीमंताच्या मुलीची धना-राजलक्ष्मीची ही कहाणी. अतिशय सुंदर, वेगवान कथानक,रोमांचक एकदा हाती घेतल्यानंतर खाली ठेवावीच वाटत नाही.
- Anil Jadhav
तसा कुस्तीमधलं माझं ज्ञान अगदीच संकुचित आहे.
पण #धना वाचताना पै. गणेश मानुगडे गावच्या जत्रेचा माहोल, पाळणे, खेळणी, गावरान लोकांची यात्रेची लगबग डोळ्यासमोर उभी करण्यात पूर्ण यशस्वी होतात.
त्यात जमलेला असतो कुस्तीचा फड, समोरच्या पैलवानाला चितपट करायला आसुसलेले तगडे मल्ल, आणि त्यांना चिअर करणारी कुस्ती शौकिनांची गर्दी.
आणि त्या गर्दीचा आपण सुद्धा एक भाग कधी होऊन जातो याच भान आपल्याला राहत नाही.
त्यात रंगलेली कुस्ती, कुस्तीचा फड सगळं चित्रपटापेक्षा सुंदर चित्रण आपल्या डोळ्यासमोर सुरु होत.
एका क्षणाला आपल्याला अशी जाणीव होते की आपणही त्या गर्दीमध्ये सामील आहोत, आणि त्या कुस्ती रुपी द्वंद्व युद्धात आपला पैलवान समोरच्याला कधी चितपट करतोय अशी दुगदुग लागून राहते.
(मी आधीच सांगितलंय मला कुस्तीमधलं काहीच कळत नाही. तरीपण माझी अवस्था अशी होती. )
खरंतर गोष्ट फक्त कुस्ती साठी किंवा कुस्तीप्रेमींसाठी मर्यादित नाही आहे.
त्यात खूप रोमांचक, उत्कंठा शिगेला पोहचवणाऱ्या घटना आणि महत्वाचं म्हणजे पुस्तकं खाली ठेऊ न देणारे प्रसंग मांडले आहेत.
आपल्या कथेला जिवंत करण्याच कसब लेखक #पै_गणेश_मानुगडे यांच्या लेखन शैलीत क.. मा... ल... आहे.
पुस्तकाला जिवंत उभ करण्याच त्यांचं थरारक कौशल्य मी #बाजींद मध्ये मनमुराद लुटलंय.
वाचन प्रेमी असाल आणि नसाल तरीही एकदा #धना आणि #बाजींद वाचाच.
- Vaibhav Mahajan
पै. गणेश मानगुडे यांचे `बाजी ` हे पुस्तक मी वाचलं ते मला खुप आवडलं. म्हणुन ` धना ` प्रकाशित झाल्यावर लगेच घेतलं
एका पहेलवानाची आणि श्रीमंताच्या मुलीची, धना-राजलक्ष्मी ची ही प्रेमकहाणी, अतिशय सुंदर, वेगवान कथानक, रोमांचक. एकदा हाती घेतल्या नंतर खाली ठेवावीच वाटत नाही.
- DAINIK SAKAL 19-08-2018
उत्कंठावर्धक कहाणी...
पै. गणेश मानुगडे हे नाव समाजमाध्यमांवर कुस्ती या खेळाबद्दलच्या सातत्यपूर्ण लेखनामुळे अनेकांना परिचयाचे आहे. त्यांची ‘धना’ ही कादंबरी अलीकडेच मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केली आहे. पहिलवान असलेला धना आणि राजलक्ष्मी यांच्या प्रेमाची ही कहाणी आहे. राजलक्ष्मी ही सर्जेराव नामक तालेवाराची कन्या. या सर्जेरावचा धनाने कुस्ती खेळण्यास विरोध असल्याने आणि धनाला तो अमान्य असल्याने त्याचा धना-राजलक्ष्मी यांच्या लग्नास विरोध करतो. पुढे नरभक्षक वाघाला ठार करून धना आपले शौर्य दाखवतो. यात जखमी झालेल्या धनाला इस्पितळात दाखल केले जाते. इथून या कहाणीला वेगळेच वळण मिळते. याचे कारण यशवंत महाराज यांची माणसे धनाचे अपहरण करतात. ते धनाला त्यांच्या फौजेचे नेतृत्व देऊ करतात. मात्र, त्यासाठी धनाला राजलक्ष्मीचा त्याग करावा लागणार असतो. राजलक्ष्मीवर प्रेम असूनही धना ती अट मान्य करून फौजेचे नेतृत्व स्वीकारतो. दरम्यान वाघाच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी गावात सूर्याजी हा वन खात्याचा अधिकारी येतो. राजलक्ष्मीचे धनावरील प्रेम पाहून तो या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. मात्र, यात अनेक घटना घडत जातात, त्यातून फौजेची गुप्तता धोक्यात येऊ लागते, राजलक्ष्मी आणि सूर्याजी यांना संपवण्याचा आदेश धनाला दिला जातो... जे सारे कसे आणि का घडते, याचा उलगडा होण्यासाठी ही उत्कंठावर्धक कादंबरी वाचावी लागेल.
- pravin shivaji sakpal
वस्ताद........ एकच no..
- सचिन शेवतकर
गणेश मानगुडे लिखित धना कादंबरी बद्दल बोलायचे म्हणजे शब्द कमी पडतील खरोखर शब्दांची सांगड मांडणी अतिशय सुरेख आणि त्यामुळे कादंबरी वाचताना त्यातील पात्र डोळ्यासमोर फिरतात जसे ते सर्व आपल्या डोळ्या देखत घडत आहे.
गणेशराव तुमचा आणि मेहता पब्लिशिंग हाऊस यांचा मी आभारी आहे.