* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: WE, THE PEOPLE
  • Availability : Available
  • Translators : V.S.WALIMBE
  • ISBN : 9788177663440
  • Edition : 8
  • Publishing Year : JUNE 1985
  • Weight : 350.00 gms
  • Pages : 424
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : POLITICS & GOVERNMENT
  • Available in Combos :V. S. WALIMBE COMBO SET- 4 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
HIS BOOKS `LAW AND PRACTICE OF INCOME TAX`, `TAXATION INDIA`, HIGHEST TAXED NATION`, `OUR CONSTITUTION DEFACED AND DEFILED` AND `INDIA`S PRICELESS HERITAGE` ARE CONSIDERED TO BE STANDARD.HE IS RELATED WITH MANY INDUSTRIES AND BUSINESSES AS THE CHAIRMAN, VICE CHAIRMAN AND DIRECTOR.HE IS THE CHAIRMAN OF `FORUM OF FREE ENTERPRISE` AND LESLEY SOHONI PROGRAMME OF TRAINING FOR DEMOCRACY`.
माझी दृष्टी अशा माणसाला द्यावी ज्याने कधीही सूर्योदय पाहिलेला नाही. माझे हृदय अशा व्यक्तीच्या हाती स्वाधीन करावे ज्याने त्याच्या हृदयात दु:ख झेलले आहे. त्या तरुणाला दान करावे ज्याला पुढे आपली नातवंडे खेळत आहेत हे पाहण्याइतके दीर्घायुष्य मिळेल. माझी मूत्रपिंडे दुस-याच्या शरीरातील विष काढू देत. माझी हाडे पंगू मुलाला पावले टाकण्यास मदत करू देतं. माझ्या शरीराचा आता जो काही भाग राहील त्याचे दहन करावे. काही दफन करायचे असल्यास माझे दोष व माझे भाऊबंदांबरोबरचे पूर्वग्रह यांना मूठमाती द्यावी. माझे प्रमाद सैतानाकडे पोहोचावेत. माझा आत्मा परमेश्वराला अर्पण करावा. माझे स्मरण करायचे झाल्यास जिला तुमची आवश्यकता आहे अशा व्यक्तीशी चार गोड शब्द बोलून किंवा तिच्यासाठी काही सत्कार्य करून ते साधावे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#NANI PALKHIWALA #V.S.SVALIMBE#WARSAWTEHIROSHIMA #WETHEPEOPLE #WETHENATION
Customer Reviews
  • Rating StarPravin Karvekar

    Bhashecha khup chan darja

  • Rating StarDAINIK SAKAL 15-12-2002

    नानी पालखीवाला : पारदर्शी व्यक्तिमत्त्व… नानी पालखीवाला. घटना आणि आयकर अशा क्लिष्ट विषयांतील अभ्यासू आणि भारतातील उत्तुंग, आदरणीय व्यक्तिमत्त्व. ‘वई दि पीपल’ हे त्यांचं पुस्तक इंग्रजीत प्रसिद्ध झालं होतं. त्याचं मराठीत भाषांतर करायचं माझ्या मनात हतं. त्यासंबंधीचे हक्क मागण्यासाठी मी त्यांच्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत होतो. त्यांना मी मुंबईत फोन लावला. ‘तीन सेकंदात बोल’ ते म्हणाले. ‘तुमच्या वुई, दि पीपल या पुस्तकाचं मराठीत भाषांतर करून ते प्रकाशित करायचं आहे.’ मी ‘तसं पत्र लिही.’ बस फोन बंद. मी त्यांना तीन-चार पत्रं लिहिली. उत्तर नाही मी विचारात पडलो. माझे करसल्लागार बी. के. शहा यांचे मुंबईत एक समव्यावसायिक मित्र आहेत. ते नानी पालखीवालांशी संबंधित आहेत असं समजलं. त्यांच्याकडून मी नानींच्या घरचा फोन नंबर मिळविला. (कारण तो नंबर अनलिस्टेड होता) मी घरी फोन केला. ‘तू उद्या येऊ शकशील का?’ या त्यांच्या प्रश्नावर मी होकार दिला. ‘ठीक आहे येताना तुझ्या भाषांतरकाराला घेऊन ये.’ त्यांनी सांगितलं. भाषांतराचं काम मी श्री. वि. स. वाळिंबे यांना देणार होता. नानीशी फोनवर बोलणं झाल्यावर त्यांच्या स्वभावाचा एक पैलू माझ्या ठळकपणानं लक्षात आला. तो हा की, ते वेळेला अतिशय महत्त्व देत असत. फोनवर त्यांनी मला विचारलं. ‘तू मुंबईला कसा येणार आणि परत केव्हा आणि कसा जाणार?’ मी सांगितलं, ‘‘मी डेक्कन क्वीननं येणार आणि त्याच गाडीनं परत येणार.’’ मग त्यांनी मला दुपारी दीडची वेळ दिली. आम्ही वेळेवर त्यांच्याकडे पोहोचलो; पण त्यांची सेक्रेटरी आम्हाला आज जाऊ देईना; कारण तिच्याकडे आमच्या भेटीची वेळ नव्हती. शेवटी मोठ्या मिनतवारीनं मी तिला माझं व्हिजिटिंग कार्ड आत नेऊन द्यायला राजी केलं. ती आत गेली कार्ड पाहिल्याबरोबर त्यांनी आम्हाला आत बोलावलं. त्या पहिल्या भेटीतच त्यांची साधी राहणी, निगर्वी, पारदर्शी स्वभाव यांची माझ्यावर छाव पडली. श्री. वाळिंबे यांनी अनुवादित केलेली काही पुस्तकं आम्ही त्यांना दाखवली, त्यात श्री. अरूण शौरी यांच्या पुस्तकाच्या अनुवादाचाही समावेश होता. श्री. शौरी त्यांचे मित्र त्यामुळे त्यांनी चटकन भाषांतराला परवानगी दिली. त्यांना मराठी येत नव्हतं. त्यामुळं त्या पुस्तकाचा अनुवाद तपासायला एका विशिष्ट संपादकांकडे पाठवा, असं त्यांनी सांगितलं. मला या संपादकांचा वाईट अनुभव आला होता. त्यामुळें या गोष्टीस मी स्पष्ट नकार दिला. मी त्यांना म्हणालो, ‘‘मी अनुवाद तुमच्याकडे पाठवितो. तुम्ही तो कुणाकडूनही तपासून घ्या.’’ निघता निघता मी त्यांना रॉयल्टीबद्दल विचारलं. ते म्हणाले, ‘‘मला रॉयल्टी नको; पण पुस्तकाचा अनुवाद आणि त्याची निर्मिती दोन्ही अत्युत्तम दर्जाची हवी.’’ अर्थातच मी होकार दिला. याच भेटीत मी त्यांच्याकडून आणखी एक गोष्ट कबूल करून घेतली. या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीच्या प्रकाशन समारंभाला त्यांनी पत्नीसह यावं, असं मी सांगितलं. माझी ही विनंतीसुद्धा त्यांनी मान्य केली. त्यांच्याकडून बाहेर पडल्यानंतर श्री. वाळिंबे यांनीसुद्धा रॉयल्टी न घेण्याचा निर्णय मला सांगितला. पुस्तक तयार झाल्यानंतर काही प्रती घेऊन मी त्यांना दाखवायला गेलो. त्यांना पुस्तक खूपच आवडलं, मात्र प्रकाशन समारंभाला येण्यासाठी त्यांच्याकडे तीन-चार महिने तरी वेळ नव्हता. ते म्हणाले, ‘‘प्रकाशनापूर्वीच तू पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध कर. पुस्तक बाजारात येऊ दे.’’ मी ही गोष्ट मान्य केली नाही म्हणालो, ‘‘तुम्हाला वेळ नसेल, तर तीन-चार महिने ही पुस्तकं गोडाऊनमध्ये पडून राहतील; पण प्रकाशनापूर्वी मी त्यांची विक्री करणार नाही.’’ ‘गोडाऊन’ हा शब्द ऐकताच त्यांना राग आला. मग मी त्यांना त्यांच्या वचनाची आठवण करून दिली. मी विनातक्रार थांबायला तयार असल्याचंही सांगितलं. मग मात्र त्यांनी मला पंधरा दिवसांतलच वेळ दिली आणि तो समारंभ पुण्यात झाला. पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात कार्यक्रम ठरला. त्याचदिवशी सकाळी नानी पालखीवाला पत्नीसह विमानाने आले. त्यांना आणण्यासाठी टेल्को कंपनीची मर्सिडीज गाडी आली होती. माझे पुण्यातील मित्र डॉ. अनिल गांधी यांची मर्सिडीत घेऊन मी विमानतळावर गेलो होतो. मी त्यांना आमच्या गाडीतून येण्याची विनंती केली; कारण त्या दिवशी ते आमचे पाहुणे होते. त्याप्रमाणेच झाले. ते आमच्या गाडीतून हॉटेलवर आले. त्या दिवशी दुपारी मी त्यांच्याकडे त्यांचा एक तास मागितला. त्यांनी मान्यता दिली. दुपारी दीड वाजता मी आणि वाळिंबे अनुवादाच्या शंभर प्रती घेऊन गेला. त्यावर त्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या; कारण ऐनवेळी खूपच गर्दी होणार याची आम्हाला खात्री होती. दुपारीच स्वाक्षऱ्या घेण्यामागे ही गर्दी टाळण्याचा हेतू होता. एका तासात त्यांनी शंभर स्वाक्षऱ्या पूर्ण केल्या. शेजारीच त्यांच्या पत्नी होत्या त्या मिस्कीलपणे हसत होत्या. स्वाक्षऱ्या संपल्यावर त्या माझ्या जवळ आल्या आणि त्यांनी माझी पाठ थोपटली. त्या म्हणाल्या, ‘‘स्वाक्षऱ्या करण्याचा त्यांना फार आळस आहे आणि त्यांच्याकडून तू तासाभरात चक्क शंभर स्वाक्षऱ्या करून घेतल्यास म्हणून तुला शाबासकी देते!’’ सभागृह तुडुंब भरलं होतं. प्रसिद्ध विचारवंत ग. प्र. प्रधान, एस. एम. जोशी यांच्यासह अनेक नामवंत, विद्वान आवर्जून उपस्थित होते. सभागृहाच्या बाहेरही तीन चारशे लोक उभे होते. त्यांनी आत येऊन मध्ये बसण्यास परवानगी मागितली. हळूहळू शे-दीडशे लोक सभागृहात मिळेल त्या जागेवर चक्क मांडी घालून बसले. त्याचदिवशी श्री. भोगिशयन यांचं भाषण अतिशय सुंदर झालं. नानी मला म्हणाले, ‘‘इतक्या उत्तम भाषणानंतर मी काय बोलू? त्यापेक्षा आधी माझं भाषण ठेवलं असतं तर मी अधिक चांगलं बोललो असतो.’’ असं ते म्हणाले खरे; पण त्यांचंही भाषण खूपच सुरेख झालं. त्यांच्या त्या भाषणाचं पहिलं वाक्य असं होतं – ‘मी अनेक पुस्तके लिहिली; पण कोणत्याही पुस्तकाचा प्रकाशन समारंभ झाला नाही. त्या अर्थाने माझ्या आयुष्यातील हा पहिलाच प्रकाशन समारंभ आहे.’’ ‘वई, दि नेशन’ हे त्यांचं पुस्तक इंग्रजीत झाल्यानंतर त्यांनी आपणहून मला फोन केला. म्हणाले, ‘‘हे पुस्तक तू मराठीत करावंस अशी माझी इच्छा आहे.’’ मी मान्यता दिली. या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ कोल्हापुरात करण्याची माझी इच्छा होती; पण नानी यांना वेळ मिळत नव्हता. वय वाढत होतं. मागच्या वर्षी पेटिट डे दिवशी त्यांना फोन केला (शुभेच्छा देण्यासाठी) पण त्यांच्या सहकाऱ्याने त्यांच्या आजाराविषयी सांगितले. आता ते कोल्हापूरला कधीच येणार नाही. -अनिल मेहता ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    नानी पालखीवाला यांचे नाव भारताच्या कायदेविषयक क्षेत्रात अनन्यसाधारण मान्यता पावलेले आहे. त्यांना अनेक विषयात रुची असल्याने त्यांनी सहजतेने अनेक क्षेत्रे गाजवली. त्यांनी जी भाषणे दिली आणि लेख लिहिले त्यांचे हे संकलन आहे. काही ठिकाणी थोडासा संक्षेपही कलेला आहे, परंतु या सगळ्या विचारांमध्ये एक सूत्र आहे आणि ते सूत्र या पुस्तकाच्या शिर्षकामध्ये सूचित झालेले आहे. या लेखांमध्ये काही मूलभूत विचार आणि विषय मांडलेले आहेत, तर काही ठिकाणी त्यांचा पुरेसा विस्तार करण्यात आलेला नाही. त्यांचे अधिक विकसित रूप नंतरच्या काही लेखांमध्ये आढळेल, त्यामुळे काही प्रमाणात एखाद्या विचाराची वा विषयाची पुनरुक्ती झालेली आढळून येईल. आणीबाणीच्या काळात त्यांनी जे लिखाण केले, ते हेतुत: येथे पुनर्मुद्रित करण्यात आलेले आहे. कारण आपल्या प्रजासत्ताकाच्या इतिहासामध्ये १९७५ ते १९७७ हा काळ फारच उद्बोधक ठरला जॉर्ज सान्तायन यांनी म्हटले आहे, ‘‘प्रगतीमध्ये बदलाइतकेच सातत्यालाही महत्त्व असते... जे भूतकाळ विसरतात त्यांच्या हातून जुन्या चुका पुन्हा घडण्याचा संभव असतो.’’ आपल्याला जर आपल्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण करायचे असेल तर आणीबाणीत काय घडले हे आपण कधीही विसरता कामा नये. कारण त्या काळात नागरिकांचे मूलभूत अधिकार स्थगित ठेवण्यात आलेले होते. जे त्या वेळी घडले ते पुन्हा केव्हाही घडू शकते. जेव्हा जेव्हा कठीण प्रसंग उद्भवले, तेव्हा तेव्हा राष्ट्रहितासाठी पालखीवाला मोठ्या तडफेने आपल्या साऱ्या बुद्धिवैभवासह उभे ठाकले. एका महान देशाला नैतिक ऱ्हासाने ग्रासून टाकले आहे असे या लेखांमधून आपल्या देशाचे चित्र साकार होते. या परिस्थितीत नजीकच्या भविष्यकाळात तरी बदल होण्याची काहीही चिन्हे दिसत नाहीत. आपली सद्सद्विवेक बुद्धी पार गारठून गेली आहे हे आपले खरे दुखणे आहे, आणि हे दुखणे केवळ टिकून राहिले असे नव्हे, तर ते चिघळत चाललेले आहे. ‘माणसाने पैसा मिळविणे एवढे एकच ध्येय डोळ्यांपुढे ठेवले, की त्याचे मन कंगाल बनते,’ या म्हणीचा प्रत्यय आपल्याला असंख्य राजकारणी लोकांची आणि व्यापारीवर्गाची विलासी राहणी पाहिली की येतो. आज देशावर जो तिरंगी ध्वज फडफडत आहे त्यात काळा, तांबडा आणि शेंदरी हे रंग दिसत आहेत-बेहिशोबी पैशाचा काळा, दफ्तर-दिरंगाईच्या लाल फितीचा तांबडा आणि भ्रष्टाचाराचा झगमगता शेंदरी. आपल्या सरकारी प्रशासनयंत्रणेला वेळेचे महत्व जाणवतच नाही. आर्थिक आणि वैज्ञानिक संशोधन प्रतिष्ठानने आपल्या अलिकडच्या एका पाहाणीत असे नमूद केले आहे की पंचवार्षिक योजनांमधील कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यात दिरंगाई झाली नसती तर (अ) आपले राष्ट्रीय उत्पन्न दरवर्षी १,२०,००० कोटी रुपयांनी वाढले असते, (ब) निर्यातीमध्ये दरवर्षी ९,६०० कोटी रुपयांची वाढझाली असती. (क) अन्नधान्याच्या वार्षिक उत्पादनात ५ कोटी ४० लाख टनांची वाढघडून आली असती (ड) नवे १ कोटी ४४ लाख रोजगार निर्माण झाले असते, आणि (ई) दर माणशी उत्पन्नात तिप्पट वाढझाली असती. काल आणि उद्या यांना ‘कल’ हा एकच शब्द वापरणारा भारत हा जगातील बहुधा एकमेव देश असावा. गेल्या तीस वर्षांत आपण अनेक चुकीचे निर्णय केले, वेळ वाया घालविला, सोन्याला राखेची किंमत दिली आणि सोन्याच्या भावाने राख खरेदी केली. असे असले तरी भारताच्या दीर्घकालीन उज्ज्वल भवितव्याबद्दल माझ्या मनात किंचितही संदेह नाही, असे ते आग्रहाने नमुद करतात. प्रत्येक नागरिकाने वाचावे असे अभ्यासाचे महत्त्वपूर्ण पुस्तक. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MI GALIB BOLTOY
MI GALIB BOLTOY by SHABBIR ROMANI Rating Star
Arvind deshpande

Mirza Ghalib is the Jewel in the Urdu literature. He is the pioneer in setting new trend in it. Authar Shabbir Romani excellently explained it. Everyone who is not acquainted with urdu literature should go throw it. The socio political and historicalenviorn of that time is skillfully reflected in his poetry and was narrated by author shabbir Romani. ...Read more

NADIMUKH
NADIMUKH by PERUMAL MURUGAN Rating Star
गार्गी म्हात्रे

पेरुमाल मुरुगन ह्या तामिळ लेखकाच " नदीमुख" हे अनुवादित पुस्तक वाचले. मराठी मध्ये दाक्षिणात्य भाषां मधल्या तामिळ भाषेच्या उत्तम साहित्याची वाचन संधी या पुस्तकाच्या निमित्ताने मिळाली. साठच्या दशकात जन्मलेल्या पिढीला वेगाने ,खर तर अती वेगाने बदलत जाणाऱ्ा तंत्रज्ञान व तरुण पिढीची मानसिकता यांचे सुंदर चित्रण या कादंबरी मध्ये करण्यात आले आहे. माणूस किंवा असुर पालक असला की मुलांच्या भविष्याची चिंता त्यामधून उद्भवणारा संघर्ष साध्या सोप्या पण प्रवाही भाषेमधून आपल्या समोर उभा राहातो. कुमारासुराच्या एकसुरु झापडे लावून घेतलेल्या आयुष्यात `नदीमुख` दर्शना नंतर झालेली तगमग व बदल यांचे खूप सुंदर वर्णन शेवटी आलेल आहे. डॉ. मानसी जयंत केळकर यांनी अतिशय प्रवाही भाषेत व उत्कृष्ट समर्पक शब्दात पुस्तक अनुवादित केल्यामुळे कांदबरीची मजा घेता येते. मराठी व्यतिरिक्त अन्य भाषेतील साहित्य वाचनाला उपलब्ध करुन दिल्या बद्दल मेहता पब्लिशिंग हाऊस व डॉ मानसी केळकर यांचे आभार ! ...Read more