* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: TO KILL A DEMOCRACY:INDIAS PASSAGE TO DESPOTISM
  • Availability : Available
  • Translators : UTPAL V.B.
  • ISBN : 9789357201162
  • Edition : 1
  • Publishing Year : AUGUST 2023
  • Weight : 280.00 gms
  • Pages : 308
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : POLITICS & GOVERNMENT
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
COMBINING POIGNANT LIFE STORIES WITH SHARP SCHOLARLY INSIGHT, TO KILL A DEMOCRACY REJECTS THE BELIEF THAT INDIA WAS ONCE A BEACON OF DEMOCRACY BUT IS NOW BEING RUINED BY THE DESTRUCTIVE FORCES OF MODI-STYLE POPULISM. IT DETAILS THE MUCH DEEPER HISTORICAL ROOTS OF THE PRESENT-DAY ASSAULTS ON CIVIL LIBERTIES AND DEMOCRATIC INSTITUTIONS. DEMOCRACY, THE AUTHORS ALSO ARGUE, IS MUCH MORE THAN ELECTIONS AND THE SEPARATION OF POWERS. IT IS A WHOLE WAY OF LIFE LIVED IN DIGNITY, AND THAT IS WHY THEY PAY SPECIAL ATTENTION TO THE DECAYING SOCIAL FOUNDATIONS OF INDIAN DEMOCRACY.IN COMPELLING FASHION, THE BOOK DESCRIBES DAILY STRUGGLES FOR SURVIVAL AND EXPLAINS HOW LIVED SOCIAL INJUSTICES AND UNFREEDOMS ROB INDIAN ELECTIONS OF THEIR MEANING, WHILE AT THE SAME TIME FEEDING THE DECADENCE AND IRON-FISTED RULE OF ITS GOVERNING INSTITUTIONS. IT POINTS OUT THAT WHAT IS HAPPENING IN THE COUNTRY IS GLOBALLY IMPORTANT, AND NOT JUST BECAUSE EVERY THIRD PERSON LIVING IN A DEMOCRACY IS AN INDIAN. IT SHOWS THAT WHEN DEMOCRACIES RACK AND RUIN THEIR SOCIAL FOUNDATIONS, THEY DON’T JUST KILL OFF THE SPIRIT AND SUBSTANCE OF DEMOCRACY. THEY LAY THE FOUNDATIONS FOR DESPOTISM.
"मर्मभेदी जीवनकथा आणि तीक्ष्ण, अभ्यासू अंतर्दृष्टी यांचे मिश्रण असलेले ‘लोकशाहीच्या हत्येसाठी` हे पुस्तक भारत हा एकेकाळी लोकशाहीचा दीपस्तंभ होता आणि आता तो मोदी शैलीतील लोकानुनयवादामुळे मोडकळीस येतो आहे या मताला नाकारते. आज नागरी स्वातंत्र्यावर आणि लोकशाहीत्मक संस्थांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या ऐतिहासिक मुळांपाशी हे पुस्तक जाते. लेखकांचे असेही प्रतिपादन आहे की लोकशाही म्हणजे निवडणुका आणि सत्तेच्या विभाजनापेक्षा बरेच काही आहे. ती एक प्रतिष्ठेने जगली जाणारी जीवनशैली आहे. आणि म्हणूनच भारतीय लोकशाहीच्या ढासळत्या सामाजिक पायाकडे लेखकांनी विशेष लक्ष दिले आहे. अस्तित्वाच्या दैनंदिन लढायांकडे हे पुस्तक प्रभावीपणे आपले लक्ष वेधते. प्रत्यक्ष अनुभवलेले सामाजिक अन्याय आणि पारतंत्र्य भारतीय निवडणुकांचा अर्थ कशा प्रकारे हिरावून घेतात आणि त्याच वेळी प्रशासकीय संस्थांची अवनती होत त्यांची पोलादी पकड कशी मजबूत होत जाते याचा खुलासा या पुस्तकातून होतो. देशात जे घडते आहे ते जागतिक स्तरावर महत्त्वाचे आहे याकडे हे पुस्तक लक्ष वेधते. आणि लोकशाहीत राहणारा प्रत्येक तिसरा माणूस भारतीय आहे म्हणूनच केवळ ते महत्त्वाचे नाही. पुस्तक दाखवून देते की जेव्हा लोकशाही व्यवस्था आपल्या सामाजिक पायाला उद्ध्वस्त करतात तेव्हा त्या फक्त लोकशाहीचा आत्मा आणि सारतत्त्वच मारत नाहीत तर जुलूमशाहीची पायाभरणी करतात. "
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #मेहतापब्लिशिंगहाऊस #कादंबरी #अनुवाद #क्लासिक #आध्यात्मिक #धार्मिक #लोकशाहीच्याहत्तेसाठी #देबाशीषरॉयचौधरी #जॉनकीन #भारतीयलोकशाही #नागरीहक्क #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #MEHTAPUBLISHINGHOUSE #TOKILLADEMOCRACY #DEBASHISHROYCHOWDHURY #JOHNKEANE #INDIANDEMOCRACY #MODISTYLEPOPILISM #FICTION #MARATHITRANSLATION
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
सौ. जयश्री अनिल आसलकर अमरावती

आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधला मराठमोळा झंझावात - *महारुद्र* काही माणसे मैदान गाजवतात, काही इतिहास घडवतात, काही आपल्या कर्तृत्वाने जग जिंकतात, तर काही आपल्या माणुसकीने मने. पण ज्यांचे कर्तृत्व शब्दांच्या पलीकडचे आणि ज्यांचे माणुसकीचे वैभव वर्णनातीत अशाव्यक्तिमत्त्वाला शब्दांत बांधणे म्हणजे अथांग सागराची विशालता ओंजळीत सामावण्याचा प्रयत्न करणे होय. भीमराव देशमुख हे असेच एक असामान्य व्यक्तिमत्त्व. भीमरावांच्या या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडवणारे ‘महारुद्र’ हे केवळ एका महान फुटबॉलपटूचे चरित्र नाही, तर कर्तृत्व, त्याग, स्वाभिमान आणि माणुसकी यांचा अनमोल जीवनपट आहे त्यांच्या विराट रूपाचे वर्णन करण्यास माझी लेखणी अपुरी पडते आणि शब्दही नतमस्तक होतात. आंतरराष्ट्रीय फुटबॉलच्या मैदानावर आपल्या कर्तृत्वाचा झंझावात निर्माण करणारे भीमराव गावच्या मातीत मात्र सहकाऱ्यांशी समरस होण्यासाठी अनवाणी खेळतात. प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचूनही प्रसिद्धीचा मोह बाळगत नाहीत आणि स्वतःच्या उद्याची चिंता न करता दुसऱ्याच्या अडचणीला धावून जातात. जग जिंकण्याचे सामर्थ्य असतानाही माणुसकी जपणाऱ्या या अवलियाचे मोठेपण त्यांच्या विजयात जितके आहे त्याहून कितीतरी अधिक त्यांच्या त्यागात आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉलच्या मैदानावर कर्तृत्वाचा झेंडा फडकवणाऱ्या भीमरावांकडे निवृत्तीच्या वेळी पैसा, प्रसिद्धी आणि यश सारे काही होते परंतु स्वतःजवळचे इतरांना देऊन टाकण्याच्या त्यांच्या वृत्तीने त्यांना पुन्हा हलाखीच्या परिस्थितीत आणले. स्वतःच्या उद्याची चिंता न करता दुसऱ्याच्या गरजेला प्राधान्य देणाऱ्या या अवलियाने संपत्तीपेक्षा माणुसकीला अधिक मोल दिले. जग जिंकणाऱ्या या खेळाडूने स्वतःसाठी काही जपले नाही पण इतरांसाठी जगण्याचा एक अनमोल आदर्श मागे ठेवला. पुस्तकाचे लेखक श्री. जी. बी. देशमुख यांनी *महारुद्र* च्या माध्यमातून पित्याच्या जीवनातील कर्तृत्व, संघर्ष, त्याग आणि माणुसकीचे जे दर्शन घडवले आहे ते केवळ चरित्र लेखन नाही तर ती एका असामान्य जीवनाला शब्दरूप देण्याची हृदयस्पर्शी साधना आहे. भीमराव देशमुख यांचे व्यक्तिमत्व तसेच कर्तृत्व शब्दांपलीकडचे आणि त्यांचे औदार्य वर्णनातीत. अशा उत्तुंग व्यक्तिमत्त्वाविषयी लिहिताना शब्द अपुरे पडतात आणि अमरावतीच्या ऐतिहासिक वैभवात मोलाची भर घालणाऱ्या कर्तृत्ववान भीमरावांविषयी अभिमानाने मन भरून येते. काही व्यक्तिमत्त्वे इतकी उत्तुंग असतात की त्यांचे वर्णन करण्यापेक्षा त्यांच्यापुढे नतमस्तक होणेच अधिक समर्पक ठरते. लेखक श्री. जी. बी. देशमुख यांचे या अनमोल साहित्यकृतीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! ...Read more

PRATIKSHA
PRATIKSHA by RANJEET DESAI Rating Star
Mahesh Muley

अतिशय सुंदर पुस्तक, आयुष्य जगताना खूप काही हरवले आहे वाटते पण हे पुस्तक नव्याने जगायला आणि आहे ती परिस्थिती स्वीकारायला वाटा शोधायला नवीन प्रेरणा देते, सध्या समाजाची स्थिती बदलली असताना स्त्रियांना आणि त्यांच्या भावनांचा विचार करण्यासाठी नैतिकता जागेकरण्याला हे रणजीत देसाई लिखित पुस्तक खूपच महत्त्वाचे ठरेल... ...Read more