NANI PALKHIWALA

About Author

Birth Date : 16/01/1920
Death Date : 11/12/2002




नानी ए. पालखीवाला यांचा जन्म मुंबई येथे झाला. मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयामध्ये ते कायद्याचे प्राध्यापक होते आणि नंतर त्यांची कलकत्ता विद्यापीठात कायद्याचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली. न्यूयॉर्कमधील ॲकॅडमी ऑफ पोलिटिकल सायन्स या संस्थेने त्यांना 1975 मध्ये सन्माननीय सदस्यत्व दिले आणि 1977 मध्ये अमेरिकेतील भारताचे राजदूत म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. न्यू जर्सी (अमेरिका) येथील प्रिन्स्टन विद्यापीठाने त्यांचा डॉक्टर ऑफ लॉज ही सन्माननीय पदवी देऊन गौरव केला. घटनात्मक स्वातंत्र्याचा संरक्षक, मानवी अधिकारांचा पुरस्कर्ता, अध्यापक, लेखक आणि आर्थिक विषयांचा तज्ज्ञ असे त्यांचे त्या वेळी वर्णन करण्यात आले. विसकॉन्सिक (अमेरिका) येथील लॉरेन्स विद्यापीठानेही 1971 च्या एप्रिलमध्ये त्यांना ’डॉक्टर ऑफ लॉज’ या सन्माननीय पदवीने गौरविले. भारतातील आणि परदेशांतील न्यायालयांमध्ये पालखीवाला यांनी अनेक ऐतिहासिक खटल्यांमध्ये बाजू मांडली. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संचालक या नात्यांनी ते अनेक औद्योगिक आणि व्यापारी समूहांशी संबंधित होते.
Sort by
Show per page
Items 1 to 2 of 2 total
WE, THE NATION Rating Star
Add To Cart INR 350
WE, THE PEOPLE Rating Star
Add To Cart INR 495