* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: WE, THE NATION
  • Availability : Available
  • Translators : V.S.WALIMBE
  • ISBN : 9788177667165
  • Edition : 6
  • Publishing Year : MAY 1995
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 320
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : POLITICS & GOVERNMENT
  • Available in Combos :V. S. WALIMBE COMBO SET- 4 BOOKS
  • Discount : SPECIAL OCTOBER DISCOUNT 33/50 PERCENT(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
A BOOK FOR ALL PERSONS AND ALL SEASONS INDEED. EACH TOPIC IS ILLUMINATED WITH SENSITIVITY AND SUNLIGHT-CLEAR EXPOSITION. PUBLIC MEMORIES ARE IRRESPONSIBLY SHORT AND SELECTIVE, AND THIS BOOK, SPANNING AS IT DOES THE PANORAMA OF THE LAST TEN TUMULTUOUS YEARS, BECOMES ESSENTIAL READING - THE HISTORY THAT MUST BE1 READ SO THAT WE ARE NOT CONDEMNED TO REPEATING IT. INDIA, THE SLEEPING GIANT OF AN ECONOMY IN THE WORDS OF LEE KUAN YEW IS, AT LAST, SLOWLY STIRRING FROM ITS LONG NIGHT OF SLUMBER, DRUGGED AS IT HAS BEEN FOR DECADES WITH THE OPIATE OF SOCIALISM. THIS AMAZING SUBCONTINENT WITH ITS MOSAIC OF COLOURS, CULTURES, CONTRASTS AND MADDENING CONTRADICTIONS, ALWAYS HAS, THANKS TO VAST QUANTITIES OF ITS OWN INDIGENOUSLY MANUFACTURED RED TAPE AND VENAL POLITICIANS, BEEN HELD IN THRALL FOR SO LONG. IT IS ONLY NOW, AND THAT TOO HESITANTLY, THAT INDIA IS MOVING TO TAKE ITS RIGHTFUL PLACE IN THE COMMUNITY OF NATIONS OF THE WORLD. WHAT AILS INDIA, WHAT ITS POTENTIAL IS, HOW MAGNIFICENT ITS HERITAGE IS, HOW RICHLY ENDOWED IT IS BY BOTH HISTORY AND NATURE, ARE ALL HIGHLIGHTED IN THIS BOOK.
`निद्रिस्त महाशक्ती’ असे ली कुआन यू यांनी भारताचे वर्णन केले होते. समाजवादाची नशा ओसरल्यामूळे, सुदैवाने भारत दीर्घ निद्रेतून हळूहळू जागा होत आहे. त्यामूळे लवकरच तो आंतरराष्ट्रीय पटावर आपले न्याय्य स्थान संपादन करील,असा विश्वास वाटतो. भारताचे दुखणे काय आहे, त्याच्यापाशी केवढी उदंड क्षमता आहे, त्याला केवढा वैभवशाली वारसा लाभलेला आहे, इतिहास आणि निसर्ग या दोन्ही बाबतींत तो किती समृध्द आहे, याचे अत्यंत मार्मिक विवेचन या पुस्तकात करण्यात आलेले आहे. भारताच्या उदात्त राज्यघटनेपासून, या देशाला वेळोवेळी भेडसावत गेलेल्या माननिर्मित समस्यांपर्यंत अनेक विषयांचा वेध लेखकाने आपल्या अजोड बुध्दिमत्तेच्या बळावर अचूक रीतीने घेतला आहे. पालखीवाला यांनी केवळ समस्यांचेच सूचन केले आहे. असे नाही; आपल्या वैशिष्ट्यपूर्ण व्यासंगाच्या आणि विविध क्षेत्रांतील सखोल अनुभवाच्या आधारे त्यांच्या सोडवणुकीची दिशाही सांगितली आहे. जो देश इतिहास विसरतो, त्याच्या नशिबी त्या इतिहासाची पुनरावरावृत्ती अनुभवण्याची वेळ येते, असे सर्वच विचारवंत मानतात. त्या दृष्टीनेच पालखीवाला यांनी गेल्या सहा वर्षांच्या वाटचालीसंबंधी या ग्रंथात मागोवा घेतला आहे. थोडक्यात सांगायचे, तर सर्व व्यक्तींना सर्व प्रसंगी उपयुक्त ठरते, असे हे पुस्तक आहे.

No Records Found
No Records Found
Keywords
#NANI PALKHIWALA #V.S.SVALIMBE#WARSAWTEHIROSHIMA #WETHEPEOPLE #WETHENATION
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    ‘वुई दि नेशन’ हे पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल प्रकाशक श्री. अनिल मेहता यांना धन्यवाद. कारण एक इंग्लिशमधील एक महत्त्वपूर्ण पुस्तक त्यांनी मराठीत आणले. पुस्तक वाचताना ते अनुवादित आहे असे कुठल्याही पानावर जाणवत नाही. इतक्या अर्थपूर्ण सामर्थ्यवान आणि ओघवतया भाषाशैलीमध्ये त्यांनी लिहिले आहे, अनुवाद ही सुद्धा एक ‘स्वतंत्र कलाकृती’ असते हेच या पुस्तकावरून जाणवते. केंद्रबिंदू अनाम देशबांधव भारतातील एक प्रसिद्ध विचारवंत श्री. नानी पालखीवाला यांचे ‘वुई दि नेशन’ हे पुस्तक म्हणजे शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक, जातीयता, कायदा, संस्कृती, वृत्तपत्र या महत्त्वपूर्ण विषयांवरील चिंतन आणि मार्गदर्शन याचा एक वस्तुपाठच म्हणता येईल. श्री. पालखीवाला यांनी हे पुस्तक न कुरकुरता खडतर वाटचाल करीत असलेल्या कोट्यवधी सालम अनाम देशबांधवांना अर्पण केले आहे. या अर्पण पत्रिकेवरूनच लक्षात येते की, वर नमूद केलेल्या विषयांच्या मूलभूत संदर्भ किंवा केंद्रबिंदू हा देशातील अनाम देशबांधव - सामान्य माणूस आहे आणि असे असूनही हा अनाम बांधवच सदोदित उपेक्षित राहिला आहे. दुर्लक्षित राहिला आहे, हीच आपल्या देशाची शोकांतिका होय. या अनाम देशबांधवांची योग्य ती दखल राज्यकर्त्यांनी घेतली असती तर आपला देश जगातील एक समृद्ध आणि बलाढ्य देश झाला असता असेही श्री. पालखीवाला सांगतात. चुकीचा समाजवाद भारताचे दुखणे नेमके काय आहे याचा शोध पालखीवाला यांनी घेतला आहे. ते म्हणतात, ‘‘भारतातील चुकीचा समाजवाद हे त्यातील पहिले आणि मुलभूत दुखणे आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेहरूंची काँग्रेस अधिकारावर आली आणि तेव्हापासून अधिकारावर आलेल्या सर्व सरकारांशी राष्ट्रावर विवेकशून्य आणि अनुकरणात्मक समाजवाद लादला, त्यामुळे उद्यमशिलतेला आणि उपक्रमशिलतेला वावच उरला नाही. वास्तविक सामाजिक न्याय हाच समाजवादाचा खरा आशय. त्याऐवजी रशियन-कम्युनिकेशनच्या अनुकरणातून लादलेली सरकारी नियंत्रणे आणि सरकारी मालकी म्हणजे समाजवाद असे राज्यकत्र्यांनी गृहीत धरले. वास्तविक भारतात आचरणात आणला जाणारा समाजवाद म्हणजे एक प्रचंड ढोंग आहे. अशा परखड शब्दांमध्ये पालखीवाला यांनी भारतीय समाजवादावर कडाडून टीका केली आहे.’’ फुटिरता हा दुसरा प्रश्न फुटिरता हा भारतातील आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे. देशाच्या एकतेवर आणि अखंडतेवर जातीय विद्वेष, भाषिक दुराभिमान आणि प्रादेशिक निष्ठा प्रहार करीत असतात. जात किंवा वंश संप्रदाय किंवा भाषा यापैंकी कशाचाही आधार दहशतवाद्यांना आणि सराईत गुंडांना पुरेसा वाटतो. क्षुल्लक कारणावरून माणसे मारायला या गुंडांना जराही संकोच वाटत नाही. भारतीय प्रजासत्ताकाच्या इतिहासात पूर्वी कधीही पाहायला मिळाले नाही एवढे सध्या हिंसाचाराने थैमान घातले आहे. भारताच्या अशा अनेक समस्या असल्या तरी त्यावर उपाय करणे अशक्य आहे असे नाही. त्याबद्दल काय करणे शक्य नाही. त्याबद्दल काय करणे शक्य आहे याची चर्चा पालखीवाला यांनी आपल्या भाषणातून केली आहे. यासाठी भारताला त्याच्या उदंड, प्रचंड क्षमतेचा उपयोग करून द्यावा लागेल. भारताला पाच हजार वर्षाची सांस्कृतिक परंपरा लाभली आहे. सर्वकष, उदात्त अशी राज्यघटना आपल्याला लाभली आहे, अत्यंत सर्जनशील उपक्रमशीलता, अत्यंत गतिमान व्यापारी नेतृत्व आणि अर्थकारणाचे जाणकार तज्ज्ञ भारतात अनेक आहेत. दुर्मिळ अशी फार मोठी मानवी क्षमता आहे. एवढी विलक्षण निर्मिती शक्ती, क्षमता असताना आमचा देश मागे का पडला? मागे वळून पाहिले तर स्वातंत्र्यानंतरची महत्त्वाची २० वर्षे भारताने वाया घालविली असे म्हणावेसे वाटते. नानी पालखीवाला यांनी आपल्या भाषणातून गेल्या काही वर्षातील देशातील महत्त्वाच्या घटनांवरही चर्चा केली आहे. अयोध्या प्रश्नाविषयी ते म्हणतात, सध्याच्या कालखंडाची अयोध्याकांड म्हणून इतिहासात नोंद होईल. संघर्ष आणि समन्वय यापैकी एकाची आपल्याला निवड करावयाची आहे. भिन्न धर्मियांमध्ये सौहार्द आणि सहिष्णुता नांदावी यासाठी भारताचा आत्मा तळमळत आहे. जेथे कोठे चांगले दिसेल त्याचा स्वीकार करून ते आत्मसात करून भारतीय संस्कृती गेल्या पाच हजार वर्षांमध्ये अधिक प्रगल्भ आणि समृद्ध झाली आहे. या सर्वसमावेशक वृत्तीमुळे भारतीय संस्कृतीला वेगळेच सौंदर्य प्राप्त झाले आहे. नानी पालखीवाला यांच्या करप्रणाली आणि केंद्रीय अर्थसंकल्पावरील अभ्यासपूर्ण भाषणांचाही समावेश प्रस्तुत पुस्तकात आहे. त्यामध्ये त्यांनी भ्रष्टाचाराचा उगम आणि उपाययोजना यांचाही परामर्श घेतला आहे. भारतातील महत्त्वपूर्ण घटनात्मक प्रश्नांमध्ये त्यांनी मंडल आयोगाविषयी आपले विचार मांडले आहेत. मंडल आयोगातील पाच त्रुटी त्यांनी सांगितल्या आहेत. मान्यवरांवर लेख ‘वुई दि नेशन’ या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अनेक मान्यवर व्यक्तींच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक कारकीर्दी विषयाचे लेख समाविष्ट केले आहेत. त्यामध्ये आदर्श राज्यपाल सी. सुब्रमण्यम्, आदी शंकराचार्य, दादाभाई नौरोजी, सरदार वल्लभभाई पटेल, सर आशुतोष मुखर्जी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सुमंत मुळगावकर, एम, पी. बिर्ला, नौरोजी गोदरेज, रामनाथ गोएंका यासारख्या असामान्य व्यक्तीच्या कर्तृत्वाचा मार्मिकतेने आढावा घेतला आहे. पारशी समाजाचे योगदान भारतातील पारशी समाजातील लोकांबद्दल आकाशवाणीवर केलेल्या भाषणात पालखीवालांनी म्हटले, ‘‘भारतातील पारशी लोकांनी देशाच्या जीवनात निर्वासित म्हणून पारशी भारतात आले. सध्या ९४³ पारशी शहरात राहतात. शिक्षण, सामाजिक सुधारणा, आर्थिक विकास आणि राजकारण अशा चार क्षेत्रांमध्ये पारशी लोकांची नावे घेता येतील. या महान देशाने पारशी समाजावर एक हजार वर्षांपूर्वी त्यांना आश्रय देऊन जे उपकार केले त्याची परतफेड एकट्या जमशेटजी टाटाने केली आहे. पारशी समाज भारताशी संपूर्णपणे समरस झाल्याचे उदाहरण म्हणजे सर फिरोजशहा मेहता, दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी म्हणत, मी हिंदू, मुसलमान, पारशी, खिस्ती किंवा अन्य कोणत्याही धर्माचा असो, मी सर्वप्रथम भारतीय आहे. आमचा देश भारत, आमचे राष्ट्रीयत्व भारतीय. भारतातील या अत्यंत चिमुकल्या समाजाने भारताच्या समृद्धीतच समाधान मानले. स्वत:साठी विशेषधिकाराची किंवा राखीव जागांची कधीही मागणी केली नाही. गेल्या शंभर वर्षात पारशी समाजाने अनेक आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या व्यक्तींना जन्म दिला आहे. दादाभाई नौरोजी, जमशेटजी टाटा, फिरोजशहा मेहता, मंचरजी भावनगरी, शापूरजी सावतावाला, डॉ. होती भाभा, जुबीन मेहता अशी कितीतरी नावे घेता येतील. स्वतंत्र भारताची आता ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या पन्नास वर्षांत आपण नेमके काय मिळवले? आताची आपल्या देशाची परिस्थिती पाहाता ही वर्षे ‘वाया गेली’ असेच म्हणायचे का? आशियाचा दीपस्तंभ होण्याची क्षमता असलेला भारत नैतिकतेच्या दृष्टीने प्रत्यक्षात कृष्णविवर झालेला आहे. एक राष्ट्र म्हणून भारताची प्रशासन यंत्रणा असेच याला स्वरूप येत असून असे घडणे निश्चितच धोकादायक ठरेल. धार्मिक विद्वेष आणि भाषिक नि प्रादेशिक दुराभिमान यांच्या वाढत्या आघातांमुळे आपण आपली राष्ट्रीय अस्मिता विसरत चाललो आहोत. त्यातच आता शहरी विरुद्ध ग्रामीण तसेच मागासलेले आणि पुढारलेले वर्ग या नव्या संघर्षाची भर पडत आहे, त्यामुळे फुटिरतेचे वर्तुळ पूर्ण झाले आहे, असे म्हणायला हरकत नाही. हे शतक संपण्याच्या आत भारताचे विघटन घडून येईल हे जीन रिक्सन हिचे खोडसाळ भविष्य खरे व्हावे, या दृष्टीने आपण आपल्या परीने हातभार लावीत आहोत. पान नं. १०३ वरील हे विचार प्रत्येक सुजाण भारतीयाला अंतर्मुख करतील असेच आहेत तरीही, समाजवादाची नशा ओसरल्यामुळे सुदैवाने भारत दीर्घ निद्रेतून हळुहळू जागा होत आहे, त्यामुळे लवकरच ती आंतरराष्ट्रीय पटावर आपले न्यायस्थान संपादन करील असा विश्वास वाटतो.’’ असे नानी पालखीवाला यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे. आपल्या देशाला सध्या सर्वच क्षेत्रात उतरती कळा आल्याचे दिसून येते. निराशापूर्ण अशा परिस्थितीत वरील विचारांनी न कुरकुरता खडतर वाटचाल करीत असलेल्या कोट्यवधी सालस, अनाम, देशबांधवांना निदान जगण्याच्या प्रेरणा मिळतील आणि त्यांच्या जगण्यातील आशावाद टिकून राहील असे वाटते. कारण सिंगापूरचे पंतप्रधान ली कुआन यू यांनी भारताचे वर्णन ‘एक निद्रिस्त महाशक्ती’ असे केले आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MI GALIB BOLTOY
MI GALIB BOLTOY by SHABBIR ROMANI Rating Star
Arvind deshpande

Mirza Ghalib is the Jewel in the Urdu literature. He is the pioneer in setting new trend in it. Authar Shabbir Romani excellently explained it. Everyone who is not acquainted with urdu literature should go throw it. The socio political and historicalenviorn of that time is skillfully reflected in his poetry and was narrated by author shabbir Romani. ...Read more

NADIMUKH
NADIMUKH by PERUMAL MURUGAN Rating Star
गार्गी म्हात्रे

पेरुमाल मुरुगन ह्या तामिळ लेखकाच " नदीमुख" हे अनुवादित पुस्तक वाचले. मराठी मध्ये दाक्षिणात्य भाषां मधल्या तामिळ भाषेच्या उत्तम साहित्याची वाचन संधी या पुस्तकाच्या निमित्ताने मिळाली. साठच्या दशकात जन्मलेल्या पिढीला वेगाने ,खर तर अती वेगाने बदलत जाणाऱ्ा तंत्रज्ञान व तरुण पिढीची मानसिकता यांचे सुंदर चित्रण या कादंबरी मध्ये करण्यात आले आहे. माणूस किंवा असुर पालक असला की मुलांच्या भविष्याची चिंता त्यामधून उद्भवणारा संघर्ष साध्या सोप्या पण प्रवाही भाषेमधून आपल्या समोर उभा राहातो. कुमारासुराच्या एकसुरु झापडे लावून घेतलेल्या आयुष्यात `नदीमुख` दर्शना नंतर झालेली तगमग व बदल यांचे खूप सुंदर वर्णन शेवटी आलेल आहे. डॉ. मानसी जयंत केळकर यांनी अतिशय प्रवाही भाषेत व उत्कृष्ट समर्पक शब्दात पुस्तक अनुवादित केल्यामुळे कांदबरीची मजा घेता येते. मराठी व्यतिरिक्त अन्य भाषेतील साहित्य वाचनाला उपलब्ध करुन दिल्या बद्दल मेहता पब्लिशिंग हाऊस व डॉ मानसी केळकर यांचे आभार ! ...Read more