DHIRENDRA MEHTA

About Author

Birth Date : 29/08/1944


MA IN GUJARATI LITERATURE AND PH.D. MEHTA ATTENDED GUJARAT COLLEGE IN AHMEDABAD AND RR IN BHUJ. WORKED AS A PROFESSOR AT LALAN COLLEGE FOR A TOTAL OF 37 YEARS. AFTER RETIREMENT, HE MENTORED M.PHIL STUDENTS AT KUTCH UNIVERSITY.

गुजराथी साहित्य या विषयात एम.ए. आणि पीएच.डी. झालेल्या मेहता यांनी अहमदाबाद येथील गुजरात कॉलेज आणि भुज येथील आर.आर. लालन कॉलेज येथे एकूण ३७ वर्षे प्राध्यापक म्हणून काम केले. निवृत्तीनंतर त्यांनी कच्छ युनिव्हर्सिटीत एम.फिलच्या विद्याथ्र्यांना मार्गदर्शन केले. १९८० सालापासून मेहता सातत्याने लेखन करीत आहेत. ते कवी, कथालेखक आणि कादंबरीकार म्हणून वाचकांना परिचित आहेत. याशिवाय त्यांनी विवेचक व संपादक अशा जबाबदाऱ्याही पार पाडल्या आहेत. त्यांची ३० पुस्तके प्रकाशित असून त्यातील काही पुस्तकांचे इंग्रजी, हिंदी व ओडिया भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. काही कथांचे मराठीत अनुवाद झाले आहेत. २०१० साली त्यांच्या छावणी या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. त्यांना रणजितराम सुवर्णचंद्रक , साहित्य क्षेत्रातील कामाबद्दल मुनशी सुवर्णचंद्रक , कादंबरी लेखनासाठी दर्शक फाउंडेशन अ‍ॅवॉर्ड व धूमकेतू चंद्रक आणि गुजराती साहित्य परिषद पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
CHHAVANI Rating Star
Add To Cart INR 200

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
विभा मिटकरी, मुंबई.

`कुलामामाच्या देशात` ह्या पुस्तकाचे लेखक जी.बी.देशमुख ह्यांची लेखन शैली फार छान आहे. ओघवत्या लेखन शैली मुळे पुस्तक वाचताना प्रत्येक प्रसंग डोळ्यांसमोर उभा राहतो, आपण घरात नसून जंगलात वावरतोय असा अनुभव येतो, प्रत्येक कथा उत्कंठा वाढवणारी आहे आणि वन्यजवना बद्दल खूप महत्त्व पुर्ण माहिती देणारी आहे. माझी जी.बी.देशमुखांना विनंती कि त्यांनी श्री.रवींद्र वानखेडे साहेबांच्या संग्रही असणारे असेच अनेक चित्तथरारक अनुभव आम्हा वाचकांसाठी शब्द बद्ध करावे. ...Read more