* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: INDIAN POLICE…AS I SEE
 • Availability : Available
 • Translators : MADHURI SHANGBAUG
 • ISBN : 9789387789647
 • Edition : 4
 • Publishing Year : MARCH 2009
 • Weight : 180.00 gms
 • Pages : 168
 • Language : Translated From ENGLISH to MARATHI
 • Category : POLITICS & GOVERNMENT
 • Available in Combos :KIRAN BEDI COMBO SET - 11 BOOKS
Quantity
Buying Options:
 • Ebooks:
 • Print Books:
IT WILL BE A REVOLUTION IF WE ALL COULD BECOME THE POLICE OF OUR ACTIONS. THE POLICE ADMINISTRATION CAN BE USED TO STOP THE BAD THINGS AND TO START THE GOOD THINGS. POLICE SERVICE CAN PROTECT THE HUMAN RIGHTS BUT IT CAN ALSO VIOLATE THE HUMAN RIGHTS. IT IS UP TO THOSE WHO ARE ALREADY THERE IN THESE SERVICES AND THOSE WHO ARE GOING TO BE A PART OF THESE SERVICES TO MAKE A CHOICE BETWEEN THESE TWO. TODAY, SOME POLITICIANS ARE USING THE POLICE SERVICES FOR THEIR OWN BENEFIT, BUT THEN IT IS THE POLICE WHO HAVE TO DECIDE WHETHER HE/SHE SHOULD BE USED IN THIS WAY OR NOT? IF WE REALLY WANT THESE SERVICES TO BE SIMPLE AND MOST EFFECTIVE, THEN WE MUST WALK ON THE PATH OF TRUTH AND NONVIOLENCE. WE NEED SUCH LEADERSHIP WHICH IS VISIONARY, WHICH IS SKILLFUL, WHICH IS DEVOTED. SUCH A LEADERSHIP SHOULD REACH THE BOTTOM OF THE SOCIETY. DR. 106~ WRITES HER VIEWS ABOUT MAKING THE POLICE SERVICES MORE EFFECTIVE, VIRTUOUS, AND FRIENDLY. SHE ALSO GIVES US A CALL TO JOIN IN WITH OUR FEELINGS, PARTICIPATION AND REACTIONS.
``आपण सर्व स्वत:च्या कृतीचे पोलीस झालो तर ती फार मोठी क्रांती ठरेल.`` ``सुधारणा, वाईट गोष्टी रोखणे आणि चांगल्याचा अंमल करणे, यासाठी पोलीससेवेची सत्ता वापरता येते.`` ``ही सेवा मानवी हक्कांचे संरक्षण करू शकते अन् पायमल्लीही करू शकते. यातील काय निवडायचे ते या सेवेत असणारे आणि येऊ पाहणारे, यांनीच ठरवायचे आहे.`` ``आज आपल्या देशातील पोलीससेवा काही राजकारणी वापरतात. आपला वापर होऊ द्यायचा की नाही हे आपणच ठरवू शकतो.`` ``ही सेवा सुलभ आणि परिणामकारक व्हायची असेल, तर सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने वाटचाल करायला हवी. असे द्रष्टे, कुशल, समर्पित नेतृत्व या सेवेतून पुढे यायला हवे अन् ते तळापर्यंत झिरपायला हवे आहे.`` पोलीससेवा अधिकाधिक लोकाभिमुख आणि नीतिमान कशी होईल यावर आपल्या दीर्घ, डोळस अनुभवाचे विचार मांडणाया डॉक्टर किरण बेदी, वाचकांना या पुस्तकाद्वारे आपल्या संवेदना, सहभाग आणि प्रतिक्रिया देण्यासाठी उद्युक्त करतात.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#9TH JUNE #I DARE #ITS ALWAYS POSSIBLE #WHAT WENT WRONG AND WHY #MAJAL DARMAJAL #AS I SEE STRIYANCHE SAKSHAMIKARAN #AS I SEE BHARTIYA POLICE SEVA #AS I SEE NETRUTVA AANI PRASHASAN #BE THE CHANGE FIGHTING CORRUPTION #KIRAN BEDI #MADHURI SHANGBAUG #आय डेअर #इट्स ऑलवेज पॉसिबल #व्हॉट वेंट राँग अ‍ॅण्ड व्हाय #मजल दरमजल #अ‍ॅज आय सी...-स्त्रियांचे सक्षमीकरण...#भारतीय पोलीस सेवा...#नेतृत्व आणि प्रशासन...#भ्रष्टाचाराशी लढा #किरण बेदी #माधुरी शानभाग
Customer Reviews
 • Rating StarDAINIK SAMANA 12-12-2004

  किरण बेदींचे चिंतनशील अनुभव... डॉ. किरण बेदी या हिंदुस्थानी पोलीस सेवेतील सर्वोच्च पदावर पोहोचलेल्या पहिल्या स्त्री अधिकारी आहेत. देशाच्या विविध भागांत विविध पदांवर जबाबदारीने समर्थपणे पोलीस कार्य केल्याचा ३० वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. लोकभिमुख पोलीस कार्ये ही त्यांची विशेषत: आहे. स्त्रियांच्या प्रश्नांवर, तुरुंग सुधारणांबद्दल, अमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम, त्यांची तस्करी रोखणे यावरती अमेरिकेत, युरोपीय देशांत, आशियाई देशात आणि संयुक्त राष्ट्रसंघात भरलेल्या परिषदांमध्ये त्यांनी हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व केलेले आहे. त्यांना अनेक राष्ट्रीय तसेच रॅमन मॅगसेसे पुरस्कारासारखे आंतरराष्ट्रीय पुरस्कार लाभले आहेत. आपल्या पोलीस सेवेतील अनुभवांवर आधारित त्यांचे दोन स्तंभ ‘द ट्रिब्युन’ आणि ‘पंजाब केसरी’मध्ये सुरू झाले आणि त्यांना मोठा प्रतिसाद मिळाला. आपल्या लेखनाविषयी त्यांच्या भावनाही बोलक्या होत्या. ‘‘मी जे पाहते, ऐकते, वाचते, बारकाईने निरखते त्याचे काय करावे असा प्रश्न मला पडतो. मी ते सर्व विसरून जाऊ शकते, दुर्लक्षू शकते, पण तसे न करता त्यावर लिहून शब्दांतून माझी अस्वस्थत: प्रकट करणे ही मला माझी एक गरज वाटते. म्हणून मी लिहिते आणि लिहित राहीन.’’ किरण बेदी यांनी आपल्या ओघवत्या, सोप्या, ताज्या आणि टवटवीत शैलीत आपण अनुभवलेल्या छोट्यामोठ्या घटनांवर, मुद्द्यांवर ‘अ‍ॅ आय सी...’ या आपल्या इंग्रजी पुस्तकातील शंभर स्फूट लेखांत आपली मते व्यक्त केली आहेत. या पुस्तकाचा अतिशय सुबोध आणि प्रवाही अनुवाद माधुरी शानभाग यांनी केला आहे. या लिखाणातून वाचकांना सजग करायचे त्यांचे प्रामाणिक प्रयत्न सहज जाणवतात. ज्या घटनांचा ऊहापेह त्या या लेखातून करतात त्यांना समजून घेतल्याने वाचक आणखी मानवी होण्याच्या दिशेने प्रवास करतील असा विश्वास त्यांना वाटतो. ‘अ‍ॅज आय सी...’ यामध्ये लेखिका जसे पाहते तसे तुम्हीही पाहा असे आवाहन त्या वाचकांना करतात. त्यांनी समाजातील जी कुरूप चित्रे पाहिली ती सर्वांनी मिळून सुंदर करायचा प्रयत्न करण्यासाठी या लेखनातून त्या जणू वाचकांना मन:पूर्वक विनंती करतात. आजच्या स्त्रीबाबत किरण बेदी अतिशय जागरूक आणि आशावादी आहेत. हिंदुस्थानातील बहुसंख्य स्त्रियांची स्थिती परावलंबी असली तरी शिक्षणाने त्या सबल होतील असे त्यांना वाटते. पोलीस खात्यातील नीतीमूल्ये, भष्टाचार, वरिष्ठांचा मनमानीपणा, तरुण अधिकाऱ्यांचा होणारा हिरमोड, राजकीय हस्तक्षेप इत्यादी बाबींवर त्या जबाबदारीने कोरडे ओढून केवळ गप्प बसत नाहीत तर मार्गदर्शनही करतात पोलिसांनी स्वत:कडे अंतर्मुख होऊन पाहिले पाहिजे असे त्यांना वाटते. त्यासाठी तिहार जेलमध्ये त्यांनी तुरुंग कर्मचारी आणि कैद्यांसाठी ‘विपश्यना’ हा ध्यानाचा प्रकार सुरू केला. त्या स्वत:ही त्यात सामील झाल्या. त्याचा फायदा त्यांना स्वत:ला आणि पोलिसांनाही झाला आणि पुढे देशभर अशी शिबिरे सुरू झाली. सर्व व्यवहारांकडे डोळसपणे पाहण्याची, सकारात्मक वृत्ती अंगी बाणविण्याची शिकवण त्यांनी आपल्या कृतीतून पोलिसांना दिली. उदघाटनाअभावी बंद असलेला गोव्याच्या जुआरी नदीवरील पूल कोणत्याही आदेशाची वाट न पाहता सुरू करून देणाऱ्या किरण बेदी. कृतिशीलतेला किती महत्त्व देतात याची खात्री त्या एका उदाहरणावरून पटते. कुटुंबसंस्था, स्वातंत्र्य आणि स्वैराचार, दहशतवाद, हिंसाचार, नवी पिढी, स्त्रीशक्ती, कायदे, शिक्षण यांसारख्या अवतीभोवतीच्या घटनांवर आणि विषयांवर त्या आपली स्पष्ट मते निर्भीडपणे व्यक्त करतात. त्यांचं संवेदनशील मन आणि तितकीच कर्तव्यकठोरता त्यांच्या लेखनातून ठायी ठायी व्यक्त होते. त्यांचे विचार एखाद्या तत्त्ववेत्त्याच्या वचनांचे रूप धारण करतात. प्रचंड अनुभवाशिवाय हे शक्य नाही. कडूगोड अनुभवांच्या मुशीतूनच हे लेखनाचे परिपक्व रसायन बनले आहे. त्यांच्या नजरेतून ते आपण अनुभवण्यात खरी मजा आहे. -श्रीकांत आंब्रे ...Read more

 • Rating StarDAINIK LOKSATTA 03-04-2005

  रोखठोक वैचारिक मंथन… डॉ. किरण बेदी! काही आठवले का? हो त्याच त्या भारतीय पोलीस सेवेतील सर्वोच्च पदावर पोहोचलेल्या पहिल्या स्त्री-अधिकारी. रॅमन मॅगसेसेसह अनेक पुरस्कारांनी सन्मानित. विविध समाजोपयोगी कामांतून महत्त्वाचा सहभाग. वेळात वेळ काढून स्तंभलेखन या आधी काही पुस्तकांचे प्रकाशन. इ. इ. हा बायोडेटा’ सर्वांना माहीत असेलच. तो पुनहा आठवण्याचे कारण त्यांचे ‘अ‍ॅज आय सी...’ हे नवीन पुस्तक होय. ‘द ट्रिब्यून’ आणि ‘पंजाब केसरी’मध्ये सातत्याने आलेल्या शंभर लेखांचे संकलन या पुस्तकात करण्यात आले आहे. समाज आणि त्यात घडणाऱ्या असंख्य लहान-मोठ्या घडामोडींवर बेदींचे बारीक लक्ष दिसते. किंबहुंना तो त्यांच्या चिंतनाचा विषय आहे. भारतीय पोलीस सेवेदरम्यान आलेले अनुभव या लेखांतून आधिक्याने जाणवतात. पोलीस, प्रशिक्षण केंद्र, पोलिसांची जीवनशैली, त्यांच्याविषयी वाटणाऱ्या आत्मीयतेसोबतच सेवाकार्याचा वारसा चालावा, सांगण्याची धडपड या लेखांतून दिसते. ‘स्त्री’ हा किरण बेदीचा दुसरा जिव्हाळ्याचा विषय मानता येईल. स्त्री शिक्षण, सबलीकरण, अनिष्ट प्रथावृत्तींच्या विरोधात ठामपणे उभे राहणे, स्त्री-शक्तीची जाणीव करून देणे असे कार्य या लेखाद्वारे होताना दिसते. देशाचे भावी नागरिक कसे हवेत, त्यांचे शिक्षण, त्यांच्यावर होणारे संस्कार, त्यांचा सर्वांगीण विकास यादृष्टीने मुलांच्या भवितव्याचा विचार बेदी या लेखात करताना दिसतात. सैनिकांचे बलिदान, देशाभिमान, आपल्या उपयुक्त आर्दर्श ठरणाऱ्या परंपरा त्या वाचकांपुढे ठेवतात. तशाच समाजात चालणारे गैरव्यवहार, साध्या साध्या वाटणाऱ्या प्रश्नांनी घेतलेले भयनाक स्वरूप आणि या साऱ्यांतूनही आशेचा किरण दिसू शकतो, ही भावना यातून व्यक्त होते. परदेशातील कायदा-सुव्यवस्था, ‘इथे-तिथे’ मधला जाणवणारा फरक, तिथल्या चांगल्या-वाईट, आदर्श गोष्टी, दाखले किरण बेदी देतात. स्वत: उत्तम खेळाडू असल्याने खेळ-आरोग्याची महती त्या गातात. काही निवडक लोकांची पत्रे दाखवत त्यावर भाष्य करतात. कधी एखाद्या ठिकाणी आपण केलेले भाषणच ओघवते लिहून जातात. या साऱ्यांतून त्यांचे चतुरस्त्र व्यक्तिमत्व जाणवून जाते. ‘‘मी जे पाहते, ऐकते, वाचते, बारकाईने निरखते त्याचे काय करावे असा प्रश्न मला पडतो. मी ते सर्व विसरून जाऊ शकते, दुर्लक्षू शकते. त्याबद्दल तक्रारी करू शकते वा पुढे बघू म्हणून हात झटकू शकते. पण तसे न करता त्यावर लिहून शब्दांतून माझी अस्वस्थता प्रकट करणे ही मला माझी एक गरज वाटते. म्हणून मी लिहिते आणि लिहित राहीन.’’ या किरण बेदींच्या उद्गारातून त्यांची भूमिका सहज स्पष्ट होऊ शकते. यथार्थ शीर्षके आणि रोखठोक कथन असलेले हे अनुभव बेदींची चीड, प्रेरणा, चित्तवेधक गोष्टी, वैचारिकता असे कंगोरे दाखवतात. समाज वास्तवाच्या असंख्या छटा रंगवून त्यांचे दर्शन वाचकांना घडवायचा त्यांचा मानस आहे. ओघवती भाषा, सुबोध आणि नेमका आशय थोडक्या शब्दांत पोचवणारी शैली बेदींनी आत्मसात केलेली दिसते. वाचकांशी संवाद साधत, सजग करत, त्यांना ‘माणूस’ बनवण्याचे बेदींचे प्रयत्न प्रामाणिक वाटतात. समाज सर्वार्थाने सुंदर व्हावा, असे किरण बेदींना वाटते. त्यासाठी अर्थातच प्रत्येकाने झटायला हवे. म्हणूनच ‘अ‍ॅज आय सी...’ असे म्हणताना तुम्हीही पाहा, असे मन:पूर्वक त्या वाचकांना सांगतात. -राधिका कुंटे ...Read more

 • Rating StarDAINIK DESHDOOT 19-7-2009

  ‘अ‍ॅज आय सी’ (भारतीय पोलीस सेवा) यामधून किरण बेदींचे कार्यक्षेत्र असलेले भारतीय पोलीस दल, त्याबद्दलच्या वंदता, वस्तुस्थिती, या दलाचे प्रामाणिक प्रयत्न तसेच या दलासमोर असलेल्या अडचणी या सगळ्या विषयांवरच्या लेखांची एकत्र गुंफण वाचताना वाचक खिळून राहतो.किरण बेदींच्या मते कर्तव्य बजावणारा अधिकारी हा प्रकाशाचा स्त्रोत असतो. तेव्हा काळोखाला घाबरून चालत नाही. त्यांच्या मते वेळ कधीच टळलेली नसते. आपण आहोत तिथून बदलायला सुरुवात केली तरी चालते. कुणाही व्यक्तीपेक्षा कायद्याची अन् घटनेची बांधिलकी जास्त महत्त्वाची आहे. किरण बेदींनी पोलिसांनाही सामान्य माणसासारखी प्रेमाची भूक असते हे जनतेने लक्षात घ्यावे, असे सुचवले आहे. एकत्र येऊन ठरवले तर सामान्य जनतासुद्धा मोठमोठे निर्णय घेण्यास सरकारला भाग पाडते त्याचपद्धतीने न्यायव्यवस्थेवर अंकुश ठेवला तर गुन्हेगारांना शासन होईल अन् बळी पडलेल्यांना न्याय मिळेल. अपवादात्मक प्रसंगात पोलिसांना कठोर व्हावेच लागते. सतत मानवतावादी भूमिका घेऊन चालत नाही. अन्यथा पंजाबमधला हिंसाचार अजूनही सुरू राहिला असता, असं सांगितलं आहे. किरण बेदी खूपच आशावादी आहेत. पोलीस खात्यातील नवी पिढी भारतीय पोलीससेवा नवा चेहरा आहे. पोलीससेवा अधिकाधिक लोकाभिमुख आणि नीतिमान कशी होईल यावर आपल्या कुशल कारकीर्दीचे अनुभव उधृत करून किरण बेदींनी अधिकाधिक तरुणांनी पोलीससेवेत यावे असे आवाहनही केले आहे. महिलांनी तर खास करून पोलीससेवेत शिरकाव करावा. त्यायोगे पोलीस दलाला अजून मानवीय चेहरा प्राप्त होईल. अन् नागरिक व समाजाचे हितसंबंध निकोप व सुदृढ होतील असे मत व्यक्त केले आहे. ...Read more

 • Rating StarDAILY TARUN BHARAT 3-5-2009

  किरण बेदी यांनी वेळोवेळी वेगवेगळ्या प्रश्नांवर लिहिलेल्या लेखांचे हे संकलन, वाचकांना स्त्रीप्रश्नांबद्दल संवेदनशील करेल आणि प्रतिसाद द्यायला, कृती करायला उद्युक्त करेल. या पुस्तकाच्या प्रयोजनाविषयी लिहिले आहे की, स्त्री असणे ही एक मौल्यवान गोष्ट आणि बाबदारी आहे. ती स्वत:ला कसे घडवते यावर या दोन्हींपैकी एक असणे ठरते. जेव्हा ती स्वयंनिभर्र, स्वावलंबी असते तेव्हा अत्यंत मौल्यवान असते. आपण कुणावर अवलंबुन रहायचे की नाही हा निर्णय तिचा असतो. ती जेव्हा शिकलेली नसते, आर्थिकदृष्ट्या दुसऱ्यावर अवलंबून असते तेव्हा जबाबदारी असते. त्यात जर ती मानसिक दृष्ट्या दुसNयावर अवलंबून असेल तर परिस्थिती आणखी वाईट असते. तिला सर्वथा गुलामाचे आयुष्य जगावे लागते. कसे याचे विवेचन एक्कावन्न वेगवेगळ्या लेखातून केले गेले आहे. लेख छोटे असले तरी प्रत्येकातून एक महत्त्वपूर्ण विचार व्यक्त होतो. `पालकत्व ही माणसाची सर्वात मोठी जबाबदारी आहे. त्यासाठी प्रशिक्षण नाही, मार्गदर्शन नाही, कायदे नाहीत, पालकांची कर्तव्ये कोणती हेही कुठे लिहिलेले नाही.` वॅâप्टन थापर सारख्या शूरवीराची, मानवजात असेपर्यंत देशाच्या इतिहासात आठवण काढली जाईल, असे शूरवीर घडण्यासाठी पालकांनी, शिक्षकांनी त्यांच्यापुढे ध्येयवादी, आदर्श वागणूक ठेवायला हवी. त्यासाठी हवी ती विंâमत मोजायला हवी.` `उत्कृष्ट बनणे म्हणजे आपले आचार, विचार, कृती योजनाबद्ध रीतीने शिस्तित पार पाडणे. तुमचे अग्रक्रम स्पष्ट हवेत. विद्यार्थी दशेत असताना अभ्यास हा तुमचा पहिला अग्रक्रम असेल. `कुटुंबसंस्था, मुलांची काळजी घेण्यासाठी स्वत:चे सारे काही दुय्यम मानणे ही भारतीय परंपरा या गोष्टी सर्व जगाने अनुकरण कराव्यार, अशा आहेत. हा आपला सांस्कृतिक वारसा आपण बळकट करायला हवा. कारण निकोप, घट्ट विणलेली कुटुंबसंस्था ही आपली राष्ट्रीय संपत्ती आहे.` वरील विचारमोती सर्व लेखांमध्ये विखुरले आहेत. हे वैचारिक धन वाचकाला प्रेरणा देते. विचार करण्यास प्रवृत्त करते. ज्या प्रमाणे वेश्या व्यवसायाने आपला पत्ता बदलला आहे. लाल बत्तीचा विभाग म्हणून पूर्वी नागरी वस्तीपासून असा भाग सहजपणे वेगळा करता येत असे. आता मोबाइल फोनच्या जमान्यात हा व्यवसाय उच्चभ्रू पॉश समजल्या जाणाऱ्या वस्तीपर्यंत पसरला आहे. मसाज वेंâद्र, आरोग्यवेंâद्र आणि एंटरटेनमेंट सेंटर, हॉटेल, विश्रामगृहे गावाबाहेर शेतांवर बांधलेली फार्म हाऊस अशा नावाच्या जागा वापरून वैश्या व्यवसायामध्ये नवे नियम येत आहेत.` फक्त महिला दिनाचे कार्यक्रम करून आणि त्याला हजेरी लावून समाजाची स्त्रियांप्रती असलेली जबाबदारी राज्यकत्र्यांना झटकता येणार नाही. स्त्रियांचे हक्क जपणे हे समाजाचे कर्तव्य आहे. आरोग्यपूर्ण सुशिक्षित स्त्री ही राष्ट्रीय संपत्ती आहे. `वाचन, खेळ, एन.सी.सी. आणि एसक्यू हे चार पैलू विद्याथ्र्याला अष्टपैलू चौपेâर व्यक्तिमत्त्वाचे असे विकसित करतात. `सौंदर्य या शब्दाला अनेक पर्यायी शब्द सापडले. गोड रूप, देखणेपणा, मर्दानी, दुखऱ्या डोळ्यांना समाधान देणारे, सुरेख, अवाक करणारे अत्युत्कृष्ट कलाकृती, बाहुली, नटरंगी स्त्री, भूल घालणारी, खानदानी, जादू करणारी, सौंदर्यवती वगैरे शब्द. त्या शब्दांशी निगडीेत असलेले शब्द रंगरंगोटी, सौंदर्यप्रसाधने, पावडर, ओष्ठशलाका, नखांचे रंग, शांपू, डौलदार बांधा, सुंदर चेहरा वगैरे अशी न संपणारी यादी. पण `ब्यूटी` या शब्दाशी कोशकाराने बुद्धी, हुशारी, कौशल्य या शब्दांचा धागा जोडलेला दिसला नाही. `भारतामध्ये स्त्रीला अजूनही स्वतंत्र्य ओळख मिळालेली नाही. कोणतीही स्त्री इथे आधी मुलगी, पत्नी, आई, बहीण, सून वा सासू असते. स्वतंत्रपणे स्वत:ची ओळख असलेल्या स्त्रिया अगदीच नाहीत, असे नाही. पण त्यांची संख्या अगदी कमी आहे.` लेखांबद्दल लेखिका लिहिते, सतत शिकणे अन मिळालेले ज्ञान वाटून घेणे यावर माझा पूर्ण विश्वास आहे. मी जे पाहते, ऐकते, वाचते त्यातील जे मला अस्वस्थ करते, त्याबद्दल लिहिणे हे माझे कर्तव्य आहे, असे मला वाटते. विशेषत: स्त्री आणि तरुण यांच्या सक्षमीकरणासाठी सर्वांनी सजग राहून कृती करायची गरज आहे. लेखणीची ताकद वापरून, सामान्यांचा आवाज जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी हाती निशाण धरायचे काम मी यापुढेही करत राहीन.` आणि अनुवादाबद्दल काय लिहावे? ह्या प्रकारात हातखंडा असलेल्या माधुरी शानभाग यांनी पुस्तकाचा सुरेख अनुवाद केला आहे. अगदी स्वतंत्र रचना असावी, वाटावी इतपत. ...Read more

 • Read more reviews
Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book