* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: PAHILI PHERI?
 • Availability : Available
 • ISBN : 9788177669701
 • Edition : 2
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 192
 • Language : MARATHI
 • Category : POLITICS & GOVERNMENT
Quantity
"YASHWANTRAO IS AN EXCELLENT STRATEGIST AND A PROFOUND THINKER...` DR. MANMOHAN SINGH. YASHWANTRAO CHAVAN HAS NOTED THE DETAILS OF THE WAR BETWEEN INDIA AND PAKISTAN IN THE YEAR SEPTEMBER 1965 IN HIS DIARY. HE ACCEPTED THE MINISTRY OF DEFENCE AFTER THE DEFEAT BY CHINA IN 1962. AFTER ACCEPTING THE POST, HE TARGETED AT STRENGTHENING THE WILL POWER OF OUR ARMED FORCES. HE ALSO GAVE PREFERENCE TO INCREASE OUR ARMED FORCES. RAM PRADHAN DISCUSSES AND PRESENTS BEFORE US THE WAR TACTICS, THE EFFORTS BY YASHWANTRAO CHAVAN, THE EVENTS DURING THE WAR AGAINST PAKISTAN, AND ALSO THE POLITICAL EVENTS AFTER THE WAR IN THIS CURRENT BOOK. THIS ELABORATION IS DONE FROM THE NATIONAL AND INTERNATIONAL POINT OF VIEW AND WILL PROVE VERY USEFUL TO THE STUDENTS OF SOCIOLOGY AND THE COMMON MEN AS WELL.
... यशवंतरावजी उत्तम व्यूहरचनाकार व जाणते रणनिती विचारवंत होत... डॉ. मनमोहन सिंग १९६५ WAR INSIDE STORY या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात पाकिस्तानविरुद्ध सप्टेंबर १९६५ च्या युद्धातील कार्यवाहीची नोंद यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या रोजनिशीत केली आहे. चीनविरुद्धच्या १९६२ मधील युद्धातील पराभवानंतर संरक्षण मंत्रीपदाची जबाबदारी घेतलेल्या यशवंतरावांनी सैन्याचे बल व मनोधैर्य वाढविण्यासाठी केलेले प्रयत्न तसेच पाकिस्तान युद्धातील घटना व युद्धानंतरच्या राजकीय घडामोडी यांचा ऊहापोह राम प्रधान यांनी या पुस्तकात केला आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय या स्तरांवरून केलेले हे विश्लेषण समाजशास्त्रांचे अभ्यासक तसेच सामान्य वाचक यांना उपयुक्त ठरेल.
Video not available
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #PAHILIPHERI #PAHILIPHERI #पहिलीफेरी #POLITICS&GOVERNMENT #MARATHI #RAMPRADHAN #राम #प्रधान "
Customer Reviews
 • Rating StarLOKSATTA 19-10-2008

  भारत-पाक युद्धाच्या प्रांजळ नोंदी… भारताचे माजी संरक्षणमंत्री व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी १९६५ च्या भारत व पाकिस्तान यांच्यामध्ये झालेल्या युद्धाच्या काळात दैनंदिनी लिहिली होती. त्या दैनंदिनीतील नोंदीवर आधारित राम प्रधान ांनी लिहिलेल्या ‘१९६५ वॉर - इनसाईड स्टोरी’ या पुस्तकाचे प्रकाश पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या हस्ते झाले. त्यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, भारत व पाकिस्तान युद्धासारख्या राष्ट्रीय महत्त्वाच्या विषयावर यशवंतराव चव्हाण यांचे काय विचार होते याचे दर्शन या पुस्तकातून होत आहे. यशवंतराव चव्हाण हे विचारवंत राजकारणी होते व विचारी व्यक्तींचे नेतृत्व ते करीत असत. महाराष्ट्राच्या राजकारणावर आपला अमीट ठसा उमटविल्यानंतर ते राष्ट्रीय राजकारणात आले. पं. नेहरूंनी यशवंतराव चव्हाण यांना संरक्षणमंत्री केले. पं. जवाहरलाल नेहरू व इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली यशवंतराव चव्हाण यांनी राजकारण, समाजकारणाच्या क्षेत्रात अजोड कार्य केले. भारत व पाकिस्तानमधील संबंध व जम्मू-काश्मीर प्रश्नासंदर्भात यशवंतराव चव्हाण यांनी व्यक्त केलेले विचार मननीय आहेत. जम्मू-काश्मीरचा प्रश्न लष्करी बळाचा वापर करून सुटणार नाही असे स्पष्ट मत यशवंतराव चव्हाण यांनी मांडल्याचे मला ‘१९६५ वॉर - इनसाईड स्टोरी’ या पुस्तकाच्या वाचनातून कळले. - पंतप्रधान मनमोहनसिंग सप्टेंबर १९६५ मध्ये भारत-पाकिस्तान यांच्या दरम्यान जे युद्ध झाले, त्याच्या आठवणी आजही सर्वांच्या अंगावर रोमांच उभ्या करतात. याच युद्धाच्या संदर्भात तत्कालीन संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी त्यांच्या रोजनिशीत केलेल्या नोंदींवर आधारित असलेले ‘पहिली फेरी’ हे पुस्तक पुण्याच्या ‘मेहता प्रकाशन’ने प्रसिद्ध केले आहे. अरुणाचल प्रदेशचे माजी राज्यपाल व सनदी अधिकारी राम प्रधान यांचे हे पुस्तक म्हणजे जिज्ञासू वाचकांसाठी मेजवानीच आहे. यशवंतराव चव्हाण संरक्षणमंत्री असताना त्यांनी १ ते २२ सप्टेंबर १९६५ या भारत-पाकिस्तान युद्धाच्या कालखंडातील आठवणी रोजनिशीत नोंदीच्या स्वरूपांत लिहिल्या होत्या. हे युद्ध इतिहासाला वळण देणारे होते, त्यामुळे आजही त्याची माहिती वाचायला सर्वांनाच आवडेल यात शंका नाही. १९६५ च्या या युद्धात २२ सप्टेंबरला शस्त्रसंधीची पूर्तता झाली, तोपर्यंतच्या नोंदी यशवंतरावांनी केल्या आहेत. लष्करप्रमुख पदासारख्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी त्यावेळच्या परिस्थितीचे केलेले सादरीकरण, मंत्रिमंडळ समितीच्या बैठका, संसदीय मंडळासमोर सादरीकरण, लोकसभेतील निवेदने या पाश्र्वभूमीवर अत्यंत कमी वेळ मिळत असूनही त्यांनी स्वत:वर असलेली वाढती जबाबदारी पार पाडतानाच या नोंदी केल्या आहेत. भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी पडद्यामागे नेमके काय घडले याचा लेखाजोखाच संरक्षणमंत्र्यांनीच मांडला आहे, हे या पुस्तकाचे वेगळेपण! यशवंतराव एके ठिकाणी म्हणतात, ‘५ सप्टेंबरला पाकिस्तानवर हल्ला करण्याची योजना आम्ही आखली, तेव्हा ती फिसकटली तर काय परिणाम होती, याचा विचारही मी करू शकत नाही, इतके दडपण माझ्या मनावर होते.’ या पुस्तकाचे लेखक राम प्रधान हे यशवंतरावांचे एक विश्वासू सहकारी होते. युद्धाच्या नोंदी यशवंतरावांनी त्यांच्या खासगी रोजनिशीत लिहिल्या. या सगळ्या नोंदी करण्यामागे यशवंतरावांचा उद्देश वा ऐतिहासिक घटनेबाबत स्वत:शी संवाद साधण्याचा असावा, असे दिसते. पाच सप्टेंबरला ते लिहितात, ‘ऐतिहासिक दिवस! सकाळीच भारतीय सैन्य दलांनी लाहोरकडे कूच केली. हवाई दलानेही चांगली सुरुवात केली. खरे सांगायचे तर भारत हा काही युद्धखोर देश नाही. त्याचा मला अभिमानच आहे. पण काही वेळा देशाच्या वाटचालीत असे क्षण येतात, की कुरापती काढणाऱ्यांना चांगला धडा शिकवणे क्रमप्राप्त ठरते.’ ज्यांना सरकार, संरक्षण दले, ऐतिहासिक घडामोडी यांची कल्पना नाही. त्यांना या नोंदी समजण्यास कदाचित जडही जाईल. पण राम प्रधान यांनी ही दरी भरून काढली आहे व तसे करताना वाचकांना पूरक माहिती दिली आहे. प्रशासनातील खाचाखोचा माहीत असल्याने तयंनी दिलेली पूरक माहिती महत्त्वाची आहे यात शंका नाही. नोंदीमध्ये जे अपुरे आहे ते भरून काढण्याचा पुरेपूर प्रयत्न ते करतात. राम प्रधान यांचे यशवंतरावांशी १९६० पासून निकटचे संबंध होते. भारत-पाकिस्तान युद्धाचे ढग जमू लागले तेव्हा ते ब्रुसेल्सहून तातडीने दिल्लीला परतले. १६ सप्टेंबरपासून ज्या महत्त्वाच्या घडामोडी झाल्या, त्यावेळी राम प्रधान त्याचे जवळून साक्षीदार होते. कारण त्या वेळी त्यांना यशवंतरावांनी मदतीसाठी बोलावून घेतले होते. प्रधान यांनी त्यांचे यशवंतरावांशी असलेले निकटचे संबंध, तल्लख स्मरणशक्ती यांचा फायदा वाचकांना करून दिला आहेच. शिवाय काही ठिकाणी तटस्थपणे परिपक्व मूल्यमापनही केले आहे. या पुस्तकात मूळ रोजनिशीतील इंग्रजी नोंदी जशाच्या तशा आहेत. १ व २२ सप्टेंबर रोजी यशवंतरावांनी स्वत:च्या हस्ताक्षरात केलेल्या नोंदीची फोटोकॉपी आहे. पहिल्या भागात युद्धाची ठिणगी पडण्याच्या वेळी काय परिस्थिती होती याबाबत माहिती आहे. त्यानंतर संरक्षणमंत्र्यांनी केलेल्या नोंदींचे मराठी रूपांतरही आहे. त्यावेळी रणभूमीवर काय घडले, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर काय घडामोडी झाल्या, याचीही माहिती आहे. पुस्तकातील दुसरा भाग हा ‘भाष्य’ किंवा ‘टिप्पणी’ स्वरूपाचा आहे, त्यात राम प्रधान यांनी त्या काळातील घटना, त्यामागची कारणे, मुख्य व्यक्ती, व्यक्तिगत संबंध या सर्व मुद्यांचे मार्मिक विवेचन केले आहे. ज्या काश्मीरच्या मुद्यावरून हे युद्ध झाले तो प्रश्न १९७१ मध्ये पुन्हा युद्ध होऊनही कायम राहिला. त्यानंतरच्या कारगिल युद्धाचाही परामर्श प्रधान यांनी घेतला आहे. एकूणच या पुस्तकाचे स्वरूप लक्षात घेता काही नोंदींची पुनरुक्ती होणे अटळ होते, पण त्यामुळे वाचकांना पुन्हा मागची पाने चाळण्याची गरज पडत नाही. नोव्हेंबर १९६२ मध्येदेशाने साद घातल्यानंतर यशत्तंतराव मदतीसाठी धावून गेले. संरक्षणमंत्रिपदाची धुरा त्यांनी सांभाळली. चीन भारताला घाबरवत होता. भारताने अमेरिकेकडे मदत मागितली होती. भारतीय लष्कराचा आत्मविश्वास खचला होता, अशा कठीण काळात यशवंतरावांनी संरक्षणमंत्री म्हणून अतुलनीय कामगिरी केली. त्यांनी पाकिस्तानवरच्या हल्ल्याची योजना आखली व त्याला पंतप्रधानांची मंजुरी मिळविली. १ सप्टेंबरच्या दुपारी पाकिस्तानने अखनूर भागातील पूल तोडून काश्मीरचे दळणवळण रोखण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी यशवंतरावांनी हीच प्रत्युत्तराची योग्य वेळ आहे हे जाणले. त्यांनी लगेच पठाणकोट येथून हवाईहल्ले सुरू करण्याचे आदेश दिले व पुढचा अनर्थ टळला. लष्करणप्रमुख व लष्कराच्या इतर वरिष्ठ अधिकाNयांशी सल्लामसलत करताना यशवंतरावांनी त्यांना प्रोत्साहन दिले. त्यामुळेच नंतर भारतीय लष्करी दल व हवाई दल सर्वांसाठी अभिमानाचा विषय ठरले. राम प्रधान या पुस्तकात यशवंतरावांचे तत्कालीन लष्करप्रमुख, हवाईदल प्रमुख. नौदलप्रमुख यांच्याशी असलेले संबंध उलगडून दाखवतात. यात लष्करप्रमुख काहीसे भडक व चिंतातुर स्वभावाचे, हवाईदल प्रमुख नम्र व सतत मागे राहणेच पसंत करणारे, तर नौदल प्रमुख आपण ‘हे करू शकतो’ असे सांगत नेहमीच छोटेमोठे योगदान देणारे होते हे दिसून येते. चीनने केलेल्या पराभवामुळे अगोदरच खचलेल्या संरक्षण दलांना सांघिक भावनेने एकत्र बांधण्यात यशवंतराव यशस्वी झाले व उदयोन्मुख भारताच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला गेला. त्या काळात सुरक्षाविषयक जे प्रश्न होते, त्याकडे पुस्तकात लक्ष वेधले आहे. संरक्षणतज्ज्ञांसाठी लक्षात घेण्याजोगी बाब अशी, की त्यातील काही समस्या आजही कायम आहेत. त्यातील एक उदाहरण येथे देता येईल. पाकिस्तानबरोबर युद्धाची घोषणा संरक्षणमंत्री यशवंतरा चव्हाण यांनी ६ सप्टेंबरला लोकसभेत केली, त्यावेळी त्यांना सदस्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चीनपासून असलेल्या धोक्याबाबत पंतप्रधानांनी जेव्हा निवेदन केले होते, तेव्हा मात्र त्याला थंड प्रतिसाद मिळाला. याचे कारण सरळ होते ते म्हणजे चीनच्या भीतीने सर्वांनाच ग्रासले होते. आजही परिस्थिती काही वेगळी नाही. २२ सप्टेंबरला यशवंतरावांनी भारताच्या राजकीय विजनवासाबाबत नोंद करताना पश्चात्तापाची भावना व्यक्त केली आहे. आज तरी भारताने भूराजकीय वास्तव लक्षात घेऊन चीनला सामोरे जाण्यासाठी समविचारी देशांची मोट बांधली आहे काय? की पुन्हा आपण पूर्वीच्याच पद्धतीने साचेबंद विचार करून सगळे काही छान आहे व चांगलेच घडेल या भ्रमात राहणार आहोत. राम प्रधान यांचे हे पुस्तक जिज्ञासू अभ्यासकांनी जरूर वाचावे, त्यांच्यासाठी तो माहितीचा खजिना आहे. या रोजनिशीतील नोंदी अतिशय प्रांजळ व सत्य आहेत. औपचारिक सादरीकरणातून काही बाबी वगळल्या होत्या, त्यांचेही स्पष्टीकरण त्यांनी केले आहे. १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धात प्रत्यक्ष सहभागी झालेले फार थोडे लोक आज हयात आहेत. त्यांच्या या युद्धाविषयीच्या आठवणींना या पुस्तकामुळे उजाळा मिळाला आहे. घुसखोरी करून आक्रमण करण्याची पाकिस्तानची सवय तशी जुनीच आहे. त्यावेळी त्यांना अपयश आले, कारण स्थानिक लोकांचा पाठिंबा नव्हता. पण त्यानंतर परिस्थिती बदलली खरी पण ती आणखी बिघडत गेली. १९९८ मध्ये या पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती प्रकाशित झाली, आता हे पुस्तक मराठीत आले आहे. ते सर्वांना आवडेल. ...Read more

Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SANVADU ANUVADU
SANVADU ANUVADU by UMA KULKARNI Rating Star
Govind Kulkarni

एक वस्तुपाठ आत्मकथनाचा : "संवादू अनुवादु ". लेखिका:डॉक्टर उमा कुलकर्णी. मित्रहो नमस्कार, आजच आजच डॉक्टर उमा कुलकर्णी ह्यांच आत्मकथन `संवादु अनुवादु` हे वाचून झालं. काय सांगावं?अत्यंत प्रामाणिक व अभ्यासपूर्ण पणे लिहिलेलं आत्मकथन. त्यांच्या बेळगावच्ा बालपणापासून तर आत्ताच्या जीवन प्रवासाबद्दल आत्मीयतेने लिहिलेलं आहे. माझ्याकडे जवळपास २५ आत्मकथेची चरित्र आहेत पण ह्या पुस्तकाने कांही वेगळंच शिकवलं आहे मला. असो. त्यांचे बालपणीचे संस्कार,कोठल्याही प्रकारची सक्ती नाही आणि त्यात त्यांनी स्वतःच निवडलेली व आत्मसात केलेली अनेक गोष्टी. चित्रकला हा विषय अभ्यासून शिकणे आणि आयुष्याला "अनुवादक" ह्या शब्दाला प्रतिष्ठा प्राप्त करून देणे हा सर्व प्रवास थक्क करणारच आहे. एकदा पुस्तक हातांत घेतल्यावर त्यांचं प्रवाही लेखन आपल्याला वाचनातच गुंतवून टाकतं आणि ही बौद्धिक गुंतवणूक वाचकाच्या कायमस्वरूपी लक्षांत राहते. त्यांच्या ह्या संपूर्ण प्रवासात त्यांचे इंजिनिअर पति आदरणीय विरुपाक्षजी ह्यांची सुद्धा साथ तितकीच मोलाची आहे आणि त्याचा उल्लेख सुद्धा आपल्याला वाचतांना येत राहतो. उमा कुलकर्णीनीं ५५ पेक्षा उत्तोमोमत्तम कन्नड पुस्तकांचे मराठीत अनुवाद केले आहेत तसेच ई टीव्हीवर त्यावेळी येणारी `सोनियाचा उंबरठा ही मराठी मालिका सुद्धा लिहिली आहे. त्यांच्या लिहिण्यात मला त्यांचं मला भावलेलं त्यांचं सखोल चिंतन खूप आवडलं. मग ते परिस्थिती निहाय, व्यक्ती निहाय किंवा प्रसंग निहाय असुद्या ते चिंतन आपल्याला मानसिकतेच्या वेगळ्याच प्रवाहाच दर्शन घडवतं. मग तो त्यांच्या `वॉचमन वाचन संस्कृतीचा बळी`असुद्या किंवा वरणगावाला असतांना सहकारी वर्गाशी झालेला विशिष्ट संवाद असुद्या. त्यांचा संबंध अनेक प्रतिष्ठित व्यक्तींशी आलेला आहे. तो मग कधी संवाद रूपाने,कधी सरळ सरळ अनुवादक म्हणून.उदा. ज्ञानपीठ पारितोषिक प्राप्त शिवराम कारंथ,अनंतमूर्ती,सौ.व श्री.पु.ल. देशपांडे, डॉक्टर अनिल अवचट,सरस्वती सन्मानप्राप्त श्री. भैरप्पा, गिरीश कार्नाड, पूर्णचंद्र तेजस्वी असें अनेकजण. त्यांच्या लिखाणातून कधी कधी अनुवादकाला मिळणारी दुय्यम वागणूक सतावून जाते.पण तितक्यापुरतच. असो. मला वाटतं `वादक` आणि `अनुवादक` हे त्यांच्यापरीने श्रेष्ठच असतात. कारण वादक सुरांना न्याय देतो तर... अनुवादक लेखकाच्या शब्दांना,न्याय तर देतोच पण त्यातच अनुवादकाला सृजनशीलतेला भरपूर वाव असतो.हे बर्याच लेखकांनी कबूल केलं आहे. त्यामुळेच मूळ लेखकाचं म्हणणं वाचकापर्यंत चांगल्या प्रकारे पोहचविले जातं. कारण अनुवादक लेखकाच्या `आशयाशी`अत्यंत प्रामाणिक असतो असं उमा कुलकर्णींच्या अनुवादातून प्रतीत होत जातं. त्यामुळेच अनुवादक ह्या शब्दाला त्यांनी मोठी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे. त्याच अजून एक कारण असू शकेल ते मला वाटतं`प्रत्येक लेखकाच्या शब्दांच्या पोताचं लेखिकेने केलेलं मानसिक विश्लेषण. त्यामुळेच त्यांची पुस्तकं वाचतांना ती आपल्याला आपलीच वाटत राहतातच पण वेगळाच भरपूर वाचन संस्कृतीचा ठेवा आपल्याला मिळाल्याचा आनंद होतो. मी त्यांची जास्तकरून भैरप्पांची अनुवादित पुस्तकं वाचलीत. मग ते पर्व,आवरण (एका वर्षात ३४ आवृत्या निघाल्यात),वंशवृक्ष, तंतू,पारखा, कांठ वगैरे. आतां त्यांचं सीताकांड वाचत आहे.असो. पण संवादु अनुवादु हे आत्मकथन वाचतांना त्यांच्या आयुष्यातील अनेक दालनात आपल्याला मोकळेपणाने वावरायला होतं. आणि आपल्याला त्या पुस्तकाच्या वेगळ्याच आयामाची प्रचिती येते. स्वतःचेच स्वतः त्रयस्थपणे लिहिलेलं आयुष्यात आलेल्या अनेक व्यक्तींची,प्रसंगाची त्यानिमित्तानं पडलेल्या प्रश्नांची उकल खूपच प्रभावित करते.हे सर्व करत असतांना मानसिक त्रास होणारच.पण त्याला सुद्धा वैचारिकतेने समजून घेतलं. त्यांची सतत शिकण्याची वृत्ती मानसिक बळ देऊन जाते. डॉक्टर अनिल अवचट ह्यांच सतत त्यांच्याकडे अजूनही जाणं येणं आहे. त्यांच्याकडून ओरोगामी शिकणं. तसंच त्यांच्याकडे मुक्कामाला येणारे शिवराम कारंथ, भैरप्पा, कमल देसाई अजून बरेचजण. कां कोणास ठाऊक कांही व्यक्तींचं बलस्थान कांही विशेषच असावं तसंच आदरणीय उमा कुलकर्णी व आदरणीय विरुपाक्ष कुलकर्णींच्या सहवासाचं असावं. त्यांच्यासमोर आपलं मन मोकळं करावं असं वाटत असावं. कामवाली बाई अशीच संवाद साधते विशेष म्हणजे समारोपात त्यांनी आई व वडिलां विषयी लिहिले आहे. त्याच वेगळ्याच प्रकारे विश्लेषण केलेलं आहे. एवढं सगळं विचार करणारी लेखिका पति विषयी ईतर नातेवाईकांच्या संबंधीसुद्धा तितकंच प्रांजळपणे लिहिते. तुम्हाला वाटेल त्यांत काय असं?पण तसं नाही.त्यांचा आत्तापर्यंतचा प्रवास आणि अनुवादक होण्याची जोरदार भूमिका साकारण्यात, आतां त्याला भूमिका सुध्दा म्हणता येणार नाही. कारण विशेष कार्य संपल्यावर `भूमिका` हा शब्द तात्पुरता वाटतो.. पण लेखिकेच्या बाबतीत त्यांचा स्थायीभाव वाटतो. माझ्यासारख्या वाचकाला नेहमीच `स्फूर्तिदायी किंवा प्रेरणा` ह्याच शब्दांचं बलस्थान ठरलेला आहे. मला पक्की खात्री आहे ज्यांना असं अनुवादित साहित्य आपल्या मराठीत वाचावं वाटतं त्यांनी हे जरूर वाचावं. कारण... हा एक नुसता अनुवादकाचा प्रवास नाही किंवा आत्मकथन नाही तर "अनुवाद" ही प्रक्रिया कशी जन्मते आणि आपल्यासारख्या पर्यंत पोहचते त्याचा एक आदर्श वस्तुपाठच आहे. त्यांनी अनुवाद करतांना त्या त्या साहित्य कृतीचा अभ्यास करतांनाच आपल्यापुढे जीवनाचं एक वेगळंच मनोगत म्हणा आशय मांडला आहे. ते आपल्याला आपलं मन मोकळेपणाने स्वीकारतं. आणि हो मागे पुण्याला गेलो असतांना आम्हांलाही त्यांचा सत्संग लाभला. असो आतां थोडंस थांबण्याचा प्रयत्न करतो. आपला स्नेही,💐🙏😊 गोविंद कुलकर्णी. बेंगलोर. ०८-०४-२०२०. ...Read more

DIARY OF ANNE FRANK
DIARY OF ANNE FRANK by Anne Frank Rating Star
Santosh Rangapure

अॅन फ्रॅन्क ची डायरी हे पुस्तक खूप दिवसांपासून वाचायचे डोक्यात होते आणि सध्या चालू असलेल्या lockdown मुळे हा योग जुळून आला. याला पुस्तक म्हणण्यापेक्षा एका कोवळ्या 13 वर्षाच्या जीवाने लिहिलेले अत्यंत भावनिक आणि संवेदनशील आत्मकथन च म्हणता येईल. दुसर्‍ा महायुद्धाच्या काळात हॉलंड मधील अॅमसटरडॅम येथे जन्म घेतलेली फक्त 13 वर्षाची अॅन जन्माने ज्यु असल्याने सर्वसामान्य आयुष्य जगू शकत नाही. हॉलंड वर नाझी सैन्याचा कब्जा असल्याने अनेक ज्यु कुटुंब भूमीगत होतात किंवा अज्ञातवासात तरी जातात. अॅन चे कुटुंबीय देखील अशाच एका आडजागेत सहारा घेतात आणि एकाच घरात तब्बल दोन वर्षे बाहेरच्या जगाचा कुठलाही संपर्क नसताना कुढत काढतात. असामान्य बुद्धीमत्ता आणि वाचन लेखनाची प्रचंड आवड असलेल्या अॅन ला रोजनिशी लिहायची सवय असते आणि याच रोजनिशी द्वारे ती व्यक्त व्हायचा प्रयत्न करते. स्वतः ची होणारी घुसमट, प्रचंड कोंडमारा, जगण्याची नसलेली खात्री त्यामुळे होणारी तगमग, नातेसंबंधातील ताणतणाव, तारूणय सुलभ भावना हे सर्व तिने इतक्या सुंदर पद्धतीने मांडले आहे कि वाचताना आपण हरवून जातो आणि भान हरपून जाते. तिचे नाजूक वय पाहता तिने लिहिलेल्या गोष्टींमधे निरागसता आणि सच्चाई जाणवते त्यात राजकारण नसून केवळ साधे जीवन जगण्याची धडपड दिसते. महायुद्ध संपल्यानंतर हि रोजनिशी प्रसिद्ध होऊन पुस्तक रूपात लोकांच्या समोर आले आणि त्या काळात ज्यु धर्मीयांनी सोसलेल्या हालअपेष्टांची सर्व जगाला जाणीव झाली,अॅन च्या भावनिक लिखाणाने लोक अक्षरशः हादरून गेले. सदर पुस्तक 60 पेक्षा अधिक भाषेत अनुवादित झाले असून नाझी काळातील सर्वोत्तम लिखाण म्हणून याची गणना होते. मित्रांनो आज आपण सर्व सुखसोयी असताना आपल्या स्वतःच्या घरात फक्त काही काळ काढायचा असताना कुरकुर करतो मग अॅन सारख्या 13 वर्षाच्या कोवळ्या मनाला सतत हॉलोकासट च्या दडपणाखाली मृत्यूच्या छायेत राहून काय वाटले असेल? तिची पण सामान्य मुलींसारखी स्वतंत्र जीवनाची लहान लहान स्वप्नं असतात पण त्याला ती मुकते पण अशाही धीरगंभीर परिस्थितीत मनाचा तोल न ढळू देता सकारात्मक दृष्टिकोन ठेवून ती आयुष्य जगते. स्वतःच्या अल्प कारकीर्दीत अॅन ने केवळ रोजनिशी द्वारे सकारात्मक जगण्याचा फार मोठा संदेश जगासमोर ठेवला आहे असे मला वाटते. आवर्जून वाचावे, नक्की वाचावे, पुन्हा पुन्हा वाचावे असे हे अनमोल पुस्तक हा अनमोल ठेवा मी वाचू शकलो, अनुभवू शकलो म्हणुन स्वतः ला खूप भाग्यवान समजतो. 🙏🏼🙏🏼🙏🏼 ...Read more