* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE SEVENTH SCROLL
  • Availability : Available
  • Translators : BAL BHAGWAT
  • ISBN : 9788184988314
  • Edition : 2
  • Publishing Year : SEPTEMBER 2015
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 536
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Discount : SPECIAL OCTOBER DISCOUNT 33/50 PERCENT(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Print Books:
FOR 4,000 YEARS, THE LAVISH CRYPT OF THE PHARAOH MAMOSE HAS NEVER BEEN FOUND...UNTIL THE SEVENTH SCROLL, A CRYPTIC MESSAGE WRITTEN BY HE SLAVE TAITA, GIVES BEAUTIFUL EGYPTOLOGIST ROYAN AL SIMMA A TANTALIZING CLUE TO ITS LOCATION. BUT THIS IS A TREASURE CACHE OTHERS WOULD KILL TO POSSESS. ONLY ONE STEP AHEAD OF ASSASSINS, ROYAN RUNS FOR HER LIFE AND INTO THE ARMS OF THE ONLY MAN SHE CAN TRUST, SIR NICHOLAS QUENTON-HARPER--A DARING MAN WHO WILL STAKE HIS FORTUNE AND HIS LIFE TO JOIN HER HUNT FOR THE KING`S TOMB. TOGETHER, THEY WILL EMBARK ON A BREATHTAKING JOURNEY TO THE MOST EXOTIC LOCALE ON EARTH, WHERE THE GREATEST MYSTERY OF ANCIENT EGYPT, A CHILLING DANGER AND AN EXPLOSIVE PASSION ARE WAITING.STEEPED IN ANCIENT MYSTERY, DRAMA AND ACTION, THE SEVENTH SCROLL IS A MASTERPIECE FROM WILBUR SMITH, A STORYTELLER AT THE HEIGHT OF HIS POWERS.
कथा आजच्या काळात घडलेली असली, तरी तिचा संबंध आहे चार हजार वर्षांपूर्वीच्या रिव्हर गॉडमधील जगाशी. सेव्हन्थ स्क्रोल– वाचकाला खिळवून ठेवणाऱ्या कुशल कथाकाराची आणखी एक साहसकथा. धूसर बनून विस्मृतीतच गेलेल्या कालखंडामधील अफाट खजिन्याचे स्थान निश्चित करण्यासारख्या खाणाखुणा सेव्हन्थ स्क्रोलमध्ये सोडल्या आहेत. ड्युराइड अल् सिमा आणि त्याची इंग्लिश -इजिप्तशियन माता-पिता असलेली पत्नी रॉयन यांनीच पहिल्यांदा राणी लॉस्ट्रसच्या कबरीचा शोध लावला. त्या वेळी योगायोगानेच अत्यंत हुशार आणि कावेबाज ताईताने पेरो मॅमोस आणि त्याचा अफाट खजिना कबरीमध्ये पुरून ठेवल्याचे वर्णन असलेल्या पेपायरसच्या गुंडाळ्या त्यांच्या हातात पडतात. हा त्यांचा शोध नाइलपासून इथिओपियाच्या दऱ्याखोऱ्यांत पोहोचतो. तो खजिना फक्त स्वत:साठी मिळवण्याच्या लालसेने पछाडलेले ताकदवान लोक पेरोच्या गुप्त खजिन्यामागे लागल्यावर अत्यंत हिंसक असा पाठलाग सुरू होतो. ड्युराइडचा खून पडल्यावर रॉयन इंग्लंडमध्ये आसरा घेते आणि निकोलस क्वेन्टन हार्पर या विख्यात पुराणवस्तू संशोधकाबरोबर इथिओपियाला जाते – ड्युराइडसाठी! ताईतासाठी! एका प्राचीन पेरोच्या स्वप्नांसाठी!! आणि स्वत:च्या उद्ध्वस्त आयुष्याचे धागे पुन्हा जुळवण्यासाठीही!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #THESEVENTHSCROLL #THESEVENTHSCROLL #दसेव्हन्थस्क्रोल #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #BALBHAGWAT #बाळभागवत #WILBURSMITH "
Customer Reviews
  • Rating StarRoshanrao Kadam

    वाचकाला खिळवून ठेवणार्‍या कुशल कथाकाराची एक साहसकथा. धूसर बनून विस्मृतीत गेलेल्या कालखंडामधील अफाट खजिन्याचे स्थान निश्चित करण्यासारख्या खाणाखुणा सेव्हन्थ स्क्रोलमध्ये सोडल्या आहेत. ड्युराईड अल् सिमा आणि त्याची इंग्लिश-इजिप्शियन माता-पिता असलेली पतनी रॉयन यांनीच पहिल्यांदा राणी लॉस्ट्रिसच्या कबरीचा शोध लावला. त्यावेळी योगायोगानेच अत्यंत हुशार आणि कावेबाज ताईताने फेरो मॅमोस आणि त्याचा अफाट खजिना कबरीमध्ये पुरून ठेवल्याचे वर्णन असलेल्या पपायरसच्या गुंडाळ्या त्यांच्या हातात पडतात. हा त्यांचा शोध नाईलपासुन इथिओपियाच्या दर्‍याखोऱ्यांत पोहोचतो. तो खजिना फक्त स्वतःसाठी मिळवण्याच्या लालसेने पछाडलेले ताकदवान लोक फेरोच्या गुप्त खजिन्यामागे लागल्यावर अत्यंत हिंसक असा पाठलाग सुरू होतो. ड्युराईडचा खून पडल्यावर रॉयन इंग्लंडमध्ये आसरा घेते आणि निकोलस क्वेन्टन हार्पर या विख्यात पुराणवस्तू संशोधकाबरोबर इथिओपियाला जाते - ड्युराईडसाठी! ताईतासाठी! एका प्राचीन फेरोच्या स्वप्नांसाठी!! आणि स्वतःच्या उद्ध्वस्त आयुष्याचे धागे पुन्हा जुळविण्यासाठी! ...Read more

  • Rating StarRavindra Chavan

    एक वेगवान आणि धावते कथानक.. काही वर्षापूर्वी द ममी पिक्चर आलेला तोच कॅनव्हास समोर ठेवून पुस्तक वाचायचे.. आधीच सांगतोय.. पहिली पन्नास पाने गेल्यावर अचानक कथानक संथ होतेय पण गळपटु नका पुढे खुप वेगवान कथानक साहसांनी भरलेले आहे.. शेवटची कलाटणी सिनेासारखी असल्याने शेवटास आधी हात घालु नका.. थोडक्यात कथानक :चार हजार वर्षांपूर्वी अत्यंत हुशार आणि कावेबाज ताईताने, फेरो मॅमोस आणि त्याचा अफाट खजीना कबरीमध्ये पुरून ठेवल्याचे वर्णन असलेल्या पपायरसच्या गुंडाळ्या ड्युराईड अल सीमा आणि त्याची इंग्लिश - इजिप्शियन माता - पिता असलेली त्याची पत्नी रॉयन यांच्या हातात पडतात. हा त्यांचा शोध नाईलपासुन इथियोपियाच्या दर्‍या खोर्‍यात पोहोचतो. तो खजिना फक्त स्वतःसाठी मिळवण्याच्या लालसेने पछाडलेले ताकदवान लोक फेरोच्या गुप्त खजिन्याच्या मागे लागल्यावर अत्यंत हिंसक असा पाठलाग सुरू होतो.. अतिशय घनदाट जंगलात आणि वेगवान नदीतला पाठलाग, गोळीबार, थरार अंगावर रोमांच आणतात.. ड्युराईडचा निघृण खुन पडल्यावर रॉयन, पुराणवस्तू संशोधक निकोलस क्वेंटन हार्पर बरोबर इथियोपियाला जाते.. खजिना मिळतो का.. ड्युराईडचे स्वप्न पुर्ण होते का...? स्वतःच्या उद्ध्वस्त आयुष्याचे धागे पुन्हा जुळतात का.? असंख्य उत्कंठावर्धक प्रश्नांची उकल करण्यासाठी नक्की वाचा.! आपलाच Ravindra chavan😅 ...Read more

  • Rating StarMukesh pawar

    फार सुंदर पुस्तक आहे जरूर वाचा वेगवान कथानक व अतिशय सुंदर अनुवाद.

  • Rating StarNilesh Bhagwat

    Mastach ...

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MI GALIB BOLTOY
MI GALIB BOLTOY by SHABBIR ROMANI Rating Star
Arvind deshpande

Mirza Ghalib is the Jewel in the Urdu literature. He is the pioneer in setting new trend in it. Authar Shabbir Romani excellently explained it. Everyone who is not acquainted with urdu literature should go throw it. The socio political and historicalenviorn of that time is skillfully reflected in his poetry and was narrated by author shabbir Romani. ...Read more

NADIMUKH
NADIMUKH by PERUMAL MURUGAN Rating Star
गार्गी म्हात्रे

पेरुमाल मुरुगन ह्या तामिळ लेखकाच " नदीमुख" हे अनुवादित पुस्तक वाचले. मराठी मध्ये दाक्षिणात्य भाषां मधल्या तामिळ भाषेच्या उत्तम साहित्याची वाचन संधी या पुस्तकाच्या निमित्ताने मिळाली. साठच्या दशकात जन्मलेल्या पिढीला वेगाने ,खर तर अती वेगाने बदलत जाणाऱ्ा तंत्रज्ञान व तरुण पिढीची मानसिकता यांचे सुंदर चित्रण या कादंबरी मध्ये करण्यात आले आहे. माणूस किंवा असुर पालक असला की मुलांच्या भविष्याची चिंता त्यामधून उद्भवणारा संघर्ष साध्या सोप्या पण प्रवाही भाषेमधून आपल्या समोर उभा राहातो. कुमारासुराच्या एकसुरु झापडे लावून घेतलेल्या आयुष्यात `नदीमुख` दर्शना नंतर झालेली तगमग व बदल यांचे खूप सुंदर वर्णन शेवटी आलेल आहे. डॉ. मानसी जयंत केळकर यांनी अतिशय प्रवाही भाषेत व उत्कृष्ट समर्पक शब्दात पुस्तक अनुवादित केल्यामुळे कांदबरीची मजा घेता येते. मराठी व्यतिरिक्त अन्य भाषेतील साहित्य वाचनाला उपलब्ध करुन दिल्या बद्दल मेहता पब्लिशिंग हाऊस व डॉ मानसी केळकर यांचे आभार ! ...Read more