BAL BHAGWAT

About Author

Birth Date : 17/03/1938
Death Date : 25/06/2019


BAL BHAGWAT, WHO RETIRED FROM THE MUMBAI DIVISION OF AGRO CHEMICALS, HAS A POSTGRADUATE DEGREE IN MATHEMATICS FROM THE SCIENCE DEPARTMENT. THE BAL BHAGWAT WAS WORKING IN THE SECRETARIAT IN MUMBAI BETWEEN 1958 TO 1968. THEN FROM 1968 TO 1998, HE WAS WORKING WITH RALLIES INDIA LTD COMPANY. HE LATER RETIRED AS A TECHNICAL SALES AND SALES CO-ORDINATION OFFICER IN THE MUMBAI DIVISION OF AGRO CHEMICALS. IN THEIR CURRENT LITERARY WORK DEV CHE?PARGRAHAVARIL ANTARALVEER , ADBHUT SHAKTINCHE MAYAJAL AND TRANSLATED LITERATURE INCLUDE BOOKS LIKE ANGELS AND DEMONS, THE AFGHAN , ONE SHOT , OCEAN TRANGLE , SPACE TRIANGLE, KILLING FIELDS.

अ‍ॅग्रो केमिकल्सच्या मुंबई डिव्हिजन मधून निवृत्त झालेल्या बाळ भागवत यांनी विज्ञान शाखेतून गणित विषयात पदव्युत्तर पदविका संपादित केली आहे. बाळ भागवत १९५८ ते ६८ दरम्यान मुंबई येथे सचिवालयात कार्यरत होते. त्यानंतर १९६८ ते ९८ मध्ये ते रॅलीज इंडिया लि. या कंपनीत नोकरी करत होते. त्यानंतर अ‍ॅग्रो केमिकल्सच्या मुंबई डिव्हिजन मध्ये टेकनिकल सेल्स अँड सेल्स को-ऑडिनेशन या पदावर कार्यरत असताना ते निवृत्त झाले. त्यांच्या आजवरच्या साहित्यिक वाटचालीमध्ये ‘देव? छे परग्रहावरील अंतराळवीर’, ‘सागरकथा’ तर अनुवादित साहित्यामध्ये ‘एंजल्स अँड डेमन्स’, ‘द अफगाण’, ‘वन शॉट’, ‘ओशन ट्रँगल’, स्पेस ट्रँगल’, ‘किलींग फिल्डस’ या पुस्तकांचा समावेश आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 12 of 21 total
A TIME TO KILL Rating Star
Add To Cart INR 600
TBC Classic Book
ADBHUT SHAKTINCHE MAYAJAL Rating Star
Add To Cart INR 160
ANGELS & DEMONS Rating Star
Add To Cart INR 420
TBC Classic Book
BLACK LIST Rating Star
Add To Cart INR 450
TBC Classic Book
DEV? CHHE! PARAGRAHAVARIL ANTARALVEER! Rating Star
Add To Cart INR 200
DEVIL MAY CARE Rating Star
Add To Cart INR 240
TBC Classic Book
EXODUS Rating Star
Add To Cart INR 650
TBC Classic Book
FULL BLACK Rating Star
Add To Cart INR 450
TBC Classic Book
GROWING UP BIN LADEN Rating Star
Add To Cart INR 595
NEVER GO BACK Rating Star
Add To Cart INR 550
TBC Classic Book
ONE SHOT Rating Star
Add To Cart INR 340
TBC Classic Book
THE AFGHAN Rating Star
Add To Cart INR 460
12

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
मिना हरीश सहारे, नागपूर.

कुठल्याही पुस्तकावर अभिप्राय देण्याची माझी ही पहिलीच वेळ असली तरी `दुर्दम्य` पुस्तक मनाला भिडल्यामुळे त्यावर लिहीणे मला आवश्यक वाटले. मी पण चरित्रनायक एकनाथनच्या विभागात सेवा दिली आहे. आमच्या सारख्यांना एकनाथन एक कडक तानाशाह ऑफिसर होता इतकंच माित होतं. पण लेखकाच्या नजरेतून जेव्हा त्याचे चरित्र वाचले तेव्हा तो खरा काय होता हे समजले. चरित्र वाचताना पूर्ण होई पर्यंत उत्सुकता कायम होती. कार्यालयीन जीवनातला कालखंड डोळ्यासमोर जिवंत होतो. वाचकाला खिळवून ठेवण्याचं कसब लेखकाच्या लिखाणात आहे.एकनाथन सारख्या विक्षिप्त, हेकेखोर व्यक्तीचा व लेखकाचा नक्कीच काहीतरी ऋणानुबंध असला पाहिजे. निवृती नंतरफिरून तीनदा लेखकाच्याच शहरात येणे हा योगायोग वाटत नाही. कथानकातील काही भागातील प्रसंग व घटना मजेशीर, गमतीदार वाटतात. कथेचा शेवट मनाला भिडून जातो. एका करारी, खंबीर माणसाचा अंत वाचताना मन भरून आले. पुस्तक पूर्ण केल्यावर शेवटी एक विचार आला की त्याचं मरण सुखदच झाले असे म्हणावे लागेल कारण एकाकीपणा जरी त्यांनी स्वतः निवडला होता तरी मृत्यूच्या बाबतीत भाग्याने त्यांची साथ दिली होती. त्यांच्या सारखे ताठ कणा व दुर्दम्य व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तिला परावलंबी, असहाय आयुष्य कधीच रूचलं नसतं आणि त्या नंतर आलेल्या करोना काळात त्यांचे काय हाल झाले असते त्याची कल्पनाच न केलेली बरी. कथानक वाचकाच्या मनाला भिडले यातच लेखकाचे यश आहे. पुढील लिखाणा करता शुभेच्छा. बाकी माझ्याकडून पुस्तकाचा दर्जा - खूप छान, बढिया आणि सुपर्ब... ...Read more

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
अनिल सहजे, नाशिक.

`कुलामामाच्या देशात’ हे पुस्तक म्हणजे जंगलातील अनुभवकथांचा एक विलक्षण रम्य प्रवास आहे. रवींद्र वानखडे यांच्या वनाधिकारी म्हणूनच्या प्रत्यक्ष अनुभवातून या कथा जन्माला येतात. प्रत्यक्षात घडलेल्या या कथा इतक्या रंगतदार आहेत की त्या काल्पनिक वाटाव्यात, अी त्यांची गंमत आहे. वानखडे यांच्या अनुभवांमधील कथाबीज अचूकपणे हेरून जी. बी. देशमुख यांनी त्यांना आपल्या रसाळ आणि खुमासदार शैलीत शब्दरूप दिले आहे. देशमुखांची शैली इतकी प्रवाही आणि ओघवती आहे की वाचक कथांमध्ये अक्षरशः गुंगून जातो. एकदा पुस्तक हातात घेतल्यानंतर ते पूर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेवावेसे वाटत नाही. वन हे सामान्य माणसासाठी तसे अपरिचितच क्षेत्र. जंगलातील जीवन, तेथील नियम-कायदे आणि जंगली श्वापदांचे विश्व याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. वानखडे-देशमुख द्वयी केवळ या अनोख्या जगाची ओळख करून देत नाहीत, तर त्याविषयी वाचकाच्या मनात विलक्षण कुतूहलही निर्माण करतात. ‘खुश रहेना मेरे यार’ आणि ‘महाकाय आकांत’ या दोन क्रमशः कथा तर विशेषतः चटका लावून जातात. त्या केवळ थरारक आणि अविश्वसनीय वाटाव्या अशा अनुभवांनी भारलेल्या नाहीत, तर जंगली श्वापदांची एक हळवी, माणुसकीच्या जवळ जाणारी बाजूही त्या प्रभावीपणे उलगडून दाखवतात. जी. बी. देशमुखांची खुमासदार, मिश्कील आणि रसाळ लेखनशैली वाचकाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुंतवून ठेवते. रवींद्र वानखडे यांच्या प्रत्यक्ष अनुभवांची सत्यता आणि देशमुखांच्या कथनकौशल्याचा सुंदर मिलाफ ‘कुलामामाच्या देशात’ घडवतो. हे पुस्तक केवळ जंगलातील अनुभवकथांचे संकलन राहत नाही, ते वाचकाला जंगलाच्या एका अनोख्या, रोमांचक आणि हळुवार विश्वाची सफर घडवते आणि नकळत सांगून जाते, ‘वनस्य कथा रम्यः!’ ...Read more