* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: THE GOD OF SMALL THINGS
 • Availability : Available
 • Translators : APARNA VELANKAR
 • ISBN : 9788177662535
 • Edition : 8
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 456
 • Language : Translated From ENGLISH to MARATHI
 • Category : FICTION
Quantity
THE BOOK WAS INTERNATIONALLY FELICITATED BY THE `BOOKER AWARD`. THE VOICE AND ECHOES, THE TEARS AND THE SMILES, THE CALLS AND THE ANSWERS COMING OUT OF THE CORE OF THE EARTH ARE THE SOUL OF THIS NOVEL, `GOD OF SMALL THINGS`. IT IS GARNISHED WITH THE INEVITABLE FEAR WHICH A HUMAN MIND EXPERIENCES ALONG WITH THE INEVITABLE DESTINY. THIS STORY IS FULL OF LOVE, HATRED, EGO, JEALOUSY, TREACHERY, FEELING OF GUILT AND VARIOUS SUCH ASPECTS OF LIFE WHICH ARE INEVITABLE IN A HUMAN LIFE. THE AUTHOR HAS WOVEN ALL THESE TOGETHER EXCELLENTLY WELL. SHE HAS CAPTURED US ALL IN IT MAKING IT IMPOSSIBLE TO COME OUT OF IT, TO FREE OURSELVES. THE PICKLE SMELLS OF THE SALTED RAW MANGOES, THE JELLY SMELLS OF THE RIPE BANANAS. WE ALSO COME ACROSS THE CHILDREN SINGING SONGS WHILE TRAVELLING TO THEIR NATIVE PLACES OR ACTUALLY TOWARDS THE UNAVOIDABLE SADNESS. THE STORY IS A WEIRD YET FASCINATING COMBINATION OF LAMENTATION, MYSTERY AND MELANCHOLY. SINCE THE VERY BEGINNING WE GET HYPNOTIZED, MESMERIZED. WE REALIZE THAT WE ARE WITNESSING SOMETHING TOTALLY FRESH AND NEW HAVING THE POWER TO CAPTURE OUR MINDS. THIS IS THE ONLY STORY OF ITS TYPE. NONE OTHER WILL BE EVER AS GOOD AS THIS.
पृथ्वीच्या गर्भातून उमटणारे साद-प्रतिसाद, ध्वनी-प्रतिध्वनी, अश्रू आणि हुंदके हे ‘द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ चे प्राणतत्त्व ! मानवी अस्तित्वाला घेरून असणारी आदिम भीती आणि नियतीच्या पाशामधली अपरिहार्यता यांचे वेढे उलगडून पाहणा-या या अद्वितीय लेखनाला अदृश्य मानसिक ताणाचे अस्तर आहे. अपरिमित प्रेम, द्वेष, मत्सर, विश्वासघात, तीव्र तिरस्कार, अपराधीपणाचा डंख अशा अनेक भावभावनांचे पदर कोळ्यांच्या जाळ्यासारखे धावत राहतात... विणले जातात... त्या जाळ्यांच्या वेढ्यांमधून सुटता येत नाही. स्वत:ला अलग करता येत नाही. लोणच्यामध्ये खारवलेल्या आंब्यांचा, जॅममधल्या पिकल्या केळ्यांचा वास येत राहातो. मामाच्या गाडीत बसून एका अपरिहार्य शोकांतिकेकडे प्रवास करणा-या मुलांची गाणी ऐकू येतात. कथानकाच्या शब्दाशब्दातून ठिबकणारा शोक, गूढ रहस्य आणि काळीज हलवून टाकणारी खिन्नता हे सारेच एक अजब चेटूक आहे. जाणिवांना संमोहन घालणारा प्रारंभ वाचतानाच लक्षात येते, की नवीन काहीतरी सांगणा-या एका ताज्यातवान्या प्रतिभेने आपल्या मनाची पकड घेतली आहे.. श्वास रोखून धरायला लावणारा नवा स्वर! यानंतर अशी कथा जणू पुन्हा सांगितलीच जाणार नाही. हीच पहिली... आणि एकमेव ! (आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेच्या ‘बुकर पुरस्कार’ विजेत्या ‘द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ला मिळालेल्या जागतिक अभिप्रायांमधून)
फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स पुरस्कार २००३ / साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार २००३
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#THEGODOFSMALLTHINGS #ARUNDHATIROY #APARNAVELANKAR #BOOKERAWARD #
Customer Reviews
 • Rating StarManasi Lad- Gudhate

  हे पुस्तक वयाच्या आणि परिपक्वतेच्या ज्या पडावावर माझ्या हाती आले ते सारे अत्यंत योग्यरित्या जुळून आलेले योग असावेत. या पुस्तकाने मला काय दिलं ते शब्दांत सांगून समजणं अशक्य आहे. अरुंधती रॉयने जे लिहून ठेवलंय ते अचाट आहेच.... पण अपर्णा वेलणकर ने लिहिेला अनुवाद वाचून मला अनुवाद वाचण्याविषयी सकारात्मकता निर्माण झाली. आधी एकदा लहानपणी हे पुस्तक जे मी वाचता वाचता अर्धवट सोडले होते... अर्थातच डोक्यावरून गेल्यामुळे. त्याच सुमारास या पुस्तकाला बुकर पुरस्कार मिळालेला होता. त्यामुळे भविष्यात कधीतरी हे पुस्तक पुन्हा वाचायला घ्यायचे अशी नोंद मेंदूत तेंव्हाच झालेली असावी. आणि पुन्हा हे पुस्तक हाती आलं तेंव्हा असं लक्षात आलं की हे पूर्ण वाचल्याशिवाय मी स्वत: पूर्ण होऊच शकत नाही...! अनेकांना हे पुस्तक दुर्बोध वाटू शकते. काहिंनी तर ’किळसवाणे’ किंवा ’ओंगळ’ अशीही प्रतिक्रीया दिली. पण मला हे पुस्तक एका वेगळ्याच पातळीवर अत्यंत भावले. त्यात ओंगळ असे काहीही नाही! आणि तसेही ओंगळ काही असलेच तर ते आपले माणूस म्हणून दैनंदिन जगणे हेच! त्या जगण्याचेच अस्सल शुद्ध प्रामाणिक स्वरूपात वर्णन असलेली ही कादंबरी खरंतर आपल्याला आपलेच अंतरंग त्यातल्या जाणिवा - उणिवांनिशी उघड करून दाखवते. या पुस्तकाच प्रत्येक वाचकाला अत्यंत मुलभूत आणि प्रामाणिक स्वरूपात स्वत:ला पाहता, ओळखताच नव्हे तर सामोरेही जाता येईल (नव्हे जावेच लागेल) अशी एक विलक्षण सोय नकळतपणे लेखिकेने करून ठेवलेली आहे! हे सामोरे जाणे सुखावह नक्कीच नसते नाही का? मग असल्या वर्मी घाव घालणार्‍या लेखनाला शेवटपर्यंत भिडणे एक असह्य अनुभव होऊन बसतो! असह्य... वेदनामय.... पण प्रामाणिक! आणि खरं सांगायचं तर... आवश्यक! संपूर्ण कादंबरीभर परसलेलं सतत पार्श्वभूमीला भळभळणारं एक दु:ख आहे! बर्फाच्या टणक लादीखालून संथ मूक वाहणार्‍या थंडगार पण जिवंत नदिसारखं ते एकसूरी वाहत राहतं. दिसत नाही तरी जाणवत राहतं. मध्येच प्रकट होतं मध्येच अदृष्य होतं... पण ते असतंच. सतत. कादंबरीच्या पहील्या पानापासून ते अखेरच्या शब्दापर्यंत ते दुःख आपला पाठलाग करत रहातं, प्रचंड अस्वस्थ करतं. अगदी आनंदाच्या प्रसंगांचं वर्णन करतानाही लेखिकेनं हे दुःखाचं भान हरवू दिलेलं नाही. ईस्था आणि राहेल - दोन जुळी भावंड. त्यांची आई... त्यांचं आयुष्य... त्यांचं भावविश्व.... आणि ’डिंग’! निव्वळ मुर्तिमंत नैराश्याची, माणसाच्या चिरकाळ निरंतर दुःखाची, आणि अस्तित्त्वाच्या अस्वस्थ करून सोडणार्‍या निरुत्तर प्रश्नांची गोष्ट आहे ’गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’. माणूस म्हणून जगताना स्वत:च्या अश्या भक्कम संवेदना बाळगून असण्यार्‍या प्रत्येकाला चिरस्मरणीय अनुभूती देऊन जाणारी ही कादंबरी आहे यात शंकाच नाही! आणि अनुवादही आश्चर्य़ वाटावे इतका सुरेख अप्रतिम केलेला आहे. वाचताना कुठेही रसभंग होत नाही. दुःखाची ठसठशीत जाणिव अनुवादातही व्यवस्थित जपली गेली आहे. उत्कृष्ठ अनुवाद कसा असावा याचे मुर्तिमंत उदाहरण! ...Read more

 • Rating StarNarendra Sonaje

  मराठी भाषेचे वेगळेच अनुवादित सौंदर्य

 • Rating StarD.Nitin

  अपर्णा वेलणकर मॅडमनी मराठीत ट्रान्सलेट करताना सगळे शब्द उत्तम वापरलेत.. अगदी वेलुथा ला शेवट पोलीसांनी दिलेल्या शिव्या सुद्धा शब्द बदल न करता मांडल्यात ! बाकी ह्या गोष्टीची १५० पान काय वाचतोय कळत नाय..पण लेखिकेच अलंकारिक वर्णन पुस्तक खाली ठेवु देत नय.. राहेल -ईस्थापन,अम्मु,बेबी कोचम्मा,चाको,कॉम्रेड पिल्लई ,वेलुथा हिच महत्त्वाची पात्र.. १५० पानानंतर स्टोरीचा एंड जाणुन घ्यायची ईच्छा होते.. पुर्ण पुस्तक वाचल्यानंतर समजेल की ह्या पुस्तकानी अवॉर्ड का जिंकला होता ते.. जोपर्यंत मी अॅना कॅरेनिना आणि नॉट विदाउट माय डॉटर पुर्ण वाचत नाही तोपर्यंत हेच माझ आवडत पुस्तक राहील.. बाकी एक गोष्ट खात्रीनी सांगतो..द.गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज वाचल तर ते नक्कीच तुमच फेवरेट असेल.. ...Read more

 • Rating StarNEWSPAPER REVIEW

  पहिल्याच कादंबरीने केलेला विश्वसंचार... अरुंधती रॉयने केवळ भारतीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय वाड्मयीन क्षेत्रात मोठीच खळबळ उडवून दिली, यात शंका नाही. पहिल्याच कादंबरीने तिला दहा लाख डॉलर- साडेतीन कोटी रुपये मानधनापोटी मिळवून दिले. एवढी मोठी रक्कम यापू्वी कोणाही कादंबरीकाराला मिळालेली नव्हती. प्रथम प्रकाशनाच्या वेळीच कादंबरी अनेक देशांत व अनेक भाषांत होण्याबाबतही तिने विक्रम प्रस्थापित केला. सहा महिन्यांत तिच्या दहा लाखांवर प्रती खपल्या. भारतातही हार्डकव्हरमध्ये सहा आवृत्त्या निघाल्या. बेस्टसेलर यादीत सतत नाव झळकत राहिले आणि या सगळ्यावर कळस चढविला तो इंग्लंडमधल्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा बुकर पुरस्काराने! १९८१ मध्ये सलमान रश्दी याला हा पुरस्कार `मिडनाईटस् चिल्ड्रेन` कादंबरीला मिळाला होता. त्यानंतर सोळा वर्षांनी हा सन्मान पुन्हा भारताला लाभला. पस्तिशीतल्या एका भारतीय तरुणीने आंतरराष्ट्रीय साहित्यक्षेत्रात असे दणदणीत पदार्पण करून सर्वांनाच थक्क करून टाकले. परीकथेतल्या सिंड्रेलासारखेच. एका रात्रीत अरुंधती केरळच्या, दिल्लीच्या परिसरातून बाहेर पडून साहित्यक्षेत्रातली सम्राज्ञी होऊन बसली. प्रत्येक भारतीय लेखकाला अरुधती रॉयच्या यशाने नवा आत्मविश्वास, नवा आत्मसन्मानाचा भाव प्रदान केला. या तिच्या अभूतपूर्व यशामुळे उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होणे अपरिहार्यच आहे. ही कादंबरी खरोखरच एवढी श्रेष्ठ आहे का? तिच्या `लिटररी एजंट`ने आणि प्रकाशकांनी आधुनिक `मार्केटिंग` तंत्राचा वापर करून या कादंबरीबद्दल हवा निर्माण करून तिचा फायदा घेतला? आर्किटेक्ट म्हणून पदवीधर झालेल्या अरुंधती रॉयने दूरदर्शनवरील मालिकांच्या पटकथा लिहिल्या. चित्रपट निर्माता प्रदिप किशन हा तिचा पती. त्याच्या चित्रपटांसाठी कथालेखन केले. वडील बंगाली. चहाच्या मळ्यात अधिकारपदावर. आई केरळची. सीरियन ऑर्थोडॉक्स खिश्चन धर्मीय. त्यामुळे प्राथमिक शिक्षण कोट्टायमजवळच्या गावात झालेले. मल्याळी भाषेत. आई-वडिलांनी घटस्फोट घेतल्याने दिल्लीला पुढे उच्च शिक्षणासाठी प्रयाण, तेथेच तिचे वास्तव्य... अरुंधतीने नंतर एक कादंबरी लिहिण्याचा घाट घातला. आपल्याच जीवनातले, अनुभवातले, अनेकविध प्रसंग या कादंबरीत गुंफले. राहेल आणि एस्थाप्पन ही जुळी भावंडे. राहेल मुलगी. एस्था मुलगा. राहेल अठरा मिनिटांनी एस्थापेक्षा मोठी. आई अम्मा. घटस्फोटानंतर मुलांना घेऊन आई अम्मू कोट्टायमला राहते. अम्मूचा भाऊ चॅको हा एके काळचा ऑक्सफर्डचा ऱ्होड्स स्कॉलर; पण आता घरातला `पॅरेडाइज पिकल` चा लोणच्याचा उत्पादन-वितरणाचा धंदा पाहणारा. आजोबा पप्पाजी हे जुन्या जमान्यातले. रुबाबदार, कडक, सनातनी, अधिकार गाजविणारे. आपल्या अपूर्ण महत्त्वाकांक्षा पुढच्या पिढीवर लादणारे. आजोबांची धाकटी बहीण बेबी कोचम्मा. वैफल्यग्रस्त, कडवट, चॅकोचा विवाह तरुणपणी एक इंग्लिश बारमेडशी झालेला होता. आता ती शिक्षिका आहे. तिला एक मुलगी असते. साफी मोल. हा हिंदुस्थानला परतल्यावर मार्गारेट दुसरा विवाह करते; पण तिचा दुसरा नवरा मरतो. तेव्हा चॅको तिला आपल्या मुलीसह केरळमध्ये येण्याचा आग्रह करतो. आपल्या आयेमेनेमच्या प्रशस्त घरात सुटी घालवण्याचे निमंत्रण देतो. राहेल व एस्थाप्पन नदीत बुडून मरण पावलेल्या साफी मोलच्या अंत्यविधीसाठी आयेमेनेमला येतात. सात वर्षांच्या या जुळया भावंडांच्या दृष्टीतून त्या अंत्यविधीचे कधी गंभीर तर कधी विनोदप्रचुर वर्णन वाचायला मिळते... या मुलांना घेऊन अम्मू पोलीस चौकीवर तक्रार करायला जाते. `मी या मुलीच्या मृत्यूला जबाबदार आहे.` असे म्हणते; पण पोलीस इन्सेक्टर तिला धुडकावून लावतो. `वेश्येची तक्रार आम्ही लिहून घेत नाही,` असे म्हणून तिला चौकीतून घालवून देतो. नंतर एस्थाप्पनला त्याचे वडील कलकत्त्याला नेतात. बोर्डिंग स्कूलमध्ये ठेवतात. राहेल ही मात्र आपल्या आईजवळ कोट्टायमला राहते. तेवीस वर्षांनी एस्थाप्पन पुन्हा काट्टायमला येतो. त्याचे वडील तेथील नोकरी सोडून ऑस्ट्रेलियात कायम वास्तव्यासाठी जाण्याचे ठरवतात. एस्थाप्पनला बरोबर नेणे त्यांना सोयीचे वाटत नाही, आपल्या परागंदा व परस्थ वडिलांबद्दल या मुलांना विलक्षण ओढ वाटते. त्यांना भेटायची तळमळ असते... अम्मूचाही एकाकीपणा, स्वाभाविक उर्मी... वेलुथा या कनिष्ठ वर्गातल्या हुशार व बलदंड तरुणाचे तिला आकर्षण. त्यातून वेलुथाची झालेली भीषण हत्या इत्यादी या कादंबरीतील प्रसंगांची मालिका ही कालक्रमाने आलेली नाही. भूतकाळातील घटना, चालू घटना यांची सरमिसळ चालू राहते. रचनादृष्ट्या अत्यंत गुंतागुंतीची अशी ही कादंबरी आहे आणि तरीही ती खिळवून ठेवते. वाचत राहावीशी वाटते. अरुंधती रॉय इंग्लिश भाषा अत्यंत सहजपणे लिहिते. व्याकरणाचे नियम ती धुडकावून लावते. उपपदे, कॅपिटल व स्मॉल लेटर्स, विशेषणे- क्रियाविशेषणे यांची हवी तशी तोडमोड करते. नवी क्रियापदे वापरते, नवे शब्द बनवते. आपण इंग्लिशमध्ये काही लिहितो. व्याकरणदृष्ट्या वाक्य बरोबर आहे की नाही, कर्ता-कर्म-क्रियापद यांचा मेळ बसतो की नाही, कॅपिटल अक्षर कुठे हवे, स्पेलिंगमध्ये तर चूक नाही ना- अशी अपराधी भावना मनात ठेवून फार चिंता करतो. परंतु अरुंधती रॉय इंग्रजी भाषेची, शब्दांची हवी तशी मोडतोड करते. एखादे रबराचे खेळणे हाताळावे तसे इंग्रजी शब्दांना इकडेतिकडे घुमवते. भाषेच्या या लकबींमुळे तिने केलेली वर्णनेही चित्रदर्शी होतात. आणि ही मोडमोड करताना तिला कुठेही अडखळल्यासारखे वाटत नाही. केरळीय इंग्लिश लिहिताना तिला कुठेही संकोच जाणवत नाही. ती उपमा, अलंकार वगैरेही वाटेल तसे वापरते. It was raining when Rahel came back to Ayemenem. Slanting silver ropes slammed into loose earth, ploughing it up like gunfire. The old house on the hill wore its steep, babled roof pulled over its ears like a low hat. The walls, streaked with moss, had grown soft, and bulged a little with dampness that seeped up from the ground... Hopeful yellow bullfrogs cruised the scummy pond for mates. A drenched mongoose flashed across the leaf-strewn driveway. असे पावसाळ्याचे वर्णन करताना अरुंधती तेथली वनस्पती, प्राणी, जमीन सर्वांची दखल घेते. Not old Not young But a viable die-able age अशासारखे खेळ ती लीलया करते. फ्रुटी एअर, फॅटली बॅफल्ड, इममॉडेस्ट ग्रीन अशी मजेदार विशेषणे ती वापरते. फरीव्हरिंग, सॉरी फ्लॅपिंग, डलथडिंग अशासारखे शब्द एकत्र आणून त्या वर्णनांना नेमकेपणा आणते; पण त्याबरोबर काहीसे चक्रावूनही सोडते. काळ व स्थळ यांना ही कथावस्तू भेदून जाते. बुकर प्राइझची घोषणा करताना परीक्षकांच्या वतीने कलेल्या निवेदनात खिळवून ठेवणारी निवेदनशैली (स्पेलबाइंडिंग नॅरेशन) दक्षिण भारताचा इतिहास व परंपरा यांचे सात वर्षे वयाच्या जुळ्या भावंडांच्या परिप्रेक्ष्यातून घडवण्यात आलेले दर्शन, त्या परंपरेतील खोटेपणा व कायदेशीरपणा वगैरेंचा उल्लेख केला गेला आहे. अनेक नामवंत समीक्षकांनी कादंबरीचा मुक्तकंठाने गौरव केला आहे. वेगवेगळी वैशिष्ट्ये टिपली आहेत. निवेदनशैलीचे तंत्र हे आधुनिकवाद, जादुई वास्तववाद, सिनेमॅटिक, माँटाज या सर्वांना सामावून घेऊन पुढे जाते असे एक समीक्षकाने म्हटले आहे. नंबुद्रीपाद, कम्युनिस्ट पक्षाचे राजकारण यांचे चित्रण वास्तवापेक्षा वेगळे आहे, असा आक्षेप मार्क्सवादी विचारवंतांनी घेतला आहे. अश्लीलतेवरून पुस्तकावर खटलाही झाला आहे; परंतु ही मतमतांतरे असली तरी कादंबरी जगभर पोचली आहेच. `दि गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज`चे हे यश म्हणजे गुणवत्ता च लोकप्रियता या दोहोंचा सुरेख संगम आहे. आधुनिक `मार्केर्टिंग`चेही ते यश आहे. पंकज मिश्रा या हार्पर कॉलिन्स प्रकाशनसंस्थेतील संपादकाने हे हस्तलिखित वाचले. विक्रम सेठ वगैरे लेखकांचा लिटररी एजंट डेव्हिड गॉडविन याच्याकडे ते लंडनला पाठवले. गुरुवारी त्याला ते मिळाले. रविवारी तो सरळ विमानाने दिल्लीला आला. इतका तो या पुस्तकाने भारावून गेला होता. या कादंबरीमुळे तुला दिगंत कीर्ती मिळेल, असे त्याने अरुंधतीला सांगितले. इंग्लंड-अमेरिकेतल्या प्रकाशकांशी संपर्क साधला. हार्पर कॉलिन्सने दहा लाख डॉलर आगाऊ रॉयल्टी देण्याचे मान्य केले. इतर भाषांतील अनुवादक व प्रकाशक यांच्याशी संपर्क साधला. भारतातील हक्क इंडिया इंकच्या तरुण तेजपाल यांजकडे दिले. डेव्हिड गॉडविनसारख्या रत्नपारखी लिटररी एजंटकडे हे हस्तलिखित गेले. त्यामुळे त्याचे सोने झाले. भारतीय लेखक-प्रकाशकांनीही यापासून काही घडा घ्यायला हवा. विक्रम सेठ, सलमान रश्दी, अमिताव घोष, उपमन्यू चॅटर्जी, भारती मुखर्जी, अनिता देसाई वगैरे भारतीय लेखक आज इंग्लंड-अमेरिकेत गाजत आहेत. परदेशी लेखकांच्या तुलनेत आपण कमी पडत नाही. आत्मविश्वासाने लेखन करायला हवे. आपल्याजवळ सांगण्यासारखे खूप काही आहे. आजवर आपण पाश्चात्य पुस्तकांच्या लेखकांचे आदर्श समोर ठेवून लिहिण्यात मश्गुल होतो. आता आपला आदर्श परदेशातील लेखकांना ठेवण्याचीही कदाचित इच्छा होईल. ``अरुंधती रॉयने केरळीय साहित्याचे दालनच आंतरराष्ट्रीय वाचकांपुढे खुले केले आहे. पूर्वी आम्ही युरोपियन आणि लॅटिन अमेरिकन साहित्य केरळमध्ये आयात करीत होतो. त्यांचे अनुकरण करीत होतो. आता आमची संस्कृती, आमचे विचार, आमची वाड्मयीन दृष्टी ही जागतिक वाचकवर्गावर प्रभाव गाजवू लागेल. म्हणून केरळच्या भाग्याच्या दृष्टीने हा मोठा महत्त्वपूर्ण क्षण आहे.`` असे मल्याळी साहित्यिक मोहन वर्मा यांनी म्हटले आहे. इतर भाषकांनाही आपल्या इच्छेने प्रतिनिधित्व करणारे हे विधान वाटायला हरकत नाही. अरुंधती रॉयचे यश तमाम भारतीय लेखकांना नवा आत्मविश्वास देऊ शकेल. नवी अस्मिता देऊ शकेल. ...Read more

 • Read more reviews
Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DHUMARE
DHUMARE by MADHAVI DESAI Rating Star
Prasad Salunkhe

धुमारे - माधवी देसाई म्हणतात ना `don`t judge a book by its cover` तसं काहीसं या पुस्तकाबाबत झालं. पुस्तक घेऊन फार दिवस झाले पण वाचायचा योग काही येत नव्हता. एक तर छोटं पुस्तक आहे नंतर वाचून काढू असं करत ते मागे राहिलं. आणि दुसरं म्हणजे त्याचं ओकंबों मुखपृष्ठ. ते पाहून उगाच गैरसमज होतो की काहीतरी उदासीभरं आहे हे प्रकरण. त्यात माधवी देसाईंचं `नाच गं घुमां` आधी वाचलेलं त्याचा ठसा मनावर निश्चित होता, त्या वातावरणात काही पूर्वग्रह किंवा अपेक्षा ठेवून मला हे पुस्तक हाती घ्यायचं नव्हतं. नंतर एकदोन ठिकाणी लोकांना या पुस्तकाबद्दल भरभरून बोलतांना, लिहितांना पाहिलं आणि चूक माझ्या लक्षात आली. मग पुढच्या एक दिवसात हे पुस्तक वाचून काढलं. `धूमारे` या पुस्तकात गोयच्या भूमीवर लिहिलेले पंधरा लेख आहेत. गोवा म्हणजे फेसाळती बियर, उघडेबागडे फोरेनर्स एवढंच मर्यादित नाहीये याची आपल्याला नव्याने जाणीव हे पुस्तक करून देतं. आपण गोव्याच्या अंतरंगात माधवी ताईंचं बोट धरून शिरतो. त्यांच्या संवेदनशील नजरेने इथला निसर्ग, इथली माणसं आपण पाहतो. हे सरधोपट प्रवासवर्णन असं नाहीये. एखाद्या ठिकाणी आपण बराच काळ राहिलो तर त्या भूमीशी त्या वास्तूंशी आपले बंध तयार होतात, तिथे आपली मूळं आपसूक रुजतात, तिथल्या झाडापेडांशी आपलं हितगूज सुरू होतं. आपुलकीची जी माणसं भेटतात आपण त्यांना आणि ती आपल्याला अंतर्बाह्य ओळखत असतात, त्या डोळ्यात स्नेह असतो, आपलं एक पान त्या डोळ्यात दडलेलं असतं, नुसतं डोळ्यात पाहून आपण स्वतःला वाचू शकतो. गाईडच्या भूमिकेत एखादी वास्तू, निसर्ग, तारीखवार इतिहास सांगणं वेगळं आणि आपल्या मनातील या साऱ्या सभोवतालाविषयीचे प्रामाणिक भाव व्यक्त करणं वेगळं. १९९० साली म्हणजे जवळपास तीस वर्षांनी माधवी ताई त्यांच्या बांदोडा या गावी परतल्या. जागा तीच पण वयाच्या १६ व्या वर्षी पाहिलेलं गोवा आणि साठीत समजलेलं गोवा या दोन्ही गोष्टी त्यांनी कुतुहलाने तोलून पहिल्या, आणि मांडल्याही. गोवा म्हणजे विविध संस्कृतीची सरमिसळ. त्याचे समाजावर झालेले बरेवाईट परिणाम या पुस्तकात मांडले आहेत. परकीय राजवट असून आणि आता स्वतंत्र घटक राज्य असून जपलेल्या चालीरीती, समाजात परकीय राजवटीमुळे आलेला एक मोकळेपणा सारं त्यांच्या लेखणीतून झरझर उतरतं. त्यांचं लिखाण समुद्राच्या पाण्यासारखं नितळ, ओघवत्या शैलीचं, गजाली गप्पांच्या लाटाच जणू. म्हणून पुस्तक एकदा वाचायला घेतलं की खाली ठेववत नाही. देवचार, कोपेल, पायलट, तळी, पालखी, फुलराणी लेखांच्या नुसत्या नावावर नजर फिरवली तरी काहीतरी वेगळेपणा असणार लेखात हे कळतं. गमतीची बाब म्हणजे सलमान, संजय दत्त, चंकी पांडे, दिव्या भारती विषयी त्याकाळी भाबड्या लोकांना असलेलं आकर्षण, गजालीत सिनेमा, राजकारण, दाऊद इब्राहिम हे आलेले विषय, तिथल्या लोकांची त्यावर गमतीदार टिपण्णी हे सारं वाचायला मस्त वाटतं. डोना पॉला ची प्रतिक्षा त्यांनी आपल्या शब्दात मांडली आहे. गोवन स्त्रियांमधला काळानुरूप झालेला बदल काही ठिकाणी त्या अधोरेखित करतात. पूर्वीचं गावपण कसं मागे पडत गेलं हे त्या सांगतात, तरी जे काही शिल्लक आहे ते निराशाजनक निश्चित नाही अन्यथा त्यांच्या जीवनाच्या अंतिम टप्प्यातील विश्वासाने विसवायचं ठिकाण म्हणून त्यांनी हे गाव निवडलं नसतं. इथल्या भाषेतली मौजेची गोलाई आणि माधुर्य माधवी ताई न टिपतात तर नवल. पुस्तक वाचून झालं तरी काय बरं ते गाणं होतं म्हणून पानं पुन्हा चाळली जातात आणि गुणगुणायचा प्रयत्न होतो. ... आलयली डोलयली पंटी पालयली सांग गे बाये, तुका कोणे चोरून वेल्यान गो बाये ... आंव तुजो सदाच मोग करतलो गे बाये आणि तुका हाव केन्नाच विसरचो ना गे बाये - प्रसाद साळुंखे ...Read more

THE GUNS OF NAVARONE
THE GUNS OF NAVARONE by ALISTAIR MACLEAN Rating Star
Mahesh S

दुसऱ्या महायुद्धात ‘खेरोस’ या छोट्या बेटावर १२०० ब्रिटिश सैनिक अडवून पडले होते. हे बेट तुर्कस्तानच्या जवळ होते. त्यांना सोडवायला जाणाऱ्या बोटींना नॅव्हारन बेटावरील महाकाय तोफांचा अडथळा होता. त्या तोफा त्यांच्या समोरच्या समुद्रातील कोणतेही जहाज सहज बुवू शकत होत्या. नॅव्हारनवर एक भक्कम किल्ला होता. तिथे जर्मन व इटालियन सैन्य होते. अशा या तोफा नष्ट करायला मूठभर माणसांची तुकडी बेटाच्या मागच्या कड्यावरून चढून वर पोचली. खेरोस बेटावरील सैनिकांना सोडविण्यास येणारे ब्रिटिश आरमार, तोफांचे त्यावर धरले जाणारे नेम आणि त्या नष्ट करण्यासाठी पुढे सरकलेली ती मूठभर घातपात्यांची तुकडी यांच्यात शर्यत लागली. शेवटी कोण जिंकले? ...Read more