* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: VARUL
  • Availability : Available
  • ISBN : 9789353173029
  • Edition : 3
  • Publishing Year : OCTOBER 2004
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 472
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Sub Category : SCIENCE FICTION, GENERAL FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
‘VARUL’ THE NOVEL BY BABARAO MUSALE DEPICTS THE LIFE OF OPPRESSED AND DOWNTRODDEN MASSES FROM RURAL AREAS. SPLIT IN TWO PARTS, THE NOVEL PORTRAYS THE DAY TO DAY LIFE OF THREE GENERATIONS (ESPECIALLY TWO GENERATIONS ). IT TALKS ABOUT THEIR SURVIVAL, CLASHES TRIGGERED BY THE MULTI-LAYERED CAST SYSTEM, TRADITIONS AND CUSTOMS, POVERTY, LACK OF EDUCATION AND THE LONG TERM EFFECTS THEREOF UPON THE SOCIAL STRATA. IT ALSO GIVES US A WELL NARRATED COMMENTARY UPON THE FAMINE IN 1970-71, THE WORK DR.BABASAHEB AMBEDKAR DID FOR THE BACKWARD CLASSES, THE UPRISING FOR THE MATANGAS, THE POTENTIAL DISASTERS FOR THE LOCALS BECAUSE OF A PROPOSED DAM, ELECTIONS, THE POLITICAL IMBROGLIO AMONGST THE HOMOGENEOUS AND THE BACKWARD CLASSES AS WELL AS THE INFIGHTING AMONG THEMSELVES, THE RUTHLESS POLITICAL MANIPULATIONS, AND THE RESULT OF ALL OF THIS INTO A ‘DOG EAT DOG’ SITUATION. THE OVERALL EFFECT OF ALL THESE TOUCH-POINTS, WHEN WOVEN INTO A SEAMLESSLY FLOWING NARRATION, ALLOWS THE READER A DETAILED, CLOSER LOOK AT THE LIFE OF THE BACKWARD CLASSES.
‘वारूळ’ ही बाबाराव मुसळे यांची कादंबरी ग्रामीण भागातील मागासवर्गीयांच्या समाजजीवनाचं यथार्थ दर्शन घडवते. दोन भागांत असलेल्या या कादंबरीमध्ये मागास जातींतील तीन पिढ्यांचे (विशेषत: दोन पिढ्यांचे) दैनंदिन जीवन, त्यांच्याच पोटजातीत असलेले कौटुंबिक हेवेदावे, मतभेद, पारंपरिक चालीरिती, त्यांची गरिबी, शिक्षणाचा अभाव यामुळे त्यांच्या एवूÂण सामाजिक जीवनावर होणारे दूरगामी परिणाम यांवर लेखकाने विशेष भर दिला आहे. तसेच यामध्ये १९७०-७१चा दुष्काळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मागासवर्गीयांसाठी केलेल्या कार्याची ओळख, मातंगांसाठीची चळवळ, संभाव्य धरणामुळे त्या परिसरावर अवलंबून असणाऱ्या लोकांवर ओढवू पाहाणारे संकट, निवडणुका, जाती-उपजातींतील (सवर्ण-मागास आणि कुणबी-महार, मांग वगैरे) गुंतागुंतीचे, शह-काटशहाचे स्थानिक राजकारण; त्यामुळे एकमेकांवर केली जाणारी कुरघोडी हे सारे टप्प्याटप्प्याने, ओघाओघाने गुंफले आहे. या सर्वांवर आधारित विविध घटना-प्रसंगांमुळे वाचकाला मागासवर्गीयांच्या समाजजीवनाचे यथार्थ दर्शन होते.
1.महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट ‘वाङ्मय निर्मिती’ पुरस्कार. 2.विदर्भ साहित्य संघ, नागपूर यांचा ‘पु.य. देशपांडे’ पुरस्कार. 3.जनसाहित्य परिषद, अमरावती यांचा ‘जनसारस्वत’ पुरस्कार. 4.मराठी अनुवाद परिषद, बुलढाणा यांचा ‘तुका म्हणे’ पुरस्कार. 5.पद्मगंधा प्रतिष्ठान, नागपूर यांचा पुरस्कार. 6.कै. यशवंत दाते स्मृती पुरस्कार,’ वर्धा यांचा ‘बाबा पद्मनजी’ पुरस्कार. 7.‘शब्दपंढरी पुरस्कार,’ लातूर.

No Records Found
No Records Found
Keywords
#VARUL #BABARAO MUSALE #MATANG COMMUNITY #DR.BABASAHEBAMBEDKAR
Customer Reviews
  • Rating StarSANJOSH SANAS

    खूप दिवसांनी वाचायला मिळालेले एक अप्रतिम पुस्तक!

  • Rating StarViddya Bayan - Thakur

    ...`हे` वाचून हादरून गेले.माझा जन्म खेड्यात झालेला असला तरी मला माहीत नसलेली एक विदारक दुनिया या कादंबरीत भेटली.सत्तरच्या दशकातलं कथानक असणाऱ्या या कादंबरीत गावकुसाबाहेरच्या वस्तीतल्या जीवनाचं बारकाव्यांसह तपशीलवार रेखाटन आलेलं आहे. मातंग समाजाच्ा सामाजिक स्थीत्यंतरांचा कथारूप इतिहास या कादंबरीतून वाचायला मिळतो.प्रत्येक तरूणाने वाचावी,समजून घ्यावी अशीच ही कादंबरी आहे. तरूणांनाही लाजवणारा उत्साह आदरणीय बाबाराव मुसळे सरांकडे आहे.सरांच्या उत्साहाला सलाम आणि वारूळच्या तिसऱ्या आवृत्तीला खूप खूप शुभेच्छा!💐 ...Read more

  • Rating Starलोकमत १७-११-१९

    भावविश्वाचं बंदिस्त वारूळ... खेडेगावात बालपण व्यतित केलेल्यांना मुंग्यांचं वारूळ अगदी जवळून परिचित असेल. या वारुळात जशी शांतता थंडावा, प्रसन्नता, समाधान असते तीच गोष्ट देवळातदेखील जाणवते. मग मुंग्यांसाठी त्यांचे वारूळ देऊळच नाही का... याच आशयाशी साधयार्म्य सांगणारी म्हणजे वारूळ होय. या कादंबरीचे कथानक ग्रामीण भागातील दलित, अल्प्संखांक यांसारख्या अनेक समूहांवर सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थितीवर भाष्य करते. मातंग समाजाच्या पूर्वापार चालत आलेल्या चालीरीती, जडणघडण असे सारे काही या कादंबरीत विस्तृत, तितकेच संयमी आणि वेळप्रसंगी टोकदार भूमिका मांडते. येसाजी नावाच्या व्यक्तिरेखेभोवती हे फिरणारे कथानक मनाचा ठाव घेते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

FRANKLIN MALIKA COMBO SET - 29 BOOKS
FRANKLIN MALIKA COMBO SET - 29 BOOKS by PAULETTE BOURGEOIS Rating Star
रश्मी मुसळे-साळगांवकर

लहानग्यांच्या विश्वातल्या छोट्या छोट्या गमतीजमती या पुस्तकांच्या मालिकेतून अगदी मजेशीर पद्धतीने मुलांसमोर येतात..त्या गोष्टी ऐकताना, वाचताना मूलं यात अगदी रमून जातात... शिवाय आजवर ससा आणि कासव यांव्यतिरिक्त इतर कथाविश्वात काहीसा दुर्लक्षित राहिलेलया कासवाच्या जगातही अनेक गंमती घडू शकतात ही नवखी कल्पना मुलांना भारीच आवडते... ...Read more

MARATHI DAULATICHE NARI SHILP
MARATHI DAULATICHE NARI SHILP by GOPAL DESHMUKH Rating Star
लोकसत्ता २२ जानेवारी २०२३.

बाईचे विश्व हे चूल आणि मूल एवढय़ापुरतेच मर्यादित नसते याची उदाहरणे आपल्याला इतिहासातसुद्धा पाहायला मिळतात. इतिहासात डोकावून पाहिले तर स्त्रियांचे आयुष्य हजार बंधनांनी जखडलेले होते. लहान वयातच मुलींची लग्नं केली जात असत. सतीची चाल, विधवांना केशपनाची सक्ती, सती जाणाऱ्या स्त्रियांच्या मरणाइतकेच सती न जाणाऱ्या विधवांचे जगणे भयंकर होते. अशा समाजातच काही स्त्रिया अशासुद्धा होऊन गेल्या ज्यांनी आपल्या कार्याने, आपल्या धाडसाने, शौर्याने महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाची भर टाकली. समाजाचा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे अशाच काही निवडक स्त्रियांचे चरित्र रेखाटन गोपाळ देशमुख यांनी ‘मराठी दौलतीचे नारी शिल्प’ या पुस्तकात केले आहे. जिजाऊमातेने बालशिवाजींची जडणघडण केली. अशा कर्तृत्ववान जिजाबाईंचे व्यक्तिचरित्र ‘राजमाता जिजाऊ’ या प्रकरणामध्ये सारांशरूपाने रेखाटण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. तसेच शिवरायांच्या जीवनात ज्या आठ राण्या आल्या त्यांच्या जीवनकार्याचे वर्णन ‘राणीवसा’ या प्रकरणात येते. ‘महाराणी येसूबाई’ या प्रकरणात त्यांची स्वराज्यनिष्ठा व दूरदृष्टी कशी दिसून येते याचे वर्णन केले आहे. संकटसमयी संभाजी राजांना दिलेल्या सल्ल्यामुळे त्यांच्या कार्यात मदत कशी झाली याचेही वर्णन आले आहे. ताराबाई, उमाबाई दाभाडे, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी युद्धभूमीवर शत्रूला तोंड कसे दिले. दर्याबाई निंबाळकर, पेशवा पत्नी गोपिकाबाई, रमाबाई, गंगाबाई यांनाही व्यक्तिगत सुखदु:खाबरोबरच मराठी दौलतीच्या वाटचालीत आपली भूमिका कशी पार पाडावी लागली याचीही माहिती पुस्तकात देण्यात आली आहे. दौलतीचा कारभार करताना अहिल्याबाईंना तीस वर्षे वैयक्तिक दु:खांना सामोरे जावे लागले. या साऱ्या दु:खांना बाजूला सारून उत्कृष्ट कार्य करून त्या ‘साध्वी पुण्यश्लोक अहिल्या’ कशा झाल्या याचा थोडक्यात आढावा घेतला आहे ‘अहिल्याबाई होळकर’ या प्रकरणात. तसेच पुतळाबाई आणि रमाबाई यांचे पतिनिष्ठेचे वर्णनही वाचायला मिळते. या सर्व व्यक्तिचरित्रांपैकी ‘राणी लक्ष्मीबाई’ यांचे चरित्र वाचताना त्यांची धाडसी वृत्ती, चिकाटी, येईल त्या प्रसंगाला न घाबरता शौर्याने सामोरे जाण्याची वृत्ती व शेवटी त्यांचा झालेला शोकात्मक शेवट आपल्या मनाला चटका लावून गेल्याशिवाय राहात नाही. वयाच्या चौदाव्या वर्षी गंगाधरराव यांच्याशी विवाह झाल्यानंतर आपल्या मुलाच्या आणि पतीच्या निधनानंतर शोक करत न बसता ही वीरांगना आपला दत्तक मुलगा दामोदर याला घेऊन ब्रिटिशांच्या कटू कारस्थानांना तोंड देण्यास सज्ज झाली होती. यातच तिला वीरमरण आले. हे वीरमरण येतानासुद्धा ती मोठय़ा शौर्याने अखेरच्या क्षणापर्यंत लढली आणि जेव्हा आपला देह आपल्याला साथ देत नाही हे लक्षात आले तेव्हा तिने आपल्या अनुयायांना आपला देह शत्रूच्या हातात पडता कामा नये, त्याला अग्नी द्या, असे सांगितले. अशा या वीरांगनेची गर्जना ‘मै मेरी झांसी नही दूंगी’ ही आजही अनेक स्त्रियांना आपल्या कामात प्रेरणा देणारी अशी आहे. राणी लक्ष्मीबाईच्या मरणाविषयी अनेक हकीकती उपलब्ध आहेत. त्यांचा उल्लेखही या पुस्तकात आला आहे. या पुस्तकातील स्त्रिया इतिहासकालीन असल्याने काही ठिकाणी ऐतिहासिक संदर्भाची पुनरावृत्ती झाल्यासारखे वाटते; पण ते येणेसुद्धा गरजेचे आहे. साध्या सोप्या भाषेत ही स्त्री चरित्रे आपल्याला वाचायला मिळतात. थोडक्यात असे म्हणता येईल की, इतिहासकाळातील थोर महिला विभूतींच्या जीवनकार्याचा अल्पांशाने सार वाचकांपुढे मांडण्याचा प्रयत्न लेखक गोपाळ देशमुख यांनी केला आहे, तो कौतुकास्पद आहे. ...Read more