- Roshanrao Kadam
वाचकाला खिळवून ठेवणार्या कुशल कथाकाराची एक साहसकथा.
धूसर बनून विस्मृतीत गेलेल्या कालखंडामधील अफाट खजिन्याचे स्थान निश्चित करण्यासारख्या खाणाखुणा सेव्हन्थ स्क्रोलमध्ये सोडल्या आहेत. ड्युराईड अल् सिमा आणि त्याची इंग्लिश-इजिप्शियन माता-पिता असलेली पत्नी रॉयन यांनीच पहिल्यांदा राणी लॉस्ट्रिसच्या कबरीचा शोध लावला. त्यावेळी योगायोगानेच अत्यंत हुशार आणि कावेबाज ताईताने फेरो मॅमोस आणि त्याचा अफाट खजिना कबरीमध्ये पुरून ठेवल्याचे वर्णन असलेल्या पपायरसच्या गुंडाळ्या त्यांच्या हातात पडतात. हा त्यांचा शोध नाईलपासुन इथिओपियाच्या दर्याखोऱ्यांत पोहोचतो. तो खजिना फक्त स्वतःसाठी मिळवण्याच्या लालसेने पछाडलेले ताकदवान लोक फेरोच्या गुप्त खजिन्यामागे लागल्यावर अत्यंत हिंसक असा पाठलाग सुरू होतो.
ड्युराईडचा खून पडल्यावर रॉयन इंग्लंडमध्ये आसरा घेते आणि निकोलस क्वेन्टन हार्पर या विख्यात पुराणवस्तू संशोधकाबरोबर इथिओपियाला जाते - ड्युराईडसाठी! ताईतासाठी! एका प्राचीन फेरोच्या स्वप्नांसाठी!! आणि स्वतःच्या उद्ध्वस्त आयुष्याचे धागे पुन्हा जुळविण्यासाठी!
- Ravindra Chavan
एक वेगवान आणि धावते कथानक..
काही वर्षापूर्वी द ममी पिक्चर आलेला तोच कॅनव्हास समोर ठेवून पुस्तक वाचायचे..
आधीच सांगतोय.. पहिली पन्नास पाने गेल्यावर अचानक कथानक संथ होतेय पण गळपटु नका पुढे खुप वेगवान कथानक साहसांनी भरलेले आहे..
शेवटची कलाटणी सिनेमासारखी असल्याने शेवटास आधी हात घालु नका..
थोडक्यात कथानक :चार हजार वर्षांपूर्वी अत्यंत हुशार आणि कावेबाज ताईताने, फेरो मॅमोस आणि त्याचा अफाट खजीना कबरीमध्ये पुरून ठेवल्याचे वर्णन असलेल्या पपायरसच्या गुंडाळ्या ड्युराईड अल सीमा आणि त्याची इंग्लिश - इजिप्शियन माता - पिता असलेली त्याची पत्नी रॉयन यांच्या हातात पडतात. हा त्यांचा शोध नाईलपासुन इथियोपियाच्या दर्या खोर्यात पोहोचतो. तो खजिना फक्त स्वतःसाठी मिळवण्याच्या लालसेने पछाडलेले ताकदवान लोक फेरोच्या गुप्त खजिन्याच्या मागे लागल्यावर अत्यंत हिंसक असा पाठलाग सुरू होतो.. अतिशय घनदाट जंगलात आणि वेगवान नदीतला पाठलाग, गोळीबार, थरार अंगावर रोमांच आणतात..
ड्युराईडचा निघृण खुन पडल्यावर रॉयन, पुराणवस्तू संशोधक निकोलस क्वेंटन हार्पर बरोबर इथियोपियाला जाते..
खजिना मिळतो का.. ड्युराईडचे स्वप्न पुर्ण होते का...? स्वतःच्या उद्ध्वस्त आयुष्याचे धागे पुन्हा जुळतात का.? असंख्य उत्कंठावर्धक प्रश्नांची उकल करण्यासाठी नक्की वाचा.!
आपलाच Ravindra chavan😅
- Mukesh pawar
फार सुंदर पुस्तक आहे जरूर वाचा वेगवान कथानक व अतिशय सुंदर अनुवाद.
- Nilesh Bhagwat
Mastach ...
- ABHIJEET KOLAPKAR
विल्बर स्मिथ यांचे नवीन आलेले पुस्तक खुपच छान आहे. भाषांतर लाजवाब.
- ?Kiran Borkar
द सेव्हन्थ स्क्रोल ...विल्बर स्मिथ ..अनुवाद ..बाळ भागवत
चार हजार वर्षांपूर्वीची इजिप्तशियन राणीच्या कबरीचा शोध लावताना योगायोगानेच त्या कबरीजवळ अत्यंत हुशार अशा ताईताने फेरो मेमोस आणि त्याचा अफाट खजिना कुठे दडवून ठेवला आहे त्याचा नकाशा ड्युराइड आणि त्याची पत्नी रायन यांच्या हाथी सापडतो . तेच आहे हे सेव्हन्थ स्क्रोल .त्यानंतर ड्युराइडचा खून होतो आणि त्याच्या पत्नीच्या मागे आता खुनी लागले .रायन, निकोलस ला मदतीला घेऊन त्या कबरीच्या शोधात निघते .त्यांचा हा शोध नाईल पासून एथिओपियाच्या जंगलात फिरतो . जीवावर उदार होऊन ते दोघेही ती कबर आणि खजिना शोधून काढतात . पण त्या खजिन्यामागे कित्येक लोक आहेत जे वेळप्रसंगी खून हि करू शकतात . एखादा चित्तथरारक चित्रपट पाहतोय अशी हि कादंबरी आपली क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवते . एकदा हाती घेतले कि खाली ठेवू नये असे पुस्तक