* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: TANTRADNYANACHI MULAKSHARE BHAG - 1
  • Availability : Available
  • ISBN : 9788177668230
  • Edition : 2
  • Publishing Year : APRIL 2007
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 176
  • Language : MARATHI
  • Category : SCIENCE
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
MAN HAS AN UNBREAKABLE RELATIONSHIP WITH NATURE BY BIRTH. MAN EVOLVED BY EXPERIENCING VARIOUS FORMS OF NATURE. HE STUDIED THIS EXPERIENCE TO THE BEST OF HIS BRILLIANT INTELLECT. MANY SMALL AND BIG EXPERIMENTS WERE DONE BY MISTAKE. THIS EXPERIMENT WAS THE STEP OF SCIENCE AND TECHNOLOGY. THE DETAILED AND EASY TO UNDERSTAND INFORMATION ABOUT HOW MAN TOOK STRONG STEPS FROM THIS STEP AND CREATED HUNDREDS OF THOUSANDS OF TOOLS FOR HIMSELF IS THE `PRIMITIVES OF TECHNOLOGY`.
माणसाचे निसर्गाशी जन्मत:च अतूट नाते आहे. निसर्गाच्या विविध रूपांचे अनुभव घेत माणूस उत्क्रांत होत गेला. आपल्या तल्लख बुद्धीचा उत्तम उपयोग करत त्याने या अनुभवाचा विशेष अभ्यास केला. चुकतमाकत अनेक छोटे-मोठे प्रयोग केले. हे प्रयोग म्हणजेच विज्ञान-तंत्रज्ञानाची पाऊलवाट होती. या पाऊलवाटेवरून माणसाने दमदार पावले टाकली आणि स्वत:साठी शेकडो-हजारो साधने कशी निर्माण केली, याबाबतची तपशीलवार व सुबोध शैलीत लिहिलेली माहिती म्हणजे `तंत्रज्ञानाची मुळाक्षरे`.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TANTRADNYANACHIMULAKSHAREBHAG-1 #TANTRADNYANACHIMULAKSHAREBHAG-1 #तंत्रज्ञानाचीमुळाक्षरे-भाग१ #SCIENCE #MARATHI #KAVITABHALERAO #कविताभालेराव "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK AIKYA 26-08-2007

    कविता भालेराव यांनी महत्त्वाच्या शोधांची माहिती देणारे एक सदर वृत्तमान चालवले. त्यात सुमारे पावणेदोनशे, शोधांचा समावेश झाला. सौरऊर्जा, उपग्रह, झेरॉक्स, अग्निबाण, यंत्रमानव, लेसर, विमान, मायक्रोवेव्ह ओव्हन वगैरे अत्याधुनिक शोधांनी आपल्या जीवनात जशी करांती केली तशीच प्राचीन मध्ययुगीन काळापासून माणसाने दैनंदिन जीवनातील सुखसुविधांच्या दृष्टीने शोधून काढलेल्या चाक, कागद, मासेमारी, तराजू, आगकाडी, साबन, बटन, समत, काच, विणकाम, घड्याळ, कुलूप, चष्मा, पूल, गलबत, होकायंत्र, सूक्ष्मदर्शक, सायकल, सिग्नल, रबर, बॉलपेन, स्टेथॉस्कोप, धान्य कापणी यंत्र, शिवणयंत्र या प्राथमिक शोधांनीही मानवी संस्कृतीला आकार दिला. विजेचा बल्ब, टाइपरायटर, प्लॅस्टिक, लिफ्ट, कॅमेरा, सिनेमा, टेपरेकॉर्ड, फ्रीज, वॉशिंग मशीन मानवी जीवन सुखावह, रंजक आणि आरोग्यपूर्ण बनवण्याच्या दिशेने मोठी झेप घेतली. या सर्व शोधांच्या हकिकती वाचणे म्हणजे आपल्या मानवी संस्कृतीच्या विकासाची रुपरेखा जाणून घेणे. या पुस्तकात शोधांची माहिती देताना कुठलाही विशिष्ट क्रम पाळलेला नाही किंवा विषयानुसार वर्गीकरणाचाही अवलंब केलेला नाही. सदर म्हणून ज्या क्रमाने पुस्तकात ते दिले आहेत. त्यामुळे कुठलेही पान उघडून वाचू लागले तरी चालते. पहिल्या पानापासून सलग तीनशे पाने कादंबरीप्रमाणे वाचण्याची येथे गरज नाही. कुठला शोध कुठल्या वर्षी लागला आणि तो कोणी लावला याचा कालक्रम शेवटी दिला आहे. माहिती आणि मनोरंजन या दोन्ही दृष्टींनी ‘तंत्रज्ञानाची मुळाक्षरे’ हे पुस्तक कुमार वाचकांना उपयुक्त ठरेल. या शोधांच्या तपशिलातून खूपच गमतीदार माहिती मिळते. अनेक शोध योगायोगाने लागले. करायला गेलो एक आणि झाले भलतेच असा प्रकारही दिसतो. कोणाच्या डोक्यात कुठली कल्पना येईल याचा नेम नसतो. पण ती कल्पना सुचल्यावर ती प्रत्यक्ष व्यवहारात आणण्यासाठी त्या व्यक्तीने कधीकधी आपले उभे आयुष्य वेचलेले दिसते; तर कधी, कधी त्या कल्पनेला वेगळेच फाटे फुटले असेही दिसते. माणसाला जाणवणाऱ्या समस्या, माणसाच्या गरजा या शोधांना जन्म देतात, अमुक अमुक सोय असायला हवी होती. अशी कल्पना मनात यावी आणि कोणीतरी ती पूर्ण करण्याचा वसा घ्यावा असा प्रकारही दिसतो. कुठल्याही मजकुराची, चित्राची प्रत जशीच्या तशी मिळावी असे न्यूयॉर्क इलेक्ट्रॉनिक कंपनीच्या पेटंट विभागात काम करणाऱ्या वेस्टर एफ कार्लसनला वाटले. कारण पेटंटसाठी अर्ज करताना कागदपत्रांच्या बऱ्याच प्रती द्याव्या लागत. त्या प्रती करण्याचे काम कंटाळवाणे वाटे. फोटो काढायचे तंत्र तर अवगत होते. पण ते वाटेल त्या मजकुराच्या स्वस्तात प्रती काढण्याच्या दृष्टीने व्यावहारिक नव्हते. तेव्हा भौतिकशास्त्राच्या पदवीधर असलेल्या कार्लसनने गंधकाचा लेप लावलेल्या विद्युतभारित काचेच्या प्लेटवर मजकूर लिहिलो कागद काही काळ ठेवून बाजूला केला. तेव्हा त्या प्लेटवर ती अक्षरे उमटलेली दिसली. आता ती अक्षरे काचेच्या प्लेटवरून कागदावर काशी उमटतात हा पुढचा टप्पा त्यासाठी त्याने प्रयोग केले. १९३८ साली तीन वर्षांच्या प्रयोगानंतर त्याला त्यात यश आले. पहिले झेरॉक्स मशीन तयार झाले. या यंत्राचे उत्पादन व्यापारी तत्त्वावर व्हावे म्हणून अनेक कारखानदारांना तो भेटला. १९४४ मध्ये जोसेफ विल्सनने त्याला मदतीचा हात दिला. सेलोनियन हे प्रकाशाला संवेदनशील असणारे मूलद्रव्य त्यांनी बॅटेले इन्स्टिट्यूटच्या प्रयोगशाळेत शोधून काढले. १९६० साली झेरॉक्स ९१४ हे ऑफिस कॉपियर तयार झाले. कार्लसने हे मशीन अवाढव्य आकाराचे आणि कॉपी करण्यासाठी बराच वेळ खाणारे होते. पण ते काही काळ एकमेवाद्वितीय म्हणून वापरात राहिले. झेरॉक्स कॉर्पोरशेनला खूप कमाई करून देणारे ठरले. पुढे १९७३ मध्ये कॅनन या जपानी कंपनीने रंगीत झेरॉक्स मशीन काढले. १९८६ मध्ये लेसर कलर कॉपियर तयार केले. पॅनॅसॉनिक कंपनीने पॉकेट फोटोकॉपियर तयार केला. झेरॉक्ससारख्या एका नव्याच तंत्रज्ञानाचा हा विस्मयकारक विकास काल्रसनच्या आरंभीच्या कल्पनेपासून दोन-तीन दशकांच्या अविरत संशोधनाद्वारे झाला. त्याला स्पर्धक कंपन्यांनीही सतत सुधारण करून आज लहान मुलही हे मशीन सहजपणे हाताळू शकेल इतके सोयीस्कर, सोपे बनवले आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांनी पृथ्वीवरील प्रत्येक वस्तू बनली आहे. माणसाने या सर्वांचा उपयोग करून घेतला आहे. सूर्य हा पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या ऊर्जेचे उगमस्थान. सूर्याची उपासना भारतात प्राचीन काळापासून सुरू आहे. सौरऊर्जेचा उपयोग अंतर्गोल ढालींच्या माध्यमातून करून आर्किंमिडीजने रोमनांना लढाईत हरवले. या अंतर्गोल ढालींवर सूर्याचे किरण केंद्रित होत. त्यामुळे रोमन सैनिकांना ग्रीकांच्या सैन्यावर मुकाबला करणे अवघड जाई. सूर्यशक्तीचा उपयोग करण्यासाठी माणूस वेगवेगळे प्रयोग करीत राहिला. १७१४ मध्ये आन्तान लव्हाशिए या फ्रेंच संशोधकाने सौरऊर्जेवर चालणारी भट्टी तयार करून तिच्यात धातू वितळता येतात हे दाखवून दिले. १८८० मध्ये सौरशक्तीवर चालणारे वाफेचे इंजिन तयार केले गेले. सूर्याच्या उष्णतेने पाणी तापविण्यासाठी सौरबंबाचा वापर मात्र विसाव्या शतकांत सुरू झाला. सौरऊर्जेचा वापर करून स्वयंपाक करणे, पाणी गरम करणे, वीज निर्माण करणे यासाठी आता सर्रास होऊ लागला आहे. सौरऊर्जेसाठी लागणारी पॅनल्स अजून महाग आहेत; ती स्वस्त व सुटसुटीत करता आली तर भारतासारख्या देशात वीजनिर्मितीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. हवेचे गुणधर्म ठाऊक असले तरी ते तपासून पाहण्यासाठी साधने उपकरणे उपलब्ध नव्हती. १६४०मध्ये हवेचा दाब मोजण्यासाठी पहिला दाबमापक गॅलिलिओचा शिष्य टॉरीसेली याने तयार केला. हवेला वजन असे आणि हवा जागा आपले हे त्यावरून सिद्ध झाले. पुढे रॉबर्ट बॉयले याने हवेचा दाब आणि घनता यांचा संबंध गणिती भाषेत मांडला. १७७० मध्ये हवेतील वेगवेगळ्या वायूचे घटक शोधण्याचे काम सुरू झाले. जोसेफ प्रीस्टले याने १७७४ मध्ये ऑक्सिजनचा शोध लावला. हा वायू ज्वलनक्रियेला मदत करतो हे त्याच्या लक्षात आले. लव्हॉयझर या शास्त्रज्ञाने ‘आम्ल तयार करणारे’ या अर्थाचा ऑक्सिजन हा शब्द त्यासाठी वापरला. तो रुढ झाला. १८००च्या आसपास हवेचे नायट्रोजन, कार्बन डायऑक्साइड, ऑक्सिजन, अरगॉन वगैरे घटक आणि त्यांचे प्रमाण याबद्दल बरीचशी निश्चिती झाली. १८१८ मध्ये वायूचे द्रवात रुपांतर करण्याची कल्पना मायकेल फॅरडेला सुचली. हायड्रोजन सल्फाइडला द्रवरुप देण्यात त्याला यश आले. ऑक्सिजनचे द्रवात रुपांतर करण्याचे तंत्र कायलिटेट या फ्रेंच लोहाराने त्यानंतर साठ वर्षांनी शोधून काढले. द्रवरुप ऑक्सिजन साठवण्यासाठी जेम्स देवार याने निवांत बाटली- थर्मासचा शोध लावला. श्वसनाचा त्रास असणाऱ्या रुग्णांसाठी रेस्पिरेटर किंवा व्हेंटिलेटरचा उपयोग करतात. नाकातून नळ्या घालून रुग्णाला ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. नाकावर मास्क बसवणेही शक्य होते. अशा कितीतरी शोधांची प्राथमिक माहिती आणि त्या, त्या शोधातील प्रगतीचे टप्पे या पुस्तकातील छोट्या छोट्या लेखांत नोंदवले आहेत. कुठलेही पान उघडावे आणि वाचावे. त्या विशिष्ट शोधाची माहिती मिळवावी यासाठी हे पुस्तक फारच उपयुक्त आहे. ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे आपले दैनंदिन जीवन अतिशय सुकर झाले आहे. लिफ्टपासून फोटो कॉपीपर्यंत आणि लिफ्टपासून रेफ्रिजरेटरपर्यंत किती तरी विज्ञानदूत आपले कष्ट हलके करत आहेत. ही साधने वापरताना ती कशी तयार झाली असतील, कोणत्या परिस्थितीत त्यांची निर्मिती ाली असेल, असे प्रश्न आपल्याला पडतात. ही जिज्ञासापूर्ती करण्यासाठीच कविता भालेराव यांनी ‘तंत्रज्ञानाची मुळाक्षरे’ हे पुस्तक आणले आहे. ‘युवा सकाळ’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखांचे हे पुस्तक वाचनीय आहे. भरपूर संशोधन आणि मेहनत दिसत असली, तरी ही माहिती अतिशय सोप्या शब्दांत आणि रंजकपणे मांडल्याने पुस्तक जड किंवा कंटाळवाणे वाटत नाही. कविता भालेराव यांनी निवडलेले विषय ही या पुस्तकाची खासियत, साबण, निर्लेप तवा, चष्मा, लिफ्ट, सिग्नल, स्टेथोस्कोप, झिप वेल्क्रो, कुलूप, पेन, शिलाई मशिन अशा एरवी वाचायला न मिळणाऱ्या विषयांची निवड त्यांनी केली आहे. ही साधने कशी तयार झाली, त्या वेळची परिस्थिती, सुरुवातीची साधने कशी होती, त्यात बदल कसे होत गेले इत्यादी गोष्टींचा वेध त्यांनी घेतला आहे. त्यापैकी अनेक साधनांची आता पुढची पिढी आली आहे किंवा येऊ घातली आहे. तो भविष्याचा धागाही या लेखांमध्ये जोडलेला असल्याने ही केवळ भूतकाळाची सफर ठरत नाही, तर वर्तमानाची माहिती आणि भविष्याची चुणूक यांचाही आनंद त्यात मिळतो. विषयांचे वैविध्य आणि कुतूहल वाढवणारी शीर्षके यामुळे पुस्तक वाचताना मजा येते. जवळजवळ नव्वद साधनांची ‘मुळाक्षरे’ पुस्तकात आहेत. इंटरनेटवर आणि इंग्रजीमध्ये विज्ञानावर खूप माहिती वाचायला मिळत असली, तरी मराठी पुस्तकांत मात्र विज्ञानविषयक लेखन मात्र तुलनेने खूपच कमी आहे. या पार्श्वभूमीवर विज्ञानप्रेमींच्या संग्रहात हे पुस्तक असायलाच हवे. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 18-12-2007

    तंत्रज्ञानाचा संदर्भकोश… आज आपण एकविसाव्या शतकात प्रवास करीत असताना विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक शोधांमुळे मानवी जीवन सुखकर झाले आहे. तसं पाहायला गेलं तर जगातील सर्वात महत्त्वाचा शोध कुठला, तसा विचार करायला गेलं तर त्याचं उत्तर ‘चाक’ असेच दयावे लागेल. कारण या चाकावरच आज सगळे जग फिरते आहे. कुतूहल व जिज्ञासेसून माणसाला अनेक प्रश्नांची उत्तरे सापडत गेली. त्यातून नवनवे शोध लागत गेले. आज आपण गगनचुंबी इमारतीत गेल्यानंतर चटकन लिफ्टमध्ये बसतो आणि काही सेकंदात कुठल्याही मजल्यावर जाऊ शकतो. ग्रह, तारे यांचे दर्शन अत्याधुनिक दुर्बिणींच्या मदतीने घेऊ शकतो. तंत्रज्ञानाने दिलेल्या अशा अनेक गोष्टींचा वावर आपण रोजच्या रोज करतो पण लिफ्ट, दुर्बिण, सायकल यासारख्या असंख्य गोष्टींचा शोध कुणी लावला, कसा लावला असे प्रश्न आपल्याला पडत नाहीत .शाळेतल्या मुलांनाही घडत नाहीत कारण क्रमिक पुस्तकांच्या ठोकळेबाज अभ्यासक्रमांच्या साच्यात हे बसत नाही. एखाद्या विद्यार्थ्याने कुतुहलाने असला काही वेगळा प्रश्न विचारला तर शिक्षकांनाही त्याची उत्तरे देता येतीलच याची खात्री देता येत नाही. पण विद्यार्थ्यांनी अवांतर वाचन केले तर त्यांना त्यांच्या ज्ञानात भर टाकता येईल. तंत्रज्ञानाची वाटचाल अतिशय रंजक भाषेत रेखाटणारे कविता भालेराव यांचे ‘तंत्रज्ञानाची मुळाक्षरे’ हे पुस्तक जणू काही अशा ज्ञानपिपासूंना मेजवानीच आहे. या पुस्तकात रोजच्या वापरात असणाऱ्या अनेक वस्तूंचा शोध कसा लागला, कुणी लावला यावर प्रकाश टाकला आहे. प्रेशर कुकरपासून, मायक्रोवेव्ह ओव्हनपर्यंत असंख्य साधनांचा शोध कसा लागला हे लेखिकेने अगदी ओघवत्या निवेदन शैलीत सांगितले आहे. त्यामुळे विज्ञान व तंत्रज्ञान विषय म्हणजे काहीतरी अवघडच असते हे समीकरण खोटे ठरविण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत. ओघवती भाषाशैली, चटपटीत शीर्षके त्याला चित्रांची जोड यामुळे पुस्तकाची रंजकताही वाढली आहे. पुस्तकाच्या शेवटी विषयसूचीही आहे. त्यामुळे चटकन संदर्भ शोधता येतात. त्याचबरोबर महत्त्वाचे शोध व शोधकर्ते यांची यादीही दिली आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांसाठीही संदर्भग्रंथ म्हणून त्याचा उपयोग होऊ शकतो. विद्यार्थी व शिक्षकांनी तर हे पुस्तक संग्रही ठेवण्यासारखे आहे. विशेषत: शाळांच्या वाचनालयांमध्येही हे पुस्तक असणे गरजेचे आहे. शिक्षकांनाही मार्गदर्शक ठरेल, असे हे पुस्तक आहे. विज्ञानविषयावरील या पुस्तकाने अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या मराठी भाषेत निश्चितच मोलाची भर टाकली आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more

BANGARWADI
BANGARWADI by VYANKATESH MADGULKAR Rating Star
Sameer Kazi

सुंदर अशी कादंबरी माणदेशी बनगरवाडी तशी कोरडी रखरखती पण, यातील पात्रात मायेचा करुणेचाओलावा मनात घर करुन जातो