* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788190734431
  • Edition : 6
  • Publishing Year : NOVEMBER 2008
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 232
  • Language : MARATHI
  • Category : SCIENCE
  • Available in Combos :NIRANJAN GHATE COMBO SET - 16 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE POWER OF PYRAMIDST, ATOM BOMBS, AEROPLANES IN THE TIMES OF THE MAHABHARAT, WHETHER OUR GODS WERE THE PERSONS COMING HERE FROM THE OTHER PLANETS? ARE TYPICAL QUESTIONS DEFINITELY ASKED DURING SCIENCE LECTURES. THE LECTURER TRIES TO REPLY THESE DEFINITE QUESTIONS ACCORDING TO HIS ABILITY AND CAPACITY; HE SAYS ALL THIS IS HUMBUG. HOWEVER, WHATEVER HE HAS READ IS USELESS, HE DARE NOT ADMIT. AFTER 1965, BOOKS MENTIONING THAT MOST OF THE SCIENCE THAT WE SEE AND EXPERIENCE TODAY WAS INVENTED AND DISCOVERED LONG BEFORE BY OUR ANCESTORS. THE BOOK BY GEORGE ADANSKI CONTAINS ALL THE TOPICS MENTIONED ABOVE. PEOPLE WHO BELIEVE IN THESE BOOKS, ARE NOT READY TO BELIEVE IN THOSE WHO ARE ACTUALLY DOING DEEP RESEARCH IN THIS FIELD. THEY ARE STUDYING THE THINGS THAT ARE FOUND IN THE EXCAVATION VERY CAREFULLY. SO, REALLY SPEAKING, WE SHOULD BELIEVE IN THESE SCHOLARS (EGYPTOLOGISTS, ARCHEOLOGISTS, POLYETOLOGISTS ETC;), AS THEY HAVE EVIDENCES AND PROOFS. HOW AND WHY? ALL THIS IS INCLUDED IN THE TWO BOOKS UNDER REVIEW VIZ. OUR ANCESTORS AND THEIR SCIENCE` AND `OUR ANCESTORS AND THEIR TECHNOLOGY` WRITTEN BY SHRI. NIRANJAN GHATE. SHRI. GHATE IS A WRITER NOT ONLY IN MARATHI BUT ALSO IN ENGLISH. A POST GRADUATE (M.SC. GEOLOGY) OF PUNE UNIVERSITY, HE HAS LOT OF PROFESSIONAL EXPERIENCE OF BEING AN EDITOR OF ABOUT 10 SCIENTIFIC WELL KNOWN MAGAZINES. HE HAS BEEN A MEMBER / ADVISOR TO MANY GOVT. EDUCATIONAL INSTITUTES AND AIR, PUNE CENTER. HE HAS BEEN AWARDED MANY AWARDS BY SCIENTIFIC AND GOVT. AGENCIES. OUT OF HIS 97 BOOKS, 28 BOOKS HAVE BEEN PUBLISHED BY MEHTA PUBLISHING HOUSE, PUNE. HIS TWO BOOKS MENTIONED ABOVE ARE GOOD EVIDENCE OF HIS SCHOLARLY KNOWLEDGE. IT SEEMS THAT HE HAS TAKEN STRENUOUS EFFORTS FOR EVERYTHING.
विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यक्तींबद्दल सामान्य माणसांच्या मनात नेहमीच कुतुहल असतं. शास्त्रज्ञांचा विक्षिप्तपणा, त्यांची एककल्ली वृत्ती संशोधकांची धडपड, पेटंट मिळाल्यानंतर एकाच पेटंटवर अमाप श्रीमंत बनलेल्या संशोधकांची कहाणी, ह्या गोष्टी सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असतं, हे पटवून देतात. त्यामुळं अशा व्यक्ती घडल्या कशा? हे जाणून घ्यायचीही आपल्या मनात इच्छा असते. ह्या पुस्तकामध्ये अशा मान्यवर शास्त्रज्ञ आणि संशोधकांच्या बाबतीतलं कुतुहल शमविण्याची क्षमता आहे. त्याच बरोबर ह्यामुळं तरुण वाचकांना आपणही; असं काहीतरी करायला काय हरकत आहे, असं वाटावं, ही अपेक्षाही लेखकाला वाटते. त्याच दृष्टीनं हे पुस्तक वाचावं, असं मात्र नाही. ह्या शास्त्रज्ञांची धडपड वाचून वाचकाची करमणूकही होईल. त्यामुळंही वाचकानं हे पुस्तक वाचायला हरकत नाही.
लोकमान्य सेवा संघ, पारले तर्फे गुरुवर्य कै.मा. सी. पेंढारकर पुरस्कार २००८-२००९
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#NIRANJAN GHATE #JYACHKARAVBHALA #PARYAVARANPRADUSHAN #MARATHIBOOKS #VEDHPARYAVARNACHA #DNYANDEEP #FARFARVARSHAPURVI #ROBOTFIXING #DNYANDEEP#NIRANJAN GHATE# #ज्ञानदीप#निरंजन घाटे##SWAPNACHOURYA#ज्याचंकरावंभलं #निरंजन घाटे #कथासंग्रह #एकाप्रकरणाचीसुरुवात #ज्याचंकरावंभलं #आणखीएकविकेट #जीनचेमाप #आमचाज्ञानेश्वर #एकामहादेवाचीकृपा #शेवटचाहप्ता #उद्योजक #अनूचाराजा #अनंतानावाचीवल्ली #बाळ्या #डायव्हर्शननिबाळासाहेब #व्यवहारी #मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #JYACHAKARAVABHALA #NIRANJANGHATE #EKAPRAKANACHISURUVAT #AANKHIEKWICKET #JEENCHEMAP #AAMCHADNYANESHWAR #EKAMAHADEVACHIKRIPA #SHEVATACHAHAPTA #UDYOJAK #ANUCHA RAJA #ANANTANAVACHIVALLI #BALYA #DIAVARTIONNIBALASAHEB #VYAVHARI #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
  • Rating StarMeghashri Dalvi

    आपल्या पूर्वजांचे विज्ञान हा एक वादग्रस्त विषय आहे. कधीकधी त्याचं अकारण उदात्तीकरण केलं जातं, तर कधीकधी ते सरसकट मोडीत काढलं जातं. पण निरंजन घाटे यांनी ‘आपल्या पूर्वजांचे विज्ञान’ या लेखसंग्रहात या विषयाकडे अत्यंत वस्तुनिष्ठ पद्धतीने पाहिलं आहे आणि ह या पुस्तकाचं सर्वात मोठं बलस्थान आहे. इथे आपले पूर्वज याचा अर्थ केवळ भारतीय पूर्वज असा न घेता, मानवजातीचे पूर्वज असा घ्यायचा आहे. लालसर तपकिरी रंगातलं सुरेख मुखपृष्ठ आणि मलपृष्ठदेखील वेगवेगळ्या प्राचीन संस्कृती अधोरेखित करतात. ब्लर्बमध्ये म्हटल्याप्रमाणे भूतकाळातल्या शृंखलांना एक-एक जोडून पूर्वजांच्या ज्ञानर्जानाचं फलित आणि कालौघात लुप्त झालेल्या सांस्कृतिक मूल्यांचा माहितीपूर्ण खजिना यात आहे. प्राचीन वैदयकशास्त्र, त्याकाळच्या शस्त्रक्रिया, विशेषत: मेंदूच्या शस्त्रक्रिया, भूल देण्याच्या पद्धती अशी सुरुवातींच्या लेखांमध्ये या खजिन्याची मस्त झलक मिळते आणि पुस्तक वाचून पूर्ण होईपर्यन्त ते खाली ठेवता येतच नाही. दुर्बीणीचा शोध, रेडिओचा शोध अशा गेल्या काही शतकांमधल्या संशोधनाचे भरपूर दस्तावेज उपलब्ध आहेत. पण खेळांचे प्रकार, चश्मा, छत्री, शिवणकाम, गोंदवणे, आरसे असे शोध एकट्यादुकट्याचे नसतात. ते समूहाने कसे लावले असतील, ही कल्पना कोणी मांडली असेल, त्याला इतरजणांनी कशी प्रतिक्रिया दिली असेल, चुकतमाकत त्यांनी ते शोध कसे परिपूर्ण करत नेले असतील, हे मला खूप मोहित करतं. त्यामुळे ‘आपल्या पूर्वजांचे विज्ञान’ हा लेखसंग्रह माझ्या दृष्टीने खरोखरीच खूप अमूल्य आहे. त्याकाळचं एखादं शास्त्र वा तंत्र टप्प्याटप्प्याने कसं विकसित होत गेलं याच्या खात्रीशीर लिखित नोंदी उपलब्ध नसतात. त्यामुळे आधार असतो तो उत्खननातून मिळालेले पुरावे, गुहामधली भित्तीचित्रं, पुराजीवशास्त्रातल्या तज्ञांची निरीक्षणं, अर्धेमुर्धे शिलालेख, किंवा नंतर लोकसाहित्यातले उल्लेख यांचा. या सगळ्याचा मेळ घालत तज्ञ मंडळी त्याकाळच्या समाजजीवनाचं एक एकसंध चित्र उभं करण्याचा प्रयत्न करतात. ते खूप तपशीलात या लेखांमध्ये येतं. हळूहळू त्याकाळच्या माणसाची जीवनशैली आपल्यासमोर उलगडत जाते. त्यांची रहाणी, त्यांच्या अडचणी, त्यावरचे त्यांनी काढलेले तोडगे – बघता बघता आपण त्या काळात जाऊन पोचतो. हा अनुभव फार अप्रतिम! तुर्कस्तान, पेरू, इजिप्त, सिंधू संस्कृती, चीन, ग्रीक आणि रोमन संस्कृती, फ्रान्स, स्पेन असा आरशांचा विलक्षण इतिहास आहे, भारतात ते कुठून आले ते नक्की सांगता येत नाही. आरशावरच्या नक्षीचं कोडं देखील मस्त. सौंदर्याची लक्षणं म्हणून अवयवांचे आकार बदलणे, दागिने, किंवा केसांचे टोप हे प्रकार फार गमतीशीर आहेत. पाश्चात्य देशांच्या तमोयुगातल्या वैयक्तिक स्वच्छतेच्या कल्पना तितक्याच भयंकर. भारतीयांमध्ये मात्र साबण वापरणे, दात आणि शरीर स्वच्छ ठेवणे महत्वाचे होते. सौंदर्यप्रसाधनांचा उपयोग जगभर रंगतदार होता आणि त्यात विविध धातू आणि रसायनांचा वापर होता. दागिन्यांचा प्रवासही असा थक्क करणारा. इ.स.पू. 20,000 एवढया पुरातनकाळचं हस्तिदंती कडं असो, की पुढे इ.स.पू. 3,000 मधली नकली रत्नं असोत, माणसाची दागिन्यांची आवड कालातीत खरी! डागाचे दागिने बनवण्याची कला इटलीत इ.स.पू. 1500 मध्ये पूर्णत्वाला गेली होती, ती ग्रीकोरोमन संस्कृतीत हळूहळू लयाला गेली, आणि मग अगदी अलीकडे 1933 मध्ये तिचं पुनरूज्जीवन झालं हा आलेख स्तिमित करून जातो. मुळात साप्ताहिकासाठी लिहिले असल्याने प्रत्येक लेख छोटा आहे. मात्र काही वेळा ते एकत्र वाचले पाहिजेत. प्राचीन काळात बागबगीचे आणि त्यांचं शास्त्र हे खूप गंभीरपणे घेतलं जायचं. या संग्रहातले त्याविषयीचे चारही लेख उत्कृष्ट आहेत. इजिप्तमधल्या फराहोंची वनस्पतींची आवड, असिरियन बागा, चंद्रगुप्त मौर्यांची राजेशाही बाग, एकंदरीत राजांचा बागांचा आणि बागकामांचा छंद छान मांडला आहे. आपल्याकडले ऋषींचे आश्रम आणि बृहत्संहितेतल्या शास्त्रशुद्ध निगराणीच्या सविस्तर सूचना यांचाही उल्लेख आहे. मेक्सिको किंवा बॅबिलॉनमधल्या तरंगत्या बागा, चिनी बगीचे, झेन बगीचे अशी वळणं घेत ही गाथा सुरेख उलगडत जाते. पुढे ग्रीक खेळांविषयीचे चार सलग लेखही असेच अप्रतिम आहेत. त्यामध्ये ग्रीक संस्कृतीचं वास्तव दर्शन घडतं. आपले पूर्वज आकाशात विहार करत, त्यांच्याकडे अण्वस्त्र बनविण्याचं ज्ञान होतं, अशा दंतकथांबद्दल लेखक निरंजन घाटे यांनी सुरूवातीला आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटलं आहे, “जोपर्यंत ठोस पुरावे मिळत नाहीत तोपर्यंत अशा गोष्टींवर विश्वास ठेवणं ही आत्मवंचना ठरेल.” मुळात अभ्यासक पिंड असल्याने त्यांनी या गोष्टींबाबत संशोधन करत, माहिती मिळवत, शास्त्रीय पडताळणी करत लेखनाची मांडणी केलेली आहे. त्यामुळे पुस्तकाला माहिती, मनोरंजन, आणि एक संदर्भग्रंथ असे अनेकविध पैलू लाभले आहेत. घाटे यांच्या लेखनात नेहमीच एक सहजपणा असतो. ह्या लेखनप्रपंचात त्यांना स्वत:ला भरपूर आनंद मिळाला असणार, कारण तो आनंद या लेखनात पुरेपूर उतरला आहे आणि तो आपल्यापर्यंत नेमका पोचतो. हा विषय नावीन्यपूर्ण आहेच, शिवाय घाटेंच्या भाषेत लालित्य आहे. विज्ञानासारखा विषय, तोही जुन्या काळच्या विज्ञानाविषयक, असा कोणताही आवेश न ठेवता सहजसुंदर भाषेत वाचताना आपण मंत्रमुग्ध होऊन जातो. या अनोख्या अनुभवासाठी ‘आपल्या पूर्वजांचं विज्ञान’ वाचायलाच हवं! ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 26-7-2009

    `आपल्या पूर्वजांचे विज्ञान` या पुस्तकाच्या प्रारंभी लेखकाने आद्य रुग्णालयांची माहिती दिली आहे. शिकार करणे, दुसऱ्या प्राण्यांची केलेली शिकार चोरणे, फळे-कंदमुळे वेचणे हे माणसाचे पोट भरण्याचे मार्ग! शत्रू असल्याने मारामाऱ्याही! त्यामुळे जखमा बऱ्या व्हावयात म्हणून झाडपाला वापरणे, जखमी बांधवांची सेवा करणे यातून वैद्यकाचा पाया घातला गेला, असे मानले जाते. मानववंशशास्त्रज्ञ आणि पुरातत्त्वशास्त्रज्ञांच्या मते याचा ठाम पुरावा उत्तर इराकमधील गुहांमध्ये सापडला. हिप्पोव्रॅâटीसचा दृष्टीकोन शास्त्रीय होता. रुग्णाचे निरीक्षण करुन तो नोंदी ठेवे. खाण्यावर नियंत्रण आणि मोकळ्या हवेत व्यायाम हा आरोग्याचा पाया आहे, चालण्यासारखा व्यायाम नाही असे तो म्हणे. त्याने त्या काळात उपलब्ध असे सर्व वैद्यकीय ज्ञान संकलित केले. त्याने वैद्यांसाठी जी शपथ तयार केली ती आजही आधुनिक डॉक्टरांच्या नैतिकतेचा आधार मानली जाते. प्राचीन भारतात वैद्यक प्रगत अवस्थेत होते. इसपूर्व दुसऱ्या शतकापासून भारतीय वैद्यकानं जगाचे डोळे दिपवले. या वैद्यांची वैद्यकिय हत्यारे प्रगत झाली. सुश्रुत संहितेत अशा शंभरापेक्षा जास्त हत्यारांचे वर्णन आहे. शस्त्रक्रियेच्या साधनांचा पहिला पुरावा इजिप्त मध्ये मिळाला. शस्त्रक्रियेसाठी वापरली जाणारी हत्यारे खूप प्रगत होती. पिरॅमिड बांधताना इजिप्तमध्ये शल्यविशारदांना जास्त मागणी होती. एवढ्या प्रचंड बांधकामात अपघात होणे, त्यामध्ये मजूर जखमी होणे स्वाभाविकच होते. शस्त्रक्रियेची अवजारे तांब्याची होती. खरेतर आधुनिक वैद्यकातली बरीच औषधे प्राचीन वैद्यकाला माहीत होती पण या औषधाचे कार्य कसे चालते, याची माहिती नव्हती. त्यामुळे औषधाचा गुण येण्यासाठी देवाला आव्हानही करावे लागे. साठविलेले शिळे तुप जखमा बऱ्या करण्यासाठी फार पूर्वीपासून वापरले जाई. भाकरीवरची बुरशी जखमेवर लावली की जखम लगेच भरुन येते; हे इजिप्त मधील वैद्यांना तीन हजार वर्षांपूर्वी कळले होते. लेखकाने ही माहिती सरळ शैलीत समोर ठेवली आहे. यात कुठेही रुक्षता नाही. इसपूर्व ११६ ते इस २७ या काळातला व्हारी नावाचा रोमन वैद्य म्हणतो, दलदलीत वावरताना फार काळजी घ्यावी लागते कारण या दलदलीत सूक्ष्म प्राणी निर्माण होतात. ते साध्या डोळ्यांनी दिसत नाहीत. हे हवेत तरंगतात. तोंड व नाकावाटे शरीरात शिरतात व त्यांच्यामुळे गंभीर आजार होतात. अथर्ववेदातही दुष्ट तसेच हितकारक जंतूंचा उल्लेख आहे. दुष्ट जंतूंना सूर्यप्रकाश दूर करो, असेही त्यात म्हटले आहे. एकूण पन्नास लेखात कृत्रिम दात, कृत्रिम अवयव यांची माहिती तसेच वैयक्तिक स्वच्छता, दाढी, शिवणकाम, गोंदविणे, दागिने, फॅशन हे सर्व खजिन्यासारखे वाचकांच्या समोर येते. वाचक त्यात गुंगून जातो. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 11-1-2009

    ‘आद्य रूग्णालये’ या प्रकरणात चीनमधील लो-यांग नावाच्या विद्यापीठाचे काही उल्लेख बांबूच्या चोयट्यांवर लिहिलेले सापडल्याचे उल्लेख येतात. हा काळ इसवीसन ४९३ मधील आहे. त्या काळी शासकीय वैद्यांना वैद्यकीय प्रशालांमधून खास प्रशिक्षण देण्यात येत असे. निवृत्त ैद्यकीय प्राध्यापकांच्या जागी नवे प्राध्यापक नेमताना कोणती काळजी घ्यावी, त्याबाबतचे आदेश या लेखांत आढळतात. ‘शस्त्रक्रिया’ या प्रकरणात इसवीसन १४ ते ३७ या काळात रोमनसम्राट टायबेरियस याच दरबारी वैद्य कॉर्नेलिअस सेल्सस याने मोतीबिंदूवरील शस्त्रक्रियेविषयीचे तपशीलवार वर्णन लिहिल्याचा उल्लेख आहे. भूल देण्याच्या पद्धती, इजिप्त मध्ये इसवीसनपूर्व ३९०० मध्ये केला जाणारा आरशांचा वापर, स्वाहिली भाषेचे संस्कृत भाषेशी असलेले साम्य आदी रंजक माहिती या पुस्तकात वाचायला मिळेल. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 26-4-2009

    `विज्ञानाचा ऐतिहासिक ठेवा` विज्ञानाशी संबंधित सर्वच क्षेत्रांमध्ये विज्ञानाची घोडदौड चालू आहे. सर्वसामान्य माणसांचा संबंध विज्ञानाशी येतो तो त्यांच्या नित्य वापरातील वस्तू/उपकरणांमुळे, पण या विज्ञानाच्या मुळाशी जाण्याचा, त्याचा इतिहास जाणून घेण्याा प्रयत्न फारसे कोणी करत नाही. हजारो वर्षांपूर्वी या विज्ञानाचा वापर नकळत का होईना आपलया जगभरातील पूर्वजांनी केला. विज्ञानाचा हा इतिहास विज्ञानविषयक लेखनात माहीर असणाऱ्या निरंजन घाटे यांनी ‘आपल्या पूर्वजांचे विज्ञान’ या पुस्तकात अतिशय रंजक पद्धतीने मांडला आहे. मानवी जीवनाशी निगडित असलेल्या विज्ञानाच्या अनेक क्षेत्रांचा परामर्श या पुस्तकात घेण्यात आला आहे. यामध्ये वैद्यकीय उपचार, सौंदर्यसाधना, शिवणकाम/फॅशन, उद्यानशास्त्र, प्राणिसंग्रहालये, खेळ यांसारख्या अनेक क्षेत्रांचा समावेश आहे. विज्ञानाचा हा जो इतिहास उलगडत गेला तो आर्किऑलॉजी (पुरातत्व) आणि पॉलिएंटॉलॉजीच्या (पुराजीवशास्त्र) अभ्यासकांनी केलेल्या उत्खननातून पुढे आलेलया पुराव्यांतून! सर्व जगभरात झालेल्या उत्खननातून हेच लक्षात येतं की एखाद्या कृतीमागचे वैज्ञानिक तत्त्व माहीत नसतानादेखील मानवाच्या पूर्वजांनी केलेली प्रगती आपल्याला थक्क करणारी आहे. पुस्तकातील सुरुवातीची प्रकरणे वैद्यक आणि मानवी आरोग्याशी संबंधित आहेत. त्यामध्ये रुग्णांचे औषधोपचार, रुग्णालये, शस्त्रक्रिया, शस्त्रक्रियेची उपकरणे, प्राचीन औषधे, औषधांचे बाजार, कुटुंबनियोजन व कुटुंबनियोजनाची साधने यांसारख्या विषयांचा समावेश आहे. हजारो वर्षांपूर्वीदेखील वैद्यकशास्त्र किती प्रगत होते याची जाणीव आपल्याला ही प्रकरणे वाचत असताना होत जाते. प्लॅस्टिक सर्जरीतील ‘पेडिकल फ्लॅप’ या नावाने ओळखला जाणाऱ्या तंत्राच्या सूचना भारतीय वैद्यकशास्त्राचा जनक सुश्रुत याने आपल्या ग्रंथात त्यातील बारकाव्यांसह सांगितलेल्या आढळतात. प्राचीन भारतीय वैद्यकात ‘ऱ्हिनोप्लॅस्टी’ या आधुनिक तंत्राचा वापरही आढळतो. अगदी उत्तर अश्मयुगीन काळातही कवटी उघडून मेंदूवर यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया पार पाडल्यानंतर एक व्यक्ती जगल्याचा पुरावाही आहे. आजच्या शल्यशास्त्रज्ञांना हेवा वाटेल इतकी उत्कृष्ट वैद्यकीय हत्यारे त्या काळी वापरली जात. प्राचीन काळात अद्ययावत रुग्णालये तर होतीच, त्याचबरोबर कृत्रिम दात, कृत्रिम अवयव, कुटुंबनियोजन यांसारख्या विषयातील तज्ज्ञदेखील इ.स.पूर्व काळात कार्यरत होते. सौंदर्यसाधनेत, प्रसाधन करण्यात, विविध प्रकारचे केसांचे टोप वापरण्यात प्राचीन काळातील स्त्रिया–पुरुष वाकबगार होते. मेसापोटेमियात चार हजार वर्षांपूर्वी साबण वापरला जात होता असे पुरावे आहेत. त्याच सुमारास धातूच्या आरशांच्या जोडीलाच काचेचे आरसे करण्याची कला खूपच विकसित झाली होती. नखे वाढविणे, रंगविणे, चेहरा गोरा दिसण्यासाठी शिशाची संयुगे वापरणे स्त्रियांमध्ये प्रचलित होते. वैयक्तिक स्वच्छता आणि सौंदर्य याविषयी रोमन साम्राज्यातील सर्वसामान्य नागरिकसुद्धा खूप काळजी घेत. दागिने करणे व ते वापरणे याबाबतीत प्राचीन काळातील लोक चांगलेच पुढारलेले होते. मौल्यवान दागिन्यांची नक्कल करून नकली दागिने, नकली रत्ने सर्रास वापरली जात. एवढेच नाही तर त्या काळातील जवाहिर्यांना वेगवेगळ्या हलक्या धातूंवर सोन्याचा मुलामा कसा द्यावा, याचंही तंत्र ठाऊक होतं. याच काळात वस्त्र विणण्याची कलाही विकसित झाली होती. त्या त्या हवामानात योग्य असे वस्त्रांचे प्रकार मानवाने निर्माण केले. सुमारे बावीस हजार वर्षांपूर्वी माणूस नेढं असलेल्या सुया वापरत असे. तागापासून, कापसापासून कापड विणले जात असे. इ.स.पू. ३००० च्या आसपास रेशीम उत्पादनासाठी रेशीमकिडे पाळले जात असलयाचे पुरावे उपलब्ध आहेत. वस्त्रांच्या बरोबरच फॅशनचीही सुरुवात झाली. बिकिनीची फॅशन दोन हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात होती यावर आपला आज विश्वास बसणार नाही. वनस्पतीशास्त्राचादेखील तेव्हा पद्धतशीर अभ्यास झाला होता. प्राचीन काळात उद्यानशास्त्र अतिशय प्रगत असल्याचे दाखले मिळतात. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी रोमचं वैभव तिथल्या विविध प्रकारच्या बगीच्यांमध्ये मोजलं जात होतं. या बागा अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने निर्माण केल्या जात. ‘झाडे लावा, देश वाचवा’ ही घोषणाही प्राचीन काळातलीच! प्राणिसंग्रहालयेही प्राचीन काळापासून अस्तित्वात होती. प्राणी पाळले जात होते, तशीच प्राण्यांसाठी राखीव अरण्येही होती. विविध प्रकारचे खेळ, त्यांच्या स्पर्धा यांचा उगमही इ.स. पूर्व काळातीलच! चष्मे, छत्र्या, तंबाखू याही आपल्याला मिळालेल्या पुरातनकालीन देणग्याच आहेत. तर असा हा उत्खननशास्त्र आणि पुरातनशास्त्राच्या साहाय्याने सिद्ध झालेल्या अतिशय रंजक आणि ज्ञानात भर घालणारा असा विज्ञानाचा इतिहास! इतिहास हा फक्त राजे, युद्ध, सनावळ्यांचा नसतो तर प्रत्येक विषयाच्या मागे पूर्वजांचे जे संशोधन व कर्तृत्व असते त्याचाही असतो. हा विज्ञानाचा इतिहास आपल्यापुढे या पुस्तकाद्वारे सहज उलगडत जातो. एरवी बऱ्याच जणंना कंटाळवाणा वाटणारा ‘इतिहास’ हा विषय अगदी वेगळ्या स्वरूपात आपल्यासमोर येतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यातील प्रत्येक लेखाला दिलेली उत्तम चित्रांची आणि सुस्पष्ट रेखाटनांची जोड. उदा. सुश्रुताने वर्णन केलेलया नाकाच्या प्लॅस्टिक सर्जरीची रेखाचित्रे, आरशात बघून ओठ रंगविणाऱ्या इजिप्शियन युवतीचे रेखाचित्र. या चित्रांतील रेखांकनामुळे लेखकाला जे सांगावयाचे आहे त्या माहितीचे आकलन वाचकाला अगदी सहजपणे होते. विविध विषयांच्या विभागवार मांडणीमुळे वाचनाची लयही चांगली सांभाळली गेली आहे. उत्कृष्ट छपाई, चंद्रमोहन कुलकर्णींचे विषयाला अनुरूप असे आकर्षक मुखपृष्ठ ही पुस्तकाची आणखी एक जमेची बाजू. दर्जेदार प्रकाशनासाठी प्रसिद्ध असलेल्या मेहता प्रकाशनाने साप्ताहिक मार्मिकमधील निरंजन घाटे यांची ही वाचकप्रिय लेखमाला पुस्तकरूपाने प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद! मार्मिकमधील निरंजन घाटे यांची ही लेखमाला न वाचलेल्या वाचकांना या पुस्तकामुळे वेगळ्याच वाचनानंदाचा लाभ होईल! ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
श्रीपाद ब्रह्मे

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं. एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे. सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
प्रभाकर गावंडे, अमरावती

मी विकत घेऊन वाचले आहे हे पुस्तकं, चांगले आहे, नवीन माहिती वाचायला मिळाली.