* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: DEV? CHHE! PARAGRAHAVARIL ANTARALVEER!
  • Availability : Available
  • ISBN : 9788177663013
  • Edition : 10
  • Publishing Year : 1984
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 184
  • Language : MARATHI
  • Category : SCIENCE
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
AT THE BEGINNING OF THE 20TH CENTURY, THE DREAM THAT HAD BEEN CHERISHED BY MAN FOR THOUSANDS OF YEARS CAME TRUE AND HE SOARED INTO THE SKY. THE PROGRESS FROM AVIATION TO SPACE TRAVEL TOOK ONLY SIXTY-FIVE YEARS. THE DESTRUCTIVE ATOMIC BOMB AND THE HYDROGEN BOMB WERE ALSO INVENTED IN THE INTERVENING PERIOD. EVEN TODAY`S YOUNG CHILDREN ARE FAMILIAR WITH THE BRIGHT COSTUMES OF ASTRONAUTS, THE FIREBALLS THAT SHOOT OUT SMOKE AND FLAMES, AND THE CONSEQUENCES OF THE USE OF DESTRUCTIVE WEAPONS IN SPACE.
विसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच मानवाचे हजारो वर्षे उराशी बाळगलेले स्वप्न साकार झाले आणि त्याने स्वच्छंदपणे आकाशात झेप घेतली. विमानोड्डाण ते अंतराळप्रवास या प्रगतीला साठ-पासष्ट वर्षेच पुरली. मधल्या काळात विनाशकारी अणूबॉम्ब आणि हायड्रोजन बॉम्ब यांचेही शोध लागले. आजच्या छोट्या मुलांनासुद्धा अंतराळवीरांचे चमकदार पोशाख, धूर आणि ज्वाळा सोडत उडणारे अग्निबाण आणि अंतराळयाने, प्रलयकारी अस्त्रांच्या वापराचे दुष्परिणाम या गोष्टी माहिती आहेत. पण ही सर्व प्रगती मानवाने जर प्रथमच केली असेल, तर जगातल्या सर्व प्राचीन धर्मग्रंथांमधले देव अशाच गोष्टी करत होते, असा उल्लेख कसा आला? खडकांत कोरलेली चित्रे, कालनिश्चिती करता येऊ न शकणा-या दंतकथा, लोककथा तशीच वर्णने कशी करतात? ज्ञात असलेल्या इतिहासकाळाला विसंगत असलेले प्रगत ज्ञान कसे आढळते? एरिक फॉन डेनिकेन यांनी जगाच्या कानाकोपNयांत प्रवास करून हे सर्व देव म्हणजेच पुन्हा-पुन्हा पृथ्वीला भेट देणारे अंतराळवीरच होते; असा क्रांतिकारक आणि वादग्रस्त सिद्धान्त मांडलेला आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #DEVCHHEPARAGRAHAVARILANTARALVEER #DEVCHHEPARAGRAHAVARILANTARALVEER #देवछेपरग्रहावरीलअंतराळवीर #SCIENCE #MARATHI #BALBHAGWAT #बाळभागवत "
Customer Reviews
  • Rating StarTUSHAR KUTE

    "देव" या संकल्पनेभोवती फिरणाऱ्या अनेक संकल्पना, विचारधारणा व धार्मिक समजुती जगात ज्ञात आहेत. शिवाय यावर आजवर अनेक तत्त्वज्ञांनी व लेखकांनी प्रकाशझोत टाकणारी पुस्तके लिहीलेली आहेत. अशाच एका वेगळ्या वाटेवरचे पुस्तक म्हणजे बाळ भागवत यांचे "देव? छे! परग्हावरील अंतराळवीर" हे पुस्तक होय! पुस्तकाच्या नावावरूनच त्यात कोणत्या प्रकारचे विवेचन असावे, याची कल्पना येते. परंतु, देव हे परग्रहावरचे अंतराळवीर असू शकतात का? हा प्रश्न मात्र उत्सुकता वाढवणारा आहे. देवाच्या संकल्पनेला विज्ञान व इतिहासाच्या माध्यमातून सादर करण्याचा उत्तम प्रयोग बाळ भागवत यांनी या पुस्तकातून केला आहे. प्राचीन काळापासून म्हणजे अगदी दहा ते बारा हजार वर्षांपासून देव हे पृथ्वीवर नांदत आहेत. परंतु, देव मानायचे कुणाला? काही मोठा प्रश्न पडतो. सर्वसामान्यपणे सांगायचं तर सामान्य माणसांपेक्षा अधिक शक्तिशाली व बलवान असणारा मनुष्य म्हणजे देव होय. असे आपण म्हणू शकतो. याच विचारावर सदर पुस्तकाची पूर्ण प्रगती आहे. प्राचीन काळापासून नांदत असलेल्या अमेरिका, आशिया व आफ्रिका खंडातील विविध संस्कृतींचा अभ्यास करून विविध निष्कर्ष लेखकांनी या पुस्तकात नमूद केले आहेत. आज आपल्या अस्तित्वाच्या व प्रगतीच्या केवळ पाउलखुणा सोडून गेलेल्या माया, सुमेरियन व ईजिप्शियन संस्कृतींना विज्ञान तंत्रज्ञानाचे ज्ञान हजारो वर्षांपासून होते. त्यांच्या पाऊलखुणांमधून लेखकाने काढलेले निष्कर्ष धक्कादायक आहेत. वैज्ञानिकदृष्ट्या ते पूर्णतः पटणारे वाटतात. त्यातूनच त्यांनी देवाचं अस्तित्व सिद्ध केलं आहे. आपल्यासारखे जीवनसृष्टी असणारे हजारो ग्रह आपल्या विश्वात असतील तर त्यांनी अजून आपल्याशी संपर्क साधला नसावा का? असेल तर तो कशा पद्धतीने? या प्रश्नांची शास्त्रशुद्ध उत्तरे बाळ भागवत देतात. दक्षिण अमेरिकेत एकेकाळी नांदत असलेले प्राचीन माया संस्कृती आजच्या विज्ञानाइतकी प्रगती होती का? जगाला विविध शास्त्रांचे ज्ञान देणारी सुमेरियन संस्कृती अचानक नाहीशी का झाली? या प्रश्नांची उत्तरे त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला आहे. जगाच्या विविध देशांतील दंतकथा व पुराणकथांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करून त्यातील निष्कर्ष शोधण्याचाही प्रयत्न केला आहे. आजही ईस्टर आयलंड असो वा ईजिप्तचे पिरॅमिड्स यापैकी कशाचीही १००% उत्तरे कुणालाही देता आलेली नाहीत. परग्रहवासीयांनी संपर्क साधण्याचे आजवर किती शास्त्रज्ञांनी व कसे प्रयत्न केले? याची साराभर माहिती या पुस्तकात मिळते. शास्त्रीय विचार कसा करावा? या प्रश्नाचे उत्तर हे फक्त निश्चितच देईल. एकंदरीतच देव हाही इतिहास विज्ञानाचा एक भाग आहे हे सिद्ध करण्याची क्षमता आजही मानवप्राण्यात आहे, हे त्या पुस्तकाचे एकूण सार होय. ...Read more

  • Rating Starshrikant jadhav

    Nice book. For reference of ancient aliens.i bought this book cause i have intrest in aliens. Full information is given with proofs.and most important the hypothesis of erik von daniken is given.thanks sir. Hope u write on this much in future als.

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    परग्रहाच्या अंतराळवीरांनी पृथ्वीवर येऊन येथील मानवाला संस्कृती दिली... ‘देव? छे! परग्रहावरील अंतराळवीर’ हे एक वैशिष्ट्यपूर्ण पुस्तक आहे. परग्रहावरील अंतराळवीर पृथ्वीवर अधूनमधून येत असे अनेक पुरावे त्यात आलेले आहेत. या अनंत विश्वात पृथ्वीवर राहणारी मनजात ही एकच एक बुद्धिमान जमात अस्तित्वात आहे का? इतर ग्रहांवर सजीव प्राणी नाहीत का? आपण ज्यांना देव म्हणतो, ते परग्रहावरून आलेले अंतराळवीर तर नसतील ना? परग्रहावरचे प्राणी पृथ्वीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत असतात का? असे काही प्रश्न आपल्या मनात येतात; आणि त्यांची उत्तरे शोधताना अनेक युक्तिवादांचा आश्रय घ्यावा लागतो. माणसाचा इतिहास फार तर सात आठ हजार वर्षांचा आपल्याला ठाऊक आहे; परंतु काही ताऱ्यांचा प्रकाश पृथ्वीवर येण्याला हजारो–लाखो प्रकाशवर्षे लागतात. आपल्या आकाशगंगेच्या मध्यापासून तीस हजार प्रकाशवर्षे लांब कडेला पृथ्वी हा ग्रह तसा या आकाशातील एक नगण्य छोटा ग्रह आहे. (१ प्रकाशवर्ष = १८६००० x ६० x ६० x २४ x ३६५ मैल). पृथ्वीचा पृष्ठभाग ४ अब्ज वर्षांपूर्वी निर्माण झाला असा अंदाज आहे. खगोलशास्त्रज्ञ हार्ले शेपली याच्या मते र्दुर्बिणीच्या टप्प्यात १०२० (दहा वर वीस शून्ये) इतके तारे येतात; त्यापैकी हजारात एका ताऱ्यावर जीवसृष्टी आहे असे गृहीत धरले तरी १० कोटी ताऱ्यांवर जीवसृष्टी आहे असे अनुमान निघते. अमेरिकेतील एक शास्त्रज्ञ डॉ. जॉन बिलिंगहॅम म्हणतात, ``पृथ्वीपेक्षा अब्जावधी वर्षे आधी निर्माण झालेले लक्षावधी ग्रह आहेत; त्यापैकी काही ग्रहांवर बुद्धिमान जीव निर्माण झालेले असतील; त्यांची संस्कृतीही त्या प्रमाणात प्रगत असेल. अशी शक्यता वाटते.`` पृथ्वीवर ज्या प्रकारचे वातावरण आहे त्यात प्राणवायू आणि पाणी यावर जीवन अवलंबून आहे, असे दिसते. म्हणून इतर ग्रहांवरही जीवसृष्टीसाठी प्राणवायू व पाणी असायला हवे असे आपण गृहीत धरायचे का? शक्यता अशी आहे की वेगळ्या वातावरणातही जीवसृष्टी अस्तित्वात येऊ शकेल. किंवा आलेली असेल. त्या ग्रहावरच्या सजीव प्राण्यांना पाणी व प्राणवायू याऐवजी अन्य काही घटक जगण्यासाठी लागत असतील. आपण सर्वसाधारणपणे काही गोष्ट नैर्सिगक असल्याचे गृहीत धरून चालतो. पाणी हे क्षेत्र जलचर प्राण्यांसाठी. आकाश पक्ष्यांसाठी. जमीन माणसांसाठी. अशी काहीतरी योजना देवाने केलेली असावी. परंतु ही योजना माणसाने आपल्या बुद्धीच्या आणि संशोधनाच्या बळावर धुडकावून लावली आहे. अणुशक्तीवर चालणाऱ्या पाणबुड्यातून महिनेनमहिने माणूस समुद्राखाली राहू शकतो; विमानातून अवकाशात पक्ष्याप्रमाणे संचार करू शकतो. अंतरिक्षयानातून परग्रहापर्यंत तो उड्डाण करू शकतो. एरिक फॉन डॅनिकेन याने देवविषयक निरनिराळ्या देशातील संकल्पनांचा, दंतकथांचा, दैवतकथांचा मागोवा घेऊन देव म्हणजे पुन:पुन्हा पृथ्वीला भेट देणारे अंतराळवीर होत असे मत मांडले. त्यासाठी त्याने अनेक पुरावे दिले. दक्षिण अमेरिकेतील बोलिव्हिया देशातील टिआहुआन्को या अतिप्राचीन शहरात १० फूट उंच, साडेसोळा फूट रुंद असे सूर्यद्वार असून ते दहा टन वजनाच्या अखंड दगडातून कोरून काढलेले आहे. त्यावर उडणारा देव आणि त्याच्याभोवती ४८ मूर्ती आहेत. या शहराबद्दल अशी आख्यायिका सांगण्यात येते की, सोन्याच्या अंतराळयानात बसून एरिआना ही जगन्माता होण्यासाठी येथे आली, तिने ७० मुलांना जन्म दिला. तिला पातळ पडद्याने जोडलेली चार चार बोटे होती. या सूर्यद्वाराच्या दगडातील मूर्तीनाही चार चार बोटे आहेत. याच शहारामध्ये २४ फूट उंच, आणि २० टन वजनाची एक भव्य मूर्ती सापडली आहे. ती २७००० वर्षांपूर्वीची असून तिच्यात त्यावेळी पृथ्वीवरील वर्ष २८८ दिवसांचे असून एक उपग्रह वर्षातून ४२५ वेळा पृथ्वीला प्रदक्षिणा घालत आहे. अशी माहिती कोरलेली आहे. तो उपग्रह पुढे फुटला. पृथ्वीभोवती फिरणाऱ्या त्या उपग्रहाचा एक तुकडा म्हणजे चंद्र असे मत १९२७ मध्ये होराबिजर या शास्त्रज्ञाने मांडले. त्याचे गणित या मूर्तीवरील उल्लेखांशी मिळतेजुळते ठरते. या टिआहुआन्को शहरात आणखीही खूप आश्चर्यकारक गोष्टी बघायला मिळतात. १०० टन वजनाच्या दगडावर साठ साठ टन वजनाचे दगड रचून येथे भिंती बांधण्यात आल्या आहेत. हे शहर १३०० फूट उंचीवर आहे हे लक्षात घेतले तर या अवजड दगडांच्या हालचालीचे आश्चर्य वाटते. तेथे काही दगडांवर वेगवेगळे चेहरे दिसतात. हे चेहरे कुठल्या तरी परग्रहावरील अंतराळवीरांच्या स्मृतीदाखल कोरलेले आहेत की काय? असा प्रश्न काही संशोधकांना सतावतो आहे. यासारख्या खूप गोष्टी जागोजागी दिसतात. सुमेरियन संस्कृती इराक–इराण–सीरिया वगैरे भागात पाच हजार वर्षांपूर्वी होती. तिच्या पहिल्या दहा राजांनी ४ लाख ५६ हजार वर्षे राज्य केले असा उल्लेख त्यांच्या नाण्यावर सापडतो. गिलगामेशचे महाकाव्य, पंधरा अंकी संख्या, पंख असलेल्या देवांची चित्रे– यावरून काही जण काय निष्कर्ष काढतात? ``परग्रहावरील अंतराळवीरांनी सुमेरियन लोकांना प्रथम समाजव्यवस्था आणि संस्कृती यांची दीक्षा दिला. नंतर ते निघून गेले; पण आपल्या प्रयोगाचे फलित बघण्यासाठी दर ४०।४५ वर्षांनी ते येत राहिले. पृथ्वीवरील काळ आणि अंतरिक्षयानातील काळ यांचा मेळ घालून, अंतरिक्षवीरांचा ४० वर्षांचा काळ म्हणजे पृथ्वीवरचा ३६ हजार वर्षांचा काळ असे दिसते. त्या हिशेबाने त्यांच्या ५० वर्षात पृथ्वीवरची ४ लाख २० हजार वर्षे होतात. दहा राजे – ४ लाख ६० हजार वर्षे हा हिशेब मग चूक ठरत नाही. सुमेरियनांच्या प्रत्येक देवाचा कुठल्या तरी ताऱ्याशी संबंध आहे एवढेच नव्हे तर अणूची प्रतिकृतीही एका चित्रात दिसते. सुमेरला परग्रहावरच्या अंतराळवीरांनी भेट दिली असावी असा सिद्धान्त अशा वेगवेगळ्या प्रमाणांनी पेश करण्यात येतो. त्या त्या ठिकाणी आढळणारे प्रगत तंत्रज्ञान हे आपल्या पूर्वजांना स्वबळावर विकसित करता आले असे मानणे अवघड ठरते. साहजिकच अंतराळवीरांच्या या प्रगत तंत्रज्ञानापुढे ते नतमस्तक होत राहिले असे मानणे भाग पडते. देवत्व त्यांना त्यामुळे बहाल केले गेले. देव म्हणजे अंतराळवीर हे समीकरण बायबलमधील अनेक कथांना लागू पडते. ओल्ड टेस्टॅमेंटमध्ये देव किंवा देवदूत प्रचंड आवाज करीत व धुराचे लोट सोडत आगमन करीत असे वर्णन आहे. ही देवांची अंतराळयाने उत्तरेकडून येतात. ठराविक दिशेने येतात. इझिकलेला देववाणी ऐकू येते, ``मानवपुत्रा उठ. मी तुझ्याशी बोलतो आहे.`` मोझेसला देव `ऑर्क ऑफ दि कव्हेनन्ट` बांधण्याचा आदेश देतो. त्याची प्रतिकृती दाखवतो. तिच्यात अन्न बनवणारी एक पेटी असते; आणि ती पेटी सकाळचे दविंबदू आणि एक प्रकारची बुरशी (क्लोरेला) यापासून रोज सर्वांना पुरेल एवढे अन्न बनवते असे वर्णन बायबलमध्ये आहे. ही पेटी म्हणजे छोटी अणुभट्टी असावी असा संशोधकांचा तर्क आहे. सुमेरियन महाकाव्यात गिलगामेशची कथा आली आहे. गिलगामेश म्हणजे दोन तृतीयांश देव व एक तृतीयांश मानव यांचा संगम. सर्वांगावर केस असणारा, कातड्यांची वस्त्रे घालणारा, गवत खाणारा. गुराढोरात राहणारा, एन्किडू याजबरोबर गिलगामेश देवाच्या शोधासाठी निघतात. माया इंडियन लोकांच्या संस्कृतीचीही माहिती थक्क करणारी आहे. त्यांना ग्रहताऱ्यांच्या गतीचे नेमके काळ ठाऊक होते. इजिप्शियन लोकांच्या पिरॅमिडच्या व स्पिंक्सच्या प्रचंड वास्तूतील ग्रंथ व चित्रे इजिप्तचे राजे देवांबरोबर अंतराळात विहार करताना दाखवतात. हेरोडेटेस हा ग्रीक इतिहासकार. त्याने इजिप्तचा दौरा केला तेव्हा त्याला ११३४० वर्षातील ३४१ प्रमुख धर्मगुरूंचे पुतळे दाखवण्यात आले. ३४१ पिढ्यांपूर्वी त्यांचे देव त्यांच्यात राहात होते असेही त्याला सांगण्यात आले. तेथील ममीजचा आणि भूतकाळात पृथ्वीवर आलेल्या अंतराळवीरांचा काही संबंध असेल का असाही प्रश्न काही संशोधकांना विचार प्रवण करीत आहे. प्रक्रिया करून मृतदेह जतन करायचे आणि नंतर त्यांच्यात पुन्हा प्राण भरायचे तंत्र त्यावेळच्या देवांना–अंतराळवीरांना अवगत होते का? जपानमध्ये आयलंड चाइल्डची एक दंतकथा प्रचलित आहे. तो मासेमारीसाठी समुद्रावर गेला. त्याला एक तरुणी भेटली. तू कोण आहेस? तिने म्हटले, मी आकाशातून आले आहे... तू माझ्याबरोबर चल. आपण अनंत काळापर्यंत सुखाने राहू. तो डोळे मिटतो. ती त्याला आपल्या सुंदर बेटावर नेते. तिचे आईवडील त्याला स्वर्ग–पृथ्वी यातला फरक समजावून देतात. त्यांचे लग्न लावून देतात. तीन वर्षांनी त्याला घरची आठवण येते. ती त्याला म्हणते, ``तू क्षणभर डोळे बंद कर. मी तुला घरी पोचवते.`` तो डोळे उघडतो तेव्हा आपल्या गावात असतो. पण त्याला ते गाव अनोळखी वाटते. तो चौकशी करतो तेव्हा कळते की आयलंड चाइल्डची गोष्ट त्या भागात प्रचलित आहे. तीनशे वर्षांपूर्वी तो समुद्रावर गेला पण परत आलाच नाही. तो तरुण अंतराळातून दुसऱ्या ग्रहावर गेला आणि परतला. असा या गोष्टीचा अर्थ लावायचा का? तिबेटी धर्मग्रंथात २७ राजांची नावे आहेत. त्यातील सात राजे शिडीने आकाशात गेले; ते अदृश्य झाले. त्यांना प्रकाशाचे देव मानतात. पृथ्वीवरचे काम आटोपून ते जेथून आले तिथे परत गेले. पद्मसंभव हा धर्मगुरूही अंतराळातून आला. त्याला अपरिचित भाषा अवगत होती. एक दिवस तो सर्वांच्या देखत अंतराळात उडून नाहीसा झाला. देव शब्दाचा अर्थ ढगात फिरणारे असा आहे. (१२१) बायबलमधला देव सर्वज्ञ नव्हता. त्याला इझराच्या अनेक प्रश्नांची उत्तरे ठाऊक नव्हती. तो चुकाही करीत होता. (१२४) `चॅरियट्स् ऑफ दि गॉडस्` वगैरे पुस्तकात एरिक फॉन डॅनिकेन याने देव म्हणजे अंतराळवीर हे पटवून देण्यासाठी माया, इंका व इतर संस्कृतींची अनेक उदाहरणे दिली आहेत. उडत्या तबकड्या हा प्रकारही पाश्चात्य देशात गेली अनेक वर्षे खळबळ उडवून देत आहे. या तबकड्या परग्रहावरच्या असून, त्या पृथ्वीची टेहळणी करण्यासाठी येतात – असा एक समज. १९६६ मध्ये अमेरिकेत खगोलशास्त्रज्ञ कार्ल सेगन आणि रशियन शास्त्रज्ञ श्लोवस्की यांनी इंटेलिजन्ट लाइफ इन दि युनिव्हर्स या पुस्तकात चंद्राचा उपग्रह फीबस हा कृत्रिम उपग्रह असून तो पोकळ आहे असे मत व्यक्त केले. नैर्सिगक चंद्र पोकळ असूच शकत नाही. तेव्हा फीबस हा उपग्रह कोणीतरी अंतराळात उडवला असला पाहिजे. आणि उपग्रह सोडण्याएवढी बुद्धिमता व संस्कृती मंगळावर एकेकाळी असली पाहिजे. फीबसचा व्यास फक्त १० मैल आहे; आणि मंगळाला स्वत:भोवती फिरायला जो वेळ लागतो, त्यापेक्षा फीबसला कमी वेळ लागतो. सूर्यमालेत मंगळाचेच फीबस व डिमोस हे दोन उपग्रह या प्रकारचे आहेत. (फेरीसाठी कमी वेळ लागणारे). – अशी ही वेगवेगळ्या प्रकारची निरीक्षणे आणि त्यावरून काढण्यात आलेले निष्कर्ष. कोणी कोणी हा सगळा केवळ भंपकपणा आहे, कल्पनाविलास आहे, वडाची साल वांग्याला लावण्याचा प्रकार आहे असेही मानतात. परंतु वाचकाला अद्भुत, चमत्कृतिपूर्ण असे कोणी काही सांगितले तर ते ऐकायला मजा वाटते हेही खरेच ! बाळ भागवत यांनी एरिक फॉन डॅनिकेनच्या पुस्तकावरून व इतर संदर्भावरून परग्रहावरील अंतराळवीर म्हणजे देव ही कल्पना वाचकांना पटवून देण्याचा यथाशक्ती प्रयत्न केला आहे. मराठी वाचकांना हा कल्पनाविलास आवडलेला दिसतो. म्हणूनच त्याची दुसरी आवृत्ती निघण्याचा योग आला आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

NADIMUKH
NADIMUKH by PERUMAL MURUGAN Rating Star
गार्गी म्हात्रे

पेरुमाल मुरुगन ह्या तामिळ लेखकाच " नदीमुख" हे अनुवादित पुस्तक वाचले. मराठी मध्ये दाक्षिणात्य भाषां मधल्या तामिळ भाषेच्या उत्तम साहित्याची वाचन संधी या पुस्तकाच्या निमित्ताने मिळाली. साठच्या दशकात जन्मलेल्या पिढीला वेगाने ,खर तर अती वेगाने बदलत जाणाऱ्ा तंत्रज्ञान व तरुण पिढीची मानसिकता यांचे सुंदर चित्रण या कादंबरी मध्ये करण्यात आले आहे. माणूस किंवा असुर पालक असला की मुलांच्या भविष्याची चिंता त्यामधून उद्भवणारा संघर्ष साध्या सोप्या पण प्रवाही भाषेमधून आपल्या समोर उभा राहातो. कुमारासुराच्या एकसुरु झापडे लावून घेतलेल्या आयुष्यात `नदीमुख` दर्शना नंतर झालेली तगमग व बदल यांचे खूप सुंदर वर्णन शेवटी आलेल आहे. डॉ. मानसी जयंत केळकर यांनी अतिशय प्रवाही भाषेत व उत्कृष्ट समर्पक शब्दात पुस्तक अनुवादित केल्यामुळे कांदबरीची मजा घेता येते. मराठी व्यतिरिक्त अन्य भाषेतील साहित्य वाचनाला उपलब्ध करुन दिल्या बद्दल मेहता पब्लिशिंग हाऊस व डॉ मानसी केळकर यांचे आभार ! ...Read more

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
साधना साप्ताहिक ३ ऑगस्ट २०२४ ... अशोक राणे

सुनंदा अमरापूरकर यांनी त्यांचं `खुलभर दुधाची कहाणी` हे आत्मकथन पाठवलं तेव्हा `आता हे वाचायचं केव्हा` असा प्रश्न सर्वप्रथम मनाशी आला. देणेकरी दाराशी ठाण मांडून बसावेत तशी अनेक पुस्तकं, कोणी कोणी पाठवलेल्या त्यांच्या फिल्म्स आणि माझे सतराशे साठ व्याप सोर असताना कसा वेळ काढायचा? माझं सबंध आयुष्य सिनेमा, तो आकाराला आणणारे दिग्दर्शक, कलावंत, तंत्रज्ञ, त्यांच्या निर्मितीमागच्या प्रेरणा आणि त्यांच्यातला माणूस याचा शोध घेण्यात गेलं. एका गोष्टीचं कुतूहल होतं आणि ते म्हणजे या सर्वांच्या पलीकडे असलेलं, परंतु क्वचितच कळलेलं असं त्यांच्या कुटुंबातल्याच व्यक्तीने वर्णिलेलं अमरापूरकरांचं चरित्र ! सगळी व्यवधानं बाजूला ठेवून सुनंदा अमरापूरकरांचं आत्मकथन वाचायला हे कुतूहल पुरलं. मनोगतातलं पहिलंच वाक्य आहे... `मी या आठवणी का लिहिल्या ?` ...आणि मला चट्‌कन थोर अभिजात अभिनेत्री इंग्रीड बर्गमन हिचं `माय स्टोरी` आठवलं. तिनेही अशीच सुरुवात केलीय. तिची मुलं म्हणाली, `तुझ्या आयुष्याविषयी कुणी तरी तिखटमीठ लावून काहीबाही लिहील, त्याआधी तूच सारं खरं मोकळेपणानं सांगून टाक. तिने जाडजूड ग्रंथात अभिनेत्री म्हणून तिचा सारा प्रवास कसलाही आडपडदा न ठेवता सविस्तर सांगितला. सुनंदाताईंचं पुस्तक आणि त्यातलं हे पहिलं वाक्य वाचताना मला हे का आठवावं? त्यांची पहिली ओळख म्हणजे नाट्य-चित्रसृष्टीतला एक मोठा अभिनेता, दिग्दर्शक सदाशिव अमरापूरकर यांच्या पत्नी आणि अलीकडचा परिचय म्हणजे एक उत्तम अनुवादकर्त्या. तर आता त्या आपल्या प्रसिद्ध नवऱ्याविषयी काय आणि कसं सांगतात, त्याचबरोबर त्यांचं वैवाहिक सहजीवन, एकूणच त्यांचं कौटुंबिक जीवन कसं उलगडून दाखवतात याचं कुतूहल होतं. मुख्य म्हणजे त्यांची मध्यमवर्गीय पार्श्वभूमी आणि सदाशिव अमरापूरकरांना मुंबईत स्थैर्य लाभेपर्यंत नगरसारख्या छोटया शहरातला त्यांचा वावर यातून पुढला सारा अचंबित करणारा प्रवास त्या का मांडतात याचीही उत्सुकता मनात होतीच, अमरापूरकर कुटुंबाचा प्रवास हा केवळ नगर ते मुंबई नव्हता. एखाद्या नवख्या नटाने रंगमंचाच्या अंधाऱ्या अवकाशात प्रवेश करावा आणि अचानक त्याच्यावर सर्व अंगांनी प्रखर प्रकाशझोत यावा, त्याचे डोळे इतके दिपून जावेत की त्याला ते नीट उघडून सभोवताल पाहता येऊ नये असाच काहीसा अनुभव या कुटुंबाने घेतला आहे. प्रायोगिक वे व्यावसायिक रंगभूमी हे स्थित्यंतर तसं फार तर कनिष्ठ ते उच्च मध्यमवर्गीय याच काहीशा परिचित अवकाशातलं; परंतु हिंदी सिनेमातली प्रसिद्धी तर भिरभिरावून टाकणारी. ते अंगावर घेत, वागवत या कुटुंबाने कशी वाटचाल केली हे जाणून घेण्याची उत्सुकता होती. एवढी प्रचंड प्रसिद्धी आणि वलय लाभूनही अमरापूरकर कधी फिल्मी झाले नाहीत हे वाटतं तितके सोपे नाही. `खुलभर दुधाची कहाणी यातून ते उलगडणार होते... वाचायला सुरुवात केल्यावर ते खूप तपशीलवार आणि पसरटही वाटलं. पण वाचत गेलो तसतसं लक्षात आलं की, सुनंदाताईंनी चितारलेला परिसर तप‌शिलातल्या काही फरकाने आपलाही आहे. आपणच प्रत्यक्ष जगलेले, पाहिलेल वाचतो आहोत. साठ-सत्तर वर्षांपूर्वीच्या आमच्या शाळकरी वयापासून वाचलेल्या साहित्यातून हेच सर्व पाहत आलोय. आपल्या मुलांच्या आणि नातवंडाच्या पिढीला तर हा काळ अवकाश सर्वस्वी अपरिचित. हे त्यांच्यासाठीही आहे. आजच्या नव्या पिढीला 2000 चा चित्रपट जुना वाटतो, तेव्हा त्याआधीच्या त्यांच्या आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा यांच्या सिनेमाशी आपण जसा त्यांचा परिचय करून देतो तसंच आहे हे. शिवाय या कथनाच्या नायिकेने पुढे अपरिहार्य असं जे वळण गाठलं आहे, त्यासाठी हे आवश्यकच आहे. संथ लयीत सुरू झालेलं आणि काहीसं रेंगाळल्यासारखं वाटणारं गाणं उत्तरोत्तर हलक्याशा द्रुत लयीत समेवर यावं असं हे आत्मकथन आहे. तरीही पूर्वार्धावर थोडे अधिक संपादकीय संस्कार झाले असते, तर आवश्यक असणाऱ्या संथ लयीला रेंगाळावं लागलं नसतं. `प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते` या प्रसिद्ध उक्तीच्या पलीकडे इथे काहीतरी आहे. ही नायिका इथे केवळ एवढ्याच भूमिकेत नाही. ही भूमिका पार पाडताना तिने सर्व प्रकारे गांगरवून टाकणाऱ्या परिस्थितीतही स्वतःला जपलं, स्वतःमधल्या गुणांना जमेल तसं आणि तेवढं खतपाणी घालत जोपासलं आणि आपली म्हणून एक ओळख निर्माण केली. ज्या संपूर्णतः अकल्पित, अनपेक्षित जबाबदाऱ्या येऊन पडल्या, त्या लीलया पार पाडत तिने आपलं व्यक्तिमत्त्व जपलं. `मीच एकटीने सारं पहायचं` असा सतत तक्रारखोर धोशा लावत एखादी कर्कशा झाली असती; परंतु सुनंदाताईंचं तसं झालं नाही. म्हणून पुस्तक वाचून झाल्यावर फोनवर मी त्यांना एवढंच म्हणालो, `माउली, कुठून गं इतकी ऊर्जा आणलीस?` 1950 चं दशक, त्याआधीचा आणि नंतरचाही काळ तसा गरिबीचा आहे. समाजाच्या सर्व थरांत अभावग्रस्तता आहे. कसला अभाव आहे याचीही त्या काळ अवकाशाला जाण नाही. आहे ते गोड मानून घेत जगण्याचा हा काळ. या सामाजिक स्तराखाली असाहाय्यपणे जगणारा एक वर्ग आहे. त्याचीही वास्तपुस्त करण्याची गरज या वातावरणात आहे. परंतु सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे संस्कारक्षम घडण्याची, घडविण्याची, अभावग्रस्तता तिथे महत्त्वाची भूमिका बजावते. आपल्या या नायिकेला हे पर्यावरण लाभलं आहे. त्यांचे वडील मुलं लहान असतानाच गेले. नंतर घरही गेलं आणि मुलांना घेऊन आईला देवळात राहावं लागलं. आहे त्या परिस्थितीतून वाट काढावी या धारणेत सभोवतालच्या सुसंस्कृत वातावरणाचाही मोठा आधार होता. ते सारं मुळातून वाचण्यासारखं आहे. यात गरिबीतले दिवस, हलाखी, अभावग्रस्तता यांपेक्षा हे संस्कार सर्वांत महत्त्वाचे आहेत हे सहजपणे अधोरेखित केलेले आहे. वर ज्या ऊर्जेचा उल्लेख केलाय ती इथूनच सुनंदाताईंना मिळाली आणि म्हणूनच यशस्वी नवन्याच्या पाठीशी उभ्या राहताना त्या स्वतः सर्वप्रकारे यशस्वी ठरल्या आहेत. त्यांच्या आणि अमरापूरकरांच्या कथेला कुठून कुठे नेऊन ठेवणारं वळण शाळा-कॉलेजच्या वयातच आलं. नाटक ! अमरापूरकर म्हणजे नाटक आणि नाटक म्हणजे अमरापूरकर असं हे रसायन होतं. सुनंदाताईही नगरच्या त्या छोट्या नाट्यअवकाशात मनापासून वावरत होत्या. सोबत, साथ होती अमरापूरकरांची. परंतु हा माणूस स्वतःमधल्या रंगकर्मीत इतका खोलवर बुडालेला होता की, जिच्या तो प्रेमात पडलाय; तिलाही नाटकाची आवड आहे; नोंद घेण्याजोगे कलागुण आहेत, तिच्यातला कलावंत घडविण्यात मात्र त्याने रस दाखविला नाही. इतकंच नाही तर पुढे मुंबईत यश मिळविल्यानंतर, बऱ्यापैकी स्थिरस्थावर झाल्यानंतरही सुनंदाताईंनी `यशस्वी पुरुषामागे...` ची सर्व प्रकारची भूमिका यशस्वीपणे पार पाडल्यानंतर जेव्हा ऑफिसच्या नाटकात काम करायचं ठरवलं, तेव्हा यांनी त्यास ठाम नकार दिला. इथे पुस्तकातला एक प्रसंग आठवतो. नगरमध्ये नाटकाची तालीम चालली होती. अमरापूरकर खूप सिगरेट्स ओढतात म्हणून पाकीट लपवून ठेवण्यात आलं होतं. पण जसजशी तलफ अनावर होत गेली, तसतसे ते अस्वस्थ होत गेले. नाटकावरून त्यांचं लक्ष उडत चाललं होत. तेव्हा सुनंदाताईनी आपल्या पर्समध्ये लपवून ठेवलेल्या पाकिटातून दोन सिगरेट्स आणून दिल्या. हीच लग्ना आधीची प्रेयसी नंतर पत्नी, गृहिणीच्या भूमिकेतही त्याला असंच सांभाळते. अमरापूरकरांची नाट्यवेडापायी अडलेली त्यांची पदवी या पद‌वीधारक मुलीशी लग्न ठरल्यानंतर ते पूर्ण करतात. इथे लग्न पार पडतं आणि हे भाऊ म्हणतात, `मला पुण्यात राहून एम.ए. करायच आहे. ही बाई हो ला हो करते. नववधू म्हणून तक्रार करत नाही. शिक्षण पूर्ण करून नोकरी करणारी ही मुलगी नोकरीधंदा न करणाऱ्या मुलाशी लग्न करते. तो काळ आणि लहान गाव हे लक्षात घेतलं, तर कदाचित कल्पना येईल की किती अवघड होतं ते. यांचं भांडवल काय तर पिढीजात वाडा आणि व्यवसाय. बरं त्या व्यवसायात तरी सहभाग तर तोही नाही. दिवसरात्र एकच ध्यास. एकच नाद... नाटक पुढे मिळणारे अमाप यश आणि वैभव यांची काही अंशी तरी शक्यता आणवली असेल, तर तसंही काही नव्हतं. आपलं मानलं आणि निभावलं. असेल तर एक विचार मनाशी असेल आधार द्यायला, याची कलानिष्ठा सोळा आपणे सच ! तिथे अन्य गोष्टीला थारा नाही. ते मात्र खरंच होतं. अमरापूरकरांमधला अस्वस्थ रंगकर्मी त्यांना कायमचा मुंबईत घेऊन आला आणि मग सर्वाच्या वाट्याला येतो तसा स्ट्रगल करत ते आधी व्यावसायिक रंगभूमीवर अभिनेता, दिग्दर्शक म्हणून यशस्वी होता होता अनपेक्षितपणे सिनेमात जाऊन पोहोचले आणि `अर्धसत्य` नंतर रेस्ट इज द हिस्टरी असा पुढला प्रवास घडला. या आत्मकथनात तो तपशीलवार वाचायला मिळेलच. परंतु त्यात महत्त्वाचं आहे ते भाड्याच्या घरात पितळी स्टोव्ह आणून मुंबईतल्या संसाराला केलेली सुरुवात ते नंतर ऑडीसारख्या महागड्या परदेशी गाड्यांपर्यंत झालेला प्रवास... आणि त्याहीपेक्षा हे घबाड सहजपणे घेणं, हाताळणं, स्वतः सुनंदाताईंनी, अमरापूरकरांनी आणि त्यांच्या तीन मुलींनीही. एकीकडे हे वैभव आणि दुसरीकडे मध्यमवर्गीय साध्या राहणीचे संस्कार ! दस्तुरखुद्द अमरापूरकर तसेच होते, परंतु त्यांच्या प्रचंड बिझी शेड्यूलमध्ये घरच्या आघाडीवर निगुतीने सांभाळलं, निभावून नेलं ते सुनंदाताईंनी. बरं हे करता करता आपली नोकरीही सांभाळली. मुलींची शाळा- कॉलेज, त्यांची जडणघडण, इतर साऱ्या सांसारिक बाबी, अमरापूरकरांच्या वाढत्या उत्पन्नाचं व्यवस्थापन, त्यासाठी नेमावयाचा चार्टर्ड अकाउंटंट वगैरे. आणि हे सारं करताना जे जग कालपरवापर्यंत आपल्यापासून दूर होतं तिथे सहज शिरकाव करण्याची, तिथल्या स्टार मंडळींमध्ये बावरण्याची संधी असताना ते स्वतःहून दूर ठेवणं, आपल्या मुलींनाही त्याचं आकर्षण वाटणार नाही याची काळजी घेणं हे अवघड काम या माउलीने सहज केलंय. अशीच कमाल त्यांनी केली ती त्यांच्या आई, सासू- सासरे आणि अमरापूरकरांच्या घरातच असलेल्या आत्याबाई ताई यांच्या व्यक्तिरेखा, त्यांच्याशी असलेलं नातं आणि रोजचा संबंध यांविषयी लिहिताना. त्यातून त्या वेळचा काळ अवकाश आणि बदलता कौटुंबिक सामाजिक - पोतही सहजपणे दिसून येतो. सासरे म्हणजे घरातला अखेरचा शब्द हे मनाशी कायम मानलेलं. स्वीकारलेलं. परंतु एक वेळ अशी येते की, मागल्या पिढीतलं कुणी दुखावलं तरी त्याची क्षिती न बाळगता, नव्या पिढीला आपली वाट काढावी लागते. कारण तिच्या काळ - अवकाशाचा तो रेटा आहे. तो मागल्या पिढीला कळणे शक्य नाही. स्वतःचा विचार करण्याची ही प्रेरणा खऱ्या अर्थाने मार्गदर्शक ठरते. आणखी एक नोंद घेण्याजोगी गोष्ट म्हणजे, स्वतंत्रपणे स्वतःचं आयुष्य घडवणारी तरुण मुलगी कट्टर पुरुषसत्ताक सासरी जाते, तेव्हा तो विरोधाभास पेलणं किती अवघड असतं याचंही उदाहरण इथे प्रस्तुत होतं. या दरम्यान वेगळा विचार करणारा, सर्वांना समजून घेणारा संवेदनशील नवराही मधूनच नवरेपणा गाजवतो, पण अशा वेळी `आम्ही यांच्यासाठी एवढं करतो ,पण आमच्याबद्दल काही वाटत नाही` असा तक्रारखोर विचार दूर सारत आपलं काम करत राहणं यासाठी साधनाच लागली असेल. `स्वतःची समजूत घातली यापेक्षा `परिस्थिती नीट समजून घेतली` हा मा हा मार्ग पत्करला की सोपं होतं. मन शांत होतं. कडवटपणा तर कणभर राहात नाही. सर्जनशीलता आणि मनाचा प्रसन्नपणा ताजा टवटवीत राहतो. आणि मग आपल्याला जे करावंस वाटते ते करता येतं. त्याचं व्यवस्थापन सुचतं, जस सुनंदाताईंना त्यांच्या अनुवादाच्या कामाच्या नियोजनात सुचलं. घर आणि एकूणच कुटुंबाचे सर्व करताना त्यांना त्यांच्या लेखनासाठी वेळच काढता येईना, तेव्हा पहाटे लवकर उठून त्यांनी निवांत दोन तास काढले आणि आपलं काम केलं. एवढंच नव्हे तर कॉलेज, अभ्यास हे चाळीसेक वर्षे मागे पडल्यानंतर पुन्हा त्या मुंबई विद्यापीठात हजर झाल्या आणि मायथोलॉजीवरच्या एक वर्षाच्या घनघोर अभ्यासक्रमात स्वतःला झोकून दिलं आणि त्यात उत्तम गुण मिळवून पासही झाल्या. वयाच्या या टप्प्यावर घरगुती जबाबदाऱ्यांत, लेकींच्या बाळंतपणाचीही एकीचं तिकडे अमेरिकेत भर पडली. आरंभी मी म्हटले तस `कुठून आणते ही ऊर्जा ही माउली...!` असं करता करता आता कुठे स्वतः साठी वेळ मिळतोय असं वाटेवाटेपर्यंत अमरापूरकरांचं शेवट गाठणारं आजारपण सुरू होतं. आता पुन्हा नव्याने सारं नियोजन, आता दिवसाचा प्रत्येक क्षण त्यांची सेवा करण्यासाठी आणि त्यांच्यासोबत राहण्यासाठी. अमरापूरकरांची कामं कमी होत चालली होती. जिथून आयुष्याची सुरुवात केली, तिथे जाऊन तिथल्या घरात दोघांनी पुढली वर्ष काढायची असं ठरवता ठरवता तोच सारा वेळ मुंबईत हॉस्पिटलमध्ये काढावा लागला. नगरला पोहोचला तो अमरापूरकरांचा निष्प्राण देह... `खुलभर दुधाची कहाणी` ही एका समजदार आणि कर्तृत्ववान स्त्रीची कहाणी आहे. त्या कहाणीतून मला जाणवलेलं तिचं व्यक्तिमत्त्व अतिशय महत्त्वाचं आणि मोलाचं आहे. सुनंदा अमरापूरकर यांना सलाम! ...Read more