* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789386454973
  • Edition : 2
  • Publishing Year : MAY 2017
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 100
  • Language : MARATHI
  • Category : SCIENCE
  • Available in Combos :D.S.ITOKAR COMBO SET-13 BOOKS
  • Discount : OCTOBER EXHIBITION 2026(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WE ALL LIKE TO SEE THE GREENERY ALL AROUND US. SIMILARLY, MOST OF US WOULD LOVE TO UNDERSTAND MORE ABOUT THE PLANT KINGDOM AND THE SCIENCE BEHIND IT. ALL THE YOUNG READERS WOULD SPECIALLY LOVE TO KNOW ABOUT THE PLANTS VIA THE CONTENTS OF ‘PRAYOG-VANASPATI VIDNYANACHE’ (THE EXPERIMENTS TO UNDERSTAND PLANT SCIENCE). THE MANY ILLUSTRATIONS THROUGHOUT WILL HELP CHILDREN TO LEARN ABOUT PLANTS AND WILL ALLOW THEM TO DO SMALL EXPERIMENTS. THE BEAUTIFUL AND SIMPLE DRAWINGS WILL ENABLE THEM TO LEARN ABOUT THE VARIOUS PARTS OF PLANTS. A SEED, ITS STAGES, REPRODUCTION, GROWTH, ETC. ARE ALSO WELL EXPLAINED AND SUPPORTED WITH DIAGRAMS AND SIMPLE EXPERIMENTS. SPONGE FARMING IS A NOVEL CONCEPT INTRODUCED HERE. ‘POMATO’ WILL BE A COMPLETELY NEW CONCEPT WHERE A SINGLE PLANT WILL YIELD POTATO AS UNDERGROUND STEM AND TOMATO AS A FRUIT. THIS BOOK WILL HELP CHILDREN TO ENJOY VARIOUS EXPERIMENTS WITHOUT PURCHASING EXPENSIVE INSTRUMENTS OR SPENDING A LOT ON ANYTHING. THESE ALL CAN BE DONE OUT IN THE OPEN. A MUST BOOK FOR ALL THE GROWING YOUNGSTERS.
हिरव्या वनस्पती पाहणे कुणाला आवडत नाही? दृष्टीसुखाबरोबरच या वनस्पतींचे विज्ञान जाणून घ्यायला बाल दोस्तांना नक्कीच आवडेल. बालदोस्तांना हे विज्ञान सप्रयोग जाणून घेण्याची संधी मिळेल ‘प्रयोग – वनस्पती विज्ञानाचे’ या पुस्तकाद्वारे. वनस्पतींविषयी जाणून घेण्यासाठी त्यांचे प्रयोग कसे करावेत याचे सचित्र मार्गदर्शन या पुस्तकातून केले आहे. वनस्पतींचे अवयव आणि त्यांची रचना याविषयीची माहिती या पुस्तकातून मिळते. बियांचे पुनरुत्पादन असो किंवा बियांचे रुजणे किंवा त्यांचे अंकुरणे हे सगळे बाल दोस्तांना कळू शकते रंजक प्रयोगांतून. एक गंमत म्हणून स्पंज शेतीचा प्रयोगही या पुस्तकात सांगितला आहे. एकाच झाडाच्या मुळांना बटाटे आणि वरच्या भागाला टोमॅटो लागल्याचं नवल अनुभवायचं असेल तर ‘पोमॅटोचे झाड’ हा प्रयोग करा. असे अनेक प्रयोग या पुस्तकात समाविष्ट आहेत. हे सगळे प्रयोग करा महागड्या उपकरणांशिवाय आणि पर्यावरणाच्या खुल्या अंगणात. असे अनेक प्रयोग करण्यासाठी बालदोस्तांनी हे पुस्तक घेतलंच पाहिजे असं आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #PRAYOGVANASPATIVIDNYANACHE #PRAYOGVANASPATIVIDNYANACHE #प्रयोगवनस्पतीविज्ञानाचे #SCIENCE #MARATHI #ITOKARDS "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAMANA 15-04-2018

    वनस्पती विज्ञानाचे प्रयोग शालेय अभ्यासक्रमात अनेक विषयांसह केले जातात. भौतिक विज्ञानही मोठ्या प्रमाणात अभ्यासले जाते त्यात वनस्पतींची मुळे, खोड, पाने, फुले आणि फळे हे सारे घटक प्रयोगात असल्याने आपल्या आसपासच्या वृक्षवल्लरींचा उपयोग करून ज्ञान मिळवू शणाऱ्या विद्यार्थ्यांना अत्यंत आवश्यक आहे. मात्र हे सर्व प्रयोग रसायन शास्त्रप्रमाणे झटपट होत नाही उदाहरणार्थ बियांपासून पुनरुत्पादन. स्पंजवरील शेती, मुळे कशी वाढतात, बटाट्याने झाड वाढविणे, गाजराला कोंब फुटणे, पांढरे फुल रंगीत करणे, बोनसाय अशा प्रकारचे अनेक प्रयोग प्रत्यक्ष यशस्वी करण्यासाठी वाट पाहावी लागते. प्रतीक्षा करण्यासाठी मनाची तयारी हवी. लेखकाने आरंभी वनस्पतींचे वर्गीकरण करून, वनस्पतींचे अवयव आणि रचना सांगून एकूण प्रयोगांची व्यापकता समोर ठेवली आहे नंतर बिया कशा रुजतात, त्या कशा अंकुरतात. बियांची मुळे पाण्याकडे कशी वळतात, ती कशी वाढतात हे वाचल्यावर लक्षात येते की निसर्गप्रेमाची ही शिकवण फार गरजेची आहे. शालेय जीवनात ही दीक्षा मिळायला हवी, असे या पुस्तकावरून स्पष्टपणे जाणवते. याशिवाय प्रकाशाच्या गमती, प्राणवायू, रोपांच्या गमती, कलम करण्याचे प्रकार, नाकतोड्या, सुरवंट, फुलपाखरे आदींची माहिती मनोरंजक आहे. पाखरांची काळजी हा विषय तर रोजचाच आहे. -अरुण मालेगावकर ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 25-06-2017

    विज्ञानातल्या वेगवेगळ्या प्रयोगांबाबत डी. एस. इटोकर यांनी लिहिलेली ही पुस्तकं. विज्ञानाची तत्त्वं अतिशय छोट्या छोट्या प्रयोगाद्वारे त्यांनी समजावून दिली आहेत. काही प्रयोग तर अगदी घरात नेहमी सापडणाऱ्या वस्तूंचा वापर करून करता येतील. ‘प्रयोग वनस्पती वि्ञानाचे’ या पुस्तकात इटोकर यांनी वनस्पतींची मुळं, खोड, पानं अशा सर्व अवयावांशी संबंधित किंवा अनुषंगिक गोष्टींशी संबंधित प्रयोग दिले आहेत. पानाला असणारी छिद्रं, पाण्याकडं वळणारी बियांची मुळं, पानांचं ऑक्सिजन सोडणं अशा अनेक गोष्टी या प्रयोगातून माहीत करून घेता येतील. ‘विज्ञानातील रंजकता’ या पुस्तकात दृष्टीसातत्य, पृष्ठताण, गुरुत्वमध्य आदी तत्त्वांबाबतच्या प्रयोगांचा समावेश आहे. डोलणारा पक्षी, बाटलीतील पाणचक्की, वर चढणारा संकू, लाकडी नाव, हालचाल करणारं चित्र, चिकटणारं वर्तृळ, उडणारं बूच अशा अनेक गमतीदार वस्तूही तयार करून त्यांद्वारे विज्ञान शिकण्याची सुविधा या पुस्तकात उपलब्ध करून देण्यात आली आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
मिना हरीश सहारे, नागपूर.

कुठल्याही पुस्तकावर अभिप्राय देण्याची माझी ही पहिलीच वेळ असली तरी `दुर्दम्य` पुस्तक मनाला भिडल्यामुळे त्यावर लिहीणे मला आवश्यक वाटले. मी पण चरित्रनायक एकनाथनच्या विभागात सेवा दिली आहे. आमच्या सारख्यांना एकनाथन एक कडक तानाशाह ऑफिसर होता इतकंच माित होतं. पण लेखकाच्या नजरेतून जेव्हा त्याचे चरित्र वाचले तेव्हा तो खरा काय होता हे समजले. चरित्र वाचताना पूर्ण होई पर्यंत उत्सुकता कायम होती. कार्यालयीन जीवनातला कालखंड डोळ्यासमोर जिवंत होतो. वाचकाला खिळवून ठेवण्याचं कसब लेखकाच्या लिखाणात आहे.एकनाथन सारख्या विक्षिप्त, हेकेखोर व्यक्तीचा व लेखकाचा नक्कीच काहीतरी ऋणानुबंध असला पाहिजे. निवृती नंतरफिरून तीनदा लेखकाच्याच शहरात येणे हा योगायोग वाटत नाही. कथानकातील काही भागातील प्रसंग व घटना मजेशीर, गमतीदार वाटतात. कथेचा शेवट मनाला भिडून जातो. एका करारी, खंबीर माणसाचा अंत वाचताना मन भरून आले. पुस्तक पूर्ण केल्यावर शेवटी एक विचार आला की त्याचं मरण सुखदच झाले असे म्हणावे लागेल कारण एकाकीपणा जरी त्यांनी स्वतः निवडला होता तरी मृत्यूच्या बाबतीत भाग्याने त्यांची साथ दिली होती. त्यांच्या सारखे ताठ कणा व दुर्दम्य व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तिला परावलंबी, असहाय आयुष्य कधीच रूचलं नसतं आणि त्या नंतर आलेल्या करोना काळात त्यांचे काय हाल झाले असते त्याची कल्पनाच न केलेली बरी. कथानक वाचकाच्या मनाला भिडले यातच लेखकाचे यश आहे. पुढील लिखाणा करता शुभेच्छा. बाकी माझ्याकडून पुस्तकाचा दर्जा - खूप छान, बढिया आणि सुपर्ब... ...Read more

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
अनिल सहजे, नाशिक.

`कुलामामाच्या देशात’ हे पुस्तक म्हणजे जंगलातील अनुभवकथांचा एक विलक्षण रम्य प्रवास आहे. रवींद्र वानखडे यांच्या वनाधिकारी म्हणूनच्या प्रत्यक्ष अनुभवातून या कथा जन्माला येतात. प्रत्यक्षात घडलेल्या या कथा इतक्या रंगतदार आहेत की त्या काल्पनिक वाटाव्यात, अी त्यांची गंमत आहे. वानखडे यांच्या अनुभवांमधील कथाबीज अचूकपणे हेरून जी. बी. देशमुख यांनी त्यांना आपल्या रसाळ आणि खुमासदार शैलीत शब्दरूप दिले आहे. देशमुखांची शैली इतकी प्रवाही आणि ओघवती आहे की वाचक कथांमध्ये अक्षरशः गुंगून जातो. एकदा पुस्तक हातात घेतल्यानंतर ते पूर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेवावेसे वाटत नाही. वन हे सामान्य माणसासाठी तसे अपरिचितच क्षेत्र. जंगलातील जीवन, तेथील नियम-कायदे आणि जंगली श्वापदांचे विश्व याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. वानखडे-देशमुख द्वयी केवळ या अनोख्या जगाची ओळख करून देत नाहीत, तर त्याविषयी वाचकाच्या मनात विलक्षण कुतूहलही निर्माण करतात. ‘खुश रहेना मेरे यार’ आणि ‘महाकाय आकांत’ या दोन क्रमशः कथा तर विशेषतः चटका लावून जातात. त्या केवळ थरारक आणि अविश्वसनीय वाटाव्या अशा अनुभवांनी भारलेल्या नाहीत, तर जंगली श्वापदांची एक हळवी, माणुसकीच्या जवळ जाणारी बाजूही त्या प्रभावीपणे उलगडून दाखवतात. जी. बी. देशमुखांची खुमासदार, मिश्कील आणि रसाळ लेखनशैली वाचकाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुंतवून ठेवते. रवींद्र वानखडे यांच्या प्रत्यक्ष अनुभवांची सत्यता आणि देशमुखांच्या कथनकौशल्याचा सुंदर मिलाफ ‘कुलामामाच्या देशात’ घडवतो. हे पुस्तक केवळ जंगलातील अनुभवकथांचे संकलन राहत नाही, ते वाचकाला जंगलाच्या एका अनोख्या, रोमांचक आणि हळुवार विश्वाची सफर घडवते आणि नकळत सांगून जाते, ‘वनस्य कथा रम्यः!’ ...Read more